Skip to main content

मुखपृष्ठाची निवड करा !!!!

लेखक रामदास यांनी सोमवार, 23/05/2011 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
माझा काटेकोरांटीची फुलं हा कथासंग्रह नवता प्रकाशन या अग्रगण्य प्रकाशन संस्थेतर्फे पुढच्या महीन्यात प्रकाशीत होणार आहे. या कथासंग्रहातील कथा मिसळपाव वर गेल्या काही वर्षात आपण वाचल्या आहेतच. पुस्तकाचं मुखपृष्ठ बनवताना मुखपृष्ठकार किती मेहनत घेतात, त्याच्या मागे त्यांच्या काय संकल्पना असतात याचं दर्शन वाचकांना घडवण्यासाठी नवताच्यावतीने "काटेकोरांटीची फुलं" या कथासंग्रहासाठी बनवण्यात आलेली सर्व मुखपृष्ठ डिझाईन्स खास मिसळपावच्या सदस्यांना पहायला मिळणार आहेत. या मुखपृष्ठांमध्ये मिसळपावच्या वाचकांना जे डिझाईन सर्वाधिक भावेल तेच डिझाईन पुस्तकाचं मुखपृष्ठ म्हणून वापरण्यात येईल. याशिवाय वाचकांच्या काही सूचना असल्यास त्यांचं स्वागतच आहे.मुखपृष्ठकार श्री. अतुल परांजपे यांनी बनवलेल्या मुखपृष्ठाच्या वेगळेपणाचा अंदाज रसिकांना नक्कीच येईल. मिपाच्या सर्व सदस्यांनी हे नमुने बघून सूचना कराव्या .काही त्रुटी असतील तर त्या निदर्शनास आणून द्याव्यात. पुस्तकाविषयी नाव- काटेकोरांची फुलं लेखक- रामदास प्रकाशक- नवता पृष्ठ संख्या- सुमारे १०० छापील किंमत -१२० रुपये धन्यवाद.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 39862
प्रतिक्रिया 88

प्रतिक्रिया

चौथे चित्र चांगले वाटतंय. पण त्यात पिवळ्याच्या जागी पांढरा रंग घेतला, आणि लालच्या जागी जरा फिकट पिवळा रंग घेतला तर चांगले दिसेल, असे मला आपले उगीचच वाटतंय! - पट्टेरी माउ :)

काका, आपल्या येथेच एकसे बढकर एक कलाकार असतांना तुम्ही दुसरीकडचे डिझायीन कसे पास करत आहात? प्रास याने/हिने म्हटल्याप्रमाणे विचार करावा हि विनंती. आपल्या अपत्याचे अन आपले अभिनंदन!

कुठलेही आवडले नाही. पुस्तकातल्या वजनाला पेलणारे दुसरे काही तरी.

कुठलेही आवडले नाही. पुस्तकातल्या वजनाला पेलणारे दुसरे काही तरी.

पुस्तक नक्की विकत घेवुन वाचेन, माझ मत ४ नंबर ला. --टुकुल

प्रथम रामदास काकांचे मनःपूर्वक अभिनंदन! तसे तर एकही मुखपृष्ठ फारसे भावले नाही. पण या चार मधील तिसरे बरे वाटतेय. बाकी चतुरंग भाऊजींच्या आणि प्रासच्या सुचनांचा विचार करून पुन्हा २-३ डिझाईन्स बनवून बघायला हरकत नाही.

सर्वात वरचं म्हणजेच पहिलं मुखपृष्ठ त्यातल्यात्यात योग्य वाटतय, कारण जेव्हां कागदावर प्रींट होइल व काही काळ जाऊन जूनं होइल तेव्हां सूध्दा त्यातील रंग व डीजाइनच्या साधेपणामूळे त्याची आकर्षकता टीकून राहील असे वाटते. बाकी कथा जर डार्क शेड असणार्‍या जास्त असतील, म्हणजे दूखी: वा थोड्या वैचीत्र राखणार्‍या तर शेवटचे डीजाइन सूट होइल. फक्त ती जी पीवळी फूले आहेत ती काढून टाकावीत, म्हणजेच काटेरी झाडाचे चीत्र व त्यावर कवीतासंग्रहाचे व आपले नाव जसं व जीथं आहे तसच ठेवावे.

पुस्तकाची वाट पाहतोय. लंबर एक आणि लंबर चारचे मुखपृष्ठ भारी आहे. -दिलीप बिरुटे

आपण सर्वांनी भरभरून प्रतिक्रिया लिहील्यात त्या वाचून पुस्तक प्रकाशनापेक्षा जास्त आनंद झाला. मी -माझे प्रकाशक आणि अतुल परांजपे आपल्या सगळयांचे आभारी आहोत. सर्व सूचनांचे एकत्रीकरण करून हवे तसे बदल करण्याचे प्रयत्न चालू आहेत. पुस्तक जून अखेरीस प्रसिध्द व्हावे असा संकल्प आहे. वीस जुलाईला शिकागो येथे बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अधीवेशनात माझी आणखी एक प्रकाशक मित्र श्री.हेमंत रायकर यांचा मराठी पुस्तकांचा स्टॉल असणार आहे. तेथे काही प्रती विक्रीस उपलब्ध असतील. पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम कधी असेल ते अजून ठरले नाही. मागणी असल्यास मिपासदस्यांना पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था प्रकाशकांनी केली आहे. पुन्हा एकदा सर्व सदस्यांचे आभार!

एक कळत नाहिये... हा कथासंग्रह आहे हे स्पष्ट लिहून सुद्धा बर्‍याच लोकांनी कवितासंग्रह असं का लिहिलं आहे?

In reply to by बिपिन कार्यकर्ते

रामदासकाका, मी म्हणत होतो त्याची निशाणी इथे दिसतेय. बर्‍याच लोकांना कवितासंग्रह वाटतोय.

हाफिसातून मुखपृष्ट दिसत नाहिये.. तेमत नंतर देतो तुर्तास प्रकाशनाबद्द्ल अभिनंदन! :)