✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मुखपृष्ठाची निवड करा !!!!

र
रामदास यांनी
Mon, 05/23/2011 - 11:59  ·  लेख
लेख
माझा काटेकोरांटीची फुलं हा कथासंग्रह नवता प्रकाशन या अग्रगण्य प्रकाशन संस्थेतर्फे पुढच्या महीन्यात प्रकाशीत होणार आहे. या कथासंग्रहातील कथा मिसळपाव वर गेल्या काही वर्षात आपण वाचल्या आहेतच. पुस्तकाचं मुखपृष्ठ बनवताना मुखपृष्ठकार किती मेहनत घेतात, त्याच्या मागे त्यांच्या काय संकल्पना असतात याचं दर्शन वाचकांना घडवण्यासाठी नवताच्यावतीने "काटेकोरांटीची फुलं" या कथासंग्रहासाठी बनवण्यात आलेली सर्व मुखपृष्ठ डिझाईन्स खास मिसळपावच्या सदस्यांना पहायला मिळणार आहेत. या मुखपृष्ठांमध्ये मिसळपावच्या वाचकांना जे डिझाईन सर्वाधिक भावेल तेच डिझाईन पुस्तकाचं मुखपृष्ठ म्हणून वापरण्यात येईल. याशिवाय वाचकांच्या काही सूचना असल्यास त्यांचं स्वागतच आहे.मुखपृष्ठकार श्री. अतुल परांजपे यांनी बनवलेल्या मुखपृष्ठाच्या वेगळेपणाचा अंदाज रसिकांना नक्कीच येईल. मिपाच्या सर्व सदस्यांनी हे नमुने बघून सूचना कराव्या .काही त्रुटी असतील तर त्या निदर्शनास आणून द्याव्यात. पुस्तकाविषयी नाव- काटेकोरांची फुलं लेखक- रामदास प्रकाशक- नवता पृष्ठ संख्या- सुमारे १०० छापील किंमत -१२० रुपये धन्यवाद.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
तंत्र
लेखनप्रकार (Writing Type)
बातमी

प्रतिक्रिया द्या
39714 वाचन

💬 प्रतिसाद (88)

प्रतिक्रिया

अभिनंदन

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 05/23/2011 - 12:07 नवीन
अभिनंदन. पुढच्या महिन्यात नक्की कधी? जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रत मिळणं शक्य आहे काय?
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन! आपले असे

नगरीनिरंजन
Mon, 05/23/2011 - 12:12 नवीन
हार्दिक अभिनंदन! आपले असे अनेक कथासंग्रह प्रसिद्ध होवोत आणि त्या सगळ्या कथा आम्हाला वाचायला मिळोत ही सदिच्छा! मुखपृष्ठाची सगळीच डिझाईन्स आकर्षक असली तरी मला चौथे सगळ्यात जास्त आवडले. (फक्त फूलं ऐवजी फुलं असावं).
  • Log in or register to post comments

+१

स्वानन्द
Mon, 05/23/2011 - 14:37 नवीन
चौथे आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

+२

सखी
Mon, 05/23/2011 - 17:29 नवीन
चौथे आवडले. मनापासुन अभिनंदन, पुस्तक संग्रही ठेवायला नक्कीच आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द

+३०००

मी-सौरभ
Tue, 05/24/2011 - 00:22 नवीन
काका अभिनंदन ४ क्रमांकाच डिझाईन मस्त वाटतय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखी

असेच

सन्जोप राव
Tue, 05/24/2011 - 16:35 नवीन
असेच म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

अभिनंदन...अभिनंदन... चार

निवेदिता-ताई
Mon, 05/23/2011 - 12:13 नवीन
अभिनंदन...अभिनंदन... चार नंबरचे मुखपृष्ठ योग्य आहे ...असे माझे मत आहे.. अजुन जाणकारांची मते घ्याच!!!!!!
  • Log in or register to post comments

+१

टारझन
Mon, 05/23/2011 - 12:26 नवीन
चार नंबरचे चित्र छान वाटते , तसेच त्या हायफन चं काय काम ? रामदास ल्ह्यावे नुसते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निवेदिता-ताई

+२

प्रभो
Mon, 05/23/2011 - 18:55 नवीन
चार नंबरचे चित्र छान वाटते ... रामदासकाका, अभिनंदन!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

२, ३

श्रावण मोडक
Mon, 05/23/2011 - 12:24 नवीन
२ किंवा ३. मुद्रितशोधन झालेलं नाहीये. निमित्त आहे म्हणून विचारतो - अपुऱ्या कथांचे काय? कधी पूर्ण होणार आहेत त्या? लवकर करा.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

विसुनाना
Mon, 05/23/2011 - 12:32 नवीन
कथासंग्रह सुप्रसिद्ध व्हावा ही शुभेच्छा. मी नक्कीच संग्रहात ठेवीन. वरून चौथे मुखपृष्ठ आवडले. मुखपृष्ठाबाबत काही शंका (लेखकाने त्यांचा विचार केलेला असल्यास त्या बाजूला साराव्यात. योग्य वाटल्यास विचार व्हावा.) १. फूलं हा शब्द बरोबर आहे की फुलं हा शब्द? २. ~रामदास अथवा -रामदास असे न लिहीता केवळ 'रामदास' असे का लिहीले नाही?
  • Log in or register to post comments

अभिनंदन रामदास काका !! चारी

सुहास..
Mon, 05/23/2011 - 12:19 नवीन
अभिनंदन रामदास काका !! चारी नापसंत !! कॅची वाटत नाही :( (अर्थात हे वैयक्तीक मत )
  • Log in or register to post comments

+१

सहज
Mon, 05/23/2011 - 12:33 नवीन
चारी नापसंत !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

अभिनंदन कविता जर जास्त करुण

मुलूखावेगळी
Mon, 05/23/2011 - 12:21 नवीन
अभिनंदन कविता जर जास्त करुण असतील तर ४ घ्या. किन्वा २ छान आहे.
  • Log in or register to post comments

???

सोत्रि
Mon, 05/23/2011 - 13:44 नवीन
कथासंग्रहात फक्त कथाच असतात असा माझा समज होता? कविताही असतात काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुलूखावेगळी

मी कविता संग्रह वाचले.

मुलूखावेगळी
Mon, 05/23/2011 - 14:05 नवीन
मी कविता संग्रह वाचले. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुलूखावेगळी

३

विलासराव
Mon, 05/23/2011 - 12:45 नवीन
मला ३ व ४ आवडले. अभिनंदन...!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments

क्रमांक ४

विजुभाऊ
Mon, 05/23/2011 - 12:46 नवीन
क्रमांक ४
  • Log in or register to post comments

शेवटचे मुखपृष्ठ

अमोल केळकर
Mon, 05/23/2011 - 12:46 नवीन
शेवटचे मुखपृष्ठ आवडले अभिनंदन अमोल केळकर ( एक प्रेमळ सुचना --शक्यतो प्रकाशन बुधाच्या नक्षत्रावर करा, म्हणजे पुढे अनेक वेळा असा योग येईल )
  • Log in or register to post comments

अभिनंदन !!

खादाड अमिता
Mon, 05/23/2011 - 12:49 नवीन
अभिनंदन !! आपण ३ नंबर ला मत देणार.
  • Log in or register to post comments

+१

अमोल खरे
Mon, 05/23/2011 - 12:57 नवीन
माझेही तेच मत. ३ नंबर.........तुमच्या कथेत थोडा करुणपणा असतो. ब्लॅक बॅकग्राऊंड जास्त चांगली दिसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खादाड अमिता

+२ ४ साठी उगाच काटे-कोरान्टी

माझीही शॅम्पेन
Mon, 05/23/2011 - 17:58 नवीन
+२ ४ साठी उगाच काटे-कोरान्टी म्हटल की कांपौंडची तर कशाला पाहिजे ! ३ - संपूर्ण काळ्या बॅकग्राउंड वर पिवळी फूल छान वाटतात आहे !!! अवांतर - मुखप्रुस्ठ कसाही असेल तरी आतल्या कविता छान हव्यात !!! (शुभेच्छा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल खरे

??? सोकाजीरावत्रिलोकेकर यांनी

मुलूखावेगळी
Mon, 05/23/2011 - 18:08 नवीन
??? सोकाजीरावत्रिलोकेकर यांनी Mon, 23/05/2011 - 13:44 ला प्रकाशित केले. कथासंग्रहात फक्त कथाच असतात असा माझा समज होता? कविताही असतात काय
हे वाचले नाहीस काय? कविता म्हनु नकोस. पुन्हा १ दा टपली मिळेल ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

अभिनंदन

RUPALI POYEKAR
Mon, 05/23/2011 - 12:59 नवीन
जास्तीची मेजॉरीटी --------------- नंबर ४ फोटो
  • Log in or register to post comments

३

दत्ता काळे
Mon, 05/23/2011 - 13:20 नवीन
तिसरे आवडले.
  • Log in or register to post comments

मला तरी दुसरे आवडले. मुखपृष्ठ

मृत्युन्जय
Mon, 05/23/2011 - 13:25 नवीन
मला तरी दुसरे आवडले. मुखपृष्ठ शक्यतो उजळ रंगाचे करा. काळा रंग आणि काट्यांचे चित्र शक्यतो टाळाच. तुमची काटेकोरांटीची फुले अप्रतिम कथा आवडली होतीच. त्या कथेच्या अनुषंगाने उजळ रंगच उठुन दिसेच. शेवटचे चित्र तर शक्यतो टाळाच.
  • Log in or register to post comments

४ पैकी मत द्यायचे आहे म्हणुन

वपाडाव
Mon, 05/23/2011 - 13:26 नवीन
४ पैकी मत द्यायचे आहे म्हणुन चौथे... अन्यथा विशेष वाटत नाही... अशीच अनेक पुस्तके प्रकाशित होवोत... हीच सदिच्छा / ई. प्रा.
  • Log in or register to post comments

३ रे

प्रचेतस
Mon, 05/23/2011 - 13:31 नवीन
३ रे ला मत दिले आहे.
  • Log in or register to post comments

सर्वप्रथम रामदासजी

सोत्रि
Mon, 05/23/2011 - 13:52 नवीन
सर्वप्रथम रामदासजी अभिनंदन. क्रमांक 1 वर जर क्रमांक 4 चे काटेरी झाड/झुडूप आले तर ते मुखपृष्ठ मला आवडेल. बाकी कथासंग्रहाच्या प्रकाशनाच्या प्रतीक्षेत... - सोकाजी
  • Log in or register to post comments

+१ हेच बोल्तो.

मितभाषी
Mon, 05/23/2011 - 22:54 नवीन
पहिले चित्र कॅची आहे. फक्त त्यात बॅकग्राऊंडला काटेरी झुडुप टाकता आले तर बघा. माझ्या आवडत्या लेखकांपैकी श्री रामदास यांच्या कथा मिपावर नेहमीच वाचत आलो आहे. हा कथासंग्रह नक्कीच विकत घेणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

अभिनंदन

सख्या
Mon, 05/23/2011 - 13:54 नवीन
तिसरे आवडले
  • Log in or register to post comments

अभिनंदन काका...

चिगो
Mon, 05/23/2011 - 13:55 नवीन
सर्वप्रथम आपले मनःपुर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा... आपल्याला साहीत्यक्षेत्रात अमाप यश लाभो ही देवापाशी प्रार्थना... आता मुखपृष्ठाबद्दल.. पहीलं थोडं गिचमिड वाटतंय, आणि रंगही डोळ्यात जाणारा, जास्त ब्राईट आहे. दुसरं चांगलं आहे पण काटेकोरांटीचा रंग पकडलेला नाही.. तिसरं मला सगळ्यात जास्त आवडलं.. कारण रंग जवळपास त्या फुलांसारखाच आहे, आणि उठूनही दिसतोय.. (फुलांच्या डिझाईनच्या जस्ट मागे असलेला थेंब कशासाठी? काटेकोरांटीच्या फुलात, देठात अगदी छोटासा मधाचा थेंब असतो म्हणुन तर नव्हे? ) चौथंही छान आहे.. .... माझं मत मात्र ३ नंबरला...
  • Log in or register to post comments

कथासंग्रह

खुसपट
Mon, 05/23/2011 - 14:05 नवीन
अभिनंदन !! प्रकाशन केव्हा आहे? त्याला हजर राहण्यास आवडेल.आपले लिखाण वाचणे हा एक सुखद अनुभव असतो.पुस्तक आल्यावर वाचणारच. खुसपट(राव)
  • Log in or register to post comments

मला चौथे नाही आवडले. त्यात

विश्वनाथ मेहेंदळे
Mon, 05/23/2011 - 14:45 नवीन
मला चौथे नाही आवडले. त्यात थोडीशी गूढ छटा वाटली. मतकरींच्या "गहिरे पाणी" ची आठवण झाली. उरलेल्या तिघांत दुसरे सर्वात जास्त आवडले.
  • Log in or register to post comments

मुखपृष्ट डिझाईन्स दिसत

गणेशा
Mon, 05/23/2011 - 15:32 नवीन
मुखपृष्ट डिझाईन्स दिसत नाहियेत मला.. अभिनंदन
  • Log in or register to post comments

मुखपृष्ट डिझाईन्स दिसत

वपाडाव
Mon, 05/23/2011 - 18:19 नवीन
मुखपृष्ट डिझाईन्स दिसत नाहियेत मला.. अभिनंदन
ह्ये एका दमात वाचले अन धारातिर्थी पडलो.... डोळ्यांच्या दवाखान्यात जाउन या एकदा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

अभिनंदन

नारयन लेले
Mon, 05/23/2011 - 15:43 नवीन
मनःपुर्वक अभिनंदन ! आशीच तुमची पुस्तके प्रकाशित होओत हिच मनोकामना. माझ्या मते दुसरे आथवा चौथे आवडले, तसेच "फूले ऐवजी फुले आसावे" विनित
  • Log in or register to post comments

अभिनंदन.

प्रभाकर पेठकर
Mon, 05/23/2011 - 15:48 नवीन
श्री. रामदास ह्यांचे हार्दीक अभिनंदन. प्रकाशन समारंभ कधी आणि कुठे आहे? मुखपृष्ठ क्रमांक ४ आवडले. मात्र त्यावरील चित्रनक्षी मुखपृष्ठाच्या उजव्या बाजूस (बाकी ३ मुखपृष्ठ नक्षींप्रमाणे) जास्त चांगली वाटेल असे वाटते. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

क्रमांक ४ चे मुखपृष्ठ आवडले.

प्रकाश घाटपांडे
Mon, 05/23/2011 - 16:34 नवीन
क्रमांक ४ चे मुखपृष्ठ आवडले.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

सुवर्णमयी
Mon, 05/23/2011 - 17:13 नवीन
रामदास, तुमचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीला मनःपूर्वक शुभेच्छा. ( २, ४ मुखपृष्ट आवडले.) सोनाली
  • Log in or register to post comments

मला एक पुस्तक फ्री देनार असाल

नरेशकुमार
Mon, 05/23/2011 - 17:53 नवीन
मला एक पुस्तक फ्री देनार असाल तरच सांगतो. . . मिपावाल्यांना काय डिस्काउंट वगेरे काय हाय का ?
  • Log in or register to post comments

असल्या लोकांना १२०/- ऐवजी

वपाडाव
Mon, 05/23/2011 - 18:19 नवीन
असल्या लोकांना १२०/- ऐवजी १३०/- पुस्तक देण्यात यावे अशी विनंती...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार

घोर अप्मान !लवकरच स्क्रु....

नरेशकुमार
Mon, 05/23/2011 - 18:26 नवीन
घोर अप्मान ! लवकरच स्क्रु.... आपलं स्कोर सेटल केल्या जाईल II मीळे त्रुप्ती खाउन भात वरन, करील जो शिकरन दुध आनि केळांचे II
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

धमकीआझम झालात आजकाल. छान

विश्वनाथ मेहेंदळे
Mon, 05/23/2011 - 19:07 नवीन
धमकीआझम झालात आजकाल. छान छान. पण जरा सांभाळून, कुणाकडे कुणाच्या कुंडल्या असतील ते सांगता येत नाही. वपाडावशी अंशत: सहमत आहे. (१३० नाही कमीत कमी २४० करावे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार

प्रेमात सगळं काही माफ असतं ना

नरेशकुमार
Mon, 05/23/2011 - 19:17 नवीन
प्रेमात सगळं काही माफ असतं ना वो काका. प्रेमाने काय धमक्या पन द्यायच्या नाय का आमी.
कुणाकडे कुणाच्या कुंडल्या असतील ते सांगता येत नाही.
दोन चार घटका येने हसने खेळने यापलीकडे आमचा काय हो गुन्हा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

>>प्रेमात सगळं काही माफ असतं

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 05/24/2011 - 14:11 नवीन
>>प्रेमात सगळं काही माफ असतं ना वो काका.प्रेमाने काय धमक्या पन द्यायच्या नाय का आमी. द्या ना. एक सोडून दहा द्या. मी कुठे आक्षेप घेतला? >>दोन चार घटका येने हसने खेळने यापलीकडे आमचा काय हो गुन्हा ? छे छे, मी कुठे म्हटले तुम्ही गुन्हा केलात म्हणून? मी फक्त एक शक्यता लक्षात आणून दिली ;-) असो, अवांतर होते आहे. बाकी बोलायचे असेल तर खव/व्यनी आहेतच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार

रामदासकाका,

प्रास
Mon, 05/23/2011 - 19:10 नवीन
आधी हार्दिक अभिनंदन! कथासंग्रह नक्कीच 'विकत' घेऊन वाचेन. ;-) बाकी मुखपृष्ठाबद्दल...... १. वरती म्हण्टल्याप्रमाणे नांव- 'काटेकोरांटीची फुलं' घ्यावं. २. नावात कोराण्टी आणि मुखपृष्ठात कोराण्टीची फुलं कुठेच नाहीत, बहुत नाइन्साफी हय, काका! तेव्हा बॅकग्राऊण्डला का असेना कोराण्टीची फुलं घ्या. ही फुलं छोटीशी असतात पण दिसायला फारच सुंदर असतात कोराण्टीच्या तीन जातींच्या फुलांच्या छायाचित्रांचे गूगल सर्चचे दुवे - अ. पिवळी कोराण्टी (पीत सैरेयक) http://www.google.co.in/search?q=barleria+prionitis&hl=en&prmd=ivns&tbm=isch&tbo=u&source=univ&sa=X&ei=GGHaTbX3MIrtrAfCzbXyBQ&sqi=2&ved=0CDYQsAQ&biw=987&bih=629 आ. नीळी कोराण्टी (नील सैरेयक) http://www.google.co.in/search?q=barleria+strigosa&hl=en&prmd=ivns&tbm=isch&tbo=u&source=univ&sa=X&ei=bmHaTe2SFMHsrQeT04j-BQ&sqi=2&ved=0CDsQsAQ&biw=987&bih=629 इ. लाल (नीळसरपणाकडेच झुकणारी, जांभळी दिसणारी) कोराण्टी (रक्त सैरेयक) http://www.google.co.in/search?q=barleria+cristata&hl=en&prmd=ivns&tbm=isch&tbo=u&source=univ&sa=X&ei=e2HaTbP3GM3KrAek5q2LBg&sqi=2&ved=0CCcQsAQ&biw=987&bih=629 हार्दिक शुभेच्छांसह, आपला फ्यान :-)
  • Log in or register to post comments

प्रतिसाद - २

प्रास
Mon, 05/23/2011 - 20:25 नवीन
काय आहे, मुखपृष्ठकार ते बनवण्यासाठी नक्कीच (ढोर) मेहनत घेत असेल पण काटेकोरांटी वनस्पती मूळ कशी दिसते हे बघण्याचा त्याने शून्य अभ्यास केलाय असं वाटल्यामुळे मी हा दुसरा प्रतिसाद देत आहे. अभ्यासाशिवाय केलेली गद्धे-मजुरी मूर्खपणा आहे असं मला वाटतं. कलेला अभ्यास हवाच! कोरांटी किंवा सैरेयक हे एक क्षुप अर्थात झुडुप आहे. या नावाच्या कथासंग्रहाच्या मुखपृष्ठावर ४थ्या डिझाईनमध्ये बॅकग्राऊण्डला जे दिसतंय तो चक्क वृक्ष आहे. कितीही आवडलं तरी ते डिझाईन ठेवणं हे 'कल्पना-दारीद्र्य' याशिवाय 'अकलेचे दिवाळे' या दोन्ही विभागात जाईल आणि पर्यायाने या सगळ्याचा अंगुलिनिर्देश तुमच्यावरच येईल. तसं होऊ नये म्हणून हा प्रतिसाद-प्रपंच. तेव्हा नवे डिझाईन बनवायला द्या असं आग्रही मागणं आहे. बाकी इतर माहितीसाठी खरडवही खुली आहेच. तुमचा फ्यान :-)
  • Log in or register to post comments

सहमत

तिमा
Mon, 05/23/2011 - 20:16 नवीन
प्रथमतः अभिनंदन. 'प्रास' यांच्याशी सहमत. या चारांतले कुठलेच डिझाईन घेऊ नका.
  • Log in or register to post comments

अभिनंदन !!

शाहरुख
Mon, 05/23/2011 - 20:18 नवीन
अभिनंदन !!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा