विडंबनकाव्यमाला-भाग-३
मुळ काव्य-''मी माझा'' या चारोळी काव्य संग्रहातून,कवी-श्री.चंद्रशेखर गोखले
विडंबन-''मग तू कुणाचा?''
.............मुळ काव्य....................................................................विडंबन...................................................................................
१)पुसणारं कोणी असेल तर.................................................कात्रण चांगलं असेल तर
डोळे भरुन यायला अर्थ आहे..............................................करंजीला अर्थ आहे
कुणाचे डोळेच भरणार नसतील..........................................करंजीच मोडली...तर(?)
तर मरण सुद्धा व्यर्थ आहे..................................................तर..सारण सुद्धा व्यर्थ आहे
२)तुझ्या माझ्यातलं अंतरसुद्धा.........................................इडली डोश्यातलं अंतर
तुझ्या माझ्यातला दुवा आहे............................................हा त्यांच्यातला दुवा आहे
ही माझी कल्पना नाही....................................................ही माझी कल्पना-?.....नाही हो
हा माझा दावा आहे ......................................................अहो,मध्यस्थी रवा आहे...
३)पाण्याचं वागणं .......................................................तेलाचं वागणं
कीती विसंगत?.......................................................कीती विसंगत ?
पोहोणाय्राला बुडवुन................................................चकलीला बुडवून
प्रेताला ठेवतं तरंगत................................................कडबोळी ठेवतं तरंगत
४)भरुन आलेलं आभाळ...........................................टोपलीभर पापलेट
ढळत गेलेला दिवस................................................जणू दिसे खरवस
माझ्या मनात चंद्राची आशा.................................मनात बांगड्याची आशा
आणी नेमकी आली आवस....................................आणी नेमका आला रावस
५)मी आहेच जरा असा..........................................मी आहेच जरा असा
एकटा एकटा राहणारा.........................................एकटा एकटा खाणारा
वाळकं पान सुद्धा गळताना...................................जळकं भजं सुद्धा तळताना
तन्मयतेनं पाहणारा..........................................माझच म्हणुन पाहणारा
पराग दिवेकर..............
वाचने
5380
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
जबरदस्त.........
In reply to जबरदस्त......... by पप्पु अंकल
व्वा व्वा...वाहव्वा---पप्पु अंकल
In reply to व्वा व्वा...वाहव्वा---पप्पु अंकल by अत्रुप्त आत्मा
(No subject)
है शाब्बास....!
टोपलीभर पापलेट
बाकी पापलेटाला खरवसाची उपमा
भरली केळी खायला बोलावेल इसे
झकास.
सूर्यकांत खोकले =)) =)) =))
In reply to सूर्यकांत खोकले =)) =)) =)) by बॅटमॅन
हंम किंवा मग
In reply to हंम किंवा मग by प्रमोद देर्देकर
तांब्याकांत मोकले(ळे)
हा हा
=))
In reply to =)) by प्रसाद गोडबोले
खुप प्रेशर असतं बाबा
पापलेट काय खर्वस काय, औघडे