✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मिपा कट्टा रद्द

स
सूड यांनी
Mon, 07/25/2011 - 17:53  ·  लेख
लेख
धन्यवाद.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
16008 वाचन

💬 प्रतिसाद (105)

प्रतिक्रिया

शुबेश्शा! इक् डं बी कट्टे करा

यकु
Mon, 07/25/2011 - 17:58 नवीन
शुबेश्शा! इक् डं बी कट्टे करा की राव कधी. :(

.

इंटरनेटस्नेही
Wed, 07/27/2011 - 18:08 नवीन
.

शुभेच्छा!

सुनील
Mon, 07/25/2011 - 19:24 नवीन
शुभेच्छा! सविस्तर वृत्तांत टाकायला विसरू नका!

अर्थात येणे नक्कीच

स्पा
Mon, 07/25/2011 - 19:25 नवीन
अर्थात येणे नक्कीच

पुण्याला नाहि गेलो तर

गणेशा
Mon, 07/25/2011 - 19:33 नवीन
पुण्याला नाहि गेलो तर येण्याचे फिक्स ... फोन करेन तसा. तरी फक्त शाकाहारी का म्हणुन हो ..निदान दोन्ही मिळेल ते हॉटेल बघा की राव.

येतो.

विजुभाऊ
Mon, 07/25/2011 - 20:06 नवीन
येतो.

अरे कोणीतरी लॅपटॉपची सोय

आत्मशून्य
Mon, 07/25/2011 - 20:30 नवीन
अरे कोणीतरी लॅपटॉपची सोय करा... लोक्स व्हर्चूअली हजर रहयला मिळालं तर बरं होयल असं म्हणताहेत...

+१

यकु
Mon, 07/25/2011 - 20:32 नवीन
सहमत लॅपटॉप घेऊन जा कुणीतरी.
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

लॅपटॉप घेऊन जा

गवि
Tue, 07/26/2011 - 10:53 नवीन
लॅपटॉप घेऊन जा कुणीतरी.. लॅपटॉप घेऊन या कुणीतरी असं अपेक्षित आहे. मागच्या वेळी नाही जमलं म्हणून उदास झालेलास ना..? मग यंदा कुठली माशी शिंकली? विक्स लाव त्या माशीला आणि ये. कंपल्सरी आहे..
↩ प्रतिसाद: यकु

अगर येणार असशील तर दोघे मिळुन

वपाडाव
Tue, 07/26/2011 - 10:50 नवीन
अगर येणार असशील तर दोघे मिळुन जाउयात.... काय म्हंतो....????
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

गटारीला?

नावातकायआहे
Mon, 07/25/2011 - 21:45 नवीन
गटारीला? ते बी संध्याकाळी ५:३०?? आल द बेस्ट! कसा झाला ते कळवा!

अर्रे.. गटारी आहे ते लक्षातच

गवि
Mon, 07/25/2011 - 22:10 नवीन
अर्रे.. गटारी आहे ते लक्षातच नव्हतं.. कट्ट्याचा उद्देश गटारी असेल तर दुसरे सामिष आणि मद्ययुक्त ठिकाण शोधावे लागेल. स्वाद हे एकदम साधे शुद्ध शाकाहारी ठिकाण आहे. काय ते नक्की करावे लवकर.. ग. कट्टा केल्यास स्त्रीवर्गाला दुर्लक्षिले गेल्यासारखे होईल. शु.शा. कट्टा गटारीदिवशी केला तर पुरुशवर्ग पाठ फिरवेल (की काय?)

गवि, माझ्यामते जो प्लॅन ठरला

इंटरनेटस्नेही
Mon, 07/25/2011 - 22:33 नवीन
गवि, माझ्यामते जो प्लॅन ठरला आहे तोच होऊन जावु दे. दारुगोळ्याची आतीशबाजी असलेला कट्टा आपण नंतर करुच नक्की. कट्याला सर्वजण आले तरच मजा आहे!
↩ प्रतिसाद: गवि

+१

स्वानन्द
Mon, 07/25/2011 - 22:41 नवीन
मी पण ट्राय करतो.
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही

.

इंटरनेटस्नेही
Wed, 07/27/2011 - 18:09 नवीन
.
↩ प्रतिसाद: स्वानन्द

शुद्ध शाकाहारी कट्टा अख्खा

वपाडाव
Tue, 07/26/2011 - 10:49 नवीन
शुद्ध शाकाहारी कट्टा अख्खा श्रावणमासात कधीही आखता येउ शकेल.... त्यामुळे गविंच्या या मताचा आदर अन विचार दोन्ही व्हावे अशी अपेक्षा.... @ इंट्या :: ठरलेले काही विधिलिखित नाहीये अन संमंलिखित तर नाहीच नाही.... त्यामुळेच कट्ट्याच्या तारखेचा अन/किंवा वेळेचा पुनर्विचार व्हावा....
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही

गवि, कट्टा सामिष असल्यास

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 07/26/2011 - 13:37 नवीन
गवि, कट्टा सामिष असल्यास चालेल (खरे तर धावेल), शाकाहारी असल्यासही माझी हरकत नाही. मात्र मद्ययुक्त नसावा असे माझे मत आहे. बरीच कॉम्प्लीकेशंस होतात त्यातून.
↩ प्रतिसाद: गवि

माझेही अगदी असेच मत आहे. पण

गवि
Tue, 07/26/2011 - 13:48 नवीन
माझेही अगदी असेच मत आहे. पण सगळेच शाकाहारी झाले मागल्यावेळेसारखे तर मग त्यांची पंचाईत होते. म्हणून जेव्हा या कट्ट्यासाठी जगेचा विचार चालू होता तेव्हा स्वाद हा शुशा पर्याय सुचवला होता. तो स्पा आणि सूड आदि मंडळींनी उचलून धरलेला दिसतो. मद्य तर कोणत्याच कट्ट्यात नसावे अशी माझी नेहमीच इच्छा असते.
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

गेले "ते" दिन गेले

सुनील
Tue, 07/26/2011 - 15:12 नवीन
मद्य तर कोणत्याच कट्ट्यात नसावे अशी माझी नेहमीच इच्छा असते. गेले "ते" दिन गेले!!
↩ प्रतिसाद: गवि

मग तर नकोच. दिवस गेले की दारू

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 07/26/2011 - 16:51 नवीन
मग तर नकोच. दिवस गेले की दारू पिऊ नये म्हणतात. ते सोडा, तुम्ही येणार आहात का ते आधी सांगा :-)
↩ प्रतिसाद: सुनील

काय हे काका !!

सूड
Tue, 07/26/2011 - 16:56 नवीन
काय हे काका !! ते नाही का म्हणतात, गर्भाचे आवडी मातेचा डोहळा. ;) ते जाऊ दे, कोण कोण येतंय ते एकदा फायनल करा ब्वॉ !!
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

ते नाही का म्हणतात, गर्भाचे

स्पा
Tue, 07/26/2011 - 17:16 नवीन
ते नाही का म्हणतात, गर्भाचे आवडी मातेचा डोहळा मग आवळा देऊन काहो काढता कोहळा :D
↩ प्रतिसाद: सूड

स्पा काका !!

सूड
Tue, 07/26/2011 - 19:03 नवीन
>>मग आवळा देऊन काहो काढता कोहळा स्पा काका !! तुमच्या वयाचा मान ठेवून गप बसतोय. धाग्याची खव नाही करायची मला. असं कधी केलं ते जरा संदर्भासहित स्पष्टीकरण देऊन खव त सांगितलंत तर बरं. संदर्भ न मिळाल्यास शन्वारी दर्भच भेऊन येईन मग !! :D
↩ प्रतिसाद: स्पा

अहो विमें.

गवि
Tue, 07/26/2011 - 17:08 नवीन
ते सोडा, तुम्ही येणार आहात का ते आधी सांगा अहो विमें. आता दारू नाही असं ठरलंय ना. मग सोडा वगैरे अ‍ॅड ऑन द्रव्यांचा विषय कशाला?
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

****

वपाडाव
Tue, 07/26/2011 - 17:15 नवीन
*) दिवस गेले की दारू पिऊ नये म्हणतात. *) ते सोडा.
अशी काँटृअ‍ॅडिक्टरी विधाने करु नये माण्सानं.... एकिकडे साळसुदपणाचा आव आणायचा अन दुसरीकडुन छोटीशी हिंटही द्यायची (कळणाराला)... ही वागणुक सोडा. बघा हा पुन्हा आला.
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

आयला!

धमाल मुलगा
Wed, 07/27/2011 - 13:58 नवीन
>>मात्र मद्ययुक्त नसावा असे माझे मत आहे. बरीच कॉम्प्लीकेशंस होतात त्यातून. >>मद्य तर कोणत्याच कट्ट्यात नसावे अशी माझी नेहमीच इच्छा असते. तुम्हा दोघांचे 'पिणारे'मित्र अट्टल देशीप्रेमी छाप राडेबाज, ओकरे वगैरे आहेत काय? नाही, मिपाच्या पहिल्या कट्ट्यापासून आम्ही कट्टे करतोय, दारवा भरभरुन वाहत असतात, पण कधी काही भानगडी वगैरे झालेल्याची कोण्याही (न पिणार्‍या कट्टेकर्‍यानंही) कधी तक्रार केली नव्हती आजवर.
↩ प्रतिसाद: गवि

धम्याशी सहमत

आदिजोशी
Wed, 07/27/2011 - 14:32 नवीन
आम्ही स्वतः असे अनेक कट्टे भरवले आहेत. शुशा कट्टेही भरवले. पण ज्यांच्यासाठी भरवले त्यांनी दरवेळी टांगच दिली. म्हणून जे येतात त्यांच्या सोयीने कार्यक्रम आखले गेले. अपेयपानामुळे कॉम्प्लीकेशंस निर्माण झाली असा एक उदाहरण द्यावे. इतर ठिकाणची उदाहरणं देऊ नये. भानगड झालीच तर 'कमी पडली' अथवा 'ह्याने माझी संपवली' अशी क्षुल्लक होते. पराचा कावळा करू नये. (आपला प.रा. डोमकावळा आहे.) त्यामुळे जनरलाईज्ड अंदाज न बांधता सर्वानुमते काय ते ठरवावे ही विनंती.
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

हौ ना यार!

धमाल मुलगा
Wed, 07/27/2011 - 14:44 नवीन
आमाले मिपाकरांन्ले तं पक्के गटारी बेवडे समजू र्‍हायले ना बाप्पा हे लोग. अ‍ॅड्या, ह्यांना एकदा आपला एखादा समद्य कट्टा पहायला बोलवू या का? ;) पहाटे पावणेतीनला वगैरे वसंतराव ऐकवू...पक्के अभिरत भिरभिर्‍यासारखं मतपरिवर्तन होऊन जातील. ;)
↩ प्रतिसाद: आदिजोशी

हॅ हॅ हॅ

परिकथेतील राजकुमार
Wed, 07/27/2011 - 14:55 नवीन
अ‍ॅड्या आणि धम्या लेका हा काय मिपा कट्टा हाय काय ? का उगा टेंशन घ्युन राहिले भौ ? मिपाकरांनी भरवलेला प्रत्येक कट्टा हा मिपा कट्टा असतोच असे नाही ;) आपण धम्याच्या घरी भेटलो होतो त्याला पण हा अ‍ॅड्या कट्टा म्हणेल ;) बाकी कट्टा बघायला बोलावण्यापेक्षा, ज्या 'दिग्गज' कट्ट्यांचे कुठे नामोल्लेख देखील आलेले नाहीत त्या कट्ट्यांचे फटू फक्त येथे टाका ;) बघा मंग कधी मज्जा मज्जा येते.
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

अहो धमुराव.. येऊच हो

गवि
Wed, 07/27/2011 - 14:56 नवीन
अहो धमुराव.. येऊच हो पुण्यातल्या कट्ट्याला.. पण इथे समस्या अशी की बहुतांश लोकांना नको असेल तर प्रथम भेटीत (कट्ट्यात अनेकजण समोरासमोर व्यक्ती म्हणून प्रथमच भेटतील असं समजून) मद्य ठेवणं काहीसं हेका धरल्यासारखं ठरेलसं वाटतं वैयक्तिक आमचे मद्यपानाविषयीचे मत प्रतिकूल बिलकूल नाही हे सांगणे न लगे. पण अशा वेळी नॉर्मली एकमेकांना चांगले ओळखणारे आणि पूर्वी अनेक कट्टे केलेले सरावाचे मित्रमंडळ असते अशी माझी समजूत. अजूनही अनेकांना आवडत असेल तर... मजाच आहे मग्..ठिकाण बदलू. आणि मुख्य म्हणजे तुम्ही येताय असं गृहीत धरतो.
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

पण इथे समस्या अशी की बहुतांश

परिकथेतील राजकुमार
Wed, 07/27/2011 - 15:08 नवीन
पण इथे समस्या अशी की बहुतांश लोकांना नको असेल तर प्रथम भेटीत (कट्ट्यात अनेकजण समोरासमोर व्यक्ती म्हणून प्रथमच भेटतील असं समजून) मद्य ठेवणं काहीसं हेका धरल्यासारखं ठरेलसं वाटतं
गवि अहो मिपा कट्टा म्हणल्यावर येणार्‍या प्रत्येकानी मिपाकर म्हणूनच हजेरे लावावी. स्वतःच्या आवडी-निवडी, स्वार्थ ह्याला फाट्यावर मारुन सगळ्यांच्यात एकरुप व्हावे. आणि असे होता येत नसेल तर तिथे जाउन इतरांच्या आनंदात माती कालवु नये :) आजवार ज्या ज्या कट्ट्यांना मला इतरांना फोन करुन वेळ -ठिकाण कळवायची वेळ आलेली आहे त्यातल्या कोणीही स्त्री-पुरुष मिपाकराने मला आजवर (मग तो देशस्थ असो वा भारतभेटीवर आलेला परदेशस्थ) ठिकाणाचा पत्ता आणि वेळ ह्याव्यतिरिक्त काहीही विचारलेले नाही :) 'तिथे शाकाहारी मिळते का? आणि महागडे आहे का ? दारु असते का? तुम्ही दारु पिणार का ? मी पिउ का? कोण कोण येणार? हे प्रश्न तर कधी कट्ट्याच्या व्यनीत देखील वाचनात आलेले नाहीत. जर रोज इथे भेटणार्‍या माणसांवर त्यांच्या वर्तणुकीवर विश्वासच नसेल तर मग भेटायचेच कशाला ?
↩ प्रतिसाद: गवि

जर रोज इथे भेटणार्‍या

गवि
Wed, 07/27/2011 - 15:12 नवीन
जर रोज इथे भेटणार्‍या माणसांवर त्यांच्या वर्तणुकीवर विश्वासच नसेल तर मग भेटायचेच कशाला ? हे लाख बोललात.. मग तर आम्ही अपेय आणि अभक्ष्याचे भक्तच आहोत. महेश लंच होमचा विचार व्हावा अशी सर्वांस विनंती. आणि हा विचार लवकरच व्हावा.. सूड/स्पा लवकर काहीतरी काँक्रीट फायनलाईझ करावे यासाठी इथे हस्तक्षेप करा..
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

>> तिथे शाकाहारी मिळते का?

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 07/27/2011 - 17:55 नवीन
>> तिथे शाकाहारी मिळते का? आणि महागडे आहे का ? दारु असते का हो का साहेब ?? खालील प्रतिक्रिया तुमचीच ना?? http://www.misalpav.com/node/17534#comment-304077 मी वरील वाक्य म्हटलेच नाही असे तुम्ही म्हणू शकता. ती तुमची सवय आता मला सवयीची झाली आहे.
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

विमे दरवेळी वाकड्यात शिरलेच

परिकथेतील राजकुमार
Wed, 07/27/2011 - 18:02 नवीन
विमे दरवेळी वाकड्यात शिरलेच पाहिजे का ? ती प्रतिक्रिया विनोदी किंवा उपरोधिक आहे हे लहान मुलाला देखील कळेल :) आणि नडायचेच असेल तर सरळ नडा, हौन जाउ दे च्यायला. मग सदस्यत्व पण गेले भोसड्यात ! जौ दे जौ दे म्हणुन गप्प बसतो तर दरवेळी आपले काहीतरी घेउन खुसपट काढून हजर. व्हर्चुअल गंमत व्हर्चुअल गंमत म्हणून सहन करायला पण एक मर्यादा असते. नका उगीच वाकड्यात शिरु अशी नम्र विनंती आहे.
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

कधी येतांव?

धमाल मुलगा
Wed, 07/27/2011 - 15:45 नवीन
जम के पिएंगे भाई :) बाकी मुद्द्यांची पर्यानं दिलेली उत्तरं मलाही पटतात त्यामुळं ते सोडून देऊ. :) >>आणि मुख्य म्हणजे तुम्ही येताय असं गृहीत धरतो. पुणे-मुंबै-पुणे ? तेही कोरडवाहू? ;) तुमीच सांगा राव, परवडतंय काऽऽऽ? ;)
↩ प्रतिसाद: गवि

हे होणार माहिती होत.. म्हणून

स्पा
Wed, 07/27/2011 - 15:10 नवीन
हे होणार माहिती होत.. म्हणून रामदास काकांना सांगत होतो, धागा काढू नका म्हणून . कृपया, संपादक मंडळाने हा धागा उडवावा..
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

सहमत. उडवा धागा.

सूड
Wed, 07/27/2011 - 15:17 नवीन
सहमत. उडवा धागा. -धन्यवाद आणि शुभेच्छा.
↩ प्रतिसाद: स्पा

का उडवा?

धमाल मुलगा
Wed, 07/27/2011 - 15:48 नवीन
च्यायला! धागा उडिवण्यासारखं काय है त्यात? वर खाली इतक्यांनी दिलेल्या शुभेच्छा दिसत नायत? त्यांचे आनंदाचे टंकनकष्ट वाया घालवण्याचा काय अधिकार है तुमाला दोघांना? आँ? >>हे होणार माहिती होत.. म्हणजे नक्की काय होणार होतं ते जरा कळेल काय? काय नक्की झालंय?
↩ प्रतिसाद: सूड

धमाल राव इथे कोणी कोणाला

स्पा
Wed, 07/27/2011 - 15:25 नवीन
धमाल राव इथे कोणी कोणाला बेवडे समजत नाहीये.. मुद्दा हा होता कि शक्यतो, बार नसलेले हाटेल निवडावे... त्यात तुम्हाला राग का आला हे कळलेले नाही , तुम्हाला असे तर कोणी म्हटलेले नाही न.. कि बाबा पिऊन येऊ नका.. किंवा तिथे येऊन पिऊ नका.. विषय हा होता कि बार असलेले हाटेल निवडावे कि नाही.. बस पण तुम्ही सोयीस्कर तो अर्थ काढलात. आम्हाला माहितेय कि तुम्ही छान कट्टे करता. पण त्यात किती नवीन मेंबर असतात? जर " मिपा परिवार" वाढवायचा असेल.. तर धागा हा टाकावाच लागेल.. तरच सगळ्यांना कळेल ना कि मिपाचे कट्टे होतात. असो... अजून काय बोलू... तुम्हाला हवा तो परिणाम झालाच.. शुभेच्छा (धमाल मोड सुरु) << काय द्येवा मस्करी करतोय .. चिडू नका >> (धमाल मोड संपला) ;)
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

स्पावड्य तुझ्या बाकी

परिकथेतील राजकुमार
Wed, 07/27/2011 - 15:39 नवीन
स्पावड्य तुझ्या बाकी प्रश्नाला धम्या इच्छा असेल तर उत्तर देईलच, फक्त तुझी एक शंका दूर करतो.
आम्हाला माहितेय कि तुम्ही छान कट्टे करता. पण त्यात किती नवीन मेंबर असतात?
दादा रे जेव्हा एखाद्या बैठकीला नविन मेंबर हजर असेल तेंव्हाच आम्ही त्याला कट्टा असे म्हणतो :) इतरवेळी आम्ही रेग्युलर मेंबर जमत असु तर त्याचा उल्लेख आम्ही खाजगीत देखील कट्टा म्हणून करत नाही. जाताजाता :- नावे सांगायची परवानगी नाही पण येवढेच सांगतो की आम्ही गेले जे सलग ७ कट्टे केले ते नविन मेंबर / मेंबर्सची भेट ह्यासाठीच केले :) ज्यात देशस्थ आणि परदेशस्थ मिपाकर आम्हाला भेटून गेले आणि बहूदा त्यांची काही तक्रार नसावी ;) आणि येड्या येवढ्या तेवढ्या मतमतांतरानी 'धाग उडवा' सारखा तुझा मूड होत असेल तर प्लिज असल्या कामात पुढाकार घेत जाउ नकोस ;) आमचा धम्या, डान्या, श्रामो वैग्रे बघ, बिचारे "संध्याकाळी या वेळेला इथे घाला' असल्या माजोरड्या फोनवर हजेरी लावतात आणि वर बिचारे बिल पण भरतात ;) परा भागवत
↩ प्रतिसाद: स्पा

__/\__

स्पा
Wed, 07/27/2011 - 15:43 नवीन
आणि येड्या येवढ्या तेवढ्या मतमतांतरानी 'धाग उडवा' सारखा तुझा मूड होत असेल तर प्लिज असल्या कामात पुढाकार घेत जाउ नकोस पुढाकाराचा प्रश्न नाहीये रे... आणि धागा उडवायला सांगतोय.. कट्टा cancel करत नाहीये उगा इथे वाद होऊन मित्र मित्रात भांडण कशाला ना :)
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

कसले आलेत वाद बोडक्याचे ?

धमाल मुलगा
Wed, 07/27/2011 - 16:02 नवीन
लेको, एव्हढ्यातेव्हढ्यावरुन वाद वाटतायत ह्याचा अर्थ मैत्रीच पक्की नाही असं समजायचं का आम्ही? येडझवे साले. ल्हान पोरांगत काय चाललंय रे? ठाकुर्लीला येऊन पोकल बांबूचे फटके देईन हां. :D
मुद्दा हा होता कि शक्यतो, बार नसलेले हाटेल निवडावे... त्यात तुम्हाला राग का आला हे कळलेले नाही , तुम्हाला असे तर कोणी म्हटलेले नाही न.. कि बाबा पिऊन येऊ नका.. किंवा तिथे येऊन पिऊ नका.. विषय हा होता कि बार असलेले हाटेल निवडावे कि नाही.. बस
>>मात्र मद्ययुक्त नसावा असे माझे मत आहे. बरीच कॉम्प्लीकेशंस होतात त्यातून. >>मद्य तर कोणत्याच कट्ट्यात नसावे अशी माझी नेहमीच इच्छा असते. ह्या वाक्यांचा अर्थ कळल्यास बरे होईल. :) राग येण्याचा प्रश्नच कुठे येतो येड्या? तूच सांग, अशा वाक्यांचा अर्थ- येणारं पब्लिक पिऊन राडे करणार, नकोच ती कटकट असा होत नाही का? अशानं आपल्याच मिपाकरांना आपण काय जोखतो? कोणत्या अनुभवाआधारे जोखतो? हा प्रश्न येत नाही का? >>पण तुम्ही सोयीस्कर तो अर्थ काढलात. म्हणजे नक्की कसा? हा कट्टा शुध्द शाकाहारी आणि दारुशिवाय असावा ह्या तुमच्या मताला खोडून 'हा कट्टा दारु+नॉनव्हेज असा असावा' असा अट्टाहास केलाय का? केवळ कट्ट्याला दारू असणे/नसणे ह्यावरील मताशी असलेली असहमती दर्शवली. तीही एखाद-दोनदा असे सूर निघालेले पाहून. पहिल्याच वेळी नव्हे. >>आम्हाला माहितेय कि तुम्ही छान कट्टे करता. छान की वाईट हा प्रश्न येतोच कुठे? आणि आम्ही कट्टे कसे करतो त्याचा संदर्भ कसा येऊ शकतो? माझे प्रतिसाद नीट वाचले तर लक्षात येईल की केवळ 'दारु असली तरीही आजवर मिपाच्या कट्ट्याबद्दल कोणाला वाइट अनुभव आलेले नाहीत' ह्याच्याशी मर्यादित आहेत. थिंक रॅशनल बडी! >>पण त्यात किती नवीन मेंबर असतात? :) पर्‍यानं उत्तर दिलंय त्यामुळं ह्याला पास. >>जर " मिपा परिवार" वाढवायचा असेल.. तर धागा हा टाकावाच लागेल.. तरच सगळ्यांना कळेल ना कि मिपाचे कट्टे होतात. अरे मग एक का, दहा कट्टे करुन दहा धागे टाका की. कोणि अडवलंय? नक्की मुद्दा काय आहे भौ ?
↩ प्रतिसाद: स्पा

पराभौ जाऊ द्या ना !!

सूड
Wed, 07/27/2011 - 15:53 नवीन
पराभौ जाऊ द्या ना !! एक तर हा धागा काढायची अजिबात इच्छा नव्हती, कारण या शक्यता विचारात घेतल्याच होत्या. मंडळी: धागा उडवू द्या, कट्ट्याचं काय ते फोनाफोनी करुन बघून घिऊ. म्हणजे हे माझं मत. स्वगतः कधी नव्हे तो माझ्या धाग्याने सत्तरी गाठली, शतकी होणार वाटतं हा धागा. ;)
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

आमचा धम्या, डान्या, श्रामो

बिपिन कार्यकर्ते
Wed, 07/27/2011 - 15:55 नवीन
आमचा धम्या, डान्या, श्रामो वैग्रे बघ, बिचारे "संध्याकाळी या वेळेला इथे घाला' असल्या माजोरड्या फोनवर हजेरी लावतात आणि वर बिचारे बिल पण भरतात.
आणि मला विसरलात भागवत काका! :( बि. मे.
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

फोन करतो रे

धमाल मुलगा
Wed, 07/27/2011 - 16:03 नवीन
एका नव्या मेंब्राला भेटूया...कधी आणि कुठं घालायची ते ठरलं की सांगतो. =))
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

आणि मला विसरलात भागवत

परिकथेतील राजकुमार
Wed, 07/27/2011 - 16:24 नवीन
आणि मला विसरलात भागवत काका!
अरे हो बिकाका राहिलेच की. कायेना सध्या फक्त आणणारे आणि पोहोचवणारेच लक्षात राहतात ;) माफी मागितल्या गेली आहे.
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

अंमळ असहमत

आनंदयात्री
Wed, 07/27/2011 - 18:19 नवीन
>>धम्या, डान्या, श्रामो वैग्रे बघ, बिचारे "संध्याकाळी या वेळेला इथे घाला' असल्या माजोरड्या फोनवर हजेरी लावतात बोल्डातल्या नावाबद्दल अंमळ असहमती दर्शवतो.
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

?????????????????????????????????????????

धमाल मुलगा
Wed, 07/27/2011 - 18:21 नवीन
<राजशेखर> क्काऽऽऽ? < \ राजशेखर>
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

मोजा

आनंदयात्री
Wed, 07/27/2011 - 18:33 नवीन
मोजा, किती वेळा वायदे तोडलेत. आणि ही असली सोलापुरी हुसेनी कारणं .. १. लैच बिसी आहे (तुर्रमखान) २. पुढच्या ३ तासात ९ मित्रांना भेटतो म्हणुन सांगितलेय, तुम्ही दहाव्वे (लॉर्ड फॉकलँड) ३. जरा ताप आलाय, आज नको. (नाजूकराव) ४. आज कंपनीत फार कटकट झालीये, आराम करायचाय. (साजूकराव) ५. जरा बाकी शून्य वाचायला घेतलेय, मस्त मूड लागलाय, आज नको (वाचकराव) ६. कलमाडी फारच माजलाय रे .. लेख लिहतोय. (लेखकराव) ९९.इत्यादी इत्यादी .. १००. इत्यादी इत्यादी .. अमेरिकेत यायच्या आदल्या वीकएंडला पण कलटी टाकली होती साल्याने, काय तर म्हणे घर शोधत होता. (नटसम्राट कुठचा)
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

=)) =)) =)) संताप...सात्विक

धमाल मुलगा
Wed, 07/27/2011 - 18:35 नवीन
=)) =)) =)) संताप...सात्विक संताप नुसता शब्दाशब्दातून उफाळता दिसतोय... :D >ही असली सोलापुरी हुसेनी कारणं .. अग्गायायायायायाया..... =)) =)) =)) म्हणजे नक्की कसली? बिनबुडाची की अनवाणी? नक्की काय म्हणायचंय?
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा