वेगळ्या वाटेवरचा कोकणदिवा
शनिवारी अचानक संध्याकाळी ६.०० वा. फोनाफोनी झाली, आणि आज रात्रीच कोकणदिव्याला जाऊ असं ठरल. आत्तापर्यंत बरेच वेळा रायगडाच्या टकमक टोकावरुन समोरचा कोकणदिवा पाहिला होता, पण प्रत्यक्षात जायची वेळ काही कधी आली न्हवती. अहो रायगडासारखा तेजस्वी तारा असताना या लुकलुकणा-या दिव्यावर कशाला कोण जातो. पण आता आमची वय झाली असल्याने (वय ३४) आणि शक्यतो तेच गड परत परत करायचे नाहीत असं ठरवल असल्याने (भिमाशंकर, राजमाची, हरिश्चंद्रगड ई. ई. सन्माननीय अपवाद वगळता) कोकणदिव्याला फिक्स केल. धावाधाव करुन सामान गोळा केलं आणि रात्री ८.०० वा. व्ह्यन घेऊन निघालो.
साधारण १.०० च्या सुमारास पाचाड्ला पोहोचलो. पाचाड गाव शांत झोपलं होतं. दिवस पावसाचे त्यामुळे झोपायचं कुठे हा मु़ख्य प्रश्ण. पाचाडच्या शाळेत पाहिल तर गेटलाच कुलूप. पाचाड फेमस देशमुख वगैरे मंडळी गार झाली होती. शेवटी एका दुकानाच्या ओसरीवर जागा दिसली, वरती शेडसुध्दा होती त्यामुळे तिथेच क्यरिमैट पसरली. पण झोप कुठची येते, आम्ही आडवे पड्लो तसे डास जागे झाले. ओडोमॉस लावुन त्यांच्या पासुन सुट्का करुन घेतोय तर तोपर्यंत पाचाड मधील कुत्र्यांना आमची खबर लागली, आम्हाला तिथे झोपु द्याव कि नाही यावर बराचवेळ त्यांची वादावाद झाली, आणि त्यातच पहाटे ३.३० च्या सुमारास आम्ही झोपलो.
वाचने
6960
प्रतिक्रिया
18
मिसळपाव


























प्रतिक्रिया
मस्त
बज्जुगुर्जी कुठे गायब होतात इतके दिवस.?
In reply to मस्त by प्रचेतस
अरे वा
In reply to बज्जुगुर्जी कुठे गायब होतात इतके दिवस.? by बज्जु
छान.. रायगडाच्या जवळचा हा भाग
छान
सुरेख. नवीन गडाची माहिती झाली
जवळपास ५/६ वर्षांनी राब आणि
कोकणदिवा...मस्त!
अरे
In reply to कोकणदिवा...मस्त! by हेम
भारी
झकास.
वा..
एकदम जबरा !!
मस्तच हो गुरूजी!
फोटो खासच.
जबरदस्त फोटो आणि माहिती,
छान वर्णन आणि फोटू!
सुंदर !!