✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

महालक्ष्मी च्या मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेशबंदी

अ
अजातशत्रु यांनी
Fri, 04/15/2011 - 20:57  ·  लेख
लेख
मानवमुक्तीचा लढा अधिक गतिमान करणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच कोल्हापुरातील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरात स्त्रीमुक्तीच्या लढय़ाचे पहिले पाऊल पडले. वस्तुत: याचे रनशिन्ग म.न,से. आमदार श्री.राम कदम यानी फुन्कले होते, पण इथेही भा.ज .पा. ने राजकरण करत भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा नीता केळकर यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यांनी सत्याग्रह करून देवीच्या पहिल्या गाभाऱ्यात प्रवेश केला कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेशबंदी हि गेली अनेक वर्षे चालु आहे, अपवाद फक्त राज घराण्यातिल/ आणि Celebrity स्त्रिया मुळात मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेशबंदी का? याचे समाधानकारक उत्तर तेथिल ब्राम्हण पुजारि का देउ शकत नाहित.... तथापि अलीकडच्या काळात हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आणि आज बुधवारी तर महिलांनी आंदोलन करीत सत्याग्रहाने एक नवे पाऊल पुढे टाकले.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
30923 वाचन

💬 प्रतिसाद (120)

प्रतिक्रिया

अरेरे!

प्रियाली
Fri, 04/15/2011 - 23:55 नवीन
असे नाही मनात आले माझ्या. खाली पडले असे म्हटल्यावर लक्षात यायला हवे होते पण तसे वाटले नाही. असो. बायकांना त्यांच्या मर्जीनुसार कुठेही जाण्यास प्रत्यवाय नसावा. बार असो किंवा मंदिर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांजसखी

हेही बघा

हुप्प्या
Sat, 04/16/2011 - 01:17 नवीन
मदिना आणि मक्का ह्या संपूर्ण शहरांत, मशिदीत, गाभार्‍यात वगैरे नाही गैर मुस्लिमांना प्रवेश नाही. निदान गेली १०० वर्‍षे तरी ही परंपरा चालू आहे. सौदी सरकारचे हे अधिकृत, सरकारी धोरण आहे. खात्री नाही पण हा नियम तोडणार्‍याला मृत्युदंड होऊ शकतो. ह्या भेदभावाबद्दलही असाच निषेध व्यक्त होईल का? हा बोर्ड बघा http://3.bp.blogspot.com/_b1Z4ZCpAGag/SUgpBQqPjSI/AAAAAAAAAPI/rgLMYmyhGp0/s1600-h/Muslims_Only_Mecca_Road_Sign.jpg आपल्या परंपरांवर टीका करायचा सर्वांना अधिकार आहेच. पण उर्वरित जगात अशा प्रकारचे काही होते आहे का हे ही माहित असावे म्हणून हा प्रपंच. आणि शिवाय हा माझा आवडता विषय!
  • Log in or register to post comments

भेदभाव वाईटच

राजेश घासकडवी
Sat, 04/16/2011 - 01:56 नवीन
असला भेदभाव वाईटच. दयाळू, सर्वशक्तिमान ईश्वराच्या नावाने केला तर तो आणखीनच वाईट. मग तो कुठच्याही का धर्मात होईना. व्यवहारात निव्वळ अंगी असलेल्या कौशल्यासाठीच व त्या गरजेपोटीच भेदभाव असावा. (म्हणजे डॉक्टरकडे जायचं असेल तर गवंड्याकडे न गेल्याने भेदभाव होत नाही अशा अर्थाने) मुळात आपल्या परंपरा, त्यांच्या परंपरा असे ग्लोबल भेद करून धर्मच 'आपण व ते' अशी फूट पाडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

आपल्या परंपरांवर टीका करायचा

Nile
Sat, 04/16/2011 - 02:09 नवीन
आपल्या परंपरांवर टीका करायचा सर्वांना अधिकार आहेच.
आपल्या परंपरा?? जिथे आपल्याच आया बहिणींनी प्रवेश नाही त्या प्रथेला आपली प्रथा कसे म्हणवते बरे? मंदिर व्यवस्थापनाची एक मूर्ख अट इतकेच. (मक्का मदिनाच काय पण मंदिरातही फारशी जायची वेळ येत नाही. मक्का मदिनावाले तर सहस्त्र मूर्ख आहेत, एका उल्केसाठी एव्हढं. असो. पण त्याविषयी इथे शंखानाद करून काही फरक पडणार आहे का? ते योग्य ठिकाणी करूच. इथे सदर अटींमुळे इथल्या आणी संबंधित व्यक्तींच्या स्वातंत्र्यावर गदा आलेली असल्याने इथे मत व्यक्त करणे जास्त सयुक्तिक.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

त्याचे असे आहे...

पंगा
Sat, 04/16/2011 - 03:24 नवीन
आपल्या परंपरांवर टीका करायचा सर्वांना अधिकार आहेच. पण उर्वरित जगात अशा प्रकारचे काही होते आहे का हे ही माहित असावे म्हणून हा प्रपंच. आणि शिवाय हा माझा आवडता विषय!
त्याचे असे आहे, माझ्या उर्वरित आयुष्यात मी मक्केला किंवा मदिनेला सोडा, पण सौदी अरेबियालासुद्धा जाण्याची शक्यता नगण्य आहे. त्यामुळे तिथे काय चालते याच्याशी मला फारसे घेणेदेणे नाही. ज्याला जायचे आहे त्याने बघून घ्यावे. उलटपक्षी, उर्वरित आयुष्यात मी मंदिरात एकदा नव्हे तर अनेकदा जाण्याची शक्यता त्या मानाने खूपच अधिक आहे. त्यामुळे, प्रत्यक्ष संबंध येत असल्याने जास्त खटकते. (तितकाच त्रास होऊ लागला, तर जाणार नाही. पण तूर्तास कधीमधी जावेसे वाटूही शकते.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

हा दुटप्पीपणा आहे

हुप्प्या
गुरुवार, 04/21/2011 - 07:53 नवीन
काळ्यांविरुद्धचा भेदभाव हा भारतीय लोकांनाही निषेध करण्याजोगा वाटला होता. अगदी अधिकृत पातळीवर. भारतात काळ्या गोर्‍याचा भेदभाव नाही. तरी त्यांना तसे वाटले. एखाद्या उच्चवर्णियाने असे म्हटले की मी उच्चवर्णीय आहे. मी ह्या जन्मात हरिजन बनणार नाही तस्मात हरिजनांविरुद्ध होत असलेल्या भेदभावाविषयी मला काही देणे घेणे नाही. तर त्याला नाक मुरडले जाईल. पण इथे मात्र हात झटकून मोकळे होण्याची वृत्ती जास्त आढळते हे का? मुस्लिमांच्या रोषाला घाबरून का पुरोगामीत्वाच्या साच्यात हे बसत नाही म्हणून? हेही निषेधनीय आणि तेही निषेधनीयच असे म्हणायला माझ्या मते हरकत नसावी. देवाधर्माविषयी काडीचीही आत्मीयता नसताना वादासाठी तशी ती असण्याचा आभास निर्माण करायची आवश्यकता नाही. व्यक्तीशः मी ना मक्केला जाणार आहे ना कोल्हापूरच्या देवळात. मला अतोनात गर्दी असलेल्या देवळात जाण्यात काडीचाही रस नाही. पण मला दोन्ही जागी असणारे भेदभाव खटकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

भेदभाव वाईट याबद्दल दुमत नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 04/16/2011 - 09:36 नवीन
तुम्हाला खरोखरच मक्केला जाण्याची इच्छा असेल तर इस्लाम स्वीकारून तिथे जाण्याचा पर्याय तुलनेने सहजरित्या उपलब्ध आहे. पण महालक्ष्मीच्या गाभार्‍यात जाण्यासाठी एखाद्या मुलीने लिंगबदलाचं ऑपरेशन करून घ्यावं काय? मक्केची आणि महालक्ष्मीच्या गाभार्‍याची तुलना मला रास्त वाटत नाही. तरीही निषेध व्यक्त व्हावा अशी इच्छा असेल तर त्यावरही स्वतंत्र चर्चा होऊ शकते. धर्म बदलता येतो, नवनवीन भाषा शिकता येतात, नागरिकतत्व बदलता येतं, पण वंश आणि जात (स्त्री-पुरूष या अर्थानेही) कसे बदलणार? भेदभाव 'करणं' मूळातूनच नष्ट होणंच समाजासाठी उत्तम नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

हो का?

हुप्प्या
Sat, 04/16/2011 - 20:36 नवीन
मुस्लिम धर्म स्वीकारणे हे इतके सरळ नाही. कायदेशीररित्या तो एक वन वे स्ट्रीट आहे. एकदा मुस्लिम बनलेला मनुष्य पुन्हा धर्म बदलता झाला तर त्याला मृत्युदंड आहे. जर आपल्याला मक्केत प्रवेश मिळवाण्याकरता इस्लाम स्वीकारणे हा सोपा मार्ग वाटतो तर मग खोट्या मिशा लावून, तात्पुरते वेषांतर करून पुरुष असल्याचा आभास करुन कोल्हापूरच्या देवळात जाणेही अशकय नाही. देवावरील भक्तीपोटी इतके वेषांतर म्हणजे काहीच नाही नाही का? देवळात येणार्‍यांची "कसून" तपासणी करुन तो पुरुष आहे ह्याची खातरजमा केली जात नाही. मुसलमानांनी केलेला भेदभाव तितकासा बोचत नाही पण हिंदूंचा मात्र असह्य होतो असे मानणे हे पुरोगामीत्वाचे निदर्शक आहे का? आणि हो, ही बंदी आता उठवलेली आहे. अशाच प्रकारे मक्का मदिनेतील बिगरमुस्लिमांची प्रवेशबन्दी उठेल असे आपणास वाटते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

मुस्लिम धर्म स्वीकारणे हे

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 04/16/2011 - 21:08 नवीन
मुस्लिम धर्म स्वीकारणे हे इतके सरळ नाही.
लिंगबदल करण्यापेक्षा सोपं असावं. ("असावं" अशासाठी लिहीलं की दोन्ही गोष्टींचा मला काडीमात्र अनुभव नाही.)
कायदेशीररित्या तो एक वन वे स्ट्रीट आहे.
त्याचा या चर्चेशी काय संबंध?
... पुरुष असल्याचा आभास करुन कोल्हापूरच्या देवळात जाणेही अशकय नाही
ही फसवणूक आहे आणि त्याला माझा विरोध आहे. अवांतर माहिती अशी की सर रिचर्ड बर्टन नामक एक हरहुन्नरी पण बिगरइस्लामिक मनुष्य मक्केत जाऊन आला आहे. देवावरच्या भक्तीचा इथे काहीही संबंध नाही. इथे मानवाकडून होणार्‍या भेदभावावर चर्चा सुरू आहे.
मुसलमानांनी केलेला भेदभाव तितकासा बोचत नाही पण हिंदूंचा मात्र असह्य होतो असे मानणे हे पुरोगामीत्वाचे निदर्शक आहे का?
दुसर्‍याने केलं तर चालतं, मी केलं काय बिघडतं; अशा प्रकारचं विनोदी आणि तर्कहीन प्रत्युत्तर दुर्लक्षित करण्यात येत आहे. (ad populum?)
आणि हो, ही बंदी आता उठवलेली आहे. अशाच प्रकारे मक्का मदिनेतील बिगरमुस्लिमांची प्रवेशबन्दी उठेल असे आपणास वाटते का?
बंदी उठवली हे उत्तम झालं. त्यासाठी थोडा का होईना आटापिटा करावा लागला हे क्लेषकारक असलं तरीही सध्या विसरण्यास हरकत नाही. इतरांच्या देशात काय चालतं याची पर्वा मी का करावी? इराकमधे लोकशाही असावी म्हणून अमेरिकेचे सैनिक तिथे लढत आहेत त्यासारखंच झालं हे! मुळात धर्मच रद्दबादल केले की हा प्रश्न येणार नाही. (वर प्रतिसाद लिहीणार होते, पण काही बूचप्रेमी सदस्यांमुळे दुसर्‍या ठिकाणी रूमाल टाकावा लागणार आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

अवांतर (किंचित असहमती)

पंगा
Sun, 04/17/2011 - 00:34 नवीन
इराकमधे लोकशाही असावी म्हणून अमेरिकेचे सैनिक तिथे लढत आहेत त्यासारखंच झालं हे!
अधोरेखिताशी किंचित असहमत आहे. बाकी चालू द्या. (उर्वरिताशी बहुतांशी सहमत.)
मुळात धर्मच रद्दबादल केले की हा प्रश्न येणार नाही.
अगोदर इतरत्र म्हटल्याप्रमाणे, हम्म्म्म्.... :) शक्यतांनी अतिशय गरोदर असे विधान आहे हे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

मुळात धर्मच रद्दबादल केले की

अप्पा जोगळेकर
Sun, 04/17/2011 - 15:20 नवीन
मुळात धर्मच रद्दबादल केले की हा प्रश्न येणार नाही. कॄपया धर्म रद्दबातल करणे याचा अर्थ स्पष्ट करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

>>इतरांच्या देशात काय चालतं

हुप्प्या
गुरुवार, 04/21/2011 - 07:47 नवीन
>>इतरांच्या देशात काय चालतं याची पर्वा मी का करावी? धार्मिक स्थळी होणारा भेदभाव असा विषय आहे. मी नास्तिक आहे मला देवळात जायची गरज नाही. मग मला महालक्ष्मीच्या देवळातील प्रवेशबंदी का जाचावी? असे पुरोगामी म्हणू शकले असते पण नाही. तसेच मक्केच्या बाबतीत का नाही? मला मक्केला जाण्यात काडीचाही रस नाही परंतु हा भेदभाव चुकीचाच आहे असे म्हणायला नक्की काय अडचण आहे? मला मक्का मदीनेला जायचे नसले तरी एकीकडे इतर धर्माचे गोडवे गाणे. येशू, आब्राहम, डेव्हिड, मोझेस अशा लोकांना आदरणीय मानायचे ढोंग करायचे. आणि दुसरीकडे त्या धर्माच्या अनुयायांना बंदी घालायची हा दुटप्पीपणा हा देवीच्या देवळात स्त्रियांना बंदी घालण्याच्याच तोडीचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

मी नास्तिक आहे मला देवळात

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 04/21/2011 - 09:21 नवीन
मी नास्तिक आहे मला देवळात जायची गरज नाही. मग मला महालक्ष्मीच्या देवळातील प्रवेशबंदी का जाचावी? असे पुरोगामी म्हणू शकले असते पण नाही.
ज्या लोकांचा देवावर विश्वास आहे, त्यांना देवळात जायचं असतं, फक्त स्त्रिया आहेत म्हणून तिथे जाता येत नाही ही गोष्ट काही पुरोगामी लोकांना अन्याय्य वाटते. त्यात पुरोगामी लोकांच्या स्वतःच्या देव-धर्मविषयक विचारांचा काय संबंध? सौदीची गोष्टच वेगळी आहे, सौदी ही राजेशाही आहे, संपूर्ण देश ही राजाचीच खासगी मालमत्ता आहे. आणि खासगी मालमत्तेत कोणी काय करावं याबद्दल इतरांनी बोलणं हा थोडा ग्रे-एरिया वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

मी टीव्हीवर पाहिलेल्या चर्चेत

शाहरुख
Sat, 04/16/2011 - 09:50 नवीन
मी टीव्हीवर पाहिलेल्या चर्चेत सनातनचा माणूस याच मुद्द्यामागे लपायचा प्रयत्न करत होता..त्यावर कदम साहेब म्हणाले की जर मुस्लिम भगिनी आमच्यावर अन्याय होतोय म्हणत आल्या तर आम्ही मशिदवाल्यांनाही निवेदन देऊ. बॉल इज इन मुस्लिम भगिनी'ज कोर्ट !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

महर्षी कर्वे

हुप्प्या
Sat, 04/16/2011 - 20:39 नवीन
हाच न्याय लावायचा तर महर्षी कर्व्यांच्या कार्याविषयी काय म्हणाल? त्यांनी विधवांच्या उद्धाराकरता खूप कार्य केले. पण त्यांच्याकडे विधवा स्त्रिया "आमच्यावर अन्याय होतो आहे. काहीतरी करा" असे म्हणत आल्या होत्या का? कर्व्यांना त्यांची स्थिती दिसली आणि त्यावर काहीतरी करावे असे वाटले आणि त्यांनी त्यांचे कार्य केले. अन्याय झालेला गट/समाज तक्रार घेऊन यायची वाट बघितलीच पाहिजे असा काही नियम नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहरुख

संबंध काय?

राजेश घासकडवी
Sun, 04/17/2011 - 06:17 नवीन
हिंदू धर्मात चालू असलेल्या सुधारणांचं कौतुक करणाऱ्या धाग्यावर इतर धर्मांत त्या सुधारणा आहेत की नाहीत याचा संबंधच काय? आपल्या घरातला कचरा काढायला लावल्यावर एखाद्या पोराने 'मग, त्या शेजारच्या बंडूच्या घरात कचरा आहे त्याचं काय?' अशी पिरपीर करण्यासारखं आहे. अरे, आपलं घर स्वच्छ झालं आहे त्याचा आनंद माना. का एके काळी ते घाण होतं हे कबूल करायची लाज वाटते? खरंच, सगळेच धर्म नष्ट झाले तर मूर्ख परंपरांना काही आधार रहाणार नाही. मग राज्यघटनेने जी समानता बहाल केली आहे ती खऱ्या अर्थाने सर्वांना मिळू शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

आपल्या घरातला कचरा काढायला

अप्पा जोगळेकर
Sun, 04/17/2011 - 15:30 नवीन
आपल्या घरातला कचरा काढायला लावल्यावर एखाद्या पोराने 'मग, त्या शेजारच्या बंडूच्या घरात कचरा आहे त्याचं काय?' अशी पिरपीर करण्यासारखं आहे. यात पिर्पिर काय ? बंडू चु* आहे आणि मी नीटनेटका आहे असे ठसठशीतपणे म्हटले तर राग येण्याचं काय कारण आहे. अरे, आपलं घर स्वच्छ झालं आहे त्याचा आनंद माना. का एके काळी ते घाण होतं हे कबूल करायची लाज वाटते? काही जण घर आज स्वच्छ झालं आहे. जरुर असेल तर अधिक स्वच्छ करु असं म्हणतात. काही जण ते पूर्वी कसं घाणेरडं होतं याबाबत गळे काढत बसतात. तुम्ही दुसर्‍या कॅटेगरीतले आहात असे वाटते. खरंच, सगळेच धर्म नष्ट झाले तर मूर्ख परंपरांना काही आधार रहाणार नाही. तसं झालं तर कोणताच धर्म न मानणारा असा एक नविन धर्म जन्माला येईल आणि त्या धर्मातदेखील नविन अनिष्ट प्रथा निर्माण होतीलच. मूर्तिपूजेला कडाडून विरोध असणार्‍या गौतम बुद्धाचे असंख्य पुतळे आज जगभरात अनेक ठिकाणी भक्तिभावाने पूजले जात आहेत यावरुनच काय ते समजून चाला. शिवाय कोणताच धर्म न मानणार्‍या डॉ. आंबेडकरांचे नवबौद्ध अनुयायी किती पुरोगामी आहेत हे आपण पाहतोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

खरं तर देवीच्या देवळात

चंद्रू
Sat, 04/16/2011 - 02:22 नवीन
खरं तर देवीच्या देवळात पुरूषांनाच प्रवेशबंदी केली पायजे. दक्षीना बुडेल पण पन देवीच्या गाभार्‍यात असले घाण लोक बरोबर नाही वाटत. काय काय लपडी चालतात या देशात. आपला देश लय भारी.
  • Log in or register to post comments

अशी काही बंदी वगैरे आहे हेच

शिल्पा ब
Sat, 04/16/2011 - 04:08 नवीन
अशी काही बंदी वगैरे आहे हेच मला माहित नव्हतं. मी एकदाच गेलेय कोल्हापुरात, खास चपला घेण्यासाठी अन महालक्ष्मीच मंदिर बघण्यासाठी. मंदिरात खूप मोठी रंग होती अन कुणालाच आत जाऊ देत नव्हते. बाहेरूनच दर्शन घ्यावे लागत होते म्हणून मंडपातून मूर्ती दिसल्यावर बाहेरच्या दुकानात पेढे घेऊन घरी यायला निघालो. अशी बंदी म्हणजे मूर्खपणाच आहे. एका बातमीत वाचलंय कि इंदिराबाई, सिंधीयाबाई वगैरेना सुद्धा प्रवेश नाकारला होता. धार्मिक भावना कशाला दुखवा म्हणून त्या काही बोलल्या नाहीत. सनातनचा खुलासा हास्यास्पद. जाई कोल्हापुरीचा प्रतिसाद फारसा विचार न करता दिलेला वाटला आणि असाच विचार इतक्या काळ लोक (स्त्रिया) करत असतील त्यामुळेच हि बंदी वगैरे चालू राहिली. अर्थात या मोर्चेवाल्या बायासुद्धा गाभाऱ्यात गेल्या नाहीत असे एका बातमीत वाचले. खरं खोटं मोर्चेवाल्या, तो पुजारी अन ती देवीच जाणे. बाकी चर्चा नेहमीप्रमाणेच.
  • Log in or register to post comments

हा काही अपवाद नाही

नंदू
Sat, 04/16/2011 - 09:23 नवीन
महालक्ष्मीमंदीर हा काही अपवाद नाही. माझा ऊडुपीच्या कृष्णमंदीरातला अनुभव काही वेगळा नाही. आम्ही (बायको आणी मुलगी बरोबर होती)दर्शनघेऊन बाहेर आल्यावर ही म्हणाली की प्रसाद घेउनच जाऊ म्हणून आम्ही प्रसादाच्या रांगेत उभे राहीलो. तेंव्हा एक कळकट माणूस आला आणी मला तुझं गोत्र काय, जानवं दाखव वगैरे प्रश्न विचारु लागला. का तर म्हणे ही पहिली रांग फक्त ब्राम्हणांसाठी असते. त्यांची जेवणं झाल्यावर मग बाकीच्यांना! आम्ही तडक पाठ फिरवून परत हॉटेलवर गेलो. सांगायचा मुद्दा असा की अजुनही लिंगभेद / जातिभेद आहेच आणी नजिकच्या काळात देखील तो दूर होईल असं वाटंत नाही. वरीलपैकी काही प्रतिसादांवरून तरी असंच वाटतं.
  • Log in or register to post comments

<<पहिली रांग फक्त

शिल्पा ब
Sat, 04/16/2011 - 09:46 नवीन
<<पहिली रांग फक्त ब्राम्हणांसाठी असते. त्यांची जेवणं झाल्यावर मग बाकीच्यांना! हे अतीच होतंय...देवाच्या दारात जाणार्‍यांना अडवणारे हे कोण? पुजा वगैरेसाठी लोकं ठीक आहेत पण कोणी आत जायचं हे ठरवायचा अधिकार फक्त ज्यांना आत जायची इच्छा आहे किंवा नाही त्यांच्यापुरताच असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदू

सर्व मानवप्राण्यांना मग ते

इंटरनेटस्नेही
Sat, 04/16/2011 - 10:19 नवीन
सर्व मानवप्राण्यांना मग ते स्री असोत वा पुरुष, समान हक्क मिळालेच पाहिजेत. कोणताही धर्म या देशाच्या संविधानापेक्षा मोठा नाही, नसावा.
  • Log in or register to post comments

सर्व मानवप्राण्यांना मग ते

llपुण्याचे पेशवेll
Sat, 04/16/2011 - 13:08 नवीन
सर्व मानवप्राण्यांना मग ते स्री असोत वा पुरुष, समान हक्क मिळालेच पाहिजेत. कोणताही धर्म या देशाच्या संविधानापेक्षा मोठा नाही, नसावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही

समानता ही समानतेने सार्वत्रिक

प्यारे१
Sat, 04/16/2011 - 11:01 नवीन
समानता ही समानतेने सार्वत्रिक असावीच. स्त्री-पुरुष या भेदाहून अधिक गरीब-श्रीमंत हा भेद देवस्थानांवर प्रकर्षाने जाणवतो. याला कारण तेथील व्यवस्थापन आणि पुजारी यांचे अर्थकारण हेच असते. बाकी राजकारणी राजकारण करतात, तथाकथित समाजसेवक सेवेचा आव आणतात, पुरोगामीपणाचा आव आणणारे चर्चा घडवतात. देव गाभार्‍यात एकटाच राहतो आणि त्याचा खरा भक्त त्याचं शक्य असेल तेव्हा, मिळेल तसं दर्शन घेऊन मनात साठवतो आणि असेल तिथून भक्ति करत राहतो. उत्तमा सहजावस्था। मध्यमा ध्यानधारणा। तृतीया प्रतिमापूजा। तीर्थयात्रा अधमाधम॥ आणि मातीचा केला पशुपति। ..... अशी सुरुवात असणारा तुकाराम महाराजांचा अभंग ( पार्थिव मूर्तीची पूजा त्या त्या देवापर्यंत आणि माती मातीत मिसळून जाणे) लक्षात ठेवणे उत्तम. बाकी चर्चा चालू द्या.
  • Log in or register to post comments

मला तर

तिमा
Sat, 04/16/2011 - 11:42 नवीन
मला तर कुठल्याही देवळाच्या गाभार्‍यात वाकून आंत गेलं की अत्यंत घुसमटायला होतं, आणि कधी एकदा तिथून बाहेर पडतोय असं होतं. बहुतेक माझ्या डोक्यावर केसांच्या आत ६६६ लिहिलेला असणार!!!
  • Log in or register to post comments

वा वा छान गरीब श्रीमंत दरी,

llपुण्याचे पेशवेll
Sat, 04/16/2011 - 13:05 नवीन
वा वा छान गरीब श्रीमंत दरी, उच्चभ्रु नॉन उच्चभ्रु सर्व दर्‍या मिटल्या वाटतं. असो. चालला आहे तो मूर्खपणा आहे. भारतीय जनता पक्षाला करावयाचीच असतील तर अनेक कामे आहेत. पुन्हा असो.
  • Log in or register to post comments

खिक्क

आनंदयात्री
Tue, 04/19/2011 - 01:37 नवीन
खिक्क !! मी पण स्क्रोल करण्यात खुप वेळ घालवला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

एकंदर हा गंमतीशीर विषय आहे.

पक्का इडियट
Sat, 04/16/2011 - 13:09 नवीन
एकंदर हा गंमतीशीर विषय आहे. :) अनेकांच्या प्रतिक्रिया त्यांच्या त्यांच्या ख्यातीनुसारच. त्यात विशेष काही नाही. चालू द्या.
  • Log in or register to post comments

नवलच आहे

कुक
Sat, 04/16/2011 - 13:51 नवीन
मन्दिरात स्त्रिया ना बन्दी आहे हे मला माहीतच नवते मारुतिचा मन्दिरात वैगरे ठिक आहे पण देविच्या मन्दीरात स्त्रियाना बन्दी नवलच आहे
  • Log in or register to post comments

मग स्पष्टिकरण द्या.

अजातशत्रु
Sat, 04/16/2011 - 18:15 नवीन
<<<<<<<<देवीच्या पुजार्‍यांमध्ये फक्त ब्राम्हणच आहेत? नक्कीच नाहीत...प.रा. मग स्पष्टि करण द्या... आणि आमच्या "अज्ञानात" भर घाला कारण माझ्या महिती प्रमाणे हिन्दुस्थानातिल कोणत्याहि मंदीरातील देव/ देवीच्या पुजार्‍यांमध्ये फक्त ब्राम्हणच आहेत..... मि तरि अजुन बहुजन समाजातील ( मराठा,मागास वर्गीय,दलित) या पैकि कुणी (श्रीपूजक) असल्याचे ऐकीवात नाहि ! मग ह्या वरच्या भिकारचोट वाक्याची सदर लेखनात गरज होती ! आणि विषय हाच आहे आणि चर्चा यावरच घडवुन आणायची इच्छा आहे,
  • Log in or register to post comments

आणि आमच्या "अज्ञानात" भर

परिकथेतील राजकुमार
Sat, 04/16/2011 - 18:51 नवीन
आणि आमच्या "अज्ञानात" भर घाला कारण माझ्या महिती प्रमाणे हिन्दुस्थानातिल कोणत्याहि मंदीरातील देव/ देवीच्या पुजार्‍यांमध्ये फक्त ब्राम्हणच आहेत..... मि तरि अजुन बहुजन समाजातील ( मराठा,मागास वर्गीय,दलित) या पैकि कुणी (श्रीपूजक) असल्याचे ऐकीवात नाहि !
अभ्यास वाढवा येवढेच म्हणतो :)
आणि विषय हाच आहे आणि चर्चा यावरच घडवुन आणायची इच्छा आहे,
अहो मग देवीचा आडोसा कशाला घेता ? सरळ 'बामणांनी केलेले अन्याय' असा धागा काढा की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजातशत्रु

कुणी काही प्रश्न विचारले असता

पक्का इडियट
Sat, 04/16/2011 - 18:56 नवीन
कुणी काही प्रश्न विचारले असता त्याला अभ्यास वाढवा असे सांगणे हे चर्चेतून पळ काढणे आहे हे मी नमुद करतो. अशाप्रकारे समोरच्याचा उत्साहभंग (पक्षी चर्चेतून त्याला बाहेर जाण्यास सांगण्यासारखे वर्तन करणे) करणे आपल्यासारख्या जून्या जाणत्यांना (पक्षी अनेक विधायक /विघातक चर्चांमधे सक्रिय सहभाग नोंदवलेल्या) शोभा देत नाही याची मी नोंद करत करत आहे. >>>अहो मग देवीचा आडोसा कशाला घेता ? देवीच्या पदराआड लपून का आरोळी देता असा वाक्यप्रचार जास्त योग्य आणि धाग्यातील विषयाला अनुकुल असता असे माझे प्रामाणिक मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हा हा हा पर्या तुझी फेबु वरची

स्पा
Sat, 04/16/2011 - 19:03 नवीन
हा हा हा पर्या तुझी फेबु वरची लिंक आठवली (क्रिकेट सामन्यांची ) अमळ हसू आले.... साले हे लोक कशाचाही संबंध कशाशीही जोडू शकतात त्यामुळे वाद घालण्यात अर्थ नाही चिल मादी अर्रर्र माडी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

काळूबाईचे पुजारी कोण आहेत

llपुण्याचे पेशवेll
Sat, 04/16/2011 - 18:59 नवीन
काळूबाईचे पुजारी कोण आहेत बरं? गुरव , लिंगायत ब्राम्हण असतात का? बरं बरं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजातशत्रु

अरेच्या तुझ्या अफुच्या गोळ्या

गणपा
Sat, 04/16/2011 - 21:44 नवीन
अरेच्या तुझ्या अफुच्या गोळ्या संपल्या की काय रे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

आणखी काहि......हास्यास्पद

अजातशत्रु
Sat, 04/16/2011 - 18:52 नवीन
span style="background: #CCCCCC;">स्त्री-पुरुष या भेदाहून अधिक गरीब-श्रीमंत हा भेद देवस्थानांवर प्रकर्षाने जाणवतो. याला कारण तेथील व्यवस्थापन आणि पुजारी यांचे अर्थकारण हेच असते..प्यारे१ अगदि सहमत कारण मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेशबंदी हि गेली अनेक वर्षे चालु आहे, अपवाद फक्त राज घराण्यातिल/ आणि Celebrity स्त्रिया का हे इथे सांगायची गरज नाहि.. <<<,या विषयावरील याचिका न्यायालयात गेली दहा वर्षे प्रलंबित आहे योगप्रभु आपल्या माहिती साठी ती याचिका अ.नि.स. ने.केली आहे ती स्त्रियांना मंदिरात प्रवेशाबाबत,, मुळात मंदिरात प्रवेशाबाबत न्यायालयात जाणे म्हणजे हास्यास्पद आहे, हि तेथील पुजार्‍यांनी घेतलेली हट्टी भूमिकाच नाहिका?
  • Log in or register to post comments

हे फक्त एका देवळात झालं.

पैसा
Sat, 04/16/2011 - 21:32 नवीन
अजून कितीतरी देवळं अशी आहेत, की जिथे महिलांना प्रवेश मिळत नाही. काही देवळांत हरिजनांना प्रवेश मिळत नाही. अशा ठिकाणी "असं का?" म्हणून विचारलं असता, ही देवळं खाजगी ट्रस्टच्या मालकीची आहेत, आणि तिथे कोणाला प्रवेश द्यावा हे त्यांच्या अखत्यारीत आहे, असं उत्तर मिळालं. चर्चमध्ये हिंदूना सगळ्या भागांमधे प्रवेश नसतो. मुस्लिमांच्या मशिदीत महिलांना प्रवेश नसतो. (महिलांसाठी वेगळ्या मशिदी असतात असं समजलं.) दक्षिण भारतात अनेक देवळांमधे फक्त ठराविक प्रकारचे कपडे असतील, तरच देवळात प्रवेश मिळतो. सगळीकडेच माणूस म्हणून सगळ्यांना सारखी वागणूक मिळावी, नाही का? यासाठी जबरदस्ती, किंवा फक्त कायदे करून प्रश्न सुटणार नाही. समाज जागृती जेव्हा कधी होईल, तेव्हाच सगळ्या ठिकाणी सर्वांना समान वागणूक मिळेल. महालक्ष्मीच्या देवळातल्या पुजार्‍यांनी सुद्धा आडमुठी भूमिका घेतलेली नाही हे लक्षात घेतलं पाहिजे.
  • Log in or register to post comments

मंदीरात सगळ्यांना परवानगी

पुष्करिणी
Sat, 04/16/2011 - 22:15 नवीन
मंदीरात सगळ्यांना परवानगी आहे, गाभार्‍यात (सर्वसामान्य)स्रीयांना प्रवेश करायची परवानगी नाही. म्हण्जे सरसकट स्रीयांना परंपरेनुसारही बंदी नसावी असं वाटतं. गाभार्‍याला लागूनच एक हॉल आहे ( सर्वात पुढे ), त्या हॉलमधे पूजा आणि आरतीच्या वेळीस फक्त बायकांना प्रवेश असतो, यावेळी पुरूषांना तेथून बाहेर काढतात. आता हे फक्त सोयीसाठी करतात की अजुन काही कारण आहे ते माहित नाही. तत्वतः देवदर्शनासाठी कोणालाही मज्जाव असू नये असं माझं मत आहे, पण व्यक्तीशः कोणताही निर्णय मंजूर केला गेला तरी काहीच फरक पडणार नाही. नुकतच सरकारनं ही बंदी हटवण्याचं विधेयक मंजूर केलं ..याचनंतर अगदी रात्री उशीरा पाणावाटपासंबंधातले अधिकार मंत्रिमंडळानं स्वतःकडे घेतले, यानुसार शेतीसाठीचं राखीव पाणी उद्योगांना ( व्यापारी, लवासा, आदर्श इ.इ. ) पुरवता येइल..माझ्यामते अंबाबाईच्या देवळाच्या गाभार्‍यात स्रीयांना प्रवेश आणि पाणीवाटपाचे निर्णय करणारा अधिकार या २ विधेयकांचं टाइमिंग अत्यंत पद्धतशीरपणे प्लॅन करण्यात आलय. पाणीवाटपासंबंधातल विधेयक दूरगामी परिणामांच्या दृष्टीनं जास्त महत्वाचं आहे . अवांतर : पुजारी हे ब्राह्मणच असतात हा गैरसमज आहे.
  • Log in or register to post comments

तुझ्या प्रतिसादातल्या

यशोधरा
Sun, 04/17/2011 - 00:42 नवीन
तुझ्या प्रतिसादातल्या शेवटच्या पॅराशी सहमत पुष्की. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

महत्त्वाचा मुद्दा

आळश्यांचा राजा
Sun, 04/17/2011 - 08:52 नवीन
म.न,से. आमदार श्री.राम कदम आणि भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा नीता केळकर यांची भारतरत्न साठी शिफारस; गेलाबाजार "थोरांची ओळख" मध्ये दोन धडे वाढवण्याची शिफारस एकाही सदस्याने केलेली नाही यावरून त्यांचा अवांतर चर्चेकडेच कल असल्याचे दिसून येते. असो. सध्या "गप्प बसायचे ठरवले आहे" ची फॅशन आहे म्हणे! ;-)
  • Log in or register to post comments

सर्वोत्तम

सुधीर१३७
Sun, 04/17/2011 - 14:23 नवीन
सर्वोत्तम प्रतिसाद.......................... :wink: .......याबद्दल आपणांस "मिपारत्न" पुरस्कार देण्यात यावा , अशी सं. मं. ला जाहीर विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आळश्यांचा राजा

नीता केळकर यांची भारतरत्न

रेवती
Sun, 04/17/2011 - 19:59 नवीन
नीता केळकर यांची भारतरत्न साठी शिफारस हा हा हा कै पण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आळश्यांचा राजा

देवाच्या बाबतीत पावित्र्य राखवे ही विन.न्ती..

वारा
Sun, 04/17/2011 - 23:16 नवीन
सर्व मित्राना नम्र विन.न्ती की देवीला एकदा मनात आठवुन आपले म्हणणे सा.न्गावे, ज्यामुळे प्रतिसाद निर्मळ राहील व आमच्या सारख्या सामान्य लोका.ना त्रास व्हायचा नाही.
  • Log in or register to post comments

ब्राम्हण पुजारी

सविता००१
Mon, 04/18/2011 - 09:48 नवीन
@ अजात शत्रु : तुळजापूर येथील पुजारी (कदम), त्यान्ना भय्येही म्हणतात. हे ब्राम्हण आहेत का?
  • Log in or register to post comments

-१

ऋषिकेश
Mon, 04/18/2011 - 20:59 नवीन
कोणत्याही पुरातन मंदिरात स्त्रियांनाच नाही तर काही मोजके मेंटेनन्स करणार्‍या पुजार्‍यांना (आणि प्रसंगी वास्तुतज्ञांना) सोडून कोणालाही प्रवेश करण्यास बंदी असली पाहिजे. या सुंदर शिल्पांची होणारी झीज थांबवणे गरजेचे आहे. (अर्थात जर पुरुषांना प्रवेश असेल तिथे स्त्रियांना मज्जाव का? ते समजले नाही)
  • Log in or register to post comments

<काळूबाईचे पुजारी कोण आहेत

अजातशत्रु
Mon, 04/18/2011 - 22:12 नवीन
<काळूबाईचे पुजारी कोण आहेत बरं? गुरव , लिंगायत ब्राम्हण असतात का? बरं बरं. <@सविता : तुळजापूर येथील पुजारी (कदम), त्यान्ना भय्येही म्हणतात. हे ब्राम्हण आहेत का? मुळ प्रश्न बहुजन समाजातील ( मराठा,मागास वर्गीय,दलित) या पैकि कुणी (श्रीपूजक) असल्याचे ऐकीवात नाहि अनुत्तरीत बरं गुरव -५, लिंगायत-५ "हे पुजारी" असले तरी जर तिथे एक ब्राम्हण पुजारी असल्यास मुख्य पुजेचा मान हा ब्राम्हणांस असतो ना..( म्हणजे का हि का असेना ब्राम्हण श्रेष्टच) इथे एक नमुद करतो कि माझा आक्षेप हा ब्राम्हण जाती वर नसुन,ब्राम्हण्यांवर आहे. मुळात जेव्हा धार्मिक प्रथा असो मंदीरातील पुजा,धार्मिक संस्कार जेव्हा चर्चेत येतात तेव्हा तिथे ब्राम्हणांचे नाव उल्लेख येणे साहजीक आहे.त्याचे कारण सर्वाना माहित असावे, नसेल तर थोडक्यात सांगतो भारतिय संस्क्रुतित मनुस्म्रुति नावाचा मौलिक ग्रंथ मनु नावाच्या ब्राम्हणाने लिहुन अखंड भारतवर्षा वर फार "उपकार" केले आहेत.. त्यातुनच आपल्या भारतवर्षाला वर्ण व्यवस्था/ जातव्यवस्था/ स्त्रियांवरिल जाचक अटी त्यांना गुलामा प्रमाणे वागवणे या व अशा अनेक अनिष्ट प्रथा आणी धार्मिक गोष्टींचा "मौल्यवान सांस्कृतिक" ठेवा मिळाला आहे...:) अशा प्रथांचा त्यांनी कायमच अफूसारखा उपयोग करुन भोळ्या भाबड्या लोकांना विषमते च्या गुलामगिरीत ठेविले आहे, बिचारे अज्ञानी लोक हे <<<<< काहिहि असेल तरि धार्मिक बाबतीत उगाच अकारण हस्तक्षेप करण्यात काहिहि तथ्य नाही. उगाच नको तिथे पुरोगामी पणाचं अवसान कशाला आणायचं? असं म्हणून त्यास ते आपलं धर्म कार्यच आहे, हिंदु धर्मात सांगीतलं आहे मग कशाला त्याचि चिकित्सा करायची? असं मानुन त्यास बळी पडतात,( मला त्यांचि किव येते) एक लक्षात असुदे जेव्हा इथल्या मुळनिवासि बहुजनांवर/स्त्रियांवर अन्न्याय/ अत्त्याचार होत होते त्या काळी धर्मचिकित्सा करायला परवानगी न्हवती (आणखी एक महत्त्वाचे मनुस्म्रुति नावाचा मौलिक ग्रंथ कुणी बहुजनाने लिहिलेला नसुन मनु नावाच्या ब्राम्हणाने लिहिलेला आहे) हा खुलासा यासाठी कि काहि लोकांना 'ब्राह्मण पुजारी' हा उल्लेख खटकला आहे. काहि लोकांनी त्यांचे लगोलग वकिल पत्र घेउन इतर देवळात 'ब्राह्मण पुजारी' कसे नाहित हे पटवून देण्याचा प्रयत्न केला........ अहो पण हि व्यवस्था निर्माण केलि कुणी? यावर आपण कधी विचार करणार आहोत कि नाहि? आज हि २१ व्या शतकात #तुझं गोत्र काय, जानवं दाखव वगैरे प्रश्न विचारणं #पहिली रांग फक्त ब्राम्हणांसाठी असते. त्यांची जेवणं झाल्यावर मग बाकीच्यांना! # आणि कहर म्हणजे २ महिन्याचा कोवळा जीव...जर असल्या निच प्रथेमुळे देवा घरी गेला असेल तर त्या कोवळा जीवा चे गुन्हेगार कोन? आपली धर्म संस्क्रुति? तिचि (अंध) श्रधाळु आई? कि "तो" खुनी पुजारि? त्याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल होउन फाशी मिळावी हि माफक अपेक्षा.... पण यात हि ते महाशय निर्दोष सुटले असतिल, किंवा तिच्या पालकांना सांगण्यात आले असेल च कि तुमचं मुल हे प्रत्यक्ष देवि च्या चरणि म्रूत्यु पावल्या मुळे तिला साक्षात प्रत्यक्ष देविने तिच्या कडे बोलावले असेल किंवा ति डायरेक्ट स्वर्गात जाईल वगैरे,, बाकि उल्लेख खटकलेल्या पैकि कुणी यावर प्रतिसाद दिला नाहि..( आश्चर्यच नाहि का?) उगाच वाटलं......कि कुणाला वाटतय म्हणुन यासाठि त्यांचं अभिनंदन करावं..:? <<<स्त्रिया अपवित्र किंवा पुरुषांपेक्षा दुय्यम दर्जाच्या म्हणून त्यांना गाभार्‍यात प्रवेश देणारच नाही, अशी हट्टी भूमिका पुजार्‍यांनी घेतलेली नव्हती. ते एवढेच म्हणत होते, की अशी प्रथा अत्यंत जुनी आहे आणि आम्ही तिचे केवळ पालन करत आहोत... दूरचित्रवाणीवरील चर्चा मीही लक्षपूर्वक ऐकली..@ योगप्रभु योगप्रभु साहेब दूरचित्रवाणीवरील चर्चा तुम्हिही लक्षपूर्वक ऐकली तर तुम्हि इथे चुकिचि माहिती देत आहात श्री.राम कदम/ नीता केळकर यांनी पत्रकारांशी खालिल प्रमुख कारणे जी त्यांना मंदिर प्रशासना कडुन देण्यात आली आणी सर्व प्रमुख वर्तमान पत्रात छापुन हि आली आहे ती अशी १ठराविक काळात स्त्रियांनी जाने योग्य नसते ` #आता ठरावीक काळ म्हणजे काय? मासिक धर्म . ते अपिवित्र कसे? हे प्रजानानात महत्वाची भूमिका निभावते. तुमचे वंश वाढतात न पिद्यान पिड्या. ते एखाद्या स्त्रीच्या शरीरात नसेन तर तिला वांझ तुमीच ठरवताना ? मग ते अपवित्र कस? २.प्रथा अत्यंत जुनी आहे आणि आम्ही तिचे केवळ पालन करत आहोत... # मनुसमृतिप्रमाणे स्त्री कुठल्याही वर्णात जन्माला आली तरी ती शुद्रच असते, ह्या खूळ चाट समजुतिमुळे तिला प्रवेश निशिध होता. मग ते राज घराण्यातिल/ आणि Celebrity स्त्रिया यांना प्रवेश बंदि का केली नाही? का हा कायदा फक्त गरिब/सामान्य स्त्रियां साठि आहे? ३ देविच्या अंगावरिल दागिन्यांच्या भितीने # म्हणजे त्यांच्यावर अविश्वास दाखवून त्यांना indirectly त्यांना चोर ठरविण्या सारखे न्हवे काय?? ४.मुख्य गाभार्‍यातील तेज महिलांना सहन न होऊन त्यांना ओटीपोटीचे त्रास होतो # अशी एक हि केस नाहि...हास्यास्पद विधान $गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची तातडीने बैठक होऊन स्त्रियांना प्रवेश खुला आहे असे सांग ण्या त आले 'ब्राह्मण पुजार्‍यांनी' लगेच नव्या नियमाप्रमाणे अंमलबजावणी केली. #खोटं आहे........हा निर्णय येताच अंबाबाईचे सेवक (श्रीपूजक) पुजारि हे आत्म दहन करणार होते:) त्यामुळे शेकडो वर्षच्या खुळ्या समजुती आणि पद्दतीला विरोध केल्याबद्दल. मि इथे म.न,से. आमदार श्री.राम कदम सौ नीता केळकर ह्यांचे जाहिर अभिनंदन करतो, देवाच पवित्र म्हणजे नक्की काय हो? ते कसा मोजतात त्याच युनिट काय आहे? गुप्तरोग झालेला पुजारी चालतो, वेश्यगमन करणारा पुजारी सुधा चालतो (पंढरपुर केस) पण निसर्गाने जीला वंशवृद्दीच वरदान दिल आहे ती चालत नाही, आता तरी आपण मनुसमृतीच्या कालातून बाहेर पडायला हवं. मुली नुसत्या शिकून अमेरिकेत जात असतील पण अनिष्ट प्रथांपुढे गुडघे टेकत असतील तर काय उपयोग,बर्‍याच जणी आज अमेरिकेत जाऊन येतात पण पाळि च्या वेळी कोपर्‍यात बसून रहातात ते सुधा संस्कार ह्या गोंडस नावाखाली हा खरच अन्याय आहे, जर राजाराम मोहंराय नसते तर ह्याच संस्कार नावाखाली आज देखील सती जा असा म्हणणारे महाभाग सापडले असते. सावित्रीबाई फुले ह्यानी फक्त घरखर्च चालावा पैसे जामवेत म्हणून मुलीनी शिका असा म्हट्लं नव्हत. महिलांना प्रवेश बंदी हि हजारो वर्षांची परंपरा असून ती मोडू नये असे काहींचे म्हणणे आहे . पूर्वी देवीला स्पर्श करण्याचा अधिकार हि फक्त ब्राह्मण समाजातल्या पुरुषांना होता . १९२० साली तर मराठा समाजाला हि प्रवेश बंदी होती ती शाहु महाराजां मुळे खुलि झाली. आता हा नियम बदलला असून सर्व जातीच्या पुरुषांना सोवळे नेसून देवीला स्पर्श करता येतो.. मनुसमृती काय आहे? व ति काय सांगते त्यातिल काहि मजेशिर ( ब्राम्हणाला आरक्षण )असणारे नियम मनुस्मृति - अध्याय पहिला या जगामध्ये जेवढे म्हणून धन आहे ते जणु सर्व ब्राह्मणाचेच आहे. कारण, श्रेष्ठता व कुलीनता या दोन गुणांमुळे त्या सर्वास ब्राह्मण योग्य आहे. ॥१००॥ ब्राह्मण जे काही दुसर्‍यांचेही खातो ते तो वस्तुतः आपलेच खातो. जे वस्त्र दुसर्‍याकडून घेऊन नेसतो ते तो आपलेच नेसतो व जे एकाकडून घेऊन दुसर्‍यास देतो तेही आपलेच देतो आणि असा प्रकार असल्यामुळे केवल ब्राह्मणाच्या करुणेमुळेच इतर जन भोजनादि करतात. ॥१॥ त्या ब्राह्मणांच्या व इतर क्षत्रियादिकांच्या कर्माचे ज्ञान व्हावे म्हणून बुद्धिमान स्वायंभुव मनु हे शास्त्र रचिता झाला. ॥२॥ सहज शृंगार चेष्टेने मोहित करून पुरुषांस दूषित करणे हा स्त्रियांचा स्वभावच आहे. यास्तव ज्ञानी पुरुष स्त्रियांविषयी कधी बेसावध रहात नाहीत॥१३॥ माता, बहीण, व कन्या यांच्या बरोबरही एकांतात बसू नये. कारण इंद्रिय समुदाय अति बलाढ्य असून तो विद्वानासही परवश करून सोडित असतो. ॥१५॥ शेवटि.... प्रतिसादां बद्दल सर्वांचे अभार..........!!!
  • Log in or register to post comments

मनु ब्राह्मण नसून क्षत्रिय होता..

योगप्रभू
Tue, 04/19/2011 - 01:03 नवीन
मनु ब्राह्मण नसून क्षत्रिय होता. अजातशत्रु 'प्रतिसाद वाचताना खूप काही लिहावे वाटले. माझे नाव घेऊन तुम्ही लिहिलेल्याचे खंडनही करता आले असते. पण अचानक माझी नजर तुमच्या एका वाक्यावर पडली आणि मी एकदम स्तब्ध झालो. 'माझा विरोध ब्राह्मणांना नसून ब्राह्मण्याला आहे.' माफ करा. आपला संवाद होऊ शकत नाही. कारण मी सर्व जातींना त्यांच्या गुणदोषासकट स्वीकारतो आणि एकूणच समाजाचा विचार करताना 'चांगले ते चांगले, वाईट ते वाईट' (सगळ्यांच जातींबाबत) अशी माझी भूमिका आहे. मला भविष्याकडे जाण्याची इच्छा आहे आणि तुमचा मार्ग भूतकाळाकडे जाण्याचा आहे. असो. हा धागा काढून विचारप्रवृत्त केल्याबद्दल तुमचेही आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजातशत्रु

कसा काय?

प्रियाली
Tue, 04/19/2011 - 01:26 नवीन
मनु ब्राह्मण नसून क्षत्रिय होता.
इथे नेमक्या कोणत्या मनुविषयी चर्चा सुरू आहे? मनु ब्राह्मणच होता असे वाटते. कुठल्याही प्रकारचे ग्रंथ रचून/लिहून इतरांना एज्युकेट करताना क्षत्रियांनी इतर जातींना शिकवण देण्याची प्रथा आपल्याकडे नव्हती असे वाटते. चू. भू. द्या. घ्या. त्यासाठी क्षात्रधर्माचा त्याग करून ब्रह्मविद्येचा अवलंब केला जात असे. (उदा. विश्वामित्र) बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

इथे नेमक्या कोणत्या मनुविषयी

परिकथेतील राजकुमार
Tue, 04/19/2011 - 13:59 नवीन
इथे नेमक्या कोणत्या मनुविषयी चर्चा सुरू आहे? मनु ब्राह्मणच होता असे वाटते. कुठल्याही प्रकारचे ग्रंथ रचून/लिहून इतरांना एज्युकेट करताना क्षत्रियांनी इतर जातींना शिकवण देण्याची प्रथा आपल्याकडे नव्हती असे वाटते. चू. भू. द्या. घ्या. त्यासाठी क्षात्रधर्माचा त्याग करून ब्रह्मविद्येचा अवलंब केला जात असे.
इथे बहुदा मनु उर्फ सत्यव्रताबद्दल चर्चा चालु आहे असे वाटते. आणि जर त्याच्याबद्दल चर्चा चालु असेल तर प्रियालीतै जे म्हणते आहे ते चुक ठरते. कारण सत्यव्रत मनुपासून पुढे ज्यांचा जन्म झाला त्यांना 'मानव' म्हणले जाते व मानवांच्या जन्मानंतर पुढे त्यांच्यात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य अशा जाती जन्माला आल्या आणि त्या त्या संदर्भात नियम बनत गेले. त्यामुळे प्रियालीतै म्हणते तो नियम अथवा रुढी इथे लागु होत नाही. मनु हा क्षत्रियच होता. महाभारतात देखील त्याचा उल्लेख आहे. ह्या मनुच्या पत्नीचे नाव श्रद्धा किंवा शक्ती असे काहीसे होते. बादवे :- बुद्धाला बोधीवृक्षा खाली साक्षात्कार झाला आणि मला अजातशत्रुंच्या प्रतिक्रियेखाली ;) बाकी वेळ मिळाल्यास त्यांनी मनुस्मृतीसह एकुणच अठरा स्मृतींवर विस्ताराने लिहावे व आमच्या ज्ञानात भर घालावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

लॉजिक

प्रियाली
Tue, 04/19/2011 - 15:09 नवीन
आणि जर त्याच्याबद्दल चर्चा चालु असेल तर प्रियालीतै जे म्हणते आहे ते चुक ठरते. कारण सत्यव्रत मनुपासून पुढे ज्यांचा जन्म झाला त्यांना 'मानव' म्हणले जाते व मानवांच्या जन्मानंतर पुढे त्यांच्यात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य अशा जाती जन्माला आल्या आणि त्या त्या संदर्भात नियम बनत गेले. त्यामुळे प्रियालीतै म्हणते तो नियम अथवा रुढी इथे लागु होत नाही. मनु हा क्षत्रियच होता.
प्रियालीताई चूक असू दे रे पण चूक आहे म्हणून वरच्या वाक्यांचे लॉजिक विचारू शकते का? मानवांची निर्मिती ज्या बापापासून झाली आणि मानवाच्या निर्मितीनंतर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य अशा जाती जन्माला आल्या तर तो बाप क्षत्रिय कसा झाला? की लॉजिकच्या नावानेही माझी बोंब आहे? ;) महाभारतात "मनुरब्रवित, मनो:राजधर्मा, मनो: शास्त्रम" असा उल्लेख आहे. मनु क्षत्रिय होता असा नाही.
बाकी वेळ मिळाल्यास त्यांनी मनुस्मृतीसह एकुणच अठरा स्मृतींवर विस्ताराने लिहावे व आमच्या ज्ञानात भर घालावी.
आम्ही काय भर घालणार. आमच्या चुका दुरुस्त आधी करायला हव्यात. असो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा