✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिपा कट्टा - ३० जुलै

क
किसन शिंदे यांनी
Mon, 08/01/2011 - 15:23  ·  लेख
लेख
मस्त रिमझिम पावसात 'शुध्द शाकाहारी कट्ट्यासाठी' स्वादमध्ये पोहचलो तेव्हा घड्याळात संध्याकाळचे ६:३० वाजले होते आणी नेहमीच्या सवयीप्रमाणे एकाही कट्टेकरयाचा तिथे पत्ता नव्हता. भराभर सगळ्यांना फोन करुन 'कोण कुठे अडकलय?' याचा अंदाज घेतला. '१ कप वाफाळता चहा आणी समोर भारताची बॅटींग' असा दुहेरी योग जिथे तुम्ही अनुभवाल तिथे बाकीच्या जगाचा विसर तुम्हाला नक्कीच पडेल, तसा मलाही पडला. मग रामदास काका त्यांनतर थोड्या फार फरकाने माझीही शॅम्पेन(हा 'तो' असावा कि 'ती' ह्या बद्दल मला नेहमी शंका पडत असे.) :) मला येवून जॉईन झाले. बरेच तर्क वितर्क करूनही शॅम्पेनराव आयडेंटिटी सांगायलाच तयार होईना, "सगळे जमा झाले कि मग खुलासा करतो." असं सांगुन उगाचच आमची उत्सूकता वाढवत होते. एकीकडे गप्पा मारता मारता दुसरीकडे बटाटेवड्यावर ताव मारण्याचे उद्योगही चालू होते. रिकाम्या झालेल्या बटाटेवड्याच्या प्लेट्स पाहायला मग मिपाचे तरुण रक्ताचे(कि गरम डोक्याचे) :) लेखक स्पा यांचे आगमन झाले, मग त्यांच्या मला 'हे नको ते नको' करण्याच्या भानगडींमूळे त्या वेटरच्या चेहरयावरचे भाव 'मग बोर्नवीटा आणून देवू का?' असे झाले होते. एव्हाना लाईट्स गेल्याने आम्ही मग रस्त्यावर येवून उभे राहिलो त्याच वेळेस मेहदंळे काका त्यांच्या नेहमीच्या 'कुर्ता पायजमा आणी खांद्यावर शबनम' या पेहरावात न येता चक्क जीन्स आणी टी-शर्ट या वेशात आले होते त्यामुळे त्यांच्या मागोमाग आलेल्या प्राचीचाही बराच गोधंळ उडाला. निदे आणी मस्त कलंदर हे जोडपंही पाठोपाठ आल्याने आम्ही सर्व पुन्हा एकदा आत जावून बसलो आणी गप्पांचा फड पुन्हा रंगात आला त्यात गगनविहारी आम्हाला येवून सामील झाले. मिसळपाव आणी बटाटेवड्यांचा आस्वाद घेता घेता चर्चा जोरात रंगली होती......सुड, मिका, इंटरनेटस्नेही, लीमाऊजेट अशी मंडळी अजूनही यायची बाकी होती. मकमावशीच्या चेहरयाकडे बघून तुम्हाला काय वाटतं?.....उत्तर सांगा बक्षीस जिंका! झणझणीत मिसळपाव! अजून एक फोटो.. :) कट्ट्याला शुभेच्छा देण्यासाठी मध्येच बिपीनदा आणी परा यांचेही फोन येवून गेले. शेवटी थाळीची वेळ झाल्याने आम्ही खाली बेसमेंटकडे निघालो त्याचवेळी सुधांशू आणी इंटरनेटस्नेही हे दोघेही येवून आम्हाला जॉईन झाले. लीमाऊ आणी मिकांचा अजूनही पत्ता नव्हता. बेसमेंटमधल्या ह्या पेंटीगवरुन काकांनी इथे मिपावर वदनी कवळ घेता नावाचा लेख बरयाच दिवसांपुर्वी टाकला होता. बेसमेंटला गेल्यावर इंट्या सर्वात शेवटी आल्याने सगळ्यांना ओळाखायला सांगून त्याची ओळख परेड चालू केली. मकीकडे बोट करुन "लीमाऊजेट का?" असं विचारणं इथपर्यंत तर सगळं ठिक होतं पण रामदास काकांकडे निर्देश करुन "हे नक्कीच विजूभाऊ असणार" असं त्याने बोलताच संपूर्ण बेसमेंटमध्ये जोरदार हास्याचे फवारे उडाले. रामदास काकांच्या अर्धवट राहीलेल्या बरयाच लेखांची चर्चा झाली त्यावरुनच मग धंद्याचा पुढील भाग काकांनी सर्वांना सांगीतला. स्वादची शुध्द शाकाहारी थाळी! डावीकडून प्राची, मस्त कलंदर, निदे, गवि, रामदास काका, जॅक स्पॅरो(स्पावड्या), किसन शिंदे, विमे, सुड, इंटरनेटस्नेही आणी माझीही शॅम्पेन. मंडळींच जेवण होऊन टेबलही मोकळा झाला होता....बरयाच उशीरने माऊताई त्यांच्या यजमानांसोबत आल्या होत्या, डावीकडे वरच्या बाजुला त्यांच जेवण चाललयं....कन्या आजारी असल्याने मिकांना यायला जमलं नव्हतं. सर्वात शेवटी सुडने डब्यातून भाजणीचे वडे न आणता हे आणलं होतं, काय दिसतय??? ढोकळा!! छॅ, तो ढोकळा नसून पनीर बर्फी आहे. 'फोटोसहीत पाकक्रुती लवकरच टाकण्यात येईल' अशी जाहीर घोषणाही लगेच करण्यात आली. बर्फी खावून यंग जनरेशन दात दाखवतय..:D शेवटी हॉटेल बंद होण्याची वेळ झाल्याने सगळ्यांना आवरते घ्यावे लागले. :( पावसाची रिमझीम चालूच होती आणी सगळ्यांनी एकमेकांचे निरोप घेतले.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
अनुभव
माहिती
आस्वाद
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
13305 वाचन

💬 प्रतिसाद (89)

प्रतिक्रिया

पावसाने घात केला. घराबाहेर

विजुभाऊ
Mon, 08/01/2011 - 15:34 नवीन
पावसाने घात केला. घराबाहेर पडणे मुश्कील होतं मला त्या दिवशी. तसा फोन सुद्धा केला होता रामदास काकाना. पण तुमची मयफील झकास जमली होती असे एकुणच जाणवतय. मिस केलं बरंच काही
  • Log in or register to post comments

असंच म्हणतो....

प्रास
Mon, 08/01/2011 - 15:50 नवीन
पण घरातून बाहेरच होतो. वाहतुक मुरांब्यामुळे ना घरका ना कट्टेका अशा लटकत्या अवस्थेत राहिलो. x-( दुपारी वसई तिथून येताना वाहतुकीत २ तास, मग घोडबंदर रोडवर पाऊण तास, मग बोरिवलीला गाडी पकडायला जाताना पाऊण तास मग मध्येच वाहतुकीमुळे मिरारोड स्टेशनला जाण्याचा निर्णय घेतला तर तिथे पोहोचायला अर्धा तास. आमचं सालं गणितच फिसकटलं. फास्ट ट्रेनने दादरात पोहोचेतो साडे आठ. साडेपाच सहा तासाचा खोळंबा करून फक्त घरी पोहोचू शकलो. :-( अगली बारी म्हमईमेच करेंगे कुछ दोस्तों..... सदस्यांनी कट्टा एंजोय केलेला बघून आनंद झाला आणि स्वादची अमर्यादित थाळी बघून प्रचंड जळजळ. मला आता ताबडतोब "प्रवाळ पंचामृत रस" वाळा घातलेल्या पाण्याबरोबर गिळायला निघालं पाहिजे..... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

जोरात

ऋषिकेश
Mon, 08/01/2011 - 15:37 नवीन
अरे वा जोरात कट्टा झालेला दिसतोय! दोन चार वगळता सगळे नेवे चेहरे बघुन मिपा प्रगती करतंय ही खुणगाठ पक्की झाली :) बाकी शेवटाच्या 'यंग जनरेशन्च्या' फोटोतून मक-निदे गायब झालेले दिसले हे निरिक्षण नोंदवले जावे :प
  • Log in or register to post comments

निरीक्षणाशी सहमत. साक्षात

बिपिन कार्यकर्ते
Mon, 08/01/2011 - 15:54 नवीन
निरीक्षणाशी सहमत. साक्षात मकमावशींचीच खोडी काढली राव! डेरिंग आहे! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

तु काय

आनंदयात्री
Mon, 08/01/2011 - 21:45 नवीन
तु काय काड्या टाकतोस रे बिकाका ? बाकी यंग जनरेशनमधुन चाईल्ड जनरेशन मध्ये आणलेस असे वाटायला जागा आहे .. हा फोटो बघा, कसे एकदम छान "शाळेला चाल्लो आम्ही !" सारखे छान पावडर टिकली करुन आलेत, निदे अगदी आईनी पाडुन दिलेला भांग स्टाईल भांग पाडुन आलाय. मस्त रिजुनिवेटेड फ्रेश दिसतायेत दोघे :) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

मलाही वगळलेय की सफाईने यंग

गवि
Mon, 08/01/2011 - 15:56 नवीन
मलाही वगळलेय की सफाईने यंग जनरेशनमधून... -(क्रुद्ध) गवि. बाकी नवनवीन सभासद मित्र इन्क्लुडिंग मैत्रिणीसुद्धा, याव्यात हाच हेतू होता. पराभाऊ ठाण्यात असूनही आले नाहीत म्हणून निषेध.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

पराभाऊ ठाण्यात .....

कुंदन
Mon, 08/01/2011 - 17:39 नवीन
ऑ , खरे की काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अरे ऋषिकेशा...

मस्त कलंदर
Mon, 08/01/2011 - 22:01 नवीन
यंग जनरेशन म्हणून 'उमेदवारी' जाहिर केलेल्यांचा फोटो टाकलाय र त्याने. समजून घे रे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

बरं झालं

सुनील
Mon, 08/01/2011 - 15:40 नवीन
हम्म. तर कट्टा (रद्द न होता) झाला, हे पुराव्यानिशी शाबीत तर झालं! वर्णन छान पण अजूनही खुलवता आलं असतं. फोटो फ्लिकर वरून टाकले नाहीत का? (कारण मला ऑफिसमधून चक्क दिसताहेत!)
  • Log in or register to post comments

>>हम्म. तर कट्टा (रद्द न

विश्वनाथ मेहेंदळे
Mon, 08/01/2011 - 23:41 नवीन
>>हम्म. तर कट्टा (रद्द न होता) झाला.. झाला म्हणजे काय होणारच होता. रद्द झाला वैग्रे हे विनोद म्हणून किंवा उपरोधाने लिहिले होते. हल्ली लहान मुलांना कळणारे विनोद मोठ्यांना कळेनासे झाले आहेत हो. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

असं कै नै. मलाही आधी वाटलं की

रेवती
Mon, 08/01/2011 - 23:49 नवीन
असं कै नै. मलाही आधी वाटलं की काहीतरी भांडणं होवून कट्टा रद्द झाला. कोणत्या हाटेलात करायचा यावरून काही चर्चा रंगली नव्हती होय? पिणार्‍यांना जरा साध्या कट्ट्याची अ‍ॅलर्जी आहे असं वाटत होतं म्हणून मी तिथे प्रतिसाद देणार होते की अश्या कट्ट्याला मुली कश्या येणार? आजकाल कुणाचं काय सांगावं? ओले कट्टे करताना तिथे महिलांचा सहभाग नको असे सांगितल्यासारखेच अस्ते. मिपाचे म्हणून जे कोणते कट्टे होतील त्यात स्रीयांनाही येण्याजाण्याची तेवढीच मोकळीक असली पाहिजे. नाहीतर आपापसात फोनवून तुम्ही प्रायव्हेट कट्टे करत चला. (हा प्रतिसाद तिथे दिला नव्हता हे इथे सांगते आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

ताई... तुमच्या हाती लाटणे आहे

प्राजु
Tue, 08/02/2011 - 01:47 नवीन
ताई... तुमच्या हाती लाटणे आहे असे का दिसते आहे मला? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

आज जरा वेळ होता म्हणून

रेवती
Tue, 08/02/2011 - 03:54 नवीन
आज जरा वेळ होता म्हणून उनाडक्या करत होते. प्रतिसाद दिल्यावर मलाही तो जरा जास्तच वाटला पण नंतर वेळ मिळाला नाही म्हणून दुरुस्ती राहून गेली. असो. तुम्ही आजकाल मिस्ड कॉल्सकडे दुर्लक्ष करता वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

हॅहॅहॅ!!! छान छान!!! चार घटका

बिपिन कार्यकर्ते
Mon, 08/01/2011 - 15:52 नवीन
हॅहॅहॅ!!! छान छान!!! चार घटका आनंडात गेल्या म्हणायच्या!!!
मकमावशीच्या चेहरयाकडे बघून तुम्हाला काय वाटतं?.....
'वाट लागली निख्याची!' असं वाटलं
उत्तर सांगा बक्षीस जिंका!
पाठवून द्या! @ प्राची : बाईंच्या अगदी जवळ बसलीयेस... जेवण गेलं ना नीट? का इथेही धपाटेच खावे लागले?
  • Log in or register to post comments

बिका,कॉलेज संपलं आता,मग कशाला

प्राची
Mon, 08/01/2011 - 18:10 नवीन
बिका,कॉलेज संपलं आता,मग कशाला भिती? आता मकी मॅम मिपाकर फ्रेंड झाल्यात. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

कट्टा खतरनाक झाला जम धमाल

स्पा
Mon, 08/01/2011 - 16:03 नवीन
कट्टा खतरनाक झाला जम धमाल आली... नेहमी प्रमाणे रामदास काकांनी ५ मिनिटात सूत्र त्यांच्या हातात घेतली.. आणि बर्याच अनुभवांची पोतडी उलगडली गेली धमाल सुरूच होती.. पावसाने खो घातल्याने जरा मेम्ब्रांची संख्या रोडावली , पण हरकत नाही , पुढच्यावेळी जास्त धमाल करू बाकी, बिपिंदांनी मधेच फोन करून "खास त्यांच्या शैलीत" शुभेच्छा दिल्या . जेवण झकास होतच, पण सूड ची "पनीर बर्फी" कहर होती... पोटात जागा असती तर अजून हादडली असती :)
  • Log in or register to post comments

किसन. अरे जाम मजा आली. अजून

गवि
Mon, 08/01/2011 - 16:06 नवीन
किसन. अरे जाम मजा आली. अजून बरंच काही लिहिलं नाहीयेस तू. यावेळी स्वादचा हॉल जणू एक्स्क्लुझिव्ह आपल्यालाच मिळाला. एकही इतर कस्टमर आला नाही. त्यामुळे अडीच तीन तास स्वादच्या आतच गप्पांची मैफिल जमवता आली. उगीच रस्त्यात येऊन उभे रहावे लागले नाही. रामदासकाकांनी गप्पांमधे भन्नाट रंगत आणली. धंदाचा पुढचा भाग एखाद्या सिनेमाच्या प्रीमियरप्रमाणे किंवा निमंत्रितांच्या खास शो प्रमाणे प्रथम ऐकायला मिळाला. त्यांची कथनशैली अद्भुतच आहे. कट्ट्याला सुरुवातीला काहीसे टीसीएस कट्ट्याचे स्वरूप येऊ घातले असतानाच बहुधा रामदासकाकांनी की आणि कोणीतरी ते तातडीने आवरले ;) गप्पांमधे हास्यस्फोटांनी आणि एकूण दंग्याने वरचे कर्वेमालक खाली येतील अशी भीती वाटत होती. पण त्यांनी ग्राहकभिमुख धोरण राबवून हे सर्व चालवून घेतले, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. :) डाळिंबी उसळ आणि टॉमॅटो सार झकास होते. अळूचे फदफदे असते तर जास्त मजा आली असती. असाच कट्टा लवकर पुन्हा होवो. नेक्स्ट टाईम महेश लंच होम असे सूचित करतो.
  • Log in or register to post comments

कामातून वेळ काढून लिहलाय हो

किसन शिंदे
Mon, 08/01/2011 - 16:09 नवीन
कामातून वेळ काढून लिहलाय हो गवि, जरा समजून घ्या की. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अरे हो रे किसन

गवि
Mon, 08/01/2011 - 16:29 नवीन
अरे हो रे किसन मित्रा.. उत्तमच लिहीले आहेस. काही काही राहिले म्हणजे जे लिहीलेय ते उणे नव्हे.. माझ्या म्हणण्याचा अर्थ की बर्‍याच मजेदार गप्पागोष्टी घडल्या आणि त्या सगळ्या वृत्तांतात पकडणे शक्य नाही याची जाणीव आहे रे. :) फोटो पण झकास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

अजून बरंच काही लिहिलं नाहीयेस

बिपिन कार्यकर्ते
Mon, 08/01/2011 - 16:16 नवीन
अजून बरंच काही लिहिलं नाहीयेस तू.
कट्ट्याला न येताही सहमत. याहून जोरदार झाला असणार कट्टा!
धंदाचा पुढचा भाग एखाद्या सिनेमाच्या प्रीमियरप्रमाणे किंवा निमंत्रितांच्या खास शो प्रमाणे प्रथम ऐकायला मिळाला.
पाठीमागं लायनीत हुबं र्‍हावा मालक! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

माझीही शॅम्पेन(हा 'तो' असावा

माझीही शॅम्पेन
Mon, 08/01/2011 - 16:43 नवीन
माझीही शॅम्पेन(हा 'तो' असावा कि 'ती' ह्या बद्दल मला नेहमी शंका पडत असे :) मला येवून जॉईन झाले. बरेच तर्क वितर्क करूनही शॅम्पेनराव आयडेंटिटी सांगायलाच तयार होईना, "सगळे जमा झाले कि मग खुलासा करतो." असं सांगुन उगाचच आमची उत्सूकता वाढवत होते.
आमचा पहिला पब्लिक अपियारंस असल्याने थोडा भाव खावून घेतला इतकच आणि अहो किसन्शेथ तुम्ही आम्हाला ओळखल नाहीच , बहुधा क्लू दिल्या नंतर तुम्ही भ्रमण-ध्वनी वरून धाग्यावर आलेल्या प्रतिक्रियेवरून अंदाज बांधला :) आणि हो मी पण मकना ओळखू शकलो नाही ! ओळख परेड चालू असताना विमे काकांनी स्वतःबद्दल आणखी काही माहिती सान्ग (म्हणजे बचेलर कि लग्न) अस सूडला सांगताना , प्राचीने म्हणजे विमे काकानंच कोणी तरी स्वतःला विचारायला हवाय अस म्हणून षटकार मारला :)
कट्ट्याला सुरुवातीला काहीसे टीसीएस कट्ट्याचे स्वरूप येऊ घातले असतानाच बहुधा रामदासकाकांनी की आणि कोणीतरी ते तातडीने आवरले
अगदी अगदी लगेच टीसीएस च्या आय-टी हमालांनी कंपू-बाजी सुरु केली ...पळा आता :)
डाळिंबी उसळ आणि टॉमॅटो सार झकास होते. अळूचे फदफदे असते तर जास्त मजा आली असती
ह्या यादीत कोथिंबीर वाड्या पण घाला ! आणि ताटात आलेली रबडी एकदम खल्लास होती किसान चं लिहिले आहेस ! फोटो सगळे छान आले आहेत (छोट्या वड्यांचा फोटो विसरलो वाटत आपण काढायला)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

ह्या यादीत कोथिंबीर वाड्या पण

गवि
Mon, 08/01/2011 - 16:48 नवीन
ह्या यादीत कोथिंबीर वाड्या पण घाला ! आँ.. ?? कोथिंबिर वड्या? ..माझ्यापर्यंत कशा नाही आल्या त्या? की तुम्ही आधीच खाऊन बसला होतात सगळे..? हे चुकीचे झाले... :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

त्याला म्हणायचयं अळूच्या

किसन शिंदे
Mon, 08/01/2011 - 17:03 नवीन
त्याला म्हणायचयं अळूच्या फदफद्यांसोबत कोथींबीर वड्याही असायला हव्या होत्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

त्याला म्हणायचयं अळूच्या

माझीही शॅम्पेन
Mon, 08/01/2011 - 23:44 नवीन
त्याला म्हणायचयं अळूच्या फदफद्यांसोबत कोथींबीर वड्याही असायला हव्या होत्या.
होय ! बरोबर !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

त्याला म्हणायचयं अळूच्या

माझीही शॅम्पेन
Mon, 08/01/2011 - 23:44 नवीन
त्याला म्हणायचयं अळूच्या फदफद्यांसोबत कोथींबीर वड्याही असायला हव्या होत्या.
होय ! बरोबर !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

चालतंय रे किश्न्या ... डोंट

स्पा
Mon, 08/01/2011 - 16:11 नवीन
चालतंय रे किश्न्या ... डोंट वरी :)
  • Log in or register to post comments

व्व्वा झकास की

पियुशा
Mon, 08/01/2011 - 16:13 नवीन
व्व्वा झकास की :)
  • Log in or register to post comments

सुक्ष्म. ...

५० फक्त
Mon, 08/01/2011 - 16:21 नवीन
तुम्ही कट्ट्याला सुक्ष्मरुपाने हजर होता असे इंट्याने सुडच्या खवत लिहिलेले स्पावड्याने वाचले म्हणे, खरे की काय.. ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

हा प्रती कोना सन्दर्भात

पियुशा
Mon, 08/01/2011 - 16:59 नवीन
हा प्रती कोना सन्दर्भात लिहिलाय तुम्ही ५० फक्त ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

मस्त रे लई भारी कट्टा झालेला

५० फक्त
Mon, 08/01/2011 - 16:14 नवीन
मस्त रे लई भारी कट्टा झालेला आहे. बरेच नवे चेहरे दिसले या वेळी किंवा काही जुनेच चेहरे नव्याने दिसले. @ सुड- पनीर बर्फी कोरईगडाला आणली असती तर, उपास नव्हता त्या दिवशी आमचा. @ ईंटया - ट्रेक आणि कट्टॅ करुन लवकरच सुधरातोय. @ स्पा - प्रत्येक फोटोत कोप-यात का रे तु, तुझा फोटो कुणी शादी.कॉम ला नाय चढवणार. @ प्रास - येवढ्या वेळात पुण्याला आला असतास, तिथुन. असो. पुढचा कट्टा मुंबईत करु तेंव्हा भेटुच. (स्पावड्या ब्लु कोरलला चवकशी कर रे जरा,) माझे दोन कट्टे मिस झालेत या पुढच्या कट्ट्याला नक्की, पावसाळ्यानंतर असेल तर माझ्या रेड मर्क्युरीला घेउन.
  • Log in or register to post comments

मस्त मजा केलीत राव. आम्ही

यकु
Mon, 08/01/2011 - 16:19 नवीन
मस्त मजा केलीत राव. आम्ही इकडे एकसमयावच्छेदेकरुन कट्टा जमवण्याची तयारी केली होती... पण प्रा. डाँ.च्या भेटीस जाता आले नाही.. मग गंडले सगळे आणि रेग्युलर ;-) कट्टा झाला. आता पुढच्या वेळी चलो पुणे..!!!! यासाठी प.रा., धमाल मुलगा, गगनविहारी, विजुभौ, स्पावड्या, सुधांशू या मंडळींनी पुढाकार घ्यावा.. प्रा. डॉ. व मी इकडून येऊ.. कसं म्हणता?
  • Log in or register to post comments

सोज्वळ कट्टा छानच झाला

गणपा
Mon, 08/01/2011 - 16:21 नवीन
सोज्वळ कट्टा छानच झाला म्हणायचा. :) @ रामदास काका प्रिमियर झाला ना दणक्यात. मग आता झळकवा की चित्रपट 'आम' आदमीसाठी बोर्डावर. :)
  • Log in or register to post comments

>>>सोज्वळ कट्टा छानच झाला

प्यारे१
Mon, 08/01/2011 - 16:33 नवीन
>>>सोज्वळ कट्टा छानच झाला म्हणायचा. उगाच 'सोज्वळ लोकांचा कट्टा छानच झाला म्हणायचा' असे वाचले आणि उडालो. परत वाचून 'जिमिणी'वर आलो. बाकी काही लोक अकाली वृद्ध का वाटायलेत ब्वा? (काका 'काका'च असल्याने ते सोडून ;) ) इतक्यात झालेलं अथवा होऊ घातलेलं लग्न तर कारणीभूत नाही ना? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

छान!!!! मस्त च फोतो न

मुलूखावेगळी
Mon, 08/01/2011 - 16:37 नवीन
छान!!!! मस्त च फोतो न वर्णन सगळ्यांनी मज्जा केली आहे हे दिसतेय. पुढील कट्ट्याला शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments

लै भारी फटु अन वृत्तांत.....

कुंदन
Mon, 08/01/2011 - 16:59 नवीन
३० ला च दुपारी मुंबईहुन निघालो दुबै साठी त्यामुळे हजर नाही राहता आले. पुढच्या वेळी जरुर प्रयत्न करीन.
  • Log in or register to post comments

तू अजूनही जातोस ठाण्यात? !

बिपिन कार्यकर्ते
Mon, 08/01/2011 - 17:08 नवीन
तू अजूनही जातोस ठाण्यात? ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

मस्त कट्टा झालेला दिसतोय...

मदनबाण
Mon, 08/01/2011 - 17:12 नवीन
मस्त कट्टा झालेला दिसतोय... :) कट्ट्याला येता आले नाही याचे लयं वाईट वाट्टतया... :(
  • Log in or register to post comments

सुडक्या, तुला अजुन कुणी गळ

वपाडाव
Mon, 08/01/2011 - 17:23 नवीन
सुडक्या, तुला अजुन कुणी गळ नाही का रे घातली? नाही म्हटलं इतका सुरेख (वर सांगितल्याप्रमाणे) सैपाक येतो ना तुला.... प्वरिवांची लैन लागली असंन घरासमोर.... येका (जर ईमाने इतबारे जगलास तर नाहीतर सगळ्यांचे आयौष्य बर्बाद) प्वरीचं नशीब खुलणार हय.... बाकी :: फुडच्या येळेला कट्ट्याला यणार... यणार म्हंजी यणार...
  • Log in or register to post comments

>>प्वरिवांची लैन लागली असंन

प्राची
Mon, 08/01/2011 - 18:05 नवीन
>>प्वरिवांची लैन लागली असंन घरासमोर.... >>येका (जर ईमाने इतबारे जगलास तर नाहीतर सगळ्यांचे आयौष्य बर्बाद) प्वरीचं नशीब खुलणार हय.... होय तर..त्या प्वरीपण कुठल्या माहितीए? देवरुखच्या,रामदास काकांन्नी सांगितल्याप्रमाणे.. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

ओ बै...काय काय घडलं हुतं जरा

वपाडाव
Mon, 08/01/2011 - 18:52 नवीन
ओ बै... काय काय घडलं हुतं जरा इस्कटुन सांगता का? हितं शक्य नसंन तर व्यनि करा / खवमदी सांगा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची

रामदासकाकांनी सूडला सांगितलं

प्राची
Mon, 08/01/2011 - 22:19 नवीन
रामदासकाकांनी सूडला सांगितलं की,देवरुखच्या मुली फारच सुंदर असतात असं म्हणतात.यावर सूड जरासा लाजला. मग काही वेळाने सूडनेच कमेंट मारली की,गोर्‍या आणि घार्‍या डोळ्यांच्या मुली जरा जास्तच ताठ असतात. सूड तर गुढग्याला बाशिंगच बांधून बसलाय.रेवतीताई लवकर मनावर घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

मी कधीच मनावर घेतलय

रेवती
Mon, 08/01/2011 - 22:48 नवीन
मी कधीच मनावर घेतलय प्राची! किर्तनाला जाते आणि गोदाक्का, पार्वतीआजी, यशोदाक्का यांच्या नाती देवळात आज्ज्यांना गाडीतून आणून सोडताना बघते. स्पा, सुधांशुला कितीवेळा सांगितलं तर ही आजकालची मुलं तिकडं फिरकत नाहीत मुळी. देवावर विश्वास नाही म्हणे! अरे देवीवर बरा विशवास आहे तुमचा? आँ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची

काकू जपून हां!!! एवढी सगळी

बिपिन कार्यकर्ते
Mon, 08/01/2011 - 22:57 नवीन
काकू जपून हां!!! एवढी सगळी लग्नं एकदम निघाली तर तुम्हालाच उभं रहायचं आहे कंबर बांधून...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

'' यांच्या नाती देवळात

५० फक्त
Tue, 08/02/2011 - 00:15 नवीन
'' यांच्या नाती देवळात आज्ज्यांना गाडीतून आणून सोडताना बघते. स्पा, सुधांशुला कितीवेळा सांगितलं तर ही आजकालची मुलं तिकडं फिरकत नाहीत मुळी'' रेवतीआजी, त्या नाती नंतर गाडीतुन कुठं जातात माहितेय का ? सुड सांग रे तुला कट्ट्याला यायला उशिर का झाला ते, कुणाची नात होती गोदाक्काची का यशोदाजींची? जिच्या गाडिनं वसईला दोन तास, घोडबंदर रोडला अर्धा तास ट्रॅफिक जाम केला, तु सुखी गाडीत अडकलास पण प्रास बिचारा येउ शकला नाहि त्यामुळं ते. अरे किमान त्याला गाडित तरी घ्यायचं कि रे, बसला असता गप्प, काहि बोलला नसता कुठं, हो कि नाय रे प्रास , नसतास ना दिला त्रास गोदाक्कच्या नातीला, मग. .. आणि रेवतीआजी, गाडीचं लायसन मिळतं १८ व्या वर्षी, या पोरांना आता कुठं सोळावं लागलंय, हो ना रे ईंट्या.?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

रेवतीआज्जी.... अशा नाती इकडे

वपाडाव
Tue, 08/02/2011 - 09:04 नवीन
रेवतीआज्जी.... अशा नाती इकडे (पक्षी : भारतात) कुठे बघायला/भेटायला मिळतील ??? (मिळतील का?) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

गोदाआज्जींची

सूड
Tue, 08/02/2011 - 09:54 नवीन
गोदाआज्जींची ......गोदाआज्जींचीच नात ती !! तिच्याच गाडीनं ट्रॅफिक जॅम झाला. तो पार्वतीआज्जींचा केतन आणि ती रंगीत पाण्याच्या बाटल्याच मिरवत होती गाडीत. त्यांच्या मागच्याच गाडीत मी होतो, पण हा प्रकार बघून डोळे इतके दिपले की प्रास भाऊ दिसलेच नाही. बघ हो रेवतीआज्जी इतकं कौतुक करतेस त्या मुलींचं, कशा आहेत त्या सर्व गावाला ठावकी आहे. ;) ५० फक्त तुम्हीच बोललात म्हणून बरं हो, एरवी माझं बोलणं नसतं खरं वाटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

रेवती आजी

स्पा
Tue, 08/02/2011 - 09:58 नवीन
रेवती आजी Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

ओ ओ हो!

प्रास
Tue, 08/02/2011 - 12:19 नवीन
हे अस्सं होतं होय? नि मी बापडा त्या बिचार्‍या पावसाला 'श्या' घालीत व्हतो..... मी मागच्या सिटवर डोळे मिटून एकदम गप गुमान बसून र्‍हायलो असतोय..... शहाण्यासारखा....!! :-) सुडा, मी दिसलो नाही म्हंजे ठार आंधळाच असावास लेका...! माझ्या डिस्प्ले चित्रातून तरी ओळखायचंस ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

अभ्यास कमी पडतोय प्राची...

मस्त कलंदर
Mon, 08/01/2011 - 18:58 नवीन
बदलापूरच्या मुलींबद्दल रामदासकाकांनी काय सांगितलं ते ऐकलं नाहीस वाट्टं!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची

गावाच्या

चतुरंग
Mon, 08/01/2011 - 20:15 नवीन
नावातच 'बदला' आहे तर! ;) -रंगा खुद के साथ बातां - रंग्या, मार खायची लक्षणं आहेत हा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा