✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बुद्धिवादी संस्थांचा व विचारांचा पराभव आधीच झाला आहे

श
शशिकांत ओक यांनी
Wed, 06/29/2011 - 21:06  ·  लेख
लेख
मित्र हो, आंतरऱाष्ट्रीय कीर्तीचे प्रख्यात बुद्धिवादी नाडीग्रंथांच्या संदर्भातील आपल्या कलुषित विचारांचे मत प्रदर्शन कसे करतात. याचा नमुना सोबत मराठीवाचकांसाठी प्रथमच प्रकाशित करत आहे. (संदर्भ- इंडियन स्केप्टिक मासिकाच्या नोव्हेंबर १९९६ मधील अंकात नाडी ग्रंथांवर केले गेलेले भाष्य) आत्तापर्यंत अनेक बुद्धिवाद्यांच्या संस्था व व्यक्तींच्या विचार प्रदर्शनाला नाडीग्रंथ केंद्रांतर्फे उत्तरे पाठवण्यात कोणत्याही नाडीकेंद्राने रस दाखवला नव्हता. मात्र यावेळी नाडीकेंद्रांतर्फे पुण्यातील केंद्र संचालक श्री. जी.ईश्ववरन यांनी बुद्धिवाद्यांच्या अशा कैफियतींवर आपले मत प्रदर्शन केले आहे. त्यांनी आपली प्रतिक्रिया शब्दात मांडण्यासाठी विंग कमांडर शशिकांत ओकांना विनंती केली. नाडीविरोधकांची मते विविध प्रसारमाध्यमांतून दणक्यात व ठळक मथळ्यांनी प्रकाशित होत असल्याने नाडी ग्रंथप्रेमींच्या मनात गोंधळ उडतो. ज्यांनी नाडी ग्रंथांचे अवलोकन केलेले नाही त्यांची मने आधीच कलुषित होतात अस लक्षात घेऊन त्यांनी हे पाऊल उचलले आहे.
प्रेषक – जी. ईश्वरन पुण्यातील नाडी केंद्राचे संचालक.
रिसबुडांनी विचारलेले प्रश्न लाल रंगात असून बी. प्रेमानंदांनी दिलेली उत्तरे काळ्यारंगात होते माझे (ईश्वरनजींचे) स्पष्टीकरण निळ्या जाड टाईपात केले आहे. १. रिसबुडांचा प्रश्न - ‘बुचकळ्यात टाकणारा प्रश्न असा की व्यक्तीची नावे(नाडीच्या) पट्टीवर दिसतात कशी? उत्तर - त्या पट्ट्या ग्राहक जेंव्हा ते ऐकायला येतो त्यावेळी तयार केल्या जातात...... .....नाडीकेंद्रातर्फे काही लोक पेरून ठेवलेले असतात त्यांनी व नाडीपट्या शोधायसाठी नाडीवाचकाने विचारलेल्या प्रश्नातून सर्व माहिती मिळवली जाते. नंतर त्या आधारे नाडीपट्टी बनवून वाचली जाते. नाडीकेंद्र चालक श्री. ईश्वरनजींचे स्पष्टीकरण - याठिकाणी बी. प्रेमानंद अभावितपणे नाडीपट्यात व्यक्तीचे नाव लिहिलेले असते असे मान्य करतात. रिसबुडांना तेच मुलतः अमान्य आहे म्हणून ते प्रेमानंदांशी वाद उकरून काढत होते. आता तर अनेक लोकांच्या नाडीपट्यातील नावाची शहानिशा तमिळ तज्ज्ञांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे ताडपट्टीतील भाषा तमिल नसते त्यात काहीही भविष्य कथन नसते आदी आक्षेप फुसके ठरले आहेत.ताडपट्टीत व्यक्तीच्या जन्मदिनांकाची व ग्रहस्थितीची नोंद असणे शक्य नाही म्हणणाऱ्यांनी त्या नोंदी पहाव्यात व मग आपले मत ठरवावे. ८. सध्या आमची तमिळेतर भागातील नाडी केंद्रांची समस्याच अशी आहे की आम्हाला बाहेर जमलेल्या ग्राहकांची भाषा धड बोलणारी माणसे मिळत नाहीत. मग नाडी केंद्रात भविष्य पहायला आलेल्या लोकांना त्यांच्या भाषेत बोलते करून त्यांच्या कडून नकळत माहिती मिळवायला लागणारे भाषापटुत्व व संभाषण कुशलता फार दूरची गोष्ट. उलट भविष्य कथन त्या त्या भाषेत टेप करून देताना भाषांतरकाराच्या रुपांतराचा दर्जा फारच खालचा असतो अशी सर्वसाधारणपणे तक्रार असते. शिवाय आमच्यासारख्या रंगाने, पोशाखाने व बोलण्याच्या धाटणीने तात्काळ ओळखू येणाऱ्या लोकांनी जमलेल्या ग्राहकांशी सलगीकरून माहिती जमा करणे कसे शक्य आहे? हे विरोधकांनी प्रयोग करून आम्हला दाखवावे. ९. नाडी केंद्रांची जागा शहरी भागात मिळेल त्या ठिकाणी एक बेडरुमच्या फ्लॅटमधे असते.त्या तेवढ्या जागेत जर ताडपत्राच्या नव्या पानांवर लेखन करायला आम्ही ताडाच्या पानांच्या झावळ्या व कातरकाम करून कचरा करू लागलो तर शेजारपाजारचे रहिवासी आमच्यावर नजर ठेऊन आमचे ते काम बंद पाडतील. १०. बी. प्रेमानंदांनी म्हटल्याप्रमाणे केंद्राची माणसे लोकात मिसळवणे, पट्ट्या केंद्रात लिहित बसून तयार करणे या सर्व त्यांच्या कल्पनेच्या भराऱ्या आहेत. कारण आम्हाला तसे करायची गरज नाही. नाडीवाचक उपलब्ध असलेल्या पट्टयातील मजकूर वाचतो तो त्या व्यक्तीला जुळत असेल असे त्या व्यक्तीने मान्य केले तरच त्या पट्टीतील मजकूर एका ४० पानी वहीत उतरवून त्याच्यावरून ग्राहकाला त्याच्या भाषेत त्यातील कथन टेप करून देतो. त्या आधी मोबदला घेतला जात नाही. अर्थात हे सर्व नाडी विरोधकांना पक्के ठाऊक आहे की त्यांच्या या तकलादू, निरर्थक सबबींमधे काही दम नाही. तरीही महर्षींच्या दिव्यदृष्टीने नाडी ग्रंथांची निर्मिती झाली आहे. हे सत्य अशा संस्थांना वा व्यक्तींना तत्वतः मान्य करता येत नाही कारण मग त्यांच्या आधी ठरवलेल्या तत्वांचा - बुद्धिवादाचा - पायाच निखळतो अशी त्यांची धारणा असल्याने त्यांना अशा सबबींवर भिस्त ठेऊन खोटी व भलतीसलत कारणे द्यावी लागतात. ११. त्यामुळे अशा बुद्धिवादी संस्थांचा व विचारांचा पराभव आधीच झाला आहे पण ते तो लोकलज्जेस्तव कधीच मान्य करणार नाहीत. नाही तर मग त्यांची सार्वजनिक छी थू झालेली त्यांना परवडण्यासारखी नाही. भाग ६ समाप्त. पुढे चालू.....
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
माहिती

प्रतिक्रिया द्या
15508 वाचन

💬 प्रतिसाद (104)

प्रतिक्रिया

समाप्त.हुश्श्श्श्श्श........

नरेशकुमार
गुरुवार, 06/30/2011 - 05:38 नवीन
समाप्त.
हुश्श्श्श्श्श.................
पुढे चालू.....
आता का परत ?
बुद्धिवादी संस्थांचा व विचारांचा पराभव आधीच झाला आहे
माझा पराभव अजुन झालेला नाही. बायदवे लेख खुप मोठ्ठा आहे. वाचुन वाचुन कंटाळा आला. काहीतरि थोडंस लिहा मग जमेल वाचायला. कधि वेळ मिळालाच तर वाचेन मगच देईन सविस्तर प्रतिक्रिया. एक सजेशन : तुम्ही ते काळं, ब्ल्यू, रेड मध्ये का लिहिता हो ! डॉल्यांना तरास होतो.
  • Log in or register to post comments

कधि वेळ मिळालाच तर .... जर-तर च्या गोष्टी

शशिकांत ओक
गुरुवार, 06/30/2011 - 13:22 नवीन
मित्रा,
कधि वेळ मिळालाच तर वाचेन मगच देईन सविस्तर प्रतिक्रिया.
घाई नाही. दमाने द्या. पण तर्काने नको. प्रत्यक्ष कृतीशील होऊन.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार

<<माझा पराभव अजुन झालेला

शिल्पा ब
गुरुवार, 06/30/2011 - 13:31 नवीन
<<माझा पराभव अजुन झालेला नाही. तुम्ही स्वतःला बुद्धीवादी समजता यातच तुमचा पराभव आहे हे तुम्हाला कधी समजणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार

एक सजेशन : तुम्ही ते काळं,

किसन शिंदे
गुरुवार, 06/30/2011 - 09:29 नवीन
एक सजेशन : तुम्ही ते काळं, ब्ल्यू, रेड मध्ये का लिहिता हो ! डॉल्यांना तरास होतो. ओक साहेब, नकुंशी सहमत आहे, ते लाल निळं वाचताना डोळ्यांना खुप त्रास होतो.
  • Log in or register to post comments

तरूण पणी डिस्कोचा नाद लागला

आत्मशून्य
गुरुवार, 06/30/2011 - 16:34 नवीन
तुम्ही ते काळं, ब्ल्यू, रेड मध्ये का लिहिता हो
तरूण पणी डिस्कोचा नाद लागला तर त्याचं प्रतीबींब धाग्यामधे असं पडण्याची माझ्या बाबत शक्यता आहे, पण ओक साहेबांच्या खूलाशाच्या प्रतिक्षेत.(जो कधीही संपूर्णपणे दिला जात नाही हे माहीत आहे तरी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

हम्म....

स्व
गुरुवार, 06/30/2011 - 09:55 नवीन
माझा साहेब झापताना नेहमी म्हणतो "you talk a lot, but say nothing!!" बुद्धिवाद्यांचा पराभव वगैरे ठिक आहे हो, ह्याच विषयाबद्दल इथे अनेकांनी भरपूर प्रश्न विचारलेत जुन्या धाग्यांवर. त्यापैकी कशाचही उत्तर न देता नवीन धागा सुरु करत सुटताय आपण.
  • Log in or register to post comments

>>>>माझा साहेब झापताना नेहमी

प्यारे१
गुरुवार, 06/30/2011 - 10:19 नवीन
>>>>माझा साहेब झापताना नेहमी म्हणतो "you talk a lot, but say nothing!!" साहेब हुशार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्व

गगनविहारीचा प्रतिसाद

शशिकांत ओक
गुरुवार, 06/30/2011 - 16:31 नवीन
आता गगनविहारी यांनी Thu, 30/06/2011 - 12:57 ला प्रकाशित केले. तुम्ही सविस्तर आणि मुद्द्याचे उत्तर देत नाही ही तक्रार आता मी मागे घेत आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्व

अरे वा आपण फक्त गविच्याच

आत्मशून्य
गुरुवार, 06/30/2011 - 16:46 नवीन
अरे वा आपण फक्त गविंच्याच प्रश्नाला उत्तरे देता/दिलीत, हे छाति ब्डवत सांगयचे काही विशेष प्रयोजन ? नाही आमच्या प्रश्नाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या म्हणून हा सात्विक संताप व्यक्त करावासा वाटालाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

मलाही प्रथमच दिलंय रे..

गवि
गुरुवार, 06/30/2011 - 16:47 नवीन
मलाही प्रथमच दिलंय रे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

सर्वांच्या नाडीपट्ट्या नसतात.

गवि
गुरुवार, 06/30/2011 - 10:15 नवीन
सर्वांच्या नाडीपट्ट्या नसतात. ज्यांच्या नशिबात / भाग्यात ती पट्टी जाणून घेणं आहे तेवढ्यांच्याच पट्ट्या बनल्या आहेत आणि तेवढेच लोक काहीही होऊन त्या पहायला जातीलच. असे एक्स्प्लेनेशन कळले. पूर्ण पटले असे म्हणत नाही पण मान्य करुन एक उरलेला प्रश्न विचारतो. वेगवेगळ्या केंद्रांमधे (पुणे, चेन्नई, सोलापुर --उदाहरणार्थ) नाडीपट्ट्या पहायची सोय आहे असे आपल्या लिखाणातून कळले. म्हणजेच चेन्नईत सेंट्रल रिपॉझिटरी आणि पुण्यातून ती अ‍ॅक्सेस होतेय असे दिसत नाही. सर्व नाड्या सर्व केंद्रात ठेवल्या असतील तर याचाच अर्थ की प्रत्येकाची डुप्लिकेट/ट्रिप्लिकेट (पट्टी गुणिले क्ष, क्ष=केंद्रांची संख्या) बनलेली आहे.. हे तरी मान्य करावेच लागेल. माझा प्रश्न असा, की प्रत्येक केंद्रात एकेक अशा कॉपीजही मूळ लेखक ऋषींनी लिहून ठेवल्या आहेत काय आणि अशी किती केंद्रे कुठेकुठे बनतील ते गृहीत धरून तेवढ्या पट्ट्या तयार करुन ठेवल्या आहेत काय? किंवा मग प्रत्येकाची एकच युनिक पट्टी आहे तर.. माझी पट्टी जर चेन्नईत असेल तर ती पुणे केंद्रातही मिळेल का? की कुठेकुठे केंद्रे निघतील आणि मी त्यातल्या कोणत्या केंद्रात नाडी शोधायला जाईन हेही हजारो वर्षांपूर्वी ठरले आहे?
  • Log in or register to post comments

या अनुभवाच्या गोष्टी आहेत.

शशिकांत ओक
गुरुवार, 06/30/2011 - 12:21 नवीन
मित्र हो, गगनविहारींच्या मनातील प्रश्न अनेकांच्या मनात असतील...
जर सर्व नाड्या सर्व केंद्रात ठेवल्या असतील तर ...प्रत्येकाची डुप्लिकेट/ट्रिप्लिकेट (पट्टी गुणिले क्ष, क्ष=केंद्रांची संख्या) बनलेली आहे..
जर-तर हे तर्क आहेत. अनुभवाची सत्यता अशी आहे कि आपण मानता तशा डुप्लिकेट पट्टया बनवलेल्या नाहीत.
प्रश्न असा, की प्रत्येक केंद्रात एकेक अशा कॉपीजही मूळ लेखक ऋषींनी लिहून ठेवल्या आहेत काय आणि अशी किती केंद्रे कुठेकुठे बनतील ते गृहीत धरून तेवढ्या पट्ट्या तयार करुन ठेवल्या आहेत काय?
अनुभवाने याचे उत्तर होय असे येते.
माझी पट्टी जर चेन्नईत असेल तर तेथे व ती पुणे केंद्रातही मिळेल का?
अनुभवाने असे लक्षात येते कि आपली एक पट्टी चेन्नईतही मिळू शकेल व नंतर त्याच महर्षींची पुण्यातही. मात्र जी पट्टी चेन्नईत होती तीच पट्टी पुण्यातील केंद्रात नसते. ती वेगळीच असते. असे मुद्दाम शोध करून मिळवलेल्या प्रत्येक वहीतील श्लोकांची छाननी करून घेऊन अनुभवले - पाहिले गेले आहे. अनेक लोकांनी एकच महर्षीं लिखित आपली कथने विविध नाडीकेंद्रातून मधे काही काळ गेल्यावर पुन्हा पाहिली आहेत. त्यातील श्लोकाची रचना व मधल्या काळातील घटनांचा बदललेला उल्लेख त्यात आढळतो.उदा. किती तरी जण लग्नाआधी व नंतर आपली पट्टी शोधतात. त्यात नंतरच्या पट्टीत आपल्याजोडीदाराचे नाव कोरलेले आढळते. जे आधीच्या पट्टीत नसते.अशा दोन्ही पट्या कधी एकाच महर्षींच्या असल्यातरी त्याच किंवा वेगवेगळ्या केंद्रातून निघतात. एकाच केंद्रात, एकाच व्यक्तीच्या विविध महर्षींनी लिहिलेल्या पट्टया - बसल्या बैठकीला - लागोपाठ निघतात. असे अनुभवले जाते. आपल्याला तमिळ कळले नाही तरी पट्टीच्या पॅकेटचा आकार, पट्टीची रुंदी- लांबी, कधी खराब झालेला भाग, तुटका, भोके पडलेला आदि वरून तमिल भाषा न येणाऱ्याला ही प्रत्येक पट्टी वेगळी आहे किंवा नाही हे सहज अनुभवता येते. असो. या अनुभवाच्या गोष्टी आहेत. इथल्या मित्रांना अनेक गोष्टींचे विवरण इथे व आत्ता अशा तातडीने हवे असते ते तसे देणे शक्य नसते किंवा योग्य नसते. नाडीग्रंथ चेष्टा- मस्करीचा विषय न राहता नाडीग्रंथांचा अभ्यास जे खरोखरच्या तळमळीने करू इच्छितात त्यांना प्रवृत्त करणे हा इथे लिखाणाचा उद्देश आहे. इतर अनेक लोकांना नाडी ग्रंथाची सामान्य माहिती असावी म्हणून विविध तऱ्हेने लेखन केले जाते. रंगसंगती विषयी - या लेखमालिकेच्या सुरवातीपासून जे रंग टाकले गेले ते सातत्य म्हणून राखले गेले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

आता

गवि
गुरुवार, 06/30/2011 - 12:57 नवीन
तुम्ही सविस्तर आणि मुद्द्याचे उत्तर देत नाही ही तक्रार आता मी मागे घेत आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

हतबुद्ध

श्रावण मोडक
गुरुवार, 06/30/2011 - 18:53 नवीन
आजपर्यंत ठीक आहे, काही तरी लिहितात, लोक वाचतात, चर्चा करतात, वाद घालतात असं म्हणून मी हे लेखन सोडून देत होतो. आज मात्र हतबुद्ध झालो.
आपली एक पट्टी चेन्नईतही मिळू शकेल व नंतर त्याच महर्षींची पुण्यातही. मात्र जी पट्टी चेन्नईत होती तीच पट्टी पुण्यातील केंद्रात नसते. ती वेगळीच असते. असे मुद्दाम शोध करून मिळवलेल्या प्रत्येक वहीतील श्लोकांची छाननी करून घेऊन अनुभवले - पाहिले गेले आहे. अनेक लोकांनी एकच महर्षीं लिखित आपली कथने विविध नाडीकेंद्रातून मधे काही काळ गेल्यावर पुन्हा पाहिली आहेत. त्यातील श्लोकाची रचना व मधल्या काळातील घटनांचा बदललेला उल्लेख त्यात आढळतो.उदा. किती तरी जण लग्नाआधी व नंतर आपली पट्टी शोधतात. त्यात नंतरच्या पट्टीत आपल्याजोडीदाराचे नाव कोरलेले आढळते. जे आधीच्या पट्टीत नसते.अशा दोन्ही पट्या कधी एकाच महर्षींच्या असल्यातरी त्याच किंवा वेगवेगळ्या केंद्रातून निघतात.
आणि असे असूनही ती माझीच पट्टी म्हणायची. अशक्य आहे. माझ्या नाडीपट्टीत (म्हणजे कोणाच्या हा प्रश्न आहेच) बहुदा ही हतबुद्धता आज लिहिली असावी. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

अशक्य आहे.

शशिकांत ओक
गुरुवार, 06/30/2011 - 19:12 नवीन
मित्रा,
ती माझीच पट्टी म्हणायची. अशक्य आहे.
एक दिवस मलाही असेच वाटले होते. मात्र विविध प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावर ती सत्यता आहे असे मान्य करावे लागते. असे नसेल असा आपला अनुभव असेल तर तो अनुभव सादर करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

संख्या?

श्रावण मोडक
गुरुवार, 06/30/2011 - 20:19 नवीन
म्हणजे मग माझ्या पट्ट्या किती असतात? वयाच्या सोळाव्या वर्षी मी एका चित्रपटात काम केले. त्यावेळी माझ्याविषयी असे म्हटले जायचे की, मी त्या क्षेत्रात नाव कमावणार. माझी त्यावेळची एक पट्टी. अठराव्या वर्षी जेव्हा मी पहिल्यांदा बंगळूरमध्ये एका क्रिकेट सामन्याचे समालोचन केले तेव्हा माझ्या क्रिकेटविषयीच्या ज्ञानाने तिथले व्यावसायीक समालोचकही प्रभावित झाले. त्याच काळात मी करायचो ते लेखन मात्र खरोखर (आज मागे वळून पाहताना मलाही तसे वाटते) भिक्कार होते. माझी त्यावेळची नाडीपट्टी वेगळी. या दोन्हीच्या आधी माझे भविष्य असे सांगायचे की मी डॉक्टर होणार. माझा व्यवसाय पाण्याशी संबंधित असणार. पत्रिका आणि भविष्य सांगणाऱ्यांचा भंपकपणा तेव्हाच समजला. तेव्हाची माझी नाडीपट्टी वेगळी असणार. पंचविशीत मी नोकरी सोडली. धंदा करायचा म्हणून. तेव्हाची नाडीपट्टी वेगळी. धंदा झालाच नाही. मी परत नोकरीत गेलो. नाडीपट्टी बदलली असणारच. कारण यावेळची नोकरी लेखनाशी संबंधित नव्हतीच. ती तांत्रीक होती. मी लग्न केले तेव्हाची नाडीपट्टी वेगळी असणार. मला आता नाडीपट्टी पहावीच लागेल. त्यात माझा घटस्फोट कसा लिहिला असेल ते पहायचे आहे. ही प्रत्येक घटना, घडामोड माझ्या जगण्याला वेगळं वळण लावणारी असल्याने त्या-त्या वेळच्या नाडीपट्ट्या वेगळ्या असल्या पाहिजेत. एकाच पट्टीत हे सारं सापडलं तर मात्र नाडीमहर्षी जगापुढचे अनेक प्रश्न लीलया सोडवू शकतात, असे मी जाहीर करेन (माझ्या मताला किंमत नसेल हा भाग वेगळा), आणि, मी हे जाहीर करेन, हे त्या नाडीमहर्षींच्या नाडीपट्टीत लिहिलेले असेल. मला ती महर्षींचीच पट्टी वाचायला मिळेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

प्रयत्न करून पहा.

शशिकांत ओक
गुरुवार, 06/30/2011 - 21:37 नवीन
का नाही जरूर. प्रयत्न करून पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

म्हणजे काय?

श्रावण मोडक
Fri, 07/01/2011 - 09:53 नवीन
प्रयत्न करा, म्हणजे काय? अशी नाडीपट्टी देतात का, त्या महर्षींच्या अशा किती नाडीपट्ट्या आहेत, त्यापैकी कोणती आता पाहता येईल, महर्षींच्या संदर्भातील जीवनक्रमातील कलाटणीच्या घटनांतील मागच्या नाडीपट्ट्या मिळतील का? अशा इतरांच्या नाडीपट्ट्या देत असतील तर त्याच्या अटी काय? त्या अटींत मी बसत असेन तर प्रयत्न करण्यात अर्थ आहे. एरवी दगडावर डोकं आपटण्यात अर्थ नाही. कारण, त्यात कष्ट, वेळ वायाच जाणार. तेव्हा, अशी माहिती द्या, ज्याद्वारे पडताळून पाहता येईल. एरवी तुमचे हे लेखन काही तरी भंपकपणा प्रसारित करण्यासाठीचे आहे, इतकाच निष्कर्ष कायम होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

लई भारी!

नगरीनिरंजन
Fri, 07/01/2011 - 08:20 नवीन
उदा. किती तरी जण लग्नाआधी व नंतर आपली पट्टी शोधतात. त्यात नंतरच्या पट्टीत आपल्याजोडीदाराचे नाव कोरलेले आढळते. जे आधीच्या पट्टीत नसते.अशा दोन्ही पट्या कधी एकाच महर्षींच्या असल्यातरी त्याच किंवा वेगवेगळ्या केंद्रातून निघतात. याचा अर्थ, पट्टी पाहणारा त्याची 'ती' पट्टी कधी आणि कुठे पाहणार आहे हे महर्षींना आधीच ज्ञात होते तर. मग नाडीग्रंथाचा अभ्यास कोण, कधी आणि कशाला करणार हे ही त्यांना ज्ञात असणारच. जर हे आधीच सगळं ठरलेलं आहे तर आपण वृथा लोकांना अभ्यासासाठी प्रवृत्त करण्यात आपला वेळ आणि शक्ती खर्च करीत आहात असे वाटते. अर्थात तुम्ही असं करणार असंच तुमच्या नाडीत लिहीले असणार यात शंका नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

आवरा

स्पा
गुरुवार, 06/30/2011 - 10:36 नवीन
बुद्धिवादी संस्थांचा व विचारांचा पराभव आधीच झाला आहे खरय , म्हणून हे अस वाचायची वेळ आलीये हल्ली कठीण आहे (मिपाच)
  • Log in or register to post comments

अरे वा!!!

सहज
गुरुवार, 06/30/2011 - 11:03 नवीन
बुद्धिवादी संस्थांचा व विचारांचा पराभव आधीच झाला आहे अभिनंदन हो विजयी मंडळींचे (म्हणजेच निर्बुद्ध संस्थेच्या अविचारी सदस्यांचे का?) बादवे कोणत्या कट्टर सदस्याच्या नाडीपट्टी मधे हे कोरलेले होते म्हणे महर्षींनी!! पुराव्याचा फटू द्यालच ना पुढच्या भागात! कोणाच्या १ बीएचकेवर प्यार्टी आहे मग ह्या विजयाची!!
  • Log in or register to post comments

सहमत

श्रावण मोडक
गुरुवार, 06/30/2011 - 12:20 नवीन
अभिनंदनाच्या मजकुराशी पूर्ण सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

मी तर म्हणतो हा विजयोत्सव

Nile
गुरुवार, 06/30/2011 - 12:09 नवीन
मी तर म्हणतो हा विजयोत्सव सर्वांनी आपापल्या नाड्या मोकळ्या करून साजरा करावा! (नाड्या कमी पडत असतील तर ओकांकडून उधारीवर मिळतीलच याची पुणेरी लोकांनी नोंद घेणे). कूठं गेली माझी नाडी!
  • Log in or register to post comments

मस्तच !

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 06/30/2011 - 12:13 नवीन
त्यामुळे अशा बुद्धिवादी संस्थांचा व विचारांचा पराभव आधीच झाला आहे पण ते तो लोकलज्जेस्तव कधीच मान्य करणार नाहीत. नाही तर मग त्यांची सार्वजनिक छी थू झालेली त्यांना परवडण्यासारखी नाही.
+१ शब्दाशब्दाशी सहमत आहे. ओक साहेब, तुम्ही लिहित रहा आणि अज्ञजनांना मार्गदर्शन करत रहा. विरोध करणारे करोत बापडे, त्यांच्याविषयी राग नाही. पण तुम्ही त्यांच्या अज्ञानाकडे आणि स्वल्पबुद्धीकडे दुर्लक्ष करुन लिहित रहा. आम्ही आहोत वाचायला.
  • Log in or register to post comments

आम्ही आहोत वाचायला

शशिकांत ओक
गुरुवार, 06/30/2011 - 12:57 नवीन
मित्रा,
आम्ही आहोत वाचायला.
धन्यवाद.
  • Log in or register to post comments

शशिकान्त'जी, आज आपल्या समाजात

मृगनयनी
गुरुवार, 06/30/2011 - 16:59 नवीन
शशिकान्त'जी, आज आपल्या समाजात खूप जण असे आहेत... की ज्यांना नाडी-पट्टी पाहाण्याची तीव्र इच्छा आहे...ज्यांचा नाडी भविष्यावर पूर्ण विश्वास आहे... केवळ मुम्बई, पुणेच नाही तर अगदी खेडेगावातल्या लोकांना देखील नाडी भविष्याचे महत्त्व पटलेले आहे.. आणि मला नक्की विश्वास वाटतो, की त्यांचा भोळा भाव ओळखून महर्षि त्यांच्या पट्ट्या सापडवायला नक्की मदत करतील... आणि पट्टीतील भविष्य ऐकून त्या सर्वांचा नाडी ज्योतिषावरील विश्वास अजून दृढ होईल. ____________________ ज्या लोकांना त्यांच्या पट्ट्या मिळत नाही.. किन्वा महर्षि इच्छेनुसार त्या पट्ट्या पाहायचा योग आलेला नाही... अश्या लोकांच्या त्वरित शन्का निरसनासाठी...आपण पुढील लेखात अत्रि-जीव-नाडी वर प्रकाश टाकला, तर कदाचित गरजू लोकांना त्याचा उचित फायदा होईल... असे वाटते... _____________________ बाकी तथाकथित बुद्धीवादी संस्थांचा, विचारांचा पराभव कधीच झालेला असूनही त्यांपैकी काही जण बाहेरच्या जगात स्वत:चेच म्हणणे खरे करण्याचा क्षीण प्रयत्न करताना दिसतात... हे पाहून त्यांची कीव आल्याशिवाय राहत नाही!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

मृगनयनी जी, आज आपल्या समाजात....

आत्मशून्य
गुरुवार, 06/30/2011 - 17:17 नवीन
आज आपल्या समाजात असे बरेच आहेत ज्यांना ओकसाहेबांचे लिखाण वाचून नाडी बघायची खूमखूमी आली आणी त्याप्रमाण ते वागले आणी ते अजिबात खरं ठरलं नाहीये अजून , आणी मी त्यातलाच एक :(, मनात भिती आणी कूशंकांच घरट मात्र वेगानं वाढतय :( कारण उत्तर द्यायला कोणच समोर येत नाहीये. नूसतं हीकडं जा ह्यांव करा आनं त्याव करा असेच सल्ले भेटत आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

मृगनयनींनी म्हटल्याप्रमाणे नाडीमहर्षींच्यापाशी जावे

शशिकांत ओक
गुरुवार, 06/30/2011 - 18:57 नवीन
मृगनयनी जी,
आणी ते (कथन)अजिबात खरं ठरलं नाहीये अजून , आणी मी त्यातलाच एक
उत्तर द्यायला कोणच समोर येत नाहीये.
इति आत्मशून्य... आत्मशून्य आणि त्यांच्यासारख्या अनेकांच्या गरजांना उद्देशून.... आपण त्यांना विचारू शकता.... नाडी ग्रंथ पाहिले कुणी ...... पृच्छकाने.... उत्तरे दिली कुणी....... नाडी महर्षींनी..... त्याने समाधान झाले नाही कुणाचे.....पृच्छकाचे.... मग त्याचे समाधान करणारे कोण असावेत......ओक.... कारण त्यांनी आपला नाडी ग्रंथांचा अनुभव लेखातून सादर केला म्हणून मी तिथे गेलो........
मनात भिती आणी कूशंकांच घरट मात्र वेगानं वाढतय
मित्रांनो, मृगनयनींनी म्हटल्याप्रमाणे नाडीमहर्षींच्यापाशी जावे व आपली भीती वा शंका निरसन कराव्यात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

बेस्ट बिझनेस मॉडेल

सहज
गुरुवार, 06/30/2011 - 19:35 नवीन
नाडी ग्रंथ पाहिले कुणी ...... पृच्छकाने.... उत्तरे दिली कुणी....... नाडी महर्षींनी..... त्याने समाधान झाले नाही कुणाचे.....पृच्छकाचे.... मग त्याचे समाधान करयची पावर आमाला नाय...... आमी पैसे भविष्याचे घेत नाही, माहीतीची गॅरंटी देत नाही. आमची फक्त नाडीपट्टी शोधायची सेवा फी आहे. खरे खोटे आमाला माहीत नाही. अजुन काही विचारायचे असल्यास अजुन पैशे टाकावे लागतील.. क्लास!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

+१

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 06/30/2011 - 21:26 नवीन
पृच्छक नाडी ग्रंथ पहाणार। नाडी महर्षि उत्तर देणार। नाडी वाचक सेवा फी घेणार। बेसुमार धागे निश्चित॥ -- इति शशिओकं सहजवाक्यम चला नाड्या लिहू या ... अर्रर्र, नाडी शब्द जुना झालाय, साडी, माडी, ताडी, खाडी, खोडी, रोडी(ज), इ.इ. बरेच शब्द बाकी आहेत. सहजमामा, पुढची टपरी कसली टाकायची? ========================== भीती ही धर्माचा मूलाधार आहे. -- बर्ट्रांड रसल. (सायन्स अँड रिलीजन)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

एकदम परफेक्ट बोललात सहजराव

आत्मशून्य
Fri, 07/01/2011 - 07:02 नवीन
+++++++++१ @ ओक साहेब
मग त्याचे समाधान करणारे कोण असावेत......ओक.... नाडी ग्रंथ पाहिले कुणी ...... पृच्छकाने.... उत्तरे दिली कुणी....... नाडी महर्षींनी..... त्याने समाधान झाले नाही कुणाचे.....पृच्छकाचे.... मग त्याचे समाधान करणारे कोण असावेत......ओक.... कारण त्यांनी आपला नाडी ग्रंथांचा अनुभव लेखातून सादर केला म्हणून मी तिथे गेलो........
आपण केवळ आपल्याच न्हवे तर लोकांना आलेल्या अनूभवा बद्दलही लिखाण केले आहे तेव्हां तूम्ही केवळ तूमचाच व्यक्तीगत अनूभव लिहता असा गोंडस गैरसमज खरोखर मिरवू नये. इतकच बोलेन की ही अफवा पसरवू नका व कोणी पसरवली तर बळी पडू देऊ नका. अवांतर :- उर्मटपणाची पातळी गाठलीय असं भासणारं मार्केटींगचे तंत्र आजच्या काळात कोण का सहन करेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

मजा आली.

शशिकांत ओक
गुरुवार, 06/30/2011 - 22:22 नवीन
विक्षिप्त ताईंना, रंगी-बेरंगी वापराने
इ.इ. बरेच शब्द बाकी आहेत
. मजा आली.
  • Log in or register to post comments

चला नाड्या लिहू या ...

दैत्य
गुरुवार, 06/30/2011 - 23:34 नवीन
चला नाड्या लिहू या ... अर्रर्र, नाडी शब्द जुना झालाय, साडी, माडी, ताडी, खाडी, खोडी, रोडी(ज), इ.इ. बरेच शब्द बाकी आहेत. सहजमामा, पुढची टपरी कसली टाकायची? नाडीवरून आठवलं, लेंग्यांचा व्यवसाय जास्त चांगला आहे!! नाडीची माहिती पट्टीवर लिहिण्यापेक्षा लेंग्यावर लिहायला जास्त जागा मिळेल आणि कापड असल्यानं स्टोरेजही व्यवस्थित होईल.. ;)
  • Log in or register to post comments

ओकसाहेब!

पिवळा डांबिस
Fri, 07/01/2011 - 10:09 नवीन
तुमची मतं मला पटोत न पटोत..... तुमच्या चिकाटीचं मात्र मला अतिशय कौतुक वाटलं..... म्हणून मी पुढच्या आठवड्यात पुण्यात येतो आहे... तेंव्हा तुम्ही जर व्यनि करून मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर कळवलांत तर मी स्वतः या तुमच्या नाडीपरिक्षेला सामोरा जायला तयार आहे.... माझा या नाडीपरिक्षेवर काडीचाही विश्वास नाही.. पण जर तुम्ही सहकार्य देण्यास तयार असाल तर मी काहीही असत्य बोलणार/ लिहिणार नाही याची ग्वाही मी देतो.... माझं भूत जर सत्य ठरलं तर इथे मिपावर तुमचा मी एक पाठीराखा असेन याची खात्री असावी.... बोला करतांय का व्यनि?
  • Log in or register to post comments

सहमत

श्रावण मोडक
Fri, 07/01/2011 - 10:37 नवीन
ओकांच्या चिकाटीबाबत सहमत. तुमची हरकत नसेल तर मीही नाडीपरीक्षेसाठी तुमच्याबरोबर येईन म्हणतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

पिडा व श्रामो ह्या दोघांचेही

अभिज्ञ
Fri, 07/01/2011 - 11:15 नवीन
पिडा व श्रामो ह्या दोघांचेही अनुभव वाचण्यास उत्सुक. अभि़ज्ञ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

शोध

विनायक प्रभू
Fri, 07/01/2011 - 12:14 नवीन
@पिडा आणि श्रामो तुमचा शोध पुरा झाल्यावर श्रमपरिहारासाठी होणार्‍या कट्ट्याला मला जरुर बोलवा. ज्याना अनुभव जाणुन घ्यायची इच्छा असेल त्यांनी नावे जरुर नोंदवावीत. मी पि.डां ना पेशल माल आणायची विनंती करणार आहे. ते नाही म्हणणार नाहीत. @ओक साहेब, तुमच्या लेखाने ही सोय झाल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ

अगदी

श्रावण मोडक
Fri, 07/01/2011 - 13:02 नवीन
मास्तर, हेच आमंत्रण समजा. पिडांकाका नाही म्हणणार नाहीतच. नावनोंदणीचे अपडेट्सही द्या. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

यासाठी जे पैसे पडतात ते खर्च करायची तयारी असावी.

शशिकांत ओक
Fri, 07/01/2011 - 12:15 नवीन
मित्रानो, ओकांची फजिती करायची आहे असा आपला होरा दिसतोय. 'तुमच्या' म्हणजे 'ओकांच्या नाडी परिक्षेला अर्थात ओकांना कसेही करून खोटे ठरवायला करायची कारवाई' असे मनात असेल तर मला त्यात इंटरेस्ट नाही. कारण नाडी ग्रंथ मी लिहिलेले नाहीत. आपणांस महर्षींच्या नाडी ग्रंथांचे अवलोकन करायचे असेल तर आपल्या घराच्या जवळच्या नाडीकेंद्रात जावे. आपली पट्टी सापडेपर्यंत त्याचा मागोवा घेण्याची चिकाटी असावी एका नाडीकेंद्रात पट्टी सापडली नाही तर केंद्रवाले आम्हाला घाबरले व पळवाट म्हणून पट्टी सापडत नाही अशी बतावणी केली असे तुणतुणे वाजवायला मिळावे असा काहींचा पवित्रा असतो. तसा नसावा. एका केंद्रात पट्टी नाही मिळाली तर दुसऱ्या केंद्रात शोधायची चिकाटी हवी. नाडीकेंद्रवाल्यांना आधी सांगून आम्हाला त्या ताडपट्टीतील मजकूर वहीत लिहून मिळायला पाहिजे व त्या विवक्षित ताडपट्टीचा फोटो काढायची परवानगी त्यांनी आधीच दिली असली पाहिजे. त्यानंतर ज्यापट्टीत आपल्यासंबंधीचे त्यातील पहिला भाग ज्यात व्यक्तीचे त्याच्या आई-वडिलांचे, पती-पत्नी जोडीदाराचे नाव, जन्मदिनांक, भावा- बहिणींची, मुलांची संख्या शिक्षण व नोकरी धंदा याचा उल्लेख येतो. ते सर्व उल्लेख १०० टक्के बरोबर आले असे आपण म्हणाल, नाडीकेंद्रवाले नव्हे. तेंव्हा त्या पट्टीतील मजकूर व दिली गेलेली ऑडिओ टेपसह त्यातील कथन यावर प्रकाश टाकावा... ही कसोटी आपण नाडीकेंद्रवाल्यांची घेत नाही आहात. असे वाटत असेल तर ते ही बरोबर नाही. महर्षींच्या ताडपट्टीतील लेखनाची आपल्याला माहिती करून घ्यायची आहे.
मी स्वतः या तुमच्या नाडीपरिक्षेला सामोरा जायला तयार आहे....
आपण फक्त एकटे कशाला सर्व मिपाकरांनो वरील प्रमाणे सचोटीने आपापली नाडी ताडपट्टी पहा व आपला अनुभव कळवा. यासाठी जे पैसे पडतात ते खर्च करायची तयारी असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

आँ??

Nile
Fri, 07/01/2011 - 12:36 नवीन
घाबरलात की काय??
'तुमच्या' म्हणजे 'ओकांच्या नाडी परिक्षेला अर्थात ओकांना कसेही करून खोटे ठरवायला करायची कारवाई' असे मनात असेल तर मला त्यात इंटरेस्ट नाही. कारण नाडी ग्रंथ मी लिहिलेले नाहीत.
पण तुमचा तर दुर्दम्य विश्वास आहे ना त्यावर? मग आता का लगेच माघार घेताय? आणि माघार घेणारच असाल तर मग इथून पूढे त्या नाडीची टिमकी बंद होईल असे समजावे का आम्ही?
आपण फक्त एकटे कशाला सर्व मिपाकरांनो वरील प्रमाणे सचोटीने आपापली नाडी ताडपट्टी पहा व आपला अनुभव कळवा. यासाठी जे पैसे पडतात ते खर्च करायची तयारी असावी.
किती तो धंदेवाईकपणा!! वा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

एक काम करा...

श्रावण मोडक
Fri, 07/01/2011 - 13:23 नवीन
तुमच्या चिकाटीचे कौतूक आहेच. पण तरीही, ही चिकाटी टिमकी वाजवण्यासाठीची नाही असे मानण्यासाठी एक काम करा. जगभरात किती ठिकाणी अशा नाडी ताडपट्ट्या आहेत त्याची एक यादी द्या. म्हणजे मला अंदाज घेता येईल की या उद्योगात मला कमाल किती पैसे फक्त प्रवासासाठी खर्च करावे लागतील. मग मी पुढचा निर्णय घेईन. ही यादी इथं न देता मला व्यनितून कळवली तरी हरकत नाही. आता पुढचा भाग: एखाद्या केंद्रात मला सापडलेली नाडीपट्टी माझ्या फक्त बालपणीचे काही सांगत असेल तर ती माझी नाडीपट्टी असे मी मानायचे. मग त्या नाडीपट्टीतील बालपणाव्यतिरिक्तचा मजकूर कुणाचा म्हणायचा? अशा किती कालखंडासाठीच्या किती नाडीपट्ट्या मी पाहणे अपेक्षीत आहे? म्हणजेच, माझ्या नाडीपट्ट्यांची कमाल संख्या किती असेल? त्यासाठीचा प्रवास खर्च सोडा, तो मी करेन; त्याकरिता मला नाडीकेंद्रात काही द्यावे लागणार आहे का? ओकांची फजिती वगैरे क्षुल्लक हेतू यामागे नाहीत. तितका वेळही नाही आमच्याकडे. मुळात ओकांची फजिती करून काहीही साध्य होणार नाही. नाडीपट्टी, अशा विषयातले 'अनुभव' हे फक्त वैयक्तिकच असतात असे म्हणायला सारेच केव्हाही मोकळे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

हैयोहैयैयो नाडी ग्रथ ताडपट्टयातील नावाच्या उल्लेखांचे प्रात्यक्

शशिकांत ओक
Fri, 07/01/2011 - 12:26 नवीन
मित्रा, माझा व्यक्तिगत नंबर दर वेळी सही खाली असतो. तरीही सर्वांच्या सोईसाठी मो. क्रमांक.- ०९८८१९०१०४९ कृपया रात्री ९ नंतर संपर्क करावा. ता. क. - आज दि, १ जुलै ला इतिहास संशोधनमंडळाच्या सभागृहात सायंकाळी ६वाजता भाषण आहे त्यात हैयोहैयैयो नाडी ग्रथ ताडपट्टयातील नावाच्या उल्लेखांचे प्रात्यक्षिक दाखवणार आहेत.इच्छुकांनी नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

विचार करा. मग ठरवा.

शशिकांत ओक
Fri, 07/01/2011 - 22:58 नवीन
मित्रा, व्यनि कशाला माझ्या सही नंतर माझा मो क्रमांक दर वेळेला येतो. त्यावर जरूर संपर्क करावा.
मी काहीही असत्य बोलणार/ लिहिणार नाही याची ग्वाही
चांगले आहे.
माझा या नाडीपरिक्षेवर काडीचाही विश्वास नाही..
अमेरिकेतून आल्यावर आपल्या व्यग्रतेत कशाला तसदी घेता...शिवाय त्याला खर्च येतो... विचार करा. मग ठरवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

ओकसाहेब,

पिवळा डांबिस
Sat, 07/02/2011 - 00:03 नवीन
फोन नंबर दिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या व्यग्रतेत कशाला तसदी घेता... ते सोडा... धिस इज गेटिंग इंट्रेष्टींग!!!!! :) शिवाय त्याला खर्च येतो... होय, आमचा खर्च आम्हीच करणार... अंदाजे किती खर्च येतो ते कळवाल का? तसेच ते लोकं काही ऑडियो टेप वगैरे, अर्थातच सशुल्क, देतात का? नायतर सगळं एकदम लक्षात कसं रहायचं माणसाच्या? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

Dear PiDa kaka.. Please

गवि
Sat, 07/02/2011 - 06:47 नवीन
Dear PiDa kaka.. Please please read this: http://www.whiteindianhousewife.com/2011/04/my-visit-to-a-nadi-astrologer/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

बी. प्रेमानंद आणि इथले वाचीवीर सदस्य यात काय फरक?

शशिकांत ओक
Sat, 07/16/2011 - 21:52 नवीन
मित्र हो, पिडांचे बोल
धिस इज गेटिंग इंट्रेष्टींग!!!!!
सगळं एकदम लक्षात कसं रहायचं माणसाच्या?
मृगनयनींचे बोल...
बाकी तथाकथित बुद्धीवादी संस्थांचा, विचारांचा पराभव कधीच झालेला असूनही त्यांपैकी काही जण बाहेरच्या जगात स्वत:चेच म्हणणे खरे करण्याचा क्षीण प्रयत्न करताना दिसतात...
यावरून वाटले की बी. प्रेमानंद आणि इथले काही वाचीवीर सदस्य यात काय फरक?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

उशीराची विचारणा....

शशिकांत ओक
गुरुवार, 07/28/2011 - 23:31 नवीन
मित्रा,
मी पुढच्या आठवड्यात पुण्यात येतो आहे... तेंव्हा तुम्ही जर व्यनि करून मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर कळवलांत तर मी स्वतः या तुमच्या नाडीपरिक्षेला सामोरा जायला तयार आहे....
आपल्या व्यस्त कार्यक्रमातून आपण नाडी परीक्षा घ्यायला येणार होतात, ती झाली का. सहज विचारावे असे वाटले म्हणून जरा उशीराची विचारणा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

बहुदा

श्रावण मोडक
Fri, 07/29/2011 - 11:06 नवीन
बहुदा त्यांच्या नाडीताडपट्टीत ते लिहिलेले नसावे. त्यांच्या ताडपट्टीत इतरच काही माणसांच्या अचानक भेटीगाठी लिहिलेल्या असाव्यात. त्यामुळं ते नाडी सोडवायला गेलेच नसावेत. या माणसांना भेटल्यानंतर त्यांना नाडी आवळून घ्यावी असे वाटले असणार. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

नाडी परीक्षा

पिवळा डांबिस
Mon, 08/01/2011 - 23:42 नवीन
शशिकांतराव, अगत्याने विचारणा केल्याबद्दल धन्यवाद. खेदजनक बाब ही की अगोदर अपॉइंट्मेंट ठरवूनही घरात एका कुटुंबियाच्या आजारपणामुळे मीच ती अपॉईंटमेंट राखू शकलो नाही. आणि पुण्यातील माझं यावेळेचं वास्तव्य फक्त ५ दिवसच असल्याने त्यात बसणारी दुसरी अपॉइंटमेंट शक्य झाली नाही. असो. आय होप टू हॅव बेटर लक नेक्स्ट टाईम!! आपला, पिडां
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

अहो मी तूमची ओनलाइन (नाडी)

आत्मशून्य
Tue, 08/02/2011 - 00:12 नवीन
अहो मी तूमची ओनलाइन (नाडी) परीक्षा घेतली तर चालेल काय ? म्हणजे डमी परीक्षा... जसंकी नाडी ओळखायचं प्रत्यक्षीक... म्हणजे प्रत्यक्ष नाडी बघायला जाताना कंफ्यूशन कमी असेल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा