पुरूषी आवाज असताना तिच्या हालचालीही पुरूषी होतात आणि स्त्रीच्या आवाजाला लगेच नाजूकपणा येतो, हे मलाही जाणवलं.
गंमत वाटली ती तिच्या कपड्यांच्या बदलणार्या रंगांची! एकतर आपल्या चित्रपटांमधल्या गाण्यांमधे कपडे बदलतात, तिने फक्त संगणकावर कपड्यांचा आणि गवत, खिडक्यांचे ब्लाईंड्स इत्यादी रंग बदलून याचीही जाणीव दाखवली आहे.
माझी एक चिनी हाऊसमेट आणि मैत्रिण माझ्याकडे राज कपूरच्या गाण्यांची ऑडीओ कॅसेट तिच्या आजीसाठी मागत होती, तिची एकदम आठवण झाली.
अदिती
तुम्ही सांगितलेली आठवण छानच आहे, जपून ठेवण्यासारखीच आहे. आणि ते दुवेही मस्त हो, बहुगुणी शेठ. साधारणपणे अभारतिय लोकांना काही हावभाव खूप रूळल्याशिवाय नीट जमत नाहीत. पण ही पोरगी तयार आहे एकदम. ग्रेट.
बिपिन कार्यकर्ते
हापिसात असल्याने अजून व्हिडीओ पाहिले नाहीत...
पण एक गोष्टं आठवली... चिनमधेच नव्हे तर टर्कीमधेही राज कपूरचे चित्रपट डब करून पाहिल्या जायचे, पण गाणी मात्र हिंदीत असायची (म्हणे). माझा लॅबमेट जो टर्कीमधून आलेला त्याने तिथे राजकपूर फार फेमस होता असे सांगीतले. त्याला तर 'आवारा हूं...'ची धूनही व्यवस्थीत येत होती.
-अनामिक
सही आहे लेख! दुवेही मस्त!
खूप वेळा लिहीले आहे मी हे खरं तर! पण लिहीते परत..
लास वेगासला व्हेनेशिअन कॅसिनो मधे एका आजोबांनी अॅकॉर्डीअन वर आवारा हू, इचक दाना बिचक दाना गाऊन, वाजवून दाखवले होते! मस्त वाटलं होतं!!
राज कपूर भलताच फेमस होता ना!
http://www.bhagyashree.co.cc/
"मिशा" माझा एक रशियन सहकारी राजकपुरचा अस्सल चाहता होता. आम्ही काम करता करता तासन तास "आवारा हू ", "मेरा जुता है जपानी" गुणगुणत बसायचो. तर टिम नावाचा अमेरीकन सहकारी भीमसेन जोशींच्या गाण्याचा दिवाणा आहे. कलेला सीमा-भाषेच बंधन नसते हेच खरं.
ह्म्म मी आमच्या कॉश्च्युम शॉपमधे सगळ्यांना गुलाम अलीच्या गझलांपासून त्यावेळेला लेटेस्ट असलेल्या दिलसे, ताल च्या गाण्यांपर्यंत, फड सांभाळ पासून प्रीतरंगमधल्या कोहिकडे गेली मया कुक्काची टिकली पर्यंत सगळं ऐकायला लावलं होतं तीन वर्षात.
सगळ्यांना छैय्या छैय्या जरा जास्तंच आवडलं होतं. अनेकांना तेव्हा गाणी कॉपी करून दिली होती.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
जालावर भटकंती करीत असताना ही चित्रफीत मिळाली. ही म्हणे श्रीलंकेतील पहिली कराओके संगीताची चित्रफीत. पण गाण्याचे शब्द ऐका - आपल्या कोंकणी भाषेतील!!
कलेला देशसीमांचं, भाषेचं बंधन नसतं हे खरंय!
" alt="" />
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
माझा स्वतःचाच धागा वरती आणल्याबद्दल थोडं चोरटं वाटतंय, पण तासभर मोकळा वेळ मिळाला आणि या धाग्याची आठवण करून देणारे काही व्हिडिओज एकापाठोपाठ एक मिळाले, म्हणून ते इथे देतोय.
या आधी मी भारतीय वंशाच्या पण अमराठी मुलांनी गायलेली मराठी गाणी शोधतांना सापडलेली अनुषा आणि पियानो/कीबोर्ड वाजवणारे वा गाणारे इतर बालकलाकार यांच्या विषयी लिहिलं होतं.
आज ओळख करून देतोय ती 'कलेला देशसीमांचं, भाषेचं बंधन नसतं' हे पुन्हा एकदा सिद्ध करणार्या काही अ-भारतीय कलाकारांची. इथे तुम्हाला ते दिसतील ते भारतीय गाणी गातांना (एका अपवादांत नाचतांना).
आवारा हूं
एक लडकी की तुम्हें क्या सुनाऊं दासतां
पुढची बरीचशी गाणी गाणारी चिनी 'एमी' ही गायिका बरीच वर्षे भारताच्या प्रेमात आहे, आणि तिची लतादीदींवर बरीच भक्ती आहे.
आओ ना, आओ ना
देख लो आवाज़ देकर
चुरा लिया है तुम ने
लूटे कोई मन का नगर
ओ यारा रब रुस जाने दे
थोडा रेशम लगता है
कभी कभी मेरे दिल में
हम तो भई जैसे हैं वैसे रहेंगे
मैं ता यारा दीवाना तेरा जाट यमला (कोरियन कलाकार पंजाबी गीतावर नाचतांना)
mai ta yaara deewana tera jat yamla (Koreans dancing to a Punjabi song)
छिन्न छिन्न आसय (हे गाणं अर्थातच 'दिल है छोटासा' याचं मूळ रूप आहे)
वंदे मातरम (खरं तर त्याचं तामीळ रूप) गातांना एक चिनी कलाकार खुद्द ए आर रेहेमानच्या उपस्थितीत
शेवटी, याच लेखात म्हंटलं होतं ते पुन्हा उद्धृत करतो:
अशी आणखीही अनेक उदाहरणं डोळे उघडे ठेवले तर सापडतील, तुम्हालाही माहीत असतील. आपला देश इतरांनी अनुकरण करावं अशा काही अजरामर कलाकृती प्रसवतो हे खरं आहेच, पण त्या कलाकृती अंगिकारण्याची वृत्ती इतर देशीय ठेवतात हेही कौतुकास्पदच!
छान लेख! एक एक दुवेही अप्रतिम! एमीची गाणीही आवडली!
माझ्या ओळखीतलेही काही अभारतीय लोक उत्तम भांगडा करतात आणि मला भांगडा नीट येत नाही म्हणून हसतात देखील माझ्यावर!
नवीन दिलेली गाणीही आवडली. त्याचबरोबर Hmong लोकांच्या परिस्थितीबद्दल दिलेली माहितीही. तिला तमिळ गाणं म्हणताना पाहून एका जालस्नेह्याने सांगितलेलं - दुसर्या महायुद्धात जपानी सैन्यापासून वाचवण्यासाठी तमिळ कुटुंबांच्या घरी आश्रय घेतल्यामुळे अस्खलित तमिळ बोलता येणार्या चिनी आजीबाईंचं उदाहरण आठवलं.
स्वतःचाच धागा बर्याच वर्षांनी वरती काढायचा प्रमाद करतो आहे, कारण खटपट्या यांनी खरडफळ्यावर दिलेला हा अप्रतिम दुवा पाहिला आणि या धाग्याची आठवण झाली:
आता या फारीनच्या कोळणी पहा
https://www.facebook.com/manish.patil.1042/videos/869140219845209/
(function(d, s, id) { var js, fjs = d.getElementsByTagName(s)[0]; if (d.getElementById(id)) return; js = d.createElement(s); js.id = id; js.src = "//connect.facebook.net/en_US/sdk.js#xfbml=1&version=v2.3"; fjs.parentNode.insertBefore(js, fjs);}(document, 'script', 'facebook-jssdk'));
दुवा चालत नाही.
तुम्ही लेखात ज्या चिनी प्रांताचा उल्लेख केला आहे त्याचे नाव युन्नान (Yunnan) आहे. हिमालय नेपाळ व भारतातून उत्तर मियानमार मार्गे चीनमध्ये शिरतो... तोच हा युन्नान. माझ्या मते हा चीनचा सर्वात जास्त निसर्गसुंदर प्रांत आहे. त्याची उत्तर-पश्चिम सीमा भारताच्या उत्तर-पूर्व सीमेपासून केवळ १२५ किमी दूर आहे ! हा भाग सांस्कृतीकरित्या तिबेटशी खूप जवळ आहे. आजही तेथे हिंदी चित्रपट बघितले जातात, हिंदी गाणी आवडीने ऐकली जातात आणि लोकांना भारतियांबद्दल आपुलकी आहे. तिथल्या अनेक लोकांनी भारतात शिक्षण घेतलेले आहे. चीनच्या भटकंतीत याच एका प्रांतात मला हिंदीत बोलून चकीत करणारे लोक भेटले होते ! माझे तिथले अनुभव इथे (भाग ८ ते १२) वाचता/बघता येतील.
प्रतिक्रिया
आपला देश
+१
हा हा
छान
मस्त लेख
वा..
छान
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
असेच म्हणतो!
जय हो.
हाहाहा!!!
मस्त आहे दुवा.
:)
शेठ!!!
हापिसात
सही आहे
खूपच
उत्तम लेख
"मिशा"
ह्म्म मी
खरेच की!!
हम सब एक हैं!
मस्त धागा.... वाचायचा राहूनच
धागा आवडला.
पुन्हा एकदा मेकी यांग:
मस्त!
मस्त.
छान
फॉरीनच्या कोळणी
आता या फारीनच्या कोळणी पहा https://www.facebook.com/manish.patil.1042/videos/869140219845209/(function(d, s, id) { var js, fjs = d.getElementsByTagName(s)[0]; if (d.getElementById(id)) return; js = d.createElement(s); js.id = id; js.src = "//connect.facebook.net/en_US/sdk.js#xfbml=1&version=v2.3"; fjs.parentNode.insertBefore(js, fjs);}(document, 'script', 'facebook-jssdk')); कलेला देशसीमांचं, भाषेचं बंधन नसतं हेच पुन्हा जाणवलं!दुवा चालत नाही.