नको येवुस कविते( ३)
काय सांगतील पोरी
या आसवांच्या ओळी
दु:खाच्या खाणीत
तव स्वप्नांची होळी
नको येवुस माहेराला
अवकळा सारी
क्षीण आहे भाव अन
जीव झाला भारी
सुख गेली दावणीला
शब्दही फितुर झाली
झोपडीच्या झरोक्यातुन
रात्र टिपुस ओली
उजाडलं रान सारं
तिथ आठवांची धुळ
माखलेल मन आज
जनु पारंब्याचा पिळ
नाही काही इथं
सार सार संपल
तुझ्या पिर्तीची ओढ
बस्स हीच जीवन वेल
---- शब्दमेघ (२० एप्रिल २०११)
२. नको बोलु बाबा काही :- http://www.misalpav.com/node/17097
१. हरवली पोर माझी कविता नावाची :- http://www.misalpav.com/node/17082
व्वाह...
छान......!
मस्त लिहिलय गनेशा जि
गणेशा - उजाडलं रान सारं तिथ
छान आहे गणेशा! थोरामोठ्याच्या
मस्तच गणेशा. पण हा विषय कसा
प्रथमता सर्वांचे मनपुर्वक
जबराच. लिहा-लिहा , मला खात्री
छान!
हृद्य!! मला ही रचना अतिशय
कधी कधी आपण काळजाचा ठाव घेता
मस्त कविता रे भावा.....!!!
अपेक्षा
@ रामदास जी .. धन्यवाद ...
नको येवुस ....