गेल्या आठवड्यात माझे एक क्लायन्ट, श्री जोशी, एका नवीन कंपनीचे 'वेट लॉस प्रोटीन शेक' त्यांच्या मित्राकडून (विकत) घेऊन आले. मी विचारल्यावर, 'मॅडम, ते माझे अगदी बालपणा पासूनचे मित्र आहेत. ते आणि त्यांची बायको, गेल्या ५ वर्षांपासून हे प्रोटीन (प्रथिन) शेक घेत आहेत. त्यांचे १२ किलो वजन कमी झालंय! त्यांच्या आग्रहाला मी बळी पडलो. तुमचं डाएट तर करतोच आणि शिवाय हे प्रोटीन शेक पण घेऊन बघतो. काही पण करून वजन कमी झालं, तर माझा फायदाच आहे न!' जोशी साहेबांच्या मित्राने समजावल्या प्रमाणे- त्यांनी दिवस भरात तीनदा त्या प्रोटीन शेक चं एक पाकीट २५० मिली दुधात घालून प्यायचा होतं. त्या व्यतिरिक्त काहीच खायचं नाही. त्या शेक मधेच शरीराला लागणारे सर्व पोषण होते. माझ्या मनात आलं, चला आपल्या देशातला कुपोषणाचा प्रश्नच सुटला की! (जोकिंग हो!) असो. ते शेक, असंच ४ महिने घेतलं तर ८-१० किलो वजन कमी होण्याची गॅरन्टी (वॉरन्टी नाही बरं का!) सुद्धा दिली होती. एवढे वायदे ऐकल्या वर मोहात पडणं स्वाभाविक होतं.
जोशी साहेबांचा ह्यात अजिबात दोष नव्हता. वर्षानुवर्ष वेग-वेगळी डाएट, जीम, वेट लॉस प्रोग्रॅम करून पण परत वजन वाढलेल्या व्यक्तींपैकी ते आहेत. अश्या लोकांची एक ठाम (पण चुकीची) समजूत असते- रोजच्या आहारापेक्षा काही खूप वेगळं केल्या शिवाय 'डाएट करणं' होत नाही. दुसरं म्हणजे सॉलिड रिझल्ट बघायची त्यांना प्रचंड घाई असते. त्यामुळे, आपल्या राहणी मानाला अनुरूप असं डाएट, की ज्याने महिन्याला २-३ किलो वजन कमी होतं, ते त्यांना पटत नाही. जोश्यांच त्या प्रोटीन शेक चं विज्ञापन ऐकल्या वर मी त्यांना एकाच प्रश्न विचारला- 'तुमचे मित्र एवढं वजन कमी करून पण अजून तेच प्रोटीन शेक का पीतायेत?' जोशी म्हणाले- 'आहो, नाहीतर मग परत त्यांचं वजन नाही का वाढणार?' अगदी बरोबर.
अॅट्कीन्स डाएट, साउथ बीच डाएट, जनरल मोटर्स डाएट किंवा असे हाय प्रोटीन शेक डाएट केल्याने वजन कमी तर होतं, पण (आधीच्या लेखात समजावल्या प्रमाणे) ते डाएट बंद करून, आपल्या नेहमीचा आहार सुरु केला की त्याहून दुप्पट वजन वाढतं. आपलं शरीर, एकदम खूप प्रमाणात आलेल्या प्रोटीन चे 'डी-अमाय्नेशन' करून, त्याला सुद्धा फॅट (चरबी) चा रूपात साठवून ठेवतं. हाय प्रोटीन शेक बरोबर इतर काहीच न खाल्ल्यामुळे शरीरातल्या पाण्याचा आणि स्नायूंचा घटक कमी होऊन, वजन कमी होते. असं वजन कमी केलेल्या लोकांना बरेचदा 'स्ट्रेच मार्क्स', 'निस्तेज चेहरा', 'केस गळणे', 'इतर काही पण खाल्लं की पोट बिघडणे' असे अनुभव येतात. ह्या व्यतिरिक्त शरीरात होणारे इतर सुप्त बदल म्हणजे आतडी शिथिल होणे, सांधे दुखणे, वारंवार आजारी पडणे, ई.
असं होण्या मागचं कारण अगदी स्पष्ट आहे- अन्न हे प्राकृतिक असून आपल्या संपूर्ण स्वास्थ्यासाठी खूप गरजेचं आहे. अन्नातले सगळे घटक शरीरात काही विशिष्ठ काम करत असतात. रोज वेळेवर संतुलित आहार खाऊन शरीरातले इतर उपयोगी सूक्ष्मजीव पण जपले जातात व त्यानी आपली प्रतिकारशक्ती पण वाढते. शरीरातल्या सर्व अवयवांना पचनक्रिये नी प्राकृतिक शक्ती आणि व्यायाम मिळतो. तर असं असताना, अन्न वगळून नुसतं दूध आणि रासायनिक पूड घेऊन स्वास्थ्य लाभेल का? पेट्रोल इंजिन च्या गाडीत डीझेल टाकून ती व्यवस्थित दीर्घ काळ चालेल का? कायम लक्षात ठेवा- आपले आरोग्य जपून वजन वाढवणे (वाढणे) किंवा कमी करणे ह्याला 'इन्स्टन्ट' उपाय कधीच नसतो. म्हणून व्यवस्थित खाऊन पिऊनच वजन कमी (किंवा जास्त) करा.
वाचने
8057
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
पिऊनच वजन कमी (किंवा जास्त) करा.
काय हो रामदास काका!!
In reply to पिऊनच वजन कमी (किंवा जास्त) करा. by रामदास
शन्वारी सामनात रामदासांचा
लेख आवडला.
जुने ते सोने
वजन कमी होणे
In reply to जुने ते सोने by अर्यन
वजन कमी होणे
In reply to वजन कमी होणे by योगी९००
लेख आवडला..
धन्यवाद :)
प्रोटीन शेक घेतल्याने वजन
प्रोटीन शेक घेतल्याने वजन वाढते असे आईकून होतो
In reply to प्रोटीन शेक घेतल्याने वजन by स्पा
ह्म्म्म्म्म्म्म्म
छान माहिती... चला मिल्क शेक
अँ..
In reply to छान माहिती... चला मिल्क शेक by मदनबाण
अँ.. ? अहो मबा.. ते शेक्स घेऊ
In reply to अँ.. by गवि
छान माहीती आहे. आम्ही देखील
पण... पण...
In reply to छान माहीती आहे. आम्ही देखील by llपुण्याचे पेशवेll
पक्का
In reply to पण... पण... by पंगा
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ.. वडाची साल
In reply to पण... पण... by पंगा
मराठीत जाहीरात म्हणतात.
In reply to छान माहीती आहे. आम्ही देखील by llपुण्याचे पेशवेll
दुरुस्ती
In reply to मराठीत जाहीरात म्हणतात. by खादाड अमिता
मस्त लेख.
गेल्या महिन्यात माझं वजन पाच