कट्टा रद्द झालेला नसून आतल्या गोटातील लोकं व्यवस्थीत भेटणार आहेतच, सध्या सर्वजण व्यनी व फोनद्वारे संपर्कात आहेत असा आमचा आतल्या गोटातला आतला बातमीदार कळवतो ;)
प्रगल्भतेकडे चाललेल्या मिपाला दोन्ही पाय धरुन मागे ओढणारा निर्णय.
असो...
सूड / स्पा,
धागा न काढता केवळ फोनाफोनी केली तर आपण आधी भेटलेलेच परत भेटू. मग तो कट्टा नसेल. शिवाय मग आपल्याला रात्री बेरात्री इतरांना फोन करून आपण कशी मजा केली हे जड जिभेने ऐकवावे लागेल, ते वेगळे. ;-)
मिपा कट्ट्याचा उद्देश आपण एकमेकांना भेटणे आहे. खाणे, पिणे हे गौण आहे. त्यामुळे तुमची प्रतिक्रिया अनाठायी वाटली. इतरांना काय वाटते यावरून आपण आपले निर्णय घ्यायचे काय? इतर वेळी "सदर प्रतिक्रियेला फाट्यावर मारले आहे" अशी प्रतिक्रिया देतो आपण. जिथे फाट्यावर मारले पाहिजे तिथे का नाही मारत?
वरील चर्चेवर खालील प्रतिक्रिया वाचायला आवडली असती.
"तुम्ही तुम्हाला हवे त्या प्रकारचे कट्टे केले, आम्ही आम्हाला हवे त्या प्रकारचे कट्टे करतो आहोत. आपल्याला एकमेकांची मते/ कृती पटली पाहिजेत असे नाही. एखाद्याला समद्य कट्टा करायचा असेल, तर जरूर करावा, आम्ही तिथेही येऊ. मात्र तुम्ही जसे केलेत तसेच इतरांनी करावेत असा आग्रह केलात तर त्या आग्रहाला योग्य जागा दाखवली जाईल."
इंट्या, हेच बरे ते मागे सांगितलेले प्रतिध्वनी. ऐकतो आहेस ना बाळ ?? ;-)
असो, ३० तारखेला मी ठाण्याला येतो आहे. ज्यांना यायचे असेल त्यांनी यावे. कुणी नाही आले तर मी गविंच्या घरी जाऊन गप्पा मारून येईन. (गवि, घ्याल ना हो घरात?)
वि.मे.
मिपा कट्ट्याचा उद्देश आपण एकमेकांना भेटणे आहे. खाणे, पिणे हे गौण आहे. त्यामुळे तुमची प्रतिक्रिया अनाठायी वाटली. इतरांना काय वाटते यावरून आपण आपले निर्णय घ्यायचे काय? इतर वेळी "सदर प्रतिक्रियेला फाट्यावर मारले आहे" अशी प्रतिक्रिया देतो आपण. जिथे फाट्यावर मारले पाहिजे तिथे का नाही मारत?
पर्फेक्ट! हेच महत्वाचं. मिपावर रहायचं तर असं गुळुमुळु करुन कसं चालेल?
तुम्ही तुम्हाला हवे त्या प्रकारचे कट्टे केले, आम्ही आम्हाला हवे त्या प्रकारचे कट्टे करतो आहोत. आपल्याला एकमेकांची मते/ कृती पटली पाहिजेत असे नाही. एखाद्याला समद्य कट्टा करायचा असेल, तर जरूर करावा, आम्ही तिथेही येऊ. मात्र तुम्ही जसे केलेत तसेच इतरांनी करावेत असा आग्रह केलात तर त्या आग्रहाला योग्य जागा दाखवली जाईल
गडबड.....बेसिकमध्येच काहीतरी गडबड होतेय असं दिसतंय मित्रांनो.
मुद्दा कोणी ठरवत असलेल्या कट्ट्याला दारु असावी की नसावी ह्याच्या आग्रहाचा नसून सातत्याने कट्ट्याला दारु नसल्याचे आग्रही प्रतिपादन करण्याबद्दल आहे...निदान माझ्याकडून तरी. कुणी त्यातून उमजेनुसार कसे अर्थ काढले त्याची इथं बसून मलातरी कल्पना नाही.
नुसतं, "अमुक एखाद्या ठिकाणी भेटणे ठरले आहे. इतक्या वाजेपर्यंत हजर व्हावे." एव्हढ्यावर जे भागू शकते त्याला दारुच नको, नॉनव्हेजच नको वगैरे अट्टाहासी प्रकार कशाला? ज्यांना ठिकाण माहित असेल त्यांना वेगळं सांगायची गरज नसते, आणि ज्यांना ठाऊक नसतं त्यांना आल्यावर कळतंच की. त्यासाठी एव्हढा 'प्युअरिस्ट' किंवा 'तात्त्विकतेचा आव कशाला ? इतकाच प्रश्न पडला.
तर मग, एव्हढ्या क्षुल्लक गोष्टीचा एव्हढा इश्श्यु का केला जातोय हेही मला कळेना.
मगाशी स्पा ला म्हणालो 'बी रॅशनल' ते एव्हढ्याचसाठी.
प्रतिक्रिया
खी खी खी!! चिअर्स!
In reply to बाकी by गवि
हा घ्या पहिल्या कट्ट्याचा
शुभेच्छा.........!
रद्द????? का रे? कोण खपलं?
रद्द का???????????
कट्टा रद्द?
अरेरे :(
गोड की खारी?
In reply to अरेरे :( by वपाडाव
कट्टा रद्द झालेला नसून आतल्या
छान ...
प्र. क. टा.आ.
सूड / स्पा, धागा न काढता
येस्स...
In reply to सूड / स्पा, धागा न काढता by विश्वनाथ मेहेंदळे
काहुन रद्द झाला? असं नव्हते
ओक साहेब मनातल्या मनात हसत