रायगडावर ६ जून रोजी हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा ३३८ वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.जबरदस्त पावसात आणि धुक्यात सोमवारी पहाटे मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली.
मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर कुलदेवतेला स्मरून शिवरायांच्या सुवर्णमूर्तीवर श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते राज्याभिषेक संपन्न झाला.यावेळी महाराजांच्या जयजयकाराने सारा आसमंत दणाणून गेला होता.
पोवाडे, ललकारी,तुतारी च्या आवाजाने वातावरण भारुन गेलं होतं.
यावेळी नितीन देसाई यांनी पुढील वर्षी सोहळा आणखी दिमाखदार आणि भव्य होणार असल्याचा सांगितलं....तसंच रायगड,राजगड आणि सिंधुदुर्ग हे मॉडेल(?) किल्ले करणार आणि शिवरायांच्या जीवनावर भव्य इंग्रजी चित्रपट काढणार असल्याची पण घोषणा केली.
सहस्त्र जलधारांच्या अभिषेकात हा राज्याभिषेक सोहळा सुंदररित्या पार पडला...काही क्षणचित्रे जोडीत आहे.
तारीख आणि तिथीचा घोळ इथेही होणार हे सामनामध्ये वाचून वाईट वाटलं....
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीप्रमाणे १३ जून २०११ रोजी हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथे राज्याभिषेक सोहळा पुन्हा साजरा होत आहे...
ज्यांना ६ जूनला जायला मिळालं नाई ते १३ जूनला तिथीप्रमाणे होणार्या या सोहळ्याला हजेरी लाऊ शकतात.
छायाचित्रे साभार - बाजी जेधे,संभाजी छत्रपती
छायाचित्रे साभार - बाजी जेधे,संभाजी छत्रपती
वाचने
9948
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
अतिशय सुन्दर फोटो !
मस्तच!
जबरदस्त ...
मस्त वृत्तांत. महाराजांना
ती धातूची मूर्ती कोणाची आहे
महाराजांची आहे !
In reply to ती धातूची मूर्ती कोणाची आहे by सूड
ह्म्म !!
In reply to महाराजांची आहे ! by मालोजीराव
अप्रतिम...
मस्त रे खुप छान खुप छान
नक्की नेणार
In reply to मस्त रे खुप छान खुप छान by ५० फक्त
जगदंब...
In reply to नक्की नेणार by मालोजीराव
भारलेलं वातावरण आणी अतिशय
हो,तो फोटो २०१० चा आहे,यावेळी
In reply to भारलेलं वातावरण आणी अतिशय by किसन शिंदे
वाह!!! नुसते फोटो पाहूनच
३३९ व्या शिवराज्याभिषेकाला !
In reply to वाह!!! नुसते फोटो पाहूनच by धमाल मुलगा
नक्की!
In reply to ३३९ व्या शिवराज्याभिषेकाला ! by मालोजीराव
महाराजांना मानाचा
मानाचा मुजरा
सुरेख!
अतिशय सुंदर
असेच म्हणतो अमोल केळकर
In reply to अतिशय सुंदर by अग्रजा