✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कलेला देशसीमांचं, भाषेचं बंधन नसतं.

ब
बहुगुणी यांनी
Fri, 07/24/2009 - 10:29  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7616 वाचन

💬 प्रतिसाद (29)

प्रतिक्रिया

आपला देश

विसोबा खेचर
Fri, 07/24/2009 - 10:40 नवीन
आपला देश इतरांनी अनुकरण करावं अशा काही अजरामर कलाकृती प्रसवतो हे खरं आहेच,
येस्स! संगीत-नृत्य कलेच्या बाबतीत वुई आर नंबर वनच आहोत!
पण त्या कलाकृती अंगिकारण्याची वृत्ती इतर देशीय ठेवतात हेही कौतुकास्पदच.
नक्कीच. आजा सोनियेचा दुवा पाहिला.. मस्त आहे! :) तात्या.
  • Log in or register to post comments

+१

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 07/24/2009 - 12:41 नवीन
नक्कीच. आजा सोनियेचा दुवा पाहिला.. मस्त आहे!
पुरूषी आवाज असताना तिच्या हालचालीही पुरूषी होतात आणि स्त्रीच्या आवाजाला लगेच नाजूकपणा येतो, हे मलाही जाणवलं. गंमत वाटली ती तिच्या कपड्यांच्या बदलणार्‍या रंगांची! एकतर आपल्या चित्रपटांमधल्या गाण्यांमधे कपडे बदलतात, तिने फक्त संगणकावर कपड्यांचा आणि गवत, खिडक्यांचे ब्लाईंड्स इत्यादी रंग बदलून याचीही जाणीव दाखवली आहे. माझी एक चिनी हाऊसमेट आणि मैत्रिण माझ्याकडे राज कपूरच्या गाण्यांची ऑडीओ कॅसेट तिच्या आजीसाठी मागत होती, तिची एकदम आठवण झाली. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

हा हा

सहज
Fri, 07/24/2009 - 10:42 नवीन
छान दुवे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

छान

सुनील
Fri, 07/24/2009 - 10:53 नवीन
उत्तम लेख. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

मस्त लेख

अश्विनि३३७९
Fri, 07/24/2009 - 11:08 नवीन
सगळे दुवे छान !!
  • Log in or register to post comments

वा..

स्वाती दिनेश
Fri, 07/24/2009 - 11:17 नवीन
उत्तम लेख, स्वाती
  • Log in or register to post comments

छान

नंदन
Fri, 07/24/2009 - 12:28 नवीन
उत्तम लेख, आवडला. लेखासोबतचे दुवेही छान आहेत.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

असेच म्हणतो!

Nile
Sat, 07/25/2009 - 12:47 नवीन
मस्त लेख! भारी वाट्लं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

जय हो.

पंकज
Fri, 07/24/2009 - 14:05 नवीन
असाच एक दुवा : http://www.youtube.com/watch?v=1HaImMwP134
  • Log in or register to post comments

हाहाहा!!!

बिपिन कार्यकर्ते
Fri, 07/24/2009 - 14:43 नवीन
हाही दुवा छान आहे... आणि स्पॅनिशभाषिक असल्याने 'जय हो' चे 'ये हो' पण झाले आहे कुठे कुठे... ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंकज

मस्त आहे दुवा.

प्राजु
Sat, 07/25/2009 - 01:40 नवीन
मस्त पर्फोम केलं आहे. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंकज

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 07/25/2009 - 09:27 नवीन
मस्त दुवा ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंकज

शेठ!!!

बिपिन कार्यकर्ते
Fri, 07/24/2009 - 14:39 नवीन
तुम्ही सांगितलेली आठवण छानच आहे, जपून ठेवण्यासारखीच आहे. आणि ते दुवेही मस्त हो, बहुगुणी शेठ. साधारणपणे अभारतिय लोकांना काही हावभाव खूप रूळल्याशिवाय नीट जमत नाहीत. पण ही पोरगी तयार आहे एकदम. ग्रेट. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

हापिसात

अनामिक
Fri, 07/24/2009 - 23:34 नवीन
हापिसात असल्याने अजून व्हिडीओ पाहिले नाहीत... पण एक गोष्टं आठवली... चिनमधेच नव्हे तर टर्कीमधेही राज कपूरचे चित्रपट डब करून पाहिल्या जायचे, पण गाणी मात्र हिंदीत असायची (म्हणे). माझा लॅबमेट जो टर्कीमधून आलेला त्याने तिथे राजकपूर फार फेमस होता असे सांगीतले. त्याला तर 'आवारा हूं...'ची धूनही व्यवस्थीत येत होती. -अनामिक
  • Log in or register to post comments

सही आहे

भाग्यश्री
Sat, 07/25/2009 - 00:59 नवीन
सही आहे लेख! दुवेही मस्त! खूप वेळा लिहीले आहे मी हे खरं तर! पण लिहीते परत.. लास वेगासला व्हेनेशिअन कॅसिनो मधे एका आजोबांनी अ‍ॅकॉर्डीअन वर आवारा हू, इचक दाना बिचक दाना गाऊन, वाजवून दाखवले होते! मस्त वाटलं होतं!! राज कपूर भलताच फेमस होता ना! http://www.bhagyashree.co.cc/
  • Log in or register to post comments

खूपच

प्राजु
Sat, 07/25/2009 - 01:33 नवीन
खूपच सुंदर. लेख आणि दुवेही! तिचं स्वतःला झोकून देऊन नाचणं खूप आवडलं. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

उत्तम लेख

प्रियाली
Sat, 07/25/2009 - 03:25 नवीन
लेख, अनुभव आवडला. मुलींचे भारी कौतुक वाटले.
  • Log in or register to post comments

"मिशा"

लवंगी
Sat, 07/25/2009 - 07:14 नवीन
"मिशा" माझा एक रशियन सहकारी राजकपुरचा अस्सल चाहता होता. आम्ही काम करता करता तासन तास "आवारा हू ", "मेरा जुता है जपानी" गुणगुणत बसायचो. तर टिम नावाचा अमेरीकन सहकारी भीमसेन जोशींच्या गाण्याचा दिवाणा आहे. कलेला सीमा-भाषेच बंधन नसते हेच खरं.
  • Log in or register to post comments

ह्म्म मी

नीधप
Sun, 07/26/2009 - 09:40 नवीन
ह्म्म मी आमच्या कॉश्च्युम शॉपमधे सगळ्यांना गुलाम अलीच्या गझलांपासून त्यावेळेला लेटेस्ट असलेल्या दिलसे, ताल च्या गाण्यांपर्यंत, फड सांभाळ पासून प्रीतरंगमधल्या कोहिकडे गेली मया कुक्काची टिकली पर्यंत सगळं ऐकायला लावलं होतं तीन वर्षात. सगळ्यांना छैय्या छैय्या जरा जास्तंच आवडलं होतं. अनेकांना तेव्हा गाणी कॉपी करून दिली होती. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

खरेच की!!

सुनील
Sun, 09/27/2009 - 05:49 नवीन
जालावर भटकंती करीत असताना ही चित्रफीत मिळाली. ही म्हणे श्रीलंकेतील पहिली कराओके संगीताची चित्रफीत. पण गाण्याचे शब्द ऐका - आपल्या कोंकणी भाषेतील!! कलेला देशसीमांचं, भाषेचं बंधन नसतं हे खरंय! Image removed." alt="" /> Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

हम सब एक हैं!

बहुगुणी
Tue, 07/19/2011 - 03:30 नवीन
माझा स्वतःचाच धागा वरती आणल्याबद्दल थोडं चोरटं वाटतंय, पण तासभर मोकळा वेळ मिळाला आणि या धाग्याची आठवण करून देणारे काही व्हिडिओज एकापाठोपाठ एक मिळाले, म्हणून ते इथे देतोय. या आधी मी भारतीय वंशाच्या पण अमराठी मुलांनी गायलेली मराठी गाणी शोधतांना सापडलेली अनुषा आणि पियानो/कीबोर्ड वाजवणारे वा गाणारे इतर बालकलाकार यांच्या विषयी लिहिलं होतं. आज ओळख करून देतोय ती 'कलेला देशसीमांचं, भाषेचं बंधन नसतं' हे पुन्हा एकदा सिद्ध करणार्‍या काही अ-भारतीय कलाकारांची. इथे तुम्हाला ते दिसतील ते भारतीय गाणी गातांना (एका अपवादांत नाचतांना). आवारा हूं एक लडकी की तुम्हें क्या सुनाऊं दासतां पुढची बरीचशी गाणी गाणारी चिनी 'एमी' ही गायिका बरीच वर्षे भारताच्या प्रेमात आहे, आणि तिची लतादीदींवर बरीच भक्ती आहे. आओ ना, आओ ना देख लो आवाज़ देकर चुरा लिया है तुम ने लूटे कोई मन का नगर ओ यारा रब रुस जाने दे थोडा रेशम लगता है कभी कभी मेरे दिल में हम तो भई जैसे हैं वैसे रहेंगे मैं ता यारा दीवाना तेरा जाट यमला (कोरियन कलाकार पंजाबी गीतावर नाचतांना) mai ta yaara deewana tera jat yamla (Koreans dancing to a Punjabi song) छिन्न छिन्न आसय (हे गाणं अर्थातच 'दिल है छोटासा' याचं मूळ रूप आहे) वंदे मातरम (खरं तर त्याचं तामीळ रूप) गातांना एक चिनी कलाकार खुद्द ए आर रेहेमानच्या उपस्थितीत शेवटी, याच लेखात म्हंटलं होतं ते पुन्हा उद्धृत करतो: अशी आणखीही अनेक उदाहरणं डोळे उघडे ठेवले तर सापडतील, तुम्हालाही माहीत असतील. आपला देश इतरांनी अनुकरण करावं अशा काही अजरामर कलाकृती प्रसवतो हे खरं आहेच, पण त्या कलाकृती अंगिकारण्याची वृत्ती इतर देशीय ठेवतात हेही कौतुकास्पदच!
  • Log in or register to post comments

मस्त धागा.... वाचायचा राहूनच

प्रभो
Wed, 07/20/2011 - 00:18 नवीन
मस्त धागा.... वाचायचा राहूनच गेलेला.
  • Log in or register to post comments

धागा आवडला.

रेवती
Wed, 07/20/2011 - 01:05 नवीन
धागा आवडला.
  • Log in or register to post comments

पुन्हा एकदा मेकी यांग:

बहुगुणी
Wed, 07/20/2011 - 01:55 नवीन
मुबारका मुबारका
  • Log in or register to post comments

मस्त!

मेघवेडा
Wed, 07/20/2011 - 03:42 नवीन
छान लेख! एक एक दुवेही अप्रतिम! एमीची गाणीही आवडली! माझ्या ओळखीतलेही काही अभारतीय लोक उत्तम भांगडा करतात आणि मला भांगडा नीट येत नाही म्हणून हसतात देखील माझ्यावर!
  • Log in or register to post comments

मस्त.

यशोधरा
Mon, 07/25/2011 - 12:13 नवीन
मस्त.
  • Log in or register to post comments

छान

नंदन
Fri, 08/19/2011 - 14:48 नवीन
नवीन दिलेली गाणीही आवडली. त्याचबरोबर Hmong लोकांच्या परिस्थितीबद्दल दिलेली माहितीही. तिला तमिळ गाणं म्हणताना पाहून एका जालस्नेह्याने सांगितलेलं - दुसर्‍या महायुद्धात जपानी सैन्यापासून वाचवण्यासाठी तमिळ कुटुंबांच्या घरी आश्रय घेतल्यामुळे अस्खलित तमिळ बोलता येणार्‍या चिनी आजीबाईंचं उदाहरण आठवलं.
  • Log in or register to post comments

फॉरीनच्या कोळणी

बहुगुणी
Sun, 08/09/2015 - 04:30 नवीन
स्वतःचाच धागा बर्‍याच वर्षांनी वरती काढायचा प्रमाद करतो आहे, कारण खटपट्या यांनी खरडफळ्यावर दिलेला हा अप्रतिम दुवा पाहिला आणि या धाग्याची आठवण झाली: आता या फारीनच्या कोळणी पहा https://www.facebook.com/manish.patil.1042/videos/869140219845209/ (function(d, s, id) { var js, fjs = d.getElementsByTagName(s)[0]; if (d.getElementById(id)) return; js = d.createElement(s); js.id = id; js.src = "//connect.facebook.net/en_US/sdk.js#xfbml=1&version=v2.3"; fjs.parentNode.insertBefore(js, fjs);}(document, 'script', 'facebook-jssdk'));

Posted by Manish Patil on Friday, August 7, 2015
कलेला देशसीमांचं, भाषेचं बंधन नसतं हेच पुन्हा जाणवलं!
  • Log in or register to post comments

दुवा चालत नाही.

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 08/09/2015 - 12:24 नवीन
दुवा चालत नाही. तुम्ही लेखात ज्या चिनी प्रांताचा उल्लेख केला आहे त्याचे नाव युन्नान (Yunnan) आहे. हिमालय नेपाळ व भारतातून उत्तर मियानमार मार्गे चीनमध्ये शिरतो... तोच हा युन्नान. माझ्या मते हा चीनचा सर्वात जास्त निसर्गसुंदर प्रांत आहे. त्याची उत्तर-पश्चिम सीमा भारताच्या उत्तर-पूर्व सीमेपासून केवळ १२५ किमी दूर आहे ! हा भाग सांस्कृतीकरित्या तिबेटशी खूप जवळ आहे. आजही तेथे हिंदी चित्रपट बघितले जातात, हिंदी गाणी आवडीने ऐकली जातात आणि लोकांना भारतियांबद्दल आपुलकी आहे. तिथल्या अनेक लोकांनी भारतात शिक्षण घेतलेले आहे. चीनच्या भटकंतीत याच एका प्रांतात मला हिंदीत बोलून चकीत करणारे लोक भेटले होते ! माझे तिथले अनुभव इथे (भाग ८ ते १२) वाचता/बघता येतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा