✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

नको येवुस कविते( ३)

ग — गणेशा, Wed, 04/20/2011 - 15:32
काय सांगतील पोरी या आसवांच्या ओळी दु:खाच्या खाणीत तव स्वप्नांची होळी नको येवुस माहेराला अवकळा सारी क्षीण आहे भाव अन जीव झाला भारी सुख गेली दावणीला शब्दही फितुर झाली झोपडीच्या झरोक्यातुन रात्र टिपुस ओली उजाडलं रान सारं तिथ आठवांची धुळ माखलेल मन आज जनु पारंब्याचा पिळ नाही काही इथं सार सार संपल तुझ्या पिर्तीची ओढ बस्स हीच जीवन वेल ---- शब्दमेघ (२० एप्रिल २०११) २. नको बोलु बाबा काही :- http://www.misalpav.com/node/17097 १. हरवली पोर माझी कविता नावाची :- http://www.misalpav.com/node/17082

Book traversal links for नको येवुस कविते( ३)

  • ‹ नको बोलु बाबा काही
  • Up
  • बोल ना रे बाबा काही ..४ ( समाप्त ) ›

प्रतिक्रिया द्या
3351 वाचन

💬 प्रतिसाद (15)

व्वाह...

मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 04/20/2011 - 15:35 नवीन
सुख गेली दावणीला शब्दही फितुर झाली झोपडीच्या झरोक्यातुन रात्र टिपुस ओली
__/\__
  • Log in or register to post comments

छान......!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 04/20/2011 - 21:28 नवीन
सुख गेली दावणीला शब्दही फितुर झाली झोपडीच्या झरोक्यातुन रात्र टिपुस ओली आवडल्या ओळी. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

मस्त लिहिलय गनेशा जि

पियुशा
Wed, 04/20/2011 - 16:15 नवीन
मस्त लिहिलय गनेशा जि :)
  • Log in or register to post comments

गणेशा - उजाडलं रान सारं तिथ

प्रकाश१११
Wed, 04/20/2011 - 18:32 नवीन
गणेशा - उजाडलं रान सारं तिथ आठवांची धुळ माखलेल मन आज जनु पारंब्याचा पिळ छान लय.एकदम +१
  • Log in or register to post comments

छान आहे गणेशा! थोरामोठ्याच्या

नगरीनिरंजन
Wed, 04/20/2011 - 19:57 नवीन
छान आहे गणेशा! थोरामोठ्याच्या घरी मुलगी दिलेल्या गरीब बापाची कहाणी वाटते.
  • Log in or register to post comments

मस्तच गणेशा. पण हा विषय कसा

निनाव
Wed, 04/20/2011 - 19:57 नवीन
मस्तच गणेशा. पण हा विषय कसा काय सुचला? कारण विषय वेगळाच आहे. हाताळणी तर उत्तमच , हे वेगळे सांगायलाच नको. :)
  • Log in or register to post comments

प्रथमता सर्वांचे मनपुर्वक

गणेशा
Wed, 04/20/2011 - 20:53 नवीन
प्रथमता सर्वांचे मनपुर्वक आभार : @ निनाव "हरवली पोर माझी कविता नावाची " ही कविता कवी आपल्या पोरीस म्हणजे कवितेस बोलतोय अश्या अर्थाने लिहायला घेतली सहज .. खुप दिवस शब्दच सुचत नसल्याने ..आणि आपोआपच ती एका बापाची कहानी झाली .. मग मुलगी-वडील यांचेच संभाषण पुढील कवितेपासुन आहे या सिरिज मध्ये .. (नगरी निरंजन, राघव यांनीही एकेके कविता लिहिल्यात अश्या) आता पुढील कवितेत मुलगी बोलेण याला उत्तर ... बस्स बाकी विशेष प्रसंग असा नाही.. पण नगरीनिरंजन म्हणतात तसे .. कवितेतील बाप हा गावाकडील गरीब शेतकरी आहे ... त्याची भाषा .. शब्द.. आणि ठिकान तेच आहे.. मात्र मुलगी मोठ्या घरी आहे असेच काही नाही.. यातील मुलीचे नाव 'कविता' आहे ... अवांतर : मुलगी आणि वडील यांचे नाते खुप आवडते मला त्यामुळे हे संभाषण लिहिताना गावाकडील चित्र हळुच डोळ्यासमोर येते .. बघु कशी होयील सिरिज ... माहित नाही "नको बोलु बाबा काही" ही कविता सर्वात आवडली या तीन मधिल पण मला ... पुढील कवितेच्या ओळीत पुन्हा हीच ओळ घेण्याचा विचार आहे .. बघु ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाव

जबराच. लिहा-लिहा , मला खात्री

निनाव
Wed, 04/20/2011 - 22:11 नवीन
जबराच. लिहा-लिहा , मला खात्री आहे सिरीज नक्किच यशस्वी होईल. :) - मना पासून शुभेच्छा. मला देखील 'ही' कविता खूप आवडली (इतरांना अनुमोदन :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

छान!

पैसा
Wed, 04/20/2011 - 20:22 नवीन
३ कवितांची कवितामालिका पुरी झाली म्हणायची!
  • Log in or register to post comments

हृद्य!! मला ही रचना अतिशय

स्पंदना
Wed, 04/20/2011 - 20:49 नवीन
हृद्य!! मला ही रचना अतिशय आवडली गणेशा!
  • Log in or register to post comments

कधी कधी आपण काळजाचा ठाव घेता

आत्मशून्य
गुरुवार, 04/21/2011 - 01:30 नवीन
कधी कधी आपण काळजाचा ठाव घेता राव.
  • Log in or register to post comments

मस्त कविता रे भावा.....!!!

प्यारे१
गुरुवार, 04/21/2011 - 09:45 नवीन
मस्त कविता रे भावा.....!!!
  • Log in or register to post comments

अपेक्षा

रामदास
गुरुवार, 04/21/2011 - 09:59 नवीन
वाढवणार्‍या कविता. माझा लिहीण्याचा मोठा अधीकार नाही पण थोडे फिनीशींग टचेस हवेसे वाटतात. (शिंपी सदरा शिवल्यावर बारीक सारीक धागे उडवतो तसे काहीसे.)
  • Log in or register to post comments

@ रामदास जी .. धन्यवाद ...

गणेशा
गुरुवार, 04/21/2011 - 12:47 नवीन
@ रामदास जी .. धन्यवाद ... फिनिशिंग टच हवेत हे अगदी बरोबर आहे.. पण शक्यतो मी ते ट्राय करत नाहि मुळ भावनांच्या खरे पणात त्यामुळे एक कृतीमता येत राहते माझ्याकडुन .. आपसुकच व्रुत्त्..लय..एकदंध कविता मला ही आवडते पण इतकी छान लिहिता येत नाही .. पण कधी कधी धडक कविता लिहिण्यातील आनंद खुप असतो त्यामुळॅ ही सहज पटकन आलेली कविता ... सर्व वाचकांचे मनापासुन आभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

नको येवुस ....

ajay wankhede
Mon, 04/25/2011 - 23:46 नवीन
........कवी ना बन जाऊ तेरे प्यार मे ये कविता . काव्य रस मनाला भिडला राव ... फिनिशिग नको च ..
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा