दहशतवादावर प्रॅक्टिकल उपाय भारताकडे आहे का?
काल मुंबईवर आतांकवादी हल्ला झाला...नेहमीप्रमाणेच.. खरंतर हे दुर्दैव की 'नेहमीप्रमाणे' हा शब्द वापरावा लागावा! :(
आधी बसलेला धक्का, मग दु:ख, मग उद्वेग आणि शेवटी चीड या क्रमाने माझ्या भावना बदलल्या. मग सुरू झाले ते प्रतिक्रीयांचे पूर. "नालायक सरकार" पासून ते "कसाब" आणि "षंढ समाजा"पासून ते "परकीय शत्रु" पर्यंत मी अनेकांना दुषणे दिली. आणि तुमच्या-माझ्यासारख्यांच्या या कोलाहलाचे रुपांतर "सरकार" या आपल्यातील एका संस्थेला टारगेट करण्यात झाले. सरकारचा यावेळी दोष आहे की नाहि हे तूर्त बाजूला ठेवले तरी हे नाकारता येणार नाही सरकार दहशतवादाशी दोन हात करण्यात अयशस्वी ठरलं आहे हे नक्की!
पण फक्त सरकार अपयशी ठरलं आहे म्हणून आपण वेगळे राहु शकतो का? सरकार अपयशी ठरलंच मात्र अहेही तितकंच खरं आहे की सरकार आपल्यातूनच बनलंय. तेव्हा, गेल्या अनेक वर्षातील घडामोडी बघता हे स्पष्ट आहे की कोणतेही सरकार असो, आपण भारतीय समाज म्हणून दहशतवादाशी लढण्यात अपयशी ठरलो आहेत. (ज्यात सरकार आले, सरकारी संस्था आल्या व तुम्ही-आम्हीही आलोच)
मात्र प्रश्न असा पडतो की या दहशतवादाशी लढायला आपल्याकडे काय योजना आहे? या दहशतवादाशी कसं लढावं?
यासाठी काहि उपाय अनेकदा सुचवले जातात
उपाय१: बहुतांश अतिरेकी शेजारील देशांतून येतात तेव्हा त्या देशांवर हल्ला करून 'एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लाऊन टाकावा'. असं षंढासारखं जिण्यापेक्षा / अश्या भ्याड हल्ल्यात मेल्यापेक्षा युद्धात मेलेलं काय वाईट? किंवा अतिरेकी क्यांपांवर हल्ला करून 'एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लाऊन टाकावा' किंवा कसंही करून कोणती तरी 'अग्रेसीव' अॅक्शन घेऊन 'एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लाऊन टाकावा' (मात्र युद्ध करून हा प्रश्न सुटेल की चिघळेल याचे उत्तर चिघळेल असेच येते)
उपाय२: चर्चा हाच प्रश्न सोडवण्याचा एकमेव मार्ग आहे. सरकारने विविध घटकांशी चर्चा करून हा प्रश्न सोडवावा. (मात्र अतिरेकी चर्चेस तयार नाहीत, त्यांच्या मागण्या माहित नाहित, असल्याच तर त्या कोणतेही सार्वभौम राष्ट्र मान्य करु शकणार नाही मग चर्चा कसली करायची?)
उपाय३: अंतर्गत बचाव (संरक्षण) फळी सक्षम करणे. गुप्तहेर, स्पेशन कमांडोज, प्रगत पोलिसिंग वगैरे वगैरे (काहि प्रमाण योग्य वाटते. मात्र किती व कसे याची उत्तरे नाहीत. शिवाय हा बचावात्मक पवित्रा असल्याने इतके करूनही हल्ला होण्याचा धोका आहेच. अनेकांना भारताने या मुद्द्यावर बचावात्मक होऊ नये असे वाटते)
तेव्हा चर्चेसाठी प्रश्न असे आहेतः
- वरीलपैकी एखादा उपाय तुम्हाला योग्य वाटतो का? नसल्यास तुमच्यामते काय उपाय आहे?
- दहशतवादाला प्रभावीपणे संपवू शकेल असा प्रॅक्टिकल उपाय मुळात भारतीय समाजाकडे आहे का?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
टार्याच्या ह्या धाग्याची
उपाय
उपाय १ - तो केल्यावरही
आर तु सिरियस ??
द्विरुक्ती !!
सहमत
भारत सध्या उपाय २ आणि ३
आता काहीही उपाय नाही हे
बहुतांश अतिरेकी शेजारील
मी काय म्हणतो
केले तर जिंकू आपणच याची
मुलाला आपण (पाहिजे तितकेसे
आजच्या जमान्यात
दहशतवाद मुळात ज्या देशांत मूळ
बराचसा सहमत आहे. पहिल्या
थोडे अधिक
आयला गवि, तुम्ही फारच
आयला गवि, तुम्ही फारच
एक सिंबॉलीक
पिसाळलेला कुत्रा मारण्या शिवाय पर्याय नसतो
-१
>>अहो पण पिसाळलेल्या
उपाय १, हा सर्वात घातक
रक्ताच्या काही ठराविक
उदाहरण चांगले आहे, पण संपुर्ण
अॅनॉलॉजी समजून घ्यावी.
तुमचा मुद्दा मला कळलेला आहे
आयडीयाची कल्पना
आमच्या वतीने पर्यालाच पाठवा.
+१००००००००००००००००
मला
उपरोधाशी सहमत....
@ ॠशिकेश , गणेशा,
एवढा मोठा आपला देश. कोट्यावधी
+१००००००००००००० भाऊ.
ज्ञा. पै.शी पुर्ण सहमत
डास चावायला लागला की ...
शिवाजी महराजांचे वंशज म्हणवतो
दोष
उपाय आहे!
क्र. ४ ची उपाययोजना आधीच अंमलात आण्ल्या गेली आहे.
माहितीबद्दल धन्यवाद मक!
दुर्दैवाने गुगलबाबाकडे या अभियानाची काहीच माहिती नाहीय.
ग्रेट, मक!
माहितीबद्दल धन्यवाद.
छान माहिती
होत असेलही
+१०००००
लेख वाच्ल्यावर डोळ्यांसमोर
५?