खूप वर्षांपूर्वी माझ्या बरोबर लॉस एंजेलिस येथे एक चिनी स्त्री सहकारी काम करीत होती. पेली ली नाव तिचं. तिच्या सुरूवातीच्या काळात तिच्याशी इंग्लिश मध्ये संवाद साधणं म्हणजे एक कसरतच होती (आजही परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही.) मला माझ्या वरिष्ठांनी सांगितलं की मला हवं असल्यास तिला कामावरून कमी करून व्यवस्थित इंग्लिश बोलणारा/री दुसरी कोणी व्यक्ती टेक्निशिअन म्हणून मला हवी असल्यास ते व्यवस्था करतील. पण तिचं काम टेक्निकल असल्याने, आणि तिच्या कामात ती निपूण असल्याने (आणि खरं सांगायचं तर माझ्यापेक्षा दहा वर्षांनी ज्येष्ठ असूनही माझ्यापेक्षा ती खूपच चटपटीत असल्याने
) मी तिलाच कायम करण्याचा निर्णय घेतला. पुढे आमचं एकमेकांशी छान जमलं. हळूहळू तिला आवडते हे कळल्यावर माझ्या पत्नीने दिलेली दाल फ्राय, आणि तिने डब्यात खास माझ्यासाठी आणलेले शाकाहारी डंपलिंग्ज खाता खाता आम्ही एकमेकांच्या देशांविषयीच्या, चालीरीतीविषयीच्या माहितीची देवाणघेवाण करू लागलो. एक दिवशी तिने मला चांगलंच आश्चर्यचकित केलं. ती जेवणाच्यावेळी घेऊन आली नवर्याला, आणि म्हणाली की त्याला मला काही द्यायचं आहे. हा तिचा नवरा इलेक्ट्रिकल एंजिनिअरींगचा प्राध्यापक आणि हुषार माणूस, पण मितभाषी. त्याने मला एक-दोन वाक्यात 'काय, कसं काय' वगैरे विचारल्यावर एकदम म्हणाला: "You are Indian, so I want to give you something that I think you will like, I have kept it for 30 years." त्याने माझ्या हातात ठेवली एक घरी burn केलेली ऑडिओ सी. डी., मला म्हणाला "Take it home and see if you like it." माझी उत्सुकता मला स्वस्थ बसू देईना, मी त्याला म्हंटलं 'आताच ऐकतो की'. मी कंप्यूटरमध्ये टाकून गाणी ऐकायला लागलो आणि उडालोच. एकापाठोपाठ १६ गाणी, पूर्णपणे चिनी भाषेत, चिनी संगीतकारांनी संगीतबद्द केलेली, चिनी गायक-गायकांनी म्हंटलेली, पण सगळी राजकपूरच्या चित्रपटांची!! त्याने मला सांगितलं, की त्याच्या तरूणपणी ईशान्य चीनमधले लोक राजकपूर साठी वेडे झाले होते, त्याचे सर्व चित्रपट चिनी भाषेत गाण्यांसहित डब झालेले आहेत. राजकपूर रशियात लाडका होता हे मी ऐकून होतो, पण चीन मध्ये त्याची इतकी लोकप्रियता होती हे मला प्रथमच कळत होतं.
ही जुन्या भारतीय सिनेमांची क्रेझ चीनमध्ये आता राहिली नाही याचं त्याला वाईट वाटत होतं. तो म्हणाला "All these years, I have saved my audio cassette of these songs which are my bridge to my glorious past days in China. Last weekend, I burned them into a single CD to give you as a gift." मी म्हंटलं, " This is such a valuable memento for you, I really appreciate it very much. Let me copy the CD and return it to you." म्हणाला, "No, please keep it, my wife told me you have been very kind to her, this is my way of saying thanks!" आजही ती सी डी माझ्यासंग्रही आहे.
*************
या घटनेची आठवण होण्याचं कारण म्हणजे आज यू ट्युबवर जुनी गाणी शोधतांना सापडलेले एका चिनी वंशाच्या तरूणीचे हिंदी गाण्यांचे व्हिडीओज्. ही तरूणी आहे मेकी यांग, आणि ती ज्या Hmong या चिनी समाजातून आलीय त्या लोकांचं वसतीस्थान आहे तो भाग ईशान्य चीनमधला, पेली च्या नवर्याचा प्रांत होता त्याच्या जवळपासचा. आजकाल Hmong लोक देशोधडीला लागले आहेत, त्यांची बहुतांश वस्ती आहे ती थायलंड मध्ये, आणि बरेचसे Hmong अमेरिकेत स्थायिक झालेत.
************
मेकी यांग चे मी ६-७ व्हिडीओज् पाहिले, आणि तिचं जीव तोडून नाचणं आणि अप्रतिम lipsynch पहातांना मनात आलं "कलेला देशसीमांचं, भाषेचं बंधन नसतं हेच खरं."
दुवा १, २, ३, वगैरे.
तिच्या नृत्याची मूळच्या चित्रपटांतील गाण्यांशी तुलना न करता, मोकळ्या मनाने पाहिलं तर तिची नृत्याविषयी किती निष्ठा आहे ते जाणवेल असं वाटतं. मेकी भरतनाट्यम शिकते असं काही ठिकाणी वाचलं. South East Asian Games शी संबंधित कार्यक्रमात (हा अमेरिकेत सॅक्रामेंटोमध्ये का झालेला दिसतो ते माहीत नाही) मेकी यांग आणि जोअॅना वँग या दोघींनी सादर केलेलं हे गाणंही पहा.
अशी आणखीही अनेक उदाहरणं डोळे उघडे ठेवले तर सापडतील, तुम्हालाही माहीत असतील. आपला देश इतरांनी अनुकरण करावं अशा काही अजरामर कलाकृती प्रसवतो हे खरं आहेच, पण त्या कलाकृती अंगिकारण्याची वृत्ती इतर देशीय ठेवतात हेही कौतुकास्पदच.

अशी आणखीही अनेक उदाहरणं डोळे उघडे ठेवले तर सापडतील, तुम्हालाही माहीत असतील. आपला देश इतरांनी अनुकरण करावं अशा काही अजरामर कलाकृती प्रसवतो हे खरं आहेच, पण त्या कलाकृती अंगिकारण्याची वृत्ती इतर देशीय ठेवतात हेही कौतुकास्पदच.| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
7690
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
आपला देश
+१
In reply to आपला देश by विसोबा खेचर
हा हा
छान
मस्त लेख
वा..
छान
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
असेच म्हणतो!
In reply to छान by नंदन
जय हो.
हाहाहा!!!
In reply to जय हो. by पंकज
मस्त आहे दुवा.
In reply to जय हो. by पंकज
:)
In reply to जय हो. by पंकज
शेठ!!!
हापिसात
सही आहे
खूपच
उत्तम लेख
"मिशा"
ह्म्म मी
खरेच की!!
हम सब एक हैं!
मस्त धागा.... वाचायचा राहूनच
धागा आवडला.
पुन्हा एकदा मेकी यांग:
मस्त!
मस्त.
छान
फॉरीनच्या कोळणी
आता या फारीनच्या कोळणी पहा https://www.facebook.com/manish.patil.1042/videos/869140219845209/दुवा चालत नाही.
In reply to फॉरीनच्या कोळणी by बहुगुणी