✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

बुद्धिवादी संस्थांचा व विचारांचा पराभव आधीच झाला आहे

श
शशिकांत ओक यांनी
Wed, 06/29/2011 - 21:06  ·  लेख
लेख
मित्र हो, आंतरऱाष्ट्रीय कीर्तीचे प्रख्यात बुद्धिवादी नाडीग्रंथांच्या संदर्भातील आपल्या कलुषित विचारांचे मत प्रदर्शन कसे करतात. याचा नमुना सोबत मराठीवाचकांसाठी प्रथमच प्रकाशित करत आहे. (संदर्भ- इंडियन स्केप्टिक मासिकाच्या नोव्हेंबर १९९६ मधील अंकात नाडी ग्रंथांवर केले गेलेले भाष्य) आत्तापर्यंत अनेक बुद्धिवाद्यांच्या संस्था व व्यक्तींच्या विचार प्रदर्शनाला नाडीग्रंथ केंद्रांतर्फे उत्तरे पाठवण्यात कोणत्याही नाडीकेंद्राने रस दाखवला नव्हता. मात्र यावेळी नाडीकेंद्रांतर्फे पुण्यातील केंद्र संचालक श्री. जी.ईश्ववरन यांनी बुद्धिवाद्यांच्या अशा कैफियतींवर आपले मत प्रदर्शन केले आहे. त्यांनी आपली प्रतिक्रिया शब्दात मांडण्यासाठी विंग कमांडर शशिकांत ओकांना विनंती केली. नाडीविरोधकांची मते विविध प्रसारमाध्यमांतून दणक्यात व ठळक मथळ्यांनी प्रकाशित होत असल्याने नाडी ग्रंथप्रेमींच्या मनात गोंधळ उडतो. ज्यांनी नाडी ग्रंथांचे अवलोकन केलेले नाही त्यांची मने आधीच कलुषित होतात अस लक्षात घेऊन त्यांनी हे पाऊल उचलले आहे.
प्रेषक – जी. ईश्वरन पुण्यातील नाडी केंद्राचे संचालक.
रिसबुडांनी विचारलेले प्रश्न लाल रंगात असून बी. प्रेमानंदांनी दिलेली उत्तरे काळ्यारंगात होते माझे (ईश्वरनजींचे) स्पष्टीकरण निळ्या जाड टाईपात केले आहे. १. रिसबुडांचा प्रश्न - ‘बुचकळ्यात टाकणारा प्रश्न असा की व्यक्तीची नावे(नाडीच्या) पट्टीवर दिसतात कशी? उत्तर - त्या पट्ट्या ग्राहक जेंव्हा ते ऐकायला येतो त्यावेळी तयार केल्या जातात...... .....नाडीकेंद्रातर्फे काही लोक पेरून ठेवलेले असतात त्यांनी व नाडीपट्या शोधायसाठी नाडीवाचकाने विचारलेल्या प्रश्नातून सर्व माहिती मिळवली जाते. नंतर त्या आधारे नाडीपट्टी बनवून वाचली जाते. नाडीकेंद्र चालक श्री. ईश्वरनजींचे स्पष्टीकरण - याठिकाणी बी. प्रेमानंद अभावितपणे नाडीपट्यात व्यक्तीचे नाव लिहिलेले असते असे मान्य करतात. रिसबुडांना तेच मुलतः अमान्य आहे म्हणून ते प्रेमानंदांशी वाद उकरून काढत होते. आता तर अनेक लोकांच्या नाडीपट्यातील नावाची शहानिशा तमिळ तज्ज्ञांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे ताडपट्टीतील भाषा तमिल नसते त्यात काहीही भविष्य कथन नसते आदी आक्षेप फुसके ठरले आहेत.ताडपट्टीत व्यक्तीच्या जन्मदिनांकाची व ग्रहस्थितीची नोंद असणे शक्य नाही म्हणणाऱ्यांनी त्या नोंदी पहाव्यात व मग आपले मत ठरवावे. ८. सध्या आमची तमिळेतर भागातील नाडी केंद्रांची समस्याच अशी आहे की आम्हाला बाहेर जमलेल्या ग्राहकांची भाषा धड बोलणारी माणसे मिळत नाहीत. मग नाडी केंद्रात भविष्य पहायला आलेल्या लोकांना त्यांच्या भाषेत बोलते करून त्यांच्या कडून नकळत माहिती मिळवायला लागणारे भाषापटुत्व व संभाषण कुशलता फार दूरची गोष्ट. उलट भविष्य कथन त्या त्या भाषेत टेप करून देताना भाषांतरकाराच्या रुपांतराचा दर्जा फारच खालचा असतो अशी सर्वसाधारणपणे तक्रार असते. शिवाय आमच्यासारख्या रंगाने, पोशाखाने व बोलण्याच्या धाटणीने तात्काळ ओळखू येणाऱ्या लोकांनी जमलेल्या ग्राहकांशी सलगीकरून माहिती जमा करणे कसे शक्य आहे? हे विरोधकांनी प्रयोग करून आम्हला दाखवावे. ९. नाडी केंद्रांची जागा शहरी भागात मिळेल त्या ठिकाणी एक बेडरुमच्या फ्लॅटमधे असते.त्या तेवढ्या जागेत जर ताडपत्राच्या नव्या पानांवर लेखन करायला आम्ही ताडाच्या पानांच्या झावळ्या व कातरकाम करून कचरा करू लागलो तर शेजारपाजारचे रहिवासी आमच्यावर नजर ठेऊन आमचे ते काम बंद पाडतील. १०. बी. प्रेमानंदांनी म्हटल्याप्रमाणे केंद्राची माणसे लोकात मिसळवणे, पट्ट्या केंद्रात लिहित बसून तयार करणे या सर्व त्यांच्या कल्पनेच्या भराऱ्या आहेत. कारण आम्हाला तसे करायची गरज नाही. नाडीवाचक उपलब्ध असलेल्या पट्टयातील मजकूर वाचतो तो त्या व्यक्तीला जुळत असेल असे त्या व्यक्तीने मान्य केले तरच त्या पट्टीतील मजकूर एका ४० पानी वहीत उतरवून त्याच्यावरून ग्राहकाला त्याच्या भाषेत त्यातील कथन टेप करून देतो. त्या आधी मोबदला घेतला जात नाही. अर्थात हे सर्व नाडी विरोधकांना पक्के ठाऊक आहे की त्यांच्या या तकलादू, निरर्थक सबबींमधे काही दम नाही. तरीही महर्षींच्या दिव्यदृष्टीने नाडी ग्रंथांची निर्मिती झाली आहे. हे सत्य अशा संस्थांना वा व्यक्तींना तत्वतः मान्य करता येत नाही कारण मग त्यांच्या आधी ठरवलेल्या तत्वांचा - बुद्धिवादाचा - पायाच निखळतो अशी त्यांची धारणा असल्याने त्यांना अशा सबबींवर भिस्त ठेऊन खोटी व भलतीसलत कारणे द्यावी लागतात. ११. त्यामुळे अशा बुद्धिवादी संस्थांचा व विचारांचा पराभव आधीच झाला आहे पण ते तो लोकलज्जेस्तव कधीच मान्य करणार नाहीत. नाही तर मग त्यांची सार्वजनिक छी थू झालेली त्यांना परवडण्यासारखी नाही. भाग ६ समाप्त. पुढे चालू.....
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
माहिती

प्रतिक्रिया द्या
15508 वाचन

💬 प्रतिसाद (104)

प्रतिक्रिया

काही हरकत नाही

शशिकांत ओक
Mon, 08/08/2011 - 21:45 नवीन
मित्रा, निदान आपण नाडी ग्रंथांच्याबद्दल असे विचारणा करून आपला सकारात्मक हेतु स्पष्ट केलात. इथे अजून अनेक मिपाकर नाडीकेंद्रांजवळ राहात असूनही स्वतःची पट्टी पहायला जात नाहीत. पण छद्मि टीकाटिपणी करत राहातात. असो. असे चालतेच. मी मनावर घेत नाही. कारण जेंव्हा नाडीग्रंथ पहायची वेळ येते तेंव्हाच ती निघते. उत्तराबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

किति लोक? आणि किती पट्ट्या ??

शाहिर
Fri, 07/01/2011 - 18:02 नवीन
Latest official current world population estimate, for mid-year 2010, is estimated at 6,852,472,823. 6,852,472,823 लोक संख्या आहे ..जगाची .... तेवढ्या पट्ट्या लिहुन ठेवल्या आहेत का ??
  • Log in or register to post comments

तेवढ्या पट्ट्या लिहुन ठेवल्या आहेत का

शशिकांत ओक
Fri, 07/01/2011 - 21:45 नवीन
मित्रा, ही संख्या काहीच नाही. असे तर्क अनेकांनी आधी देखील केले.त्यात प्रस्तूत लेखक ही होता. कारण आजची ही जनसंख्या पण आधी कित्येक शतके जन्मलेले लोक धरले तर गणना करा ना.... तर कदाचित कॅलक्युलेटरचे आकडे कमी पडतील... त्याचे उत्तर गणिती आडाख्यांनी सुटत नाही....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहिर

बाब्बो...

श्रावण मोडक
Fri, 07/01/2011 - 22:30 नवीन
मेलो... विषय संपला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

हे कसे शक्य आहे

शशिकांत ओक
Fri, 07/01/2011 - 22:49 नवीन
मित्रा, आता विषय सुरु झाला. हे कसे शक्य आहे या शोधाचा.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

शोध

नितिन थत्ते
Sat, 07/02/2011 - 07:52 नवीन
याचा अर्थ १. सगळ्या नाडीपट्ट्या आधीच लिहिलेल्या नाहीत. त्या पृच्छक आल्यावर (ऑपॉप किंवा जाणूनबुजून) लिहिल्या जातात. तसे असेल तर कोणाचीही नाडीपट्टी कोणत्याही केंद्रावर मिळायलाच हवी. किंवा २. जसे सगळ्यांचे एका दिवसाचे भविष्य १२ च भागात सांगता येते. तशा कदाचित काही विशिष्टच संख्येने (५ लाख/१०लाख/१ कोटी) नाडीपट्ट्या असू शकतात. तेवढ्याच आहेत. नाडीपट्टीत जितपत जीवनक्रम लिहिलेला असू शकतो तसा तंतोतंत जुळणारे अनेक लोक असतात. म्हणजे नितीन नाव थत्ते आडनाव असलेले १९६३ मध्ये जन्मलेले, आईचे नाव अमुक असलेले आणि वडिलांचे नाव तमुक असलेले, एक मुलगी असलेले तिचे नाव अमुक अक्षराचे असलेले, माझ्यासारखे शिकलेले, माझ्यासारखीच नोकरी करणारे अनेक लोक आजच्या घडीला जगात (ही संख्या किमान काही हजार असणार) असणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

अनुभव घ्यावा

शशिकांत ओक
Sat, 07/02/2011 - 12:58 नवीन
मित्रा ,
कोणाचीही नाडीपट्टी कोणत्याही केंद्रावर मिळायलाच हवी
चर्चा कशाला अनुभव घ्यावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

वा!

प्रकाश घाटपांडे
Sat, 07/02/2011 - 08:17 नवीन
चर्चा वाचुन धन्य जाहलो! शरण तुला शशिकांता मी रे ऽऽ शरण तुला शशिकांताऽऽ...
  • Log in or register to post comments

...

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 07/02/2011 - 10:10 नवीन
... दलाला दलाला दलाला दलाला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

आपणाला णंदलाला अस टायपायचं

आत्मशून्य
Tue, 08/02/2011 - 00:14 नवीन
आपणाला णंदलाला अस टायपायचं होतं का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

हजेरी अपेक्षित

शशिकांत ओक
Sat, 07/02/2011 - 12:54 नवीन
प्रिय पका काका, काल भाषणाला आपली हजेरी अपेक्षित होती असे प्रकाश दादा पेंडशांच्या बोलण्यात कळले.
शरण तुला
महर्षींच्या चरणी जरूर ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

निषेध !

परिकथेतील राजकुमार
Sat, 07/02/2011 - 13:14 नवीन
ओकांना कॉर्नर करण्याचा कंपूचा पुन्हा एकदा घॄणास्पद प्रयत्न ! अर्थात कंपूकडून असेच कांहीं तरी वाचायला मिळेल याची खात्री होतीच. ती खरी ठरली हे पाहून खेद झाला. अर्थात कोणी कसे वागावे हे सांगण्याचा हक्क मला नाही. मी आपले एक निरिक्षण नोंदवले. काही लोकांनी त्यांच्यासाठी वापरलेले शब्द बघुन मिपा प्रगल्भतेकडे निघाली आहे, का रसातळाकडे असे वाटून गेले. अर्थात, ज्याचीत्याची जाण, समज आणि संवेदनशीलता यावरही काही गोष्टी अवलंबून असतात हा भाग वेगळा..! संतप्त परा भयंकर
  • Log in or register to post comments

पराशेठ, ज्याचीत्याची जाण, समज

आत्मशून्य
Sat, 07/02/2011 - 14:10 नवीन
पराशेठ,
ज्याचीत्याची जाण, समज आणि संवेदनशीलता यावरही काही गोष्टी अवलंबून असतात हा भाग वेगळा
हे ओक साहेबांच सूदैव म्हणावं की दूर्दैव ? ते ज्या गोश्टीचा प्रसार गूरू आज्ञेने करत आहेत, त्याला जो पैसा मोजावा लागतो ना तो आपल्यासारख्या सामान्य लोकांच्यासाठी खरोखर मोठी रक्कम आहे. आणी ती खर्चून जर काही(?) त्रूटी अनूभवाला येत असतील तर त्या विरूध्द कोणालाही संताप येणे साहजीक आहे. अर्थात अनूभव न घेऊन बाजूने अथवा विरूध्द बोलणार्‍यांबाबत मी मत व्यक्त करणार नाहीच. पण माझ्या स्वानूभवानूसार मि ओक साहेबांचे लिखाण वाचून प्रभावीत झालो आणी नाडीपट्टी केद्रांची माहीती विचारून मग केंद्रात जाऊन त्याप्रमाणे पट्टी बघीतली (तो संवाद व्यनी आणी स्क्रीन शोट्स रूपाने आजही जपून ठेवला आहे ) आता जर यामधून भ्रमनिरास झालेला अनूभवाला आला पण जर ओक साहेब सदरील विषयावर अजूनही (आता) एकतर्फी भासणारं लेखन करतच आहेत तर त्यांना शंका विचारल्या तर काय चूक ? बर काही शंका विचारल्या तर त्यांनी लिहलेला पूस्तकाचा रेफरन्स दिला , मग यासाठी ओक साहेबांनी लिहलेल पूस्तकही वाचलं आणी मगच शंकाना सूरूवात केली, पून्हा पैसा खर्च पण त्यात शंका समाधान मिळाले नाहीच. हाती फक्त निराशा... आणी आता जर त्या शंकाही संपूर्णपणे दूर्लक्शीत केल्या गेल्या वा अजून पैसा खर्च करत शंका व्यावसायीक पध्दतीने काम करणार्‍या केद्रचालकांना विचार असे सूनवले गेले तर राग येणार नाही काय ? ओकांच्या लेखनावर नाडी केंद्रवाल्याना प्रश्न विचारायचा संबंध काय (उदा. पराशेठच्या चित्रपटाच्या परीक्षण लिखाणावर चित्रपट दीग्दर्शीत करणार्‍याची कॉलर पकडली, तर तो ते खपवून घेइल काय ? )? ज्यानं लिहलय त्यानेच उत्तर द्यावे/चर्चा करवी. एकदा पैसा खर्च केला.. पून्हा शंका समाधानासाठी अजून खर्च केला, आता नाडी वाल्यांनाच काय मी हा प्रश्न संसदेमधेही विचारायला तयार आहे फक्त आता बिन खर्चीक मार्ग त्यांनी सांगावा. खर तर स्वतःच उत्तर देणे जास्त श्रेयसकर. जेव्हा मनापासून श्रध्दा ठेऊन वागलेला मनूष्य अशा अनूभवाला सामोरा जातो तेव्हां त्याचा मनस्ताप व झालेला आर्थीक भूर्दंड व अनिश्चीततेची टांगती तलवार यागोश्टींपूढे जाण, समज आणि संवेदनशीलता या गोश्टी प्रचंड थीट्या पडतात. मिपाची प्रगल्भता काय कामाची जर ओक साहेबांच्या इथल्या लिखाणामूळे एका सन्माननीय, श्रध्दाळू मीपाकराला अशा अनूभवातून जावे लागत असेल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

श्री. आत्मशून्य साहेब, खरेतर

परिकथेतील राजकुमार
Sat, 07/02/2011 - 14:23 नवीन
श्री. आत्मशून्य साहेब, खरेतर तुम्ही माझे नाव घेतलेत म्हणून हा प्रतिसाद तुम्हाला उद्देशुन लिहित आहे. मात्र खरे सांगायचे तर हा प्रतिसाद फक्त तुम्हालाच नाही पण कोणतासा एक प्रतिसाद हा आपल्याला उद्देशून आहे किंवा आपल्याला टोचुन आहे से वाटून त्या वर भाष्य करणार्‍या सगळ्या नविन सदस्यांसाठी आहे. (तुम्ही कदाचीत त्या उद्देशाने लिहिले नसेल देखील पण तुम्ही प्रतिवाद करायला उभे ठाकलात म्हणून हे लिहित आहे.) तुम्हा लोकांना मला येवढेच सांगावेसे वाटते की तुमचा अभ्यास अतिशय कमी आहे :) माझा वरचा प्रतिसाद काय आहे हेच तुम्हाला मुळात कळलेले नाही आणि त्या प्रतिसादाची उगमस्थाने तर नाहीतच नाहीत :) थोडा धीर धरा, अभ्यास वाढवा, अगदीच लक्षात नाही आले तर ह्या प्रतिसादामागचा नक्की अर्थ बिनधास्त खव किंवा व्यनीतून विचारा. मात्र असे गैरसमज करुन घेऊ नका. तुमचे किंवा अजुन कोणाचे एखादे विधान पटले नाही तर मी सरळ त्या सदस्याचे नाव लिहून तसे बोलायला कचरणार नाही ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

पराशेठ,लेखनातील काही महत्वाचे

आत्मशून्य
Sat, 07/02/2011 - 14:38 नवीन
पराशेठ,लेखनातील काही महत्वाचे संदर्भ जे माझ्या डोक्यावरून गेले असं आपण म्हणता आहात आणी ते समजून घ्यायचे असतील तर मला अभ्यास वाढवावाच लागेल असं सांगत आहात तर त्यात आता पूर्ण तथ्य आहे असे मला वाटत आहे. कराण मला ते खरोखर समजले नाहीयत. माझ्या डीस्कोस्टाइल (यापानावरील रंगीबीरंगी) लेखनाच्या प्रकाराने व ओक साहेबांचे नाडी लिखाण व त्या अनूशंगाने त्यांच्या कृती यावर मी व्यक्त करत असलेल्या विरोधी मतांमूळे आपण ज्या कोणाला उद्देशून बोललात त्यात माझा समावेश असावा असा माझा ग्रह झाला होता म्हणूनच मी माझी व्यथा विस्तार पूर्व आपल्याला सांगीतली होती. असो, माझा हा गैरसमज दूर केल्याबद्दल धन्यवाद त्यामूळे बाकी इतर काही विषेश गोश्टी जाणायची फारशी गरज सध्या वाटत नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

भरतरत्न

Nile
Sat, 07/02/2011 - 14:31 नवीन
ओकांना कॉर्नर करण्याचा कंपूचा पुन्हा एकदा घॄणास्पद प्रयत्न !
भां** बा***! मी तर म्हणतो ओकांना कोपर्‍यात घेऊन एकदाचा भरतरत्न वगैरेच का देऊन टाकत नाही कोणी? सोबतीला हैयोहैय्ययोंना ही ज्ञानपीठ वगैरे देऊन टाका. पर्‍यालाच आयोजक करा कार्यक्रमाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

भां** बा***! मी तर म्हणतो

परिकथेतील राजकुमार
Sat, 07/02/2011 - 14:50 नवीन
भां** बा***! मी तर म्हणतो ओकांना कोपर्‍यात घेऊन एकदाचा भरतरत्न वगैरेच का देऊन टाकत नाही कोणी? सोबतीला हैयोहैय्ययोंना ही ज्ञानपीठ वगैरे देऊन टाका. पर्‍यालाच आयोजक करा कार्यक्रमाचा.
औषध घ्या. आणि कृपया जिकडे अशी भाषा चालते तिकडे जा. प्लीज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

अस्सल मराठीतून

Nile
Sat, 07/02/2011 - 14:54 नवीन
अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ.
अहो हीच तर अस्सल मराठी अभिव्यक्ती आहे परासेठ, तुमच्या सविताभाभीसारखं नाय काय! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

अस्सल मराठी

अजातशत्रु
Tue, 07/05/2011 - 18:57 नवीन
अहो हीच तर अस्सल मराठी अभिव्यक्ती आहे परासेठ, तुमच्या सविताभाभीसारखं नाय काय! =))
=) =) =) . . . . . . . बाकी काहींचा 'टोन' कधि कधी बदलतो पाहून आनंद जाला :) हे प्रगल्भतेचे लक्षण असावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

अहो हीच तर अस्सल मराठी

परिकथेतील राजकुमार
Mon, 07/11/2011 - 11:57 नवीन
अहो हीच तर अस्सल मराठी अभिव्यक्ती आहे परासेठ, तुमच्या सविताभाभीसारखं नाय काय! =))
तुमचा टोन बदलल्याने आणि तुमचे चित्त पावन नसल्याने तसेच तुम्ही स्पॅनीश दिसत नसल्याने आम्ही उत्तर द्यायला बांधील नाही. आणि हो उगा आमचा आणि सविताभाभीचा संबंध जोडू नये. घासुगुर्जींना राग येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

अवांतर

राजेश घासकडवी
Mon, 07/11/2011 - 21:44 नवीन
हे पहा पराशेठ, गेले बरेच दिवस पहातोय, तुम्ही काही ना काही कारण काढून, अवांतर करून लोकांना उचकवण्याचा प्रयत्न करत आहात. सविताभाभीसारख्या देवीसमान पवित्र हिंदू स्त्रीबद्दल बोलताना पातळी सांभाळा, इतकंच म्हणतो. माझं नाव जाहीरपणे घेतलं म्हणून लिहिलं. नाहीतर शशिकांत ओकांच्या या लेखनावर प्रतिसाद द्यायची माझी काही टाप होती का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

छ्या...

श्रावण मोडक
Mon, 07/11/2011 - 21:56 नवीन
तुम्ही काही ना काही कारण काढून, अवांतर करून लोकांना उचकवण्याचा प्रयत्न करत आहात.
छ्या... ओकांच्या धाग्यावर लोकांना उचकावण्यासाठी वेगळे प्रयत्न कशाला? त्यांना तुम्हालाच उचकवायचं होतं. तुम्ही उगाचच उचकलात. ओकांच्या धाग्यावर घासूगुर्जींना प्रतिसाद द्यायला लावतोच, असं परा परवा म्हणत होता. ते असं खरं केलं त्यानं... छ्या... तुमचं काही जात नाही हो. पैज मी हरलो ना. कुठून भरू आता ती? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

परा भौ

अजातशत्रु
Sat, 07/16/2011 - 19:01 नवीन
तुमचा टोन बदलल्याने आणि तुमचे चित्त पावन नसल्याने तसेच तुम्ही स्पॅनीश दिसत नसल्याने आम्ही उत्तर द्यायला बांधील नाही.
आमचा टोन कधीच बदलत नाही :) आमचे चित्तही पावन अन् पवित्र आहे.... ( तुमचे काय ते तपासून घ्या.) राहीला प्रश्न स्पॅनीश दिसण्याचा तसे आम्ही दिसण्याचा सुतराम संबंध नाही. आम्हाला न पाहताच आम्ही तसे दिसत नाही, असा कयास कम जावई शोध बरा लावलात :) असो आम्हि पक्के भारतिय दिसतो यात मात्र तीळमात्र शंका नाहि.
आणि हो उगा आमचा आणि सविताभाभीचा संबंध जोडू नये. घासुगुर्जींना राग येतो.
तुमचा आणि सविताभाभींचा संबंध जोडण्याचा प्रश्न आला कुठे? मी केवळ श्री.Nile यांनी दिलेल्या उत्तुंग प्रतिसादाला दाद दिली. अवांतर : 'त्या' धाग्यावरील प्रतिक्रियेतून बर्‍याच जणांना ते स्पॅनीश लोकांसारखे दिसत आहेत,असा भास झालेला दिसला आणि याचे त्यांना कोण कौतुक अन् अभिमान....हे पाहून मलाही भरुन आले.. :) . . . . . . . . . अतीअवांतरः मला माझे पारशी कलिग्स आणि इतर पारशी लोक भेटल्यावर पारशी मध्येच बोलायला सुरुवात करतात (मी ही मोडक्या तोडक्या पारशीत त्यांच्याशी संवाद साधतो) (बहुतेक ती फारसी असावी) म्हणून मि काय स्वतःला पारशी समजत नाहि ब्वॉ... आणि स्पॅनीशही.. आम्ही आपले भारतियच भले ;) जयहिंद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हं???

पंगा
Sat, 07/16/2011 - 19:07 नवीन
अतीअवांतरः मला माझे पारशी कलिग्स आणि इतर पारशी लोक भेटल्यावर पारशी मध्येच बोलायला सुरुवात करतात (मी ही मोडक्या तोडक्या पारशीत त्यांच्याशी संवाद साधतो) (बहुतेक ती फारसी असावी)
हिंदुस्थानातले पारशी लोक सर्वसाधारणतः (थोड्याशा वेगळ्या बाजाची का होईना, पण) गुजराती बोलतात, अशी ऐकीव माहिती होती. 'पारशी' भाषेबद्दल नव्यानेच ऐकले. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजातशत्रु

=)) =))

परिकथेतील राजकुमार
Fri, 07/29/2011 - 13:47 नवीन
अजातशत्रु, तुम्ही डॉक्यावर पडला आहात काय हो ? माझ्या प्रतिसादात मी अगदी व्यवस्थित श्री. निळ्या ह्यांचे वाक्य कॉपी पेस्ट करुन मग त्यानंतर माझा प्रतिसाद दिला आहे. त्याचा अर्थ मी तो प्रतिसाद श्री. निळ्या नालायक ह्यांनाउद्देशुन दिलेला आहे. थोडे निट वाचा, वाचलेले मेंदूपर्यंत जौन त्याचा अर्थ तुमच्या लक्षात येउ द्या, मग त्यावर भाष्य करा ना :) दिसले पाचर की निघाले लगेच शेपूट घेउन :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजातशत्रु

हृदय-प्रेम भावनेने सामोरे जा

शशिकांत ओक
Sat, 07/02/2011 - 14:37 नवीन
मित्रा,
ओकांना कॉर्नर करण्याचा ..
गेल्या काही वर्षापासून मिपाकरांनी हे माझ्याबाबत अनुभवलेले आहे. प्रयत्न झाले. पुढेही होतील... बुद्धिवादी लोकांची ही खुमखुमी असते. करायचे काही नाही मात्र फाटे फोडून व गिल्ला करून वाचकांचा मानसिक गोंधळ उडवून द्यायचा.... अन्य ठिकाणी याला जास्त जोर आहे. 'मला वेळ नाही म्हणून नड रे - - ला, असे फुकाचा वेळ असलेला एक दुसऱ्याला सुचवतो. आडनावाचे विडंबन, ठक कि भ्रम अशा प्रतवारीत नाडीवाल्यासेनांना दोन्हीकडे टाकावे, परदेशी नियतकालिकातून त्यांनी जर नाडीला मान्यता दिली तर मग आम्ही पाहू. आदि वाचून मजा वाटली. साधे सोपे सरळ अनुभव घेण्याचे काम कसेही करून टाळणे हे मला नवीन नाही. आम्ही अनुभव घ्यायची गरज नाही. तर्कानेच आम्ही नाडीग्रंथांना उडवून लावतो. नाडीला प्रायमाफेसी केसच नाही असे म्हणणारे अनेक मान्यवर आहेत. पण प्रत्यक्ष कृतीची वेळ आली की ... असे लोक या पुढे नाडी ग्रंथांचा अनुभव घेण्यास पुढे आले व नाडीग्रंथांतील अदभूतता पटली तरी समाजात आपली प्रतिष्ठा अबाधित राहावी म्हणून ते नाडीग्रंथांना दूषणे देत राहतात. असे मला पुर्वीच प्रत्ययाला आले आहे. नाडीग्रंथांतील लिपी व काव्यानंद घेण्याचा धागा गाजला. तेथे नाडीग्रंथांवरील लिखाणाचा बंदोबस्त करावा असा धागा निघाला. कालांतराने कोणाला 'शरण आलो' म्हणून तर कोणाला नाडीकथनाचे फोलपण सांगणारे आम्हीच मुर्ख ठरलो. म्हणून नाद सोडावा लागला. यात ओकांचे काहीही मोठेपण नाही. महर्षींच्या कार्याची फक्त झलक त्यांनी लोकांना सादर केली इतकेच. नाडीमहर्षींच्या कथनात येते की बुद्धीच्या वाटेने सामोरे जाऊ नकोस. हृदय-प्रेम भावनेने सामोरे जा व पहा.
  • Log in or register to post comments

सूदर विचार, संपूर्ण सहमत.

आत्मशून्य
Sat, 07/02/2011 - 14:43 नवीन
पण एक गोश्ट आवर्जून नमूद करतो...
बुद्धिवादी लोकांची ही खुमखुमी असते. करायचे काही नाही मात्र फाटे फोडून व गिल्ला करून वाचकांचा मानसिक गोंधळ उडवून द्यायचा....
आपल्या लिखाणातून माझ्या मनात निर्माण झालेल्या शंकांचा गॉधळ नेमक्या कशा स्वरूपाचा आहे हे वरील वाक्यात आपण अचूक टीपलेत. यावर अजून भाष्य ऐकायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

अजून भाष्य ऐकायला आवडेल

शशिकांत ओक
Sun, 07/03/2011 - 14:36 नवीन
मित्रा,
मनात निर्माण झालेल्या शंकांचा गॉधळ नेमक्या कशा स्वरूपाचा आहे हे वरील वाक्यात आपण अचूक टीपलेत. यावर अजून भाष्य ऐकायला आवडेल.
श्री. जी. ईश्वरनजींचा संपूर्ण लेख त्याच्यावर आधारित आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बुद्धिवादी नाडीग्रंथांच्या बाबत कसे बुद्धीभ्रम करतात. शोध-अभ्यास करायची वरवर भाषा करून प्रत्यक्षात काही न करता कशी शेखी मिरवतात. नाडीकेंद्रात बसून ब्लँक ताडपट्यावर लेखन केले जाते म्हणून त्यात इच्छुक व्यक्तीचे नाव कोरलेले दिसते. ते ग्राहकाला दाखवले जाते असे विधान केले. मात्र तसे असेल तर केद्रातील हा खोटेपणा का उघड केला नाही याचे स्पष्टीकरण कै. मा.श्री. रिसबुडांसारख्या खऱ्या विचारकाला ते टरकावतात कि तुम्ही लेख नीट वाचलेला नाही म्हणून.... आता नाडीकेंद्राचे संचालक ईश्वरनजींनी अशा खोडसाळ आरोपांना ठणकाऊन काय काय म्हटले आहे ते आपण वाचत आहात. हा या लेखाचा गाभा आहे. आणखी काय काय भाष्य हवे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

लेखाचा गाभा ?

आत्मशून्य
Sun, 07/03/2011 - 15:32 नवीन
समजा आपण मूर्ती नसलेले मंदीर कीती सूंदर आहे यावर पाने खरडत आहात... काय उपयोग त्याचा जर मंदीराच्या आत मूर्तीच नाहीये ? त्याच प्रमाणे आपले लेख आणी त्याचा गाभा काहीही असो काय उपयोग त्या लेखनाचा जर मूलभूत शंका समाधान तूम्ही करत नाही ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

मंदीराच्या आत मूर्तीच नाहीये ?

शशिकांत ओक
Sun, 07/03/2011 - 16:30 नवीन
मित्रा, मग विचारणा कशाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

काका

आत्मशून्य
Mon, 07/04/2011 - 01:26 नवीन
गोडवे गायले गेले म्हणून मंदीर बघायला गेलो तर ... मूर्तीच नाहीये असा अनूभव आला... तेव्हां किती गोडवे गाणार मूर्ती नसलेल्या मंदीराचे ....? ठीक आहे ज्यांच्या आज्ञेने आपण काम करत आहात ते पटीने श्रेष्टच, खरतर तूलनेचा विचारच नाही... पण याचा अर्थ असा नाही की लोकांपूढे आपलंच घोड सतत दामटत रहायचं...... लोकांच्या प्रश्नांचे शंका समाधान करता येत नसेल तर गूरू आज्ञा पाळयला अजून जेकाही जास्त प्रयत्न करावे लागतील त्यात पूढाकार घ्या. उगीच लोकांची उत्सूकता जागी झालि अथवा तूमच्या लिखणावर शंका व्यक्त केल्या की त्याना हीकडे जा तिकडे .. हे माझ्या अखत्यारेत नाही, पैसा खर्च करावा लागेल अशी तोंडाला पाने नका पूसु... गूरूंचा मान राखावा.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

ओक साहेब!

नावातकायआहे
Sun, 07/03/2011 - 15:06 नवीन
ओक साहेब! तुमच्या चिकाटिला सलाम!
  • Log in or register to post comments

सेल्समन का दलाला ...

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 07/04/2011 - 07:06 नवीन
क्रेडीट कार्ड विकणारे सेल्समन कसे गळ्यात पडून फोन करतात, स्नेल-स्पॅम्स पाठवतात, त्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे

क्रेडीट कार्ड विकणारे सेल्समन

परिकथेतील राजकुमार
Mon, 07/04/2011 - 11:43 नवीन
क्रेडीट कार्ड विकणारे सेल्समन कसे गळ्यात पडून फोन करतात, स्नेल-स्पॅम्स पाठवतात, त्याची आठवण झाली.
अतिशय चुकीचा प्रतिसाद. असे सेल्समन वैयक्तिकरीत्या फोन करुन अथवा प्रत्यक्ष भेटुन त्यांचे काम करत असतात. ओक साहेबांनी कोणाच्याही खव मध्ये जाउन माझे लेख वाचा, किंवा फोन करुन माझे लेख वाचा अशी विनंती केलेली नाही. धाग्यासमोर लेखकाचे नाव दिसत असताना देखील धागा उघडायचा आणि वर लेखकालाच अशा शब्दात बोचकारायचे हे अत्यंत चुक आहे. संपादकांनी ह्याची त्वरित दखल घ्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

+++++++++++++++++++ १०८ सहमत

मृगनयनी
Mon, 07/04/2011 - 12:17 नवीन
+++++++++++++++++++ १०८ सहमत रे पर्‍या!!! :) * धर्म हा संस्कृतीचा पाया आहे - स्वामी विवेकानन्द.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

तुमच्याच शब्दांत...

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 07/05/2011 - 09:56 नवीन
पराशेट तुमच्याच शब्दांत, बोर्डावर नाचल्यानंतर लोकं शिट्या मारतात अशी तक्रार करू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

षट्कार!!

शाहिर
Tue, 07/05/2011 - 13:48 नवीन
बोर्डावर नाचल्यानंतर लोकं शिट्या मारतात अशी तक्रार करू नये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

तिकिट

मराठी_माणूस
Mon, 07/11/2011 - 10:03 नवीन
तिकिट काढुन आत तर गेलात ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

पैसा फेको, तमाशा देखो

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 07/11/2011 - 23:01 नवीन
पैसा फेको, तमाशा देखो*। ... तमाशा नाही आवडला तर शिव्या मिळणार, आवडला तर शिट्या! नाड्यांचा फक्त सप्तरंगी तमाशाच आहे एवढंच काय ते गोष्टीचं सार. कोणातरी निबंधलेखक ढोंग्याला महर्षी म्हटलं म्हणून काय तो ज्ञानी माणूस थोडाच होणार? अगदी इसापनीती आणि पंचतंत्रातही असल्या प्रकारांच्या विरोधातल्या बोधकथा सापडतात. *मिपावर पैसा फेकावा लागत नाही, नाड्यांच्या तमाशासाठी फेकावा लागतो म्हणतात. मुद्दामच डिस्को दिवे लावले प्रतिसादात. लक्ष वेधून घ्यायला बरं पडतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

व्यस्त कार्यक्रमातून वेळ झाला असेल तर.

शशिकांत ओक
Sun, 07/10/2011 - 13:14 नवीन
पिवळा ... मित्रा,
मी पुढच्या आठवड्यात पुण्यात येतो आहे... तेंव्हा तुम्ही जर व्यनि करून मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर कळवलांत तर मी स्वतः या तुमच्या नाडीपरिक्षेला सामोरा जायला तयार आहे.... माझा या नाडीपरिक्षेवर काडीचाही विश्वास नाही..
आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ झाला असेल तर.... कदाचित....मन बदललेले नसेल तर.... विचार करा. मग ठरवा.
  • Log in or register to post comments

ओक साहेब

आत्मशून्य
Mon, 07/11/2011 - 16:16 नवीन
रवीवारी सकाळी आपल्याशी फोनवर बोलणे झाले त्याप्रमाणे मी आपण सूचवलेल्या नाडीकेंद्रात एका मित्रासोबत गेलो होतो व त्यांना आपण माझी पट्टी मलाच का देत नाही हा प्र्श्न विचारला तर सूरूवातीला त्यांनी दूर्लक्ष केले, मी थोडा मूद्दा ताणून धरत पून्हा हाच प्रश्न विचारला तर त्यांचा चेहरा थोडासा कडवट भासून उत्तर आले की हा प्रश्न एका अमूक अमूक व्यक्तीला भेटायला पून्हा या तेव्हां त्यांनाच विचारा मी ऊत्तर देणार नाही. पण मी चीकाटी सोडली नाही व पून्हा चर्चेच्या योगात हाच प्रश्न केला की माझी पट्टी मला का देत नाहीत तर फक्त इतकेच सांगून संभाषण आटोपते घ्यावे लागले की पट्या त्यांना परत करायच्या असतात... आता सांगा बरे हा कोणाचा पराभव आहे ? अवांतर : प्रतीसादास प्रतीक्रीया न आल्याने पून्हा डिस्कोमोड मधे एडीट करत आहे.
  • Log in or register to post comments

अवांतर : प्रतीसादास

स्वानन्द
Mon, 07/11/2011 - 19:23 नवीन
अवांतर : प्रतीसादास प्रतीक्रीया न आल्याने पून्हा डिस्कोमोड मधे एडीट करत आहे.
Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

आपण माझी पट्टी मलाच का देत

अलख निरंजन
Tue, 07/12/2011 - 19:45 नवीन
आपण माझी पट्टी मलाच का देत नाही?
१. नाड्या ह्या पुरातन ऋषींनी लिहिलेल्या असल्याने तो अमुल्य ठेवा आहे. तो जतन करुन ठेवणे हा नाडीकेंद्रांचाच हक्क आहे. २. आणखी शेकडो वर्षांनी जेव्हा तुम्ही पुनर्जन्म घेउन ह्याच नाडी केंद्रावर पट्टी मागायला याल तेव्हा ती उपलब्ध असली पाहिजे. नाहीतर माझी पट्टीच मिळाली नाही म्हणून नाडी थोतांड असे लिहायला तुम्ही पुन्हा मोकळे. ३. पोपटाने तुमचे कार्ड काढून त्यातले भविष्य वाचून झाल्यावर ते कार्ड पुन्हा गट्ठ्यात जाते, त्यात तुमचे भविष्य आहे म्हणून तुम्हाला देउन टाकत नाहीत. तुम्ही तिथेही 'माझे कार्ड मला द्या' असा हट्ट धरता का? *ओकांना अजून हे कसे सुचले नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

*ओकांना अजून हे कसे सुचले नाही?

शशिकांत ओक
Mon, 08/08/2011 - 21:35 नवीन
मित्रा, खरच नाही सुचले इतके सुटसुटीत उत्तर... धन्यवाद....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अलख निरंजन

आपल्याला थोडासा मासला मिळाला इतकेच.

शशिकांत ओक
Mon, 07/11/2011 - 21:02 नवीन
मित्रा,
हा प्रश्न एका अमूक अमूक व्यक्तीला भेटायला पून्हा या तेव्हां त्यांनाच विचारा मी ऊत्तर देणार नाही.
पुर्वी हे लोक मला असेच दमवायचे. कल आना, करून - तर कधी हेडऑफिस से पुछकर बताएंगे । असे म्हणून कटवायचे. आपल्याला थोडासा मासला मिळाला इतकेच. असो. चिकाटी सोडू नकोस. आता त्या व्यक्तीला भेटून विचारणा करावी ही विनंती.
  • Log in or register to post comments

चिकाटी सोडू नकोस. आता त्या

आत्मशून्य
Mon, 07/11/2011 - 22:34 नवीन
चिकाटी सोडू नकोस. आता त्या व्यक्तीला भेटून विचारणा करावी ही विनंती.
तूम्हीच का उत्तर देत नाही ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

हॅ हॅ हॅ

Nile
Mon, 07/11/2011 - 23:34 नवीन
उत्तराने बिंग फुटलं तर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

तर मग...

पंगा
Mon, 07/11/2011 - 23:48 नवीन
उत्तराने बिंग फुटलं तर?
तर मग पोरी उठून येतील. (कळले नसल्यास झिम्मा खेळणार्‍या कोकणच्या राजाकडे पृच्छा करा.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

प्रकाटाआ

पंगा
Mon, 07/11/2011 - 23:47 नवीन
प्रतिसाद वर योग्य ठिकाणी हलवला आहे. येथून काढून टाकावा.
  • Log in or register to post comments

प्रतिसाद कसा काय हलवता येतो

नरेशकुमार
Tue, 07/12/2011 - 08:37 नवीन
प्रतिसाद कसा काय हलवता येतो ? मला कधि जमले नाही. शिकवन्याचि क्रुपा करावी. अति अवांअरः लिहिलेले कळावे म्हनुन मुद्दाम ब्लॅक मधे लिहिलेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा