Skip to main content

महालक्ष्मी च्या मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेशबंदी

लेखक अजातशत्रु यांनी शुक्रवार, 15/04/2011 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
मानवमुक्तीचा लढा अधिक गतिमान करणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच कोल्हापुरातील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरात स्त्रीमुक्तीच्या लढय़ाचे पहिले पाऊल पडले. वस्तुत: याचे रनशिन्ग म.न,से. आमदार श्री.राम कदम यानी फुन्कले होते, पण इथेही भा.ज .पा. ने राजकरण करत भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा नीता केळकर यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यांनी सत्याग्रह करून देवीच्या पहिल्या गाभाऱ्यात प्रवेश केला कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेशबंदी हि गेली अनेक वर्षे चालु आहे, अपवाद फक्त राज घराण्यातिल/ आणि Celebrity स्त्रिया मुळात मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेशबंदी का? याचे समाधानकारक उत्तर तेथिल ब्राम्हण पुजारि का देउ शकत नाहित.... तथापि अलीकडच्या काळात हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आणि आज बुधवारी तर महिलांनी आंदोलन करीत सत्याग्रहाने एक नवे पाऊल पुढे टाकले.

वाचने 31435
प्रतिक्रिया 120

प्रतिक्रिया

In reply to by नंदू

पहिली रांग फक्त ब्राम्हणांसाठी असते. त्यांची जेवणं झाल्यावर मग बाकीच्यांना! हे अतीच होतंय...देवाच्या दारात जाणार्‍यांना अडवणारे हे कोण? पुजा वगैरेसाठी लोकं ठीक आहेत पण कोणी आत जायचं हे ठरवायचा अधिकार फक्त ज्यांना आत जायची इच्छा आहे किंवा नाही त्यांच्यापुरताच असावा.

सर्व मानवप्राण्यांना मग ते स्री असोत वा पुरुष, समान हक्क मिळालेच पाहिजेत. कोणताही धर्म या देशाच्या संविधानापेक्षा मोठा नाही, नसावा.

In reply to by इंटरनेटस्नेही

सर्व मानवप्राण्यांना मग ते स्री असोत वा पुरुष, समान हक्क मिळालेच पाहिजेत. कोणताही धर्म या देशाच्या संविधानापेक्षा मोठा नाही, नसावा

समानता ही समानतेने सार्वत्रिक असावीच. स्त्री-पुरुष या भेदाहून अधिक गरीब-श्रीमंत हा भेद देवस्थानांवर प्रकर्षाने जाणवतो. याला कारण तेथील व्यवस्थापन आणि पुजारी यांचे अर्थकारण हेच असते. बाकी राजकारणी राजकारण करतात, तथाकथित समाजसेवक सेवेचा आव आणतात, पुरोगामीपणाचा आव आणणारे चर्चा घडवतात. देव गाभार्‍यात एकटाच राहतो आणि त्याचा खरा भक्त त्याचं शक्य असेल तेव्हा, मिळेल तसं दर्शन घेऊन मनात साठवतो आणि असेल तिथून भक्ति करत राहतो. उत्तमा सहजावस्था। मध्यमा ध्यानधारणा। तृतीया प्रतिमापूजा। तीर्थयात्रा अधमाधम॥ आणि मातीचा केला पशुपति। ..... अशी सुरुवात असणारा तुकाराम महाराजांचा अभंग ( पार्थिव मूर्तीची पूजा त्या त्या देवापर्यंत आणि माती मातीत मिसळून जाणे) लक्षात ठेवणे उत्तम. बाकी चर्चा चालू द्या.

मला तर कुठल्याही देवळाच्या गाभार्‍यात वाकून आंत गेलं की अत्यंत घुसमटायला होतं, आणि कधी एकदा तिथून बाहेर पडतोय असं होतं. बहुतेक माझ्या डोक्यावर केसांच्या आत ६६६ लिहिलेला असणार!!!

वा वा छान गरीब श्रीमंत दरी, उच्चभ्रु नॉन उच्चभ्रु सर्व दर्‍या मिटल्या वाटतं. असो. चालला आहे तो मूर्खपणा आहे. भारतीय जनता पक्षाला करावयाचीच असतील तर अनेक कामे आहेत. पुन्हा असो.

एकंदर हा गंमतीशीर विषय आहे. :) अनेकांच्या प्रतिक्रिया त्यांच्या त्यांच्या ख्यातीनुसारच. त्यात विशेष काही नाही. चालू द्या.

मन्दिरात स्त्रिया ना बन्दी आहे हे मला माहीतच नवते मारुतिचा मन्दिरात वैगरे ठिक आहे पण देविच्या मन्दीरात स्त्रियाना बन्दी नवलच आहे

देवीच्या पुजार्‍यांमध्ये फक्त ब्राम्हणच आहेत? नक्कीच नाहीत...प.रा. मग स्पष्टि करण द्या... आणि आमच्या "अज्ञानात" भर घाला कारण माझ्या महिती प्रमाणे हिन्दुस्थानातिल कोणत्याहि मंदीरातील देव/ देवीच्या पुजार्‍यांमध्ये फक्त ब्राम्हणच आहेत..... मि तरि अजुन बहुजन समाजातील ( मराठा,मागास वर्गीय,दलित) या पैकि कुणी (श्रीपूजक) असल्याचे ऐकीवात नाहि ! मग ह्या वरच्या भिकारचोट वाक्याची सदर लेखनात गरज होती ! आणि विषय हाच आहे आणि चर्चा यावरच घडवुन आणायची इच्छा आहे,

In reply to by अजातशत्रु

आणि आमच्या "अज्ञानात" भर घाला कारण माझ्या महिती प्रमाणे हिन्दुस्थानातिल कोणत्याहि मंदीरातील देव/ देवीच्या पुजार्‍यांमध्ये फक्त ब्राम्हणच आहेत..... मि तरि अजुन बहुजन समाजातील ( मराठा,मागास वर्गीय,दलित) या पैकि कुणी (श्रीपूजक) असल्याचे ऐकीवात नाहि !
अभ्यास वाढवा येवढेच म्हणतो :)
आणि विषय हाच आहे आणि चर्चा यावरच घडवुन आणायची इच्छा आहे,
अहो मग देवीचा आडोसा कशाला घेता ? सरळ 'बामणांनी केलेले अन्याय' असा धागा काढा की.

In reply to by परिकथेतील राजकुमार

कुणी काही प्रश्न विचारले असता त्याला अभ्यास वाढवा असे सांगणे हे चर्चेतून पळ काढणे आहे हे मी नमुद करतो. अशाप्रकारे समोरच्याचा उत्साहभंग (पक्षी चर्चेतून त्याला बाहेर जाण्यास सांगण्यासारखे वर्तन करणे) करणे आपल्यासारख्या जून्या जाणत्यांना (पक्षी अनेक विधायक /विघातक चर्चांमधे सक्रिय सहभाग नोंदवलेल्या) शोभा देत नाही याची मी नोंद करत करत आहे. >>>अहो मग देवीचा आडोसा कशाला घेता ? देवीच्या पदराआड लपून का आरोळी देता असा वाक्यप्रचार जास्त योग्य आणि धाग्यातील विषयाला अनुकुल असता असे माझे प्रामाणिक मत आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

हा हा हा पर्या तुझी फेबु वरची लिंक आठवली (क्रिकेट सामन्यांची ) अमळ हसू आले.... साले हे लोक कशाचाही संबंध कशाशीही जोडू शकतात त्यामुळे वाद घालण्यात अर्थ नाही चिल मादी अर्रर्र माडी

span style="background: #CCCCCC;">स्त्री-पुरुष या भेदाहून अधिक गरीब-श्रीमंत हा भेद देवस्थानांवर प्रकर्षाने जाणवतो. याला कारण तेथील व्यवस्थापन आणि पुजारी यांचे अर्थकारण हेच असते..प्यारे१ अगदि सहमत कारण मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेशबंदी हि गेली अनेक वर्षे चालु आहे, अपवाद फक्त राज घराण्यातिल/ आणि Celebrity स्त्रिया का हे इथे सांगायची गरज नाहि.. ,या विषयावरील याचिका न्यायालयात गेली दहा वर्षे प्रलंबित आहे योगप्रभु आपल्या माहिती साठी ती याचिका अ.नि.स. ने.केली आहे ती स्त्रियांना मंदिरात प्रवेशाबाबत,, मुळात मंदिरात प्रवेशाबाबत न्यायालयात जाणे म्हणजे हास्यास्पद आहे, हि तेथील पुजार्‍यांनी घेतलेली हट्टी भूमिकाच नाहिका?

अजून कितीतरी देवळं अशी आहेत, की जिथे महिलांना प्रवेश मिळत नाही. काही देवळांत हरिजनांना प्रवेश मिळत नाही. अशा ठिकाणी "असं का?" म्हणून विचारलं असता, ही देवळं खाजगी ट्रस्टच्या मालकीची आहेत, आणि तिथे कोणाला प्रवेश द्यावा हे त्यांच्या अखत्यारीत आहे, असं उत्तर मिळालं. चर्चमध्ये हिंदूना सगळ्या भागांमधे प्रवेश नसतो. मुस्लिमांच्या मशिदीत महिलांना प्रवेश नसतो. (महिलांसाठी वेगळ्या मशिदी असतात असं समजलं.) दक्षिण भारतात अनेक देवळांमधे फक्त ठराविक प्रकारचे कपडे असतील, तरच देवळात प्रवेश मिळतो. सगळीकडेच माणूस म्हणून सगळ्यांना सारखी वागणूक मिळावी, नाही का? यासाठी जबरदस्ती, किंवा फक्त कायदे करून प्रश्न सुटणार नाही. समाज जागृती जेव्हा कधी होईल, तेव्हाच सगळ्या ठिकाणी सर्वांना समान वागणूक मिळेल. महालक्ष्मीच्या देवळातल्या पुजार्‍यांनी सुद्धा आडमुठी भूमिका घेतलेली नाही हे लक्षात घेतलं पाहिजे.

मंदीरात सगळ्यांना परवानगी आहे, गाभार्‍यात (सर्वसामान्य)स्रीयांना प्रवेश करायची परवानगी नाही. म्हण्जे सरसकट स्रीयांना परंपरेनुसारही बंदी नसावी असं वाटतं. गाभार्‍याला लागूनच एक हॉल आहे ( सर्वात पुढे ), त्या हॉलमधे पूजा आणि आरतीच्या वेळीस फक्त बायकांना प्रवेश असतो, यावेळी पुरूषांना तेथून बाहेर काढतात. आता हे फक्त सोयीसाठी करतात की अजुन काही कारण आहे ते माहित नाही. तत्वतः देवदर्शनासाठी कोणालाही मज्जाव असू नये असं माझं मत आहे, पण व्यक्तीशः कोणताही निर्णय मंजूर केला गेला तरी काहीच फरक पडणार नाही. नुकतच सरकारनं ही बंदी हटवण्याचं विधेयक मंजूर केलं ..याचनंतर अगदी रात्री उशीरा पाणावाटपासंबंधातले अधिकार मंत्रिमंडळानं स्वतःकडे घेतले, यानुसार शेतीसाठीचं राखीव पाणी उद्योगांना ( व्यापारी, लवासा, आदर्श इ.इ. ) पुरवता येइल..माझ्यामते अंबाबाईच्या देवळाच्या गाभार्‍यात स्रीयांना प्रवेश आणि पाणीवाटपाचे निर्णय करणारा अधिकार या २ विधेयकांचं टाइमिंग अत्यंत पद्धतशीरपणे प्लॅन करण्यात आलय. पाणीवाटपासंबंधातल विधेयक दूरगामी परिणामांच्या दृष्टीनं जास्त महत्वाचं आहे . अवांतर : पुजारी हे ब्राह्मणच असतात हा गैरसमज आहे.

म.न,से. आमदार श्री.राम कदम आणि भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा नीता केळकर यांची भारतरत्न साठी शिफारस; गेलाबाजार "थोरांची ओळख" मध्ये दोन धडे वाढवण्याची शिफारस एकाही सदस्याने केलेली नाही यावरून त्यांचा अवांतर चर्चेकडेच कल असल्याचे दिसून येते. असो. सध्या "गप्प बसायचे ठरवले आहे" ची फॅशन आहे म्हणे! ;-)

In reply to by आळश्यांचा राजा

सर्वोत्तम प्रतिसाद.......................... :wink: .......याबद्दल आपणांस "मिपारत्न" पुरस्कार देण्यात यावा , अशी सं. मं. ला जाहीर विनंती.

सर्व मित्राना नम्र विन.न्ती की देवीला एकदा मनात आठवुन आपले म्हणणे सा.न्गावे, ज्यामुळे प्रतिसाद निर्मळ राहील व आमच्या सारख्या सामान्य लोका.ना त्रास व्हायचा नाही.

@ अजात शत्रु : तुळजापूर येथील पुजारी (कदम), त्यान्ना भय्येही म्हणतात. हे ब्राम्हण आहेत का?

कोणत्याही पुरातन मंदिरात स्त्रियांनाच नाही तर काही मोजके मेंटेनन्स करणार्‍या पुजार्‍यांना (आणि प्रसंगी वास्तुतज्ञांना) सोडून कोणालाही प्रवेश करण्यास बंदी असली पाहिजे. या सुंदर शिल्पांची होणारी झीज थांबवणे गरजेचे आहे. (अर्थात जर पुरुषांना प्रवेश असेल तिथे स्त्रियांना मज्जाव का? ते समजले नाही)

काळूबाईचे पुजारी कोण आहेत बरं? गुरव , लिंगायत ब्राम्हण असतात का? बरं बरं. @सविता : तुळजापूर येथील पुजारी (कदम), त्यान्ना भय्येही म्हणतात. हे ब्राम्हण आहेत का? मुळ प्रश्न बहुजन समाजातील ( मराठा,मागास वर्गीय,दलित) या पैकि कुणी (श्रीपूजक) असल्याचे ऐकीवात नाहि अनुत्तरीत बरं गुरव -५, लिंगायत-५ "हे पुजारी" असले तरी जर तिथे एक ब्राम्हण पुजारी असल्यास मुख्य पुजेचा मान हा ब्राम्हणांस असतो ना..( म्हणजे का हि का असेना ब्राम्हण श्रेष्टच) इथे एक नमुद करतो कि माझा आक्षेप हा ब्राम्हण जाती वर नसुन,ब्राम्हण्यांवर आहे. मुळात जेव्हा धार्मिक प्रथा असो मंदीरातील पुजा,धार्मिक संस्कार जेव्हा चर्चेत येतात तेव्हा तिथे ब्राम्हणांचे नाव उल्लेख येणे साहजीक आहे.त्याचे कारण सर्वाना माहित असावे, नसेल तर थोडक्यात सांगतो भारतिय संस्क्रुतित मनुस्म्रुति नावाचा मौलिक ग्रंथ मनु नावाच्या ब्राम्हणाने लिहुन अखंड भारतवर्षा वर फार "उपकार" केले आहेत.. त्यातुनच आपल्या भारतवर्षाला वर्ण व्यवस्था/ जातव्यवस्था/ स्त्रियांवरिल जाचक अटी त्यांना गुलामा प्रमाणे वागवणे या व अशा अनेक अनिष्ट प्रथा आणी धार्मिक गोष्टींचा "मौल्यवान सांस्कृतिक" ठेवा मिळाला आहे...:) अशा प्रथांचा त्यांनी कायमच अफूसारखा उपयोग करुन भोळ्या भाबड्या लोकांना विषमते च्या गुलामगिरीत ठेविले आहे, बिचारे अज्ञानी लोक हे काहिहि असेल तरि धार्मिक बाबतीत उगाच अकारण हस्तक्षेप करण्यात काहिहि तथ्य नाही. उगाच नको तिथे पुरोगामी पणाचं अवसान कशाला आणायचं? असं म्हणून त्यास ते आपलं धर्म कार्यच आहे, हिंदु धर्मात सांगीतलं आहे मग कशाला त्याचि चिकित्सा करायची? असं मानुन त्यास बळी पडतात,( मला त्यांचि किव येते) एक लक्षात असुदे जेव्हा इथल्या मुळनिवासि बहुजनांवर/स्त्रियांवर अन्न्याय/ अत्त्याचार होत होते त्या काळी धर्मचिकित्सा करायला परवानगी न्हवती (आणखी एक महत्त्वाचे मनुस्म्रुति नावाचा मौलिक ग्रंथ कुणी बहुजनाने लिहिलेला नसुन मनु नावाच्या ब्राम्हणाने लिहिलेला आहे) हा खुलासा यासाठी कि काहि लोकांना 'ब्राह्मण पुजारी' हा उल्लेख खटकला आहे. काहि लोकांनी त्यांचे लगोलग वकिल पत्र घेउन इतर देवळात 'ब्राह्मण पुजारी' कसे नाहित हे पटवून देण्याचा प्रयत्न केला........ अहो पण हि व्यवस्था निर्माण केलि कुणी? यावर आपण कधी विचार करणार आहोत कि नाहि? आज हि २१ व्या शतकात #तुझं गोत्र काय, जानवं दाखव वगैरे प्रश्न विचारणं #पहिली रांग फक्त ब्राम्हणांसाठी असते. त्यांची जेवणं झाल्यावर मग बाकीच्यांना! # आणि कहर म्हणजे २ महिन्याचा कोवळा जीव...जर असल्या निच प्रथेमुळे देवा घरी गेला असेल तर त्या कोवळा जीवा चे गुन्हेगार कोन? आपली धर्म संस्क्रुति? तिचि (अंध) श्रधाळु आई? कि "तो" खुनी पुजारि? त्याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल होउन फाशी मिळावी हि माफक अपेक्षा.... पण यात हि ते महाशय निर्दोष सुटले असतिल, किंवा तिच्या पालकांना सांगण्यात आले असेल च कि तुमचं मुल हे प्रत्यक्ष देवि च्या चरणि म्रूत्यु पावल्या मुळे तिला साक्षात प्रत्यक्ष देविने तिच्या कडे बोलावले असेल किंवा ति डायरेक्ट स्वर्गात जाईल वगैरे,, बाकि उल्लेख खटकलेल्या पैकि कुणी यावर प्रतिसाद दिला नाहि..( आश्चर्यच नाहि का?) उगाच वाटलं......कि कुणाला वाटतय म्हणुन यासाठि त्यांचं अभिनंदन करावं..:? स्त्रिया अपवित्र किंवा पुरुषांपेक्षा दुय्यम दर्जाच्या म्हणून त्यांना गाभार्‍यात प्रवेश देणारच नाही, अशी हट्टी भूमिका पुजार्‍यांनी घेतलेली नव्हती. ते एवढेच म्हणत होते, की अशी प्रथा अत्यंत जुनी आहे आणि आम्ही तिचे केवळ पालन करत आहोत... दूरचित्रवाणीवरील चर्चा मीही लक्षपूर्वक ऐकली..@ योगप्रभु योगप्रभु साहेब दूरचित्रवाणीवरील चर्चा तुम्हिही लक्षपूर्वक ऐकली तर तुम्हि इथे चुकिचि माहिती देत आहात श्री.राम कदम/ नीता केळकर यांनी पत्रकारांशी खालिल प्रमुख कारणे जी त्यांना मंदिर प्रशासना कडुन देण्यात आली आणी सर्व प्रमुख वर्तमान पत्रात छापुन हि आली आहे ती अशी १ठराविक काळात स्त्रियांनी जाने योग्य नसते ` #आता ठरावीक काळ म्हणजे काय? मासिक धर्म . ते अपिवित्र कसे? हे प्रजानानात महत्वाची भूमिका निभावते. तुमचे वंश वाढतात न पिद्यान पिड्या. ते एखाद्या स्त्रीच्या शरीरात नसेन तर तिला वांझ तुमीच ठरवताना ? मग ते अपवित्र कस? २.प्रथा अत्यंत जुनी आहे आणि आम्ही तिचे केवळ पालन करत आहोत... # मनुसमृतिप्रमाणे स्त्री कुठल्याही वर्णात जन्माला आली तरी ती शुद्रच असते, ह्या खूळ चाट समजुतिमुळे तिला प्रवेश निशिध होता. मग ते राज घराण्यातिल/ आणि Celebrity स्त्रिया यांना प्रवेश बंदि का केली नाही? का हा कायदा फक्त गरिब/सामान्य स्त्रियां साठि आहे? ३ देविच्या अंगावरिल दागिन्यांच्या भितीने # म्हणजे त्यांच्यावर अविश्वास दाखवून त्यांना indirectly त्यांना चोर ठरविण्या सारखे न्हवे काय?? ४.मुख्य गाभार्‍यातील तेज महिलांना सहन न होऊन त्यांना ओटीपोटीचे त्रास होतो # अशी एक हि केस नाहि...हास्यास्पद विधान $गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची तातडीने बैठक होऊन स्त्रियांना प्रवेश खुला आहे असे सांग ण्या त आले 'ब्राह्मण पुजार्‍यांनी' लगेच नव्या नियमाप्रमाणे अंमलबजावणी केली. #खोटं आहे........हा निर्णय येताच अंबाबाईचे सेवक (श्रीपूजक) पुजारि हे आत्म दहन करणार होते:) त्यामुळे शेकडो वर्षच्या खुळ्या समजुती आणि पद्दतीला विरोध केल्याबद्दल. मि इथे म.न,से. आमदार श्री.राम कदम सौ नीता केळकर ह्यांचे जाहिर अभिनंदन करतो, देवाच पवित्र म्हणजे नक्की काय हो? ते कसा मोजतात त्याच युनिट काय आहे? गुप्तरोग झालेला पुजारी चालतो, वेश्यगमन करणारा पुजारी सुधा चालतो (पंढरपुर केस) पण निसर्गाने जीला वंशवृद्दीच वरदान दिल आहे ती चालत नाही, आता तरी आपण मनुसमृतीच्या कालातून बाहेर पडायला हवं. मुली नुसत्या शिकून अमेरिकेत जात असतील पण अनिष्ट प्रथांपुढे गुडघे टेकत असतील तर काय उपयोग,बर्‍याच जणी आज अमेरिकेत जाऊन येतात पण पाळि च्या वेळी कोपर्‍यात बसून रहातात ते सुधा संस्कार ह्या गोंडस नावाखाली हा खरच अन्याय आहे, जर राजाराम मोहंराय नसते तर ह्याच संस्कार नावाखाली आज देखील सती जा असा म्हणणारे महाभाग सापडले असते. सावित्रीबाई फुले ह्यानी फक्त घरखर्च चालावा पैसे जामवेत म्हणून मुलीनी शिका असा म्हट्लं नव्हत. महिलांना प्रवेश बंदी हि हजारो वर्षांची परंपरा असून ती मोडू नये असे काहींचे म्हणणे आहे . पूर्वी देवीला स्पर्श करण्याचा अधिकार हि फक्त ब्राह्मण समाजातल्या पुरुषांना होता . १९२० साली तर मराठा समाजाला हि प्रवेश बंदी होती ती शाहु महाराजां मुळे खुलि झाली. आता हा नियम बदलला असून सर्व जातीच्या पुरुषांना सोवळे नेसून देवीला स्पर्श करता येतो.. मनुसमृती काय आहे? व ति काय सांगते त्यातिल काहि मजेशिर ( ब्राम्हणाला आरक्षण )असणारे नियम मनुस्मृति - अध्याय पहिला या जगामध्ये जेवढे म्हणून धन आहे ते जणु सर्व ब्राह्मणाचेच आहे. कारण, श्रेष्ठता व कुलीनता या दोन गुणांमुळे त्या सर्वास ब्राह्मण योग्य आहे. ॥१००॥ ब्राह्मण जे काही दुसर्‍यांचेही खातो ते तो वस्तुतः आपलेच खातो. जे वस्त्र दुसर्‍याकडून घेऊन नेसतो ते तो आपलेच नेसतो व जे एकाकडून घेऊन दुसर्‍यास देतो तेही आपलेच देतो आणि असा प्रकार असल्यामुळे केवल ब्राह्मणाच्या करुणेमुळेच इतर जन भोजनादि करतात. ॥१॥ त्या ब्राह्मणांच्या व इतर क्षत्रियादिकांच्या कर्माचे ज्ञान व्हावे म्हणून बुद्धिमान स्वायंभुव मनु हे शास्त्र रचिता झाला. ॥२॥ सहज शृंगार चेष्टेने मोहित करून पुरुषांस दूषित करणे हा स्त्रियांचा स्वभावच आहे. यास्तव ज्ञानी पुरुष स्त्रियांविषयी कधी बेसावध रहात नाहीत॥१३॥ माता, बहीण, व कन्या यांच्या बरोबरही एकांतात बसू नये. कारण इंद्रिय समुदाय अति बलाढ्य असून तो विद्वानासही परवश करून सोडित असतो. ॥१५॥ शेवटि.... प्रतिसादां बद्दल सर्वांचे अभार..........!!!

In reply to by अजातशत्रु

मनु ब्राह्मण नसून क्षत्रिय होता. अजातशत्रु 'प्रतिसाद वाचताना खूप काही लिहावे वाटले. माझे नाव घेऊन तुम्ही लिहिलेल्याचे खंडनही करता आले असते. पण अचानक माझी नजर तुमच्या एका वाक्यावर पडली आणि मी एकदम स्तब्ध झालो. 'माझा विरोध ब्राह्मणांना नसून ब्राह्मण्याला आहे.' माफ करा. आपला संवाद होऊ शकत नाही. कारण मी सर्व जातींना त्यांच्या गुणदोषासकट स्वीकारतो आणि एकूणच समाजाचा विचार करताना 'चांगले ते चांगले, वाईट ते वाईट' (सगळ्यांच जातींबाबत) अशी माझी भूमिका आहे. मला भविष्याकडे जाण्याची इच्छा आहे आणि तुमचा मार्ग भूतकाळाकडे जाण्याचा आहे. असो. हा धागा काढून विचारप्रवृत्त केल्याबद्दल तुमचेही आभार.

In reply to by योगप्रभू

मनु ब्राह्मण नसून क्षत्रिय होता.
इथे नेमक्या कोणत्या मनुविषयी चर्चा सुरू आहे? मनु ब्राह्मणच होता असे वाटते. कुठल्याही प्रकारचे ग्रंथ रचून/लिहून इतरांना एज्युकेट करताना क्षत्रियांनी इतर जातींना शिकवण देण्याची प्रथा आपल्याकडे नव्हती असे वाटते. चू. भू. द्या. घ्या. त्यासाठी क्षात्रधर्माचा त्याग करून ब्रह्मविद्येचा अवलंब केला जात असे. (उदा. विश्वामित्र) बाकी चालू द्या.

In reply to by प्रियाली

इथे नेमक्या कोणत्या मनुविषयी चर्चा सुरू आहे? मनु ब्राह्मणच होता असे वाटते. कुठल्याही प्रकारचे ग्रंथ रचून/लिहून इतरांना एज्युकेट करताना क्षत्रियांनी इतर जातींना शिकवण देण्याची प्रथा आपल्याकडे नव्हती असे वाटते. चू. भू. द्या. घ्या. त्यासाठी क्षात्रधर्माचा त्याग करून ब्रह्मविद्येचा अवलंब केला जात असे.
इथे बहुदा मनु उर्फ सत्यव्रताबद्दल चर्चा चालु आहे असे वाटते. आणि जर त्याच्याबद्दल चर्चा चालु असेल तर प्रियालीतै जे म्हणते आहे ते चुक ठरते. कारण सत्यव्रत मनुपासून पुढे ज्यांचा जन्म झाला त्यांना 'मानव' म्हणले जाते व मानवांच्या जन्मानंतर पुढे त्यांच्यात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य अशा जाती जन्माला आल्या आणि त्या त्या संदर्भात नियम बनत गेले. त्यामुळे प्रियालीतै म्हणते तो नियम अथवा रुढी इथे लागु होत नाही. मनु हा क्षत्रियच होता. महाभारतात देखील त्याचा उल्लेख आहे. ह्या मनुच्या पत्नीचे नाव श्रद्धा किंवा शक्ती असे काहीसे होते. बादवे :- बुद्धाला बोधीवृक्षा खाली साक्षात्कार झाला आणि मला अजातशत्रुंच्या प्रतिक्रियेखाली ;) बाकी वेळ मिळाल्यास त्यांनी मनुस्मृतीसह एकुणच अठरा स्मृतींवर विस्ताराने लिहावे व आमच्या ज्ञानात भर घालावी.

In reply to by परिकथेतील राजकुमार

आणि जर त्याच्याबद्दल चर्चा चालु असेल तर प्रियालीतै जे म्हणते आहे ते चुक ठरते. कारण सत्यव्रत मनुपासून पुढे ज्यांचा जन्म झाला त्यांना 'मानव' म्हणले जाते व मानवांच्या जन्मानंतर पुढे त्यांच्यात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य अशा जाती जन्माला आल्या आणि त्या त्या संदर्भात नियम बनत गेले. त्यामुळे प्रियालीतै म्हणते तो नियम अथवा रुढी इथे लागु होत नाही. मनु हा क्षत्रियच होता.
प्रियालीताई चूक असू दे रे पण चूक आहे म्हणून वरच्या वाक्यांचे लॉजिक विचारू शकते का? मानवांची निर्मिती ज्या बापापासून झाली आणि मानवाच्या निर्मितीनंतर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य अशा जाती जन्माला आल्या तर तो बाप क्षत्रिय कसा झाला? की लॉजिकच्या नावानेही माझी बोंब आहे? ;) महाभारतात "मनुरब्रवित, मनो:राजधर्मा, मनो: शास्त्रम" असा उल्लेख आहे. मनु क्षत्रिय होता असा नाही.
बाकी वेळ मिळाल्यास त्यांनी मनुस्मृतीसह एकुणच अठरा स्मृतींवर विस्ताराने लिहावे व आमच्या ज्ञानात भर घालावी.
आम्ही काय भर घालणार. आमच्या चुका दुरुस्त आधी करायला हव्यात. असो. ;)

In reply to by प्रियाली

बाकीचे उत्तर सवडीने लिहितो ग. फक्त गैरसमज दूर करतो आधी :-
आम्ही काय भर घालणार. आमच्या चुका दुरुस्त आधी करायला हव्यात. असो
हे तुला नाही काही. अजातशत्रुनांना विनंती आहे. अभ्यासु माणुस तू आहेस का ते ? असा कसा गैरसमज करुन घेतलास बरे? ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

अभ्यासु माणुस तू आहेस का ते ?
श्री राजकुमार , तुम्हाला अभ्यासु बैमाणुस म्हणायचे आहे काय? :)

In reply to by टारझन

धन्यवाद. बैमाणुस शब्द आला असता तर अनावधानाने अजातशत्रुंचा अपमान झाला असता ;) म्हणुन माणुस ह्या शब्दावरुन निभावुन नेले.

In reply to by अजातशत्रु

'माझा विरोध ब्राह्मणांना नसून ब्राह्मण्याला आहे.' माझा विरोध मुर्खांना नसुन मुर्खपणाला आहे.

In reply to by अजातशत्रु

इथे एक नमुद करतो कि माझा आक्षेप हा ब्राम्हण जाती वर नसुन,ब्राम्हण्यांवर आहे. शब्दांचे खेळ कशाला करता ? एखाद्या विशिष्ट जातीवर राग असेल तर निदान तसे उघडपणे सांगण्याची धमक दाखवा. तुम्ही सशाच्या काळजाचे नाही ना, तर मग उगा भेदरटपणा नको. त्यातुनच आपल्या भारतवर्षाला वर्ण व्यवस्था/ जातव्यवस्था/ स्त्रियांवरिल जाचक अटी त्यांना गुलामा प्रमाणे वागवणे या व अशा अनेक अनिष्ट प्रथा आणी धार्मिक गोष्टींचा "मौल्यवान सांस्कृतिक" ठेवा मिळाला आहे... अशा प्रथांचा त्यांनी कायमच अफूसारखा उपयोग करुन भोळ्या भाबड्या लोकांना विषमते च्या गुलामगिरीत ठेविले आहे, ही माहिती अर्धवट, अपुरी आहे. कोणीतरी एक ग्रंथ लिहिला आणि हजारो वर्षे त्याचे परिणाम करोडो लोकांना भोगावे लागले इतकी ही गोष्ट साधी नाही. निवडणुकीत प्रचार करण्यासाठी ठीक आहे. एका ब्राम्हण लेखकाने हिंदू धर्म, वर्णव्यवस्था वगैरे वगैरे येथे वर्णव्यवस्थेचा अल्पसा परामर्श घेतला आहे. ते काही अंतिम सत्य नव्हे. पण निदान ते तुमच्यासारखे कोणत्याही जातीवर डूख धरुन लिहिलेले नाही. अहो पण हि व्यवस्था निर्माण केलि कुणी? यावर आपण कधी विचार करणार आहोत कि नाहि? कोणी निर्माण केली, कशी निर्माण झाली, कोणी कोणी फॉलो केली याचा जरुर विचार करा आणि थोडेसे वाचनही करा. कोणत्यातरी जातीचे नियमितपणे प्रसिद्ध होणारे मासिक किंवा पाक्षिक संदर्भासाठी वाचू नका.

छान चर्चा. कोणत्याही मंदिरात अथवा सार्वजनिक ठिकाणी स्त्री-पुरुष असा भेदभाव करुन कोणालाही प्रवेश नाकारु नये. बाकी, अशा भेदभाव करणार्‍या रुढी-परंपरा हळूहळू नष्ट होत आहेत ही चांगली गोष्ट. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉ. बिरुटे, मला प्रतिसादातून जे काही सांगायचे होते, तो अर्थ तुम्ही उत्तम जाणलात, याबद्दल धन्यवाद. खरे तर स्त्री समानतेचा हा लढा इथेच संपत नाही. नुसते महिलांना गाभार्‍यात दर्शन खुले करुन पुरेसे नाही. देवीच्या पुजारीवर्गात पौरोहित्य पारंगत महिलांना स्थान मिळेल त्यादिवशी खरा न्याय दिला, असे म्हणता येईल. सध्या मात्र सुधारणेच्या दिशेने जे पाऊल पुढे पडले आहे त्याचे स्वागत.

चातुर्वर्ण्य व्यवस्था निर्मिती करणारा आदीपुरुष मनु क्षत्रिय असेल तर त्याने चातुर्वर्ण निर्माण केले असे म्हणता येनार नाहि, कारण कुणितरि "क्षत्रिय" असण्यासाठी आधी ते चार वर्ण अस्तीत्वात हवे होते. शिवाय स्वतः मनुस्मृतिच सांगते कि विराट पुरुषाने मनुची निर्मिति केलीय आणी त्यात मनुने मरीची, भ्रूगु इ. महर्षीची निर्मिति केली, आता भ्रूगु वगैरे महर्षी हे ब्राह्मण असताना त्यांचा पिता असलेला मनु हा "क्षत्रिय" कसा काय होऊ शकतो बुवा??:?:~ आणखी एक साधं लॉजिक जर तुम्हि म्हणता तसे डोळे झाकुन जर मानले कि तो "क्षत्रियच" होता तर इतका उत्क्रुष्ट आणि मौलीक ग्रंथ लिहीणारा क्षत्रिय मनु हा उगी बामणांना श्रेष्ट दर्जा आणी खास अधिकार हक्क (आरक्षण), आणि सवलतींचि खैरात का करेल?:? त्याने ती फक्त क्षत्रियांनाच दिली असती नसति का?:) आणी चर्चा हि मग क्षत्रियांवर करावि लागली नसती का:? कुठल्याही प्रकारचे ग्रंथ रचून/लिहून इतरांना एज्युकेट करताना क्षत्रियांनी इतर जातींना शिकवण देण्याची प्रथा आपल्याकडे नव्हती यावर दुमत कुणाचे असण्याचे कारण नाहि, महाभारतात "मनुरब्रवित, मनो:राजधर्मा, मनो: शास्त्रम" असा उल्लेख आहे..... अपुरी माहिती..... असा उल्लेख जरुर आहे पण.... तो मनु दुसरा आहे.... हि वंशावळ पहा १- मरिचि..... २- क्श्यप......= दाक्षयणी ( दक्ष प्रजापतीची एक कन्या) ३- अदित्य आणि विवस्वत ४- विवस्वता चा मुलगा मनु (१० पुत्र)......= यम पुढेहि आहे. पण मारुतिचं शेपुट कशाला वाढवा महाभारतातला मनु मिळाला एवढं पुरे आहे ना..:) असो भारतीय संस्क्रुतीचा गवगवा करणारे असंख्य वेळा तारतम्यहीण वागतात. संस्क्रुतीचा अभिमान असणे वेगळे आणि पुरातन काळातील असली-नसली महत्ता शोधत आजच्या व्यंगांवर मुद्दाम पांघरुण घालने वेगळे.भारतीय संस्क्रुतीत काहीच महनीय नाही हे म्हणनेही चुक आहे... पण जातीय डंखाने आणि पुरेपुर दांभिकतेने आपला समाज भरला असल्याने ख-या इतिहासाचे अन्वेषण न करताच, सत्याचा आधार न घेताच फुकाच्या बेटक्या फुगवण्यास सज्ज असतो आणि हेच भारतीय समाजाचे दुर्दैव आहे. इतिहासाची चिकित्सा या कोणत्याही घटकाला मान्य नसते. उदा. तुकाराम हा कसल्याही स्थीतित सदेह वैकुठाला जावु शकत नाही हे जर वैज्ञानिक सत्य असेल तर मग नेमके तुकारामाचे काय झाले यावर चर्चा सहसा घडत नाही...घडली तरी ती पुन्हा जातीय अंगावरच जावुन ठेपते. म्हनजे सत्यशोधन बाजुलाच रहाते. पण याहीपेक्षा अहंकारी भावना पसरवणारे लेखन संशोधनाच्या नावाखाली केले जाते ते तर आपल्या मानसिकतेचे दिवाळे निघाले असल्याचे लक्षण आहे. भारताला इतिहास लेखन परंपरा असल्याने सावरकरांनी त्यांच्या "सहा सोणेरी पाने" या ग्रंथात एकामागुन एक बेधडक अति-साहसी विधाने केली आहेत. मुळात त्यांचे सर्वच नायक ब्राह्मण आहेत. इतिहासाचे अत्यंत पक्षपाती विवेचन त्यात आहे. ते ठीक आहे...मुळात सवरकर हे इतिहासतज्ञ नव्हतेच म्हणुन ते क्षम्यही मानता येईल...पण तोच इतिहास आहे असे समजनारे सावरकर भक्तांचे काय़? माफ करा. आपला संवाद होऊ शकत नाही. कारण मी सर्व जातींना त्यांच्या गुणदोषासकट स्वीकारतो आणि एकूणच समाजाचा विचार करताना 'चांगले ते चांगले, वाईट ते वाईट' (सगळ्यांच जातींबाबत) अशी माझी भूमिका आहे. मला भविष्याकडे जाण्याची इच्छा आहे आणि तुमचा मार्ग भूतकाळाकडे जाण्याचा आहे. योगप्रभु साहेब आपला संवाद इथे होऊ शकतो कि.. आणि त्याच बरोबर इतरांचा हि.... प्रतिक्रिया सकारात्मक असो कि नकारात्मक कोणताहि आतातायी पणा न करता त्यावर समंजसपणे चर्चा घडवुन हि नविन गोष्टि कळतात त्या नव्याने शिकता येतात.. आणि मुळात खरं असेल तेच लोकांसमोर येतं आणि यावं हिच प्रामाणीक ईच्छा आहे.. बाकी आपण सर्व जातींना त्यांच्या गुणदोषासकट स्वीकारतो (त्या शिवाय पर्याय नाहि) आणि एकूणच समाजाचा विचार करताना 'चांगले ते चांगले, वाईट ते वाईट' (सगळ्यांच जातींबाबत) अशी आपली भूमिका आहे. त्याबद्दल मि ही सहमत आहे मला भविष्याकडे जाण्याची इच्छा आहे आणि तुमचा मार्ग भूतकाळाकडे जाण्याचा आहे. भूतकाळ विसरलात तर भविष्यकाळ कसा घडवणार?? आपण भूतकाळात केलेल्या चुकां मधुनच शिकत असतो असो........ कारण इतिहास विसरणारे इतिहास घडवु शकत नाहि या मताचा मि आहे:)

In reply to by अजातशत्रु

>>इतिहासाचे अत्यंत पक्षपाती विवेचन त्यात आहे. ते ठीक आहे...मुळात सवरकर हे इतिहासतज्ञ नव्हतेच म्हणुन ते क्षम्यही मानता येईल. सावरकरांना क्षमा करताय तुम्ही !! बरं बरं .. चालुद्या .. बाकी इतिहासतज्ञ कोण मग ? आ. ह. साळुंखे का ?

In reply to by अजातशत्रु

अजातशत्रू म्हणजे संजय सोनावणी आहेत का? ;) नाही ते जर ते नसतील तर वरील प्रतिसादातील संपूर्ण लेखन हे सोनावणींच्या ब्लॉगवरुन जसेच्या तसे उचलुन आणले आहे. संपादक दखल घेतील काय ?

In reply to by अजातशत्रु

शिवाय स्वतः मनुस्मृतिच सांगते कि विराट पुरुषाने मनुची निर्मिति केलीय आणी त्यात मनुने मरीची, भ्रूगु इ. महर्षीची निर्मिति केली. आता भ्रूगु वगैरे महर्षी हे ब्राह्मण असताना त्यांचा पिता असलेला मनु हा "क्षत्रिय" कसा काय होऊ शकतो बुवा??: निर्मिती केली असे म्हणायचे आहे की जन्म दिला असे म्हणायचे आहे ते स्पष्टपणे लिहावे. निर्मिती करणारा माणूस जीवशास्त्रीय पिता असण्याचे कारण नाही. जसे - पुराणामध्ये काहीजण अग्नीय ज्वालेमधून , काही जण यज्ञातून, काही जण घामाच्या थेंबातून वगैरे निर्माण होत असतात. सबब क्षत्रिय माणुस ब्राम्हणाची निर्मिती करु शकेल. आणखी एक साधं लॉजिक जर तुम्हि म्हणता तसे डोळे झाकुन जर मानले कि तो "क्षत्रियच" होता तर इतका उत्क्रुष्ट आणि मौलीक ग्रंथ लिहीणारा क्षत्रिय मनु हा उगी बामणांना श्रेष्ट दर्जा आणी खास अधिकार हक्क (आरक्षण), आणि सवलतींचि खैरात का करेल?:? काही लोक परधार्जिणे असतात. भारताला इतिहास लेखन परंपरा असल्याने सावरकरांनी त्यांच्या "सहा सोणेरी पाने" या ग्रंथात एकामागुन एक बेधडक अति-साहसी विधाने केली आहेत. मुळात त्यांचे सर्वच नायक ब्राह्मण आहेत. इतिहासाचे अत्यंत पक्षपाती विवेचन त्यात आहे. ते ठीक आहे...मुळात सवरकर हे इतिहासतज्ञ नव्हतेच म्हणुन ते क्षम्यही मानता येईल...पण तोच इतिहास आहे असे समजनारे सावरकर भक्तांचे काय़? चालू द्या.

महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्‍यात स्त्रियांना प्रवेशबंदी, या विषयावर धागा उघडला असताना तेवढ्यापुरता मर्यादित न ठेवता आता मनुस्मृती, सावरकर, सहा सोनेरी पाने व ब्राह्मण नायक, तुकाराम वगैरे उपाख्याने सुरु झालेली दिसताहेत. याचाच अर्थ ज्ञानेश्वर, रामदास, दादोजी, पेशवे ही मंडळी नाटकात एंट्री घेण्यासाठी विंगेत नक्कीच उभी असणार. कल्याण आहे, इतकेच म्हणतो. अजातशत्रुंनी सगळे मुद्दे एकाच धाग्यात कोंबण्यापेक्षा विषयानुरुप स्वतंत्र धागे काढावेत, असे नम्र निवेदन.

"भारतीय संस्क्रुतीचा गवगवा करणारे असंख्य वेळा तारतम्यहीण वागतात. संस्क्रुतीचा अभिमान असणे वेगळे आणि पुरातन काळातील असली-नसली महत्ता शोधत आजच्या व्यंगांवर मुद्दाम पांघरुण घालने वेगळे.भारतीय संस्क्रुतीत काहीच महनीय नाही हे म्हणनेही चुक आहे... पण जातीय डंखाने आणि पुरेपुर दांभिकतेने आपला समाज भरला असल्याने ख-या इतिहासाचे अन्वेषण न करताच, सत्याचा आधार न घेताच फुकाच्या बेटक्या फुगवण्यास सज्ज असतो आणि हेच भारतीय समाजाचे दुर्दैव आहे. इतिहासाची चिकित्सा या कोणत्याही घटकाला मान्य नसते. उदा. तुकाराम हा कसल्याही स्थीतित सदेह वैकुठाला जावु शकत नाही हे जर वैज्ञानिक सत्य असेल तर मग नेमके तुकारामाचे काय झाले यावर चर्चा सहसा घडत नाही...घडली तरी ती पुन्हा जातीय अंगावरच जावुन ठेपते. म्हनजे सत्यशोधन बाजुलाच रहाते. पण याहीपेक्षा अहंकारी भावना पसरवणारे लेखन संशोधनाच्या नावाखाली केले जाते ते तर आपल्या मानसिकतेचे दिवाळे निघाले असल्याचे लक्षण आहे. भारताला इतिहास लेखन परंपरा असल्याने सावरकरांनी त्यांच्या "सहा सोणेरी पाने" या ग्रंथात एकामागुन एक बेधडक अति-साहसी विधाने केली आहेत. मुळात त्यांचे सर्वच नायक ब्राह्मण आहेत. इतिहासाचे अत्यंत पक्षपाती विवेचन त्यात आहे. ते ठीक आहे...मुळात सवरकर हे इतिहासतज्ञ नव्हतेच म्हणुन ते क्षम्यही मानता येईल...पण तोच इतिहास आहे असे समजनारे सावरकर भक्तांचे काय़?" फक्त हे २ उतारे मला इथे महत्वाचे वाटले त्यामुळे ते घेन्यात आले आहेत त्याची इथे "गरज वाटली होती" संजय सोनावणी यांचा उल्लेख जागे अभावी व अनावधानाने राहीला गेला आहे... आणि ते मि नम्रपणे मान्य करत आहे.(निदान) पण म्हणुन मनु हा "क्षत्रिय" होऊ शकत नाही:) तसं नसेल तर तसे खंडण करावे... गैरसमज तरी दुर होइल आमचा आणि आपल्या इथल्या मित्रांचा हि ! उगा वडाची साल (बोधी वृक्षाला) उप्स पिंपळा ला:-) imp= मुद्दे खोडता येत नसले कि काहि लोक उगाच मग मुळ मुद्द्याला बगल देउन मग असे प्रतिसाद देतात..=) बाकी इतिहासतज्ञ कोण मग ? आ. ह. साळुंखे का ? काय बोलणार इतकच म्हणतो लोकमान्य टिळक/बाबासाहेब पुरंदरे/ राजवाडे हेच काय ते इतिहासतज्ञ इतीहास मान्य आहेत. बाकि संपादक काय ती दखल घेतील लेखन ठेवावे कि ठेउ नये हा सर्वस्वी त्यांचाच अधिकार आहे. संपादकांनि निर्णय घ्यावा हि नम्र विनंती....

In reply to by अजातशत्रु

फक्त हे २ उतारे मला इथे महत्वाचे वाटले त्यामुळे ते घेन्यात आले आहेत त्याची इथे "गरज वाटली होती" संजय सोनावणी यांचा उल्लेख जागे अभावी व अनावधानाने राहीला गेला आहे... आणि ते मि नम्रपणे मान्य करत आहे.(निदान) याचा अर्थ आधी तुम्ही चोरी केली आणि ती पकडली गेल्यावर मूळ लेखकाचे नाव येथे दिले असे मानण्यास हरकत नाही.

इथे एक नमुद करतो कि माझा आक्षेप हा ब्राम्हण जाती वर नसुन,ब्राम्हण्यांवर आहे. शब्दांचे खेळ कशाला करता ? अहो शब्दांचे खेळ कशाला काहिंना "तो" शब्द खटकला म्हणुन तसं स्पष्टिकरण द्यावं लागलं काहिंना टिका सहन होत नसेलतर त्यावर काय बोलायचं एखाद्या विशिष्ट जातीवर राग असेल तर निदान तसे उघडपणे सांगण्याची धमक दाखवा. तुम्ही सशाच्या काळजाचे नाही ना, तर मग उगा भेदरटपणा नको. क्रुपया योगप्रभुंना दिलेला प्रतिसाद वाचावा.... (आणि कुणाला जर विचार आवडलेच नाहित तर लगेच कुणी गोळि घालनार नाहि...... जशी गांधिजींना कुणा" माथेफिरु" ने घातली) इथे ब्राम्हण हा उल्लेख जाणीव पुर्वक टाळला आहे उगा प.रा. ना राग यायचा ;-) भेदरटपणा असता तर असा धागाच काढला नसता याची नोंद घ्यावी.. आता जर फ्रंट वर एखादि विशिष्ट जातच असेल तर त्यांना टिका जास्त सहन करावि लागणार ना... त्या मुळेच कि काय लोकांना दंगलि/ मोर्चे/ आणी विरोधा साठि भडकवणारे लोक हे कधिच फ्रंट वर नसतात पोलिसांच्या गोळ्या/लाठ्या खातात ते फक्त सामान्य लोक.. उदा. ताजीच आहेत पण विषयांतर नको... ही माहिती अर्धवट, अपुरी आहे. कोणीतरी एक ग्रंथ लिहिला आणि हजारो वर्षे त्याचे परिणाम करोडो लोकांना भोगावे लागले इतकी ही गोष्ट साधी नाही. निवडणुकीत प्रचार करण्यासाठी ठीक आहे. निवडणुकीचं नंतर पाहु खात्रि आहे तिथेहि विरोधि पक्षात तुम्हि असालच बरं ही माहिती अर्धवट, अपुरी आहे.(मान्य...कारण जागे अभावि सगळंच इथे देता येत नाहि) कोणीतरी एक ग्रंथ लिहिला आणि हजारो वर्षे त्याचे परिणाम करोडो लोकांना भोगावे लागले इतकी ही गोष्ट साधी नाहीच आहे कारण तत्कालीन परिस्थिती आणी तेव्हाची सामाजीक परिस्थिती/ सामाजीक स्थित्यंतरे इ.मध्ये खुप मोठा फरक होता/आहे कारण आर्य आल्या नंतर हजारो वर्षे त्याचे परिणाम इथल्या करोडो लोकांना भोगावे लागले. कारण तीच इथली जगण्याची पद्धती म्हणुन इथं रुढ झाली (किंवा लादल्या गेली) कोणी निर्माण केली, कशी निर्माण झाली, कोणी कोणी फॉलो केली याचा जरुर विचार करा आणि थोडेसे वाचनही करा. मलाच उलट प्रश्न विचारण्या पेक्षा आपण जर मि ज्या गोष्टिंवर आक्षेप नोंदवले आणि जे मुद्दे उपस्थित केले त्याचे "तुमच्यापरिने" खंडण केले असते तर ते अधिक संयुक्तिक वाटले असते. कोणत्यातरी जातीचे नियमितपणे प्रसिद्ध होणारे मासिक किंवा पाक्षिक संदर्भासाठी वाचू नका. हि गोष्ट तुम्हालाहि लागु होते..... याचाच अर्थ ज्ञानेश्वर, रामदास, दादोजी, पेशवे ही मंडळी नाटकात एंट्री घेण्यासाठी विंगेत नक्कीच उभी असणार. भिती रास्त आहे..... फक्त एवढच म्हणेन कि मुळ मुद्द्याला बगल देउन इकडचे तिकडचे/ मग हे कोण आहेत? म हा असा का? असे प्रतिसाद देण्या पेक्षा मुळमुद्दे खोडुन काढा कि राव.. अथवा मान्य करा कि भारतिय संस्क्रुतित मनुस्म्रुति नावाचा मौलिक ग्रंथ मनु ने लिहुन अखंड भारतवर्षा वर फार "उपकार" केले आहेत.. त्यातुनच आपल्या भारतवर्षाला वर्ण व्यवस्था/ जातव्यवस्था/ स्त्रियांवरिल जाचक अटी त्यांना गुलामा प्रमाणे वागवणे या व अशा अनेक अनिष्ट प्रथा भारतीय संस्क्रुतीत जातीय डंखाने आणि पुरेपुर दांभिकतेने आपला समाज भरला असल्याने हे ख-या इतिहासाचे आणि भारतीय समाजाचे दुर्दैव आहे. मि उपस्थित केलेले मुद्दे खोटे असुन त्याचा मनुस्म्रुती शी दुरान्वये संबंध नाहि असं तरी म्हणुन दाखवावे:) अशा प्रथांचा उपयोग कायम अफूसारखाकरुन भोळ्या भाबड्या लोकांना अजुनही विषमते च्या गुलामगिरीत ठेवण्या पेक्षा इतिहासाची चिकित्सा करु द्या आणि मुळात खरं असेल तेच लोकांसमोर येउ द्या आणी मुख्य म्हणजे ते आपल्या विवेक बुद्धिला आणि मनाला पटावं यावं हिच प्रामाणीक ईच्छा आहे..

In reply to by अजातशत्रु

मलाच उलट प्रश्न विचारण्या पेक्षा आपण जर मि ज्या गोष्टिंवर आक्षेप नोंदवले आणि जे मुद्दे उपस्थित केले त्याचे "तुमच्यापरिने" खंडण केले असते तर ते अधिक संयुक्तिक वाटले असते. खंडन करायच्याच विचारात होतो पण तेवढ्यात तुम्ही लेखनचौर्य करत आहात हे सिद्ध करणारा परा यांचा प्रतिसाद आणि तुमचा कबुलीजबाब वाचला. कॉपी-पेस्ट केलेल्या आक्षेपांचे खंडन मी करत नसतो.

In reply to by अजातशत्रु

इथे ब्राम्हण हा उल्लेख जाणीव पुर्वक टाळला आहे उगा प.रा. ना राग यायचा
ज्या मनुष्याकडे स्वत:चे विचार नाहित, ज्याला चार शब्दांचे मत मांडायला देखील दुसर्‍याने लिहिलेले शब्द चोरी करुन आणावे लागतात अशा मनुष्याच्या बोलण्याच्या काय राग मानायचा ? :) असो... तुम्ही मोठे आणि प्रगल्भ झालात की तुमची दखल घ्यायचा विचार करु. तुर्तास तुम्हाला आणि तुमच्या चौर्यकर्माला फाट्यावर देखील मारायची इच्छा नाही.

@कॉपी-पेस्ट केलेल्या आक्षेपांचे खंडन मी करत नसतो.#अप्पा जोगळेकर अहो मालक मी कॉपी-पेस्ट काय केलंय?आणी माझे आक्षेप काय आहेत हेच जर तुम्हाला समजत नसेल (समजलं असेलही पण गोची झाली हो,अस काहीस आहे का??) तर काय म्हणायचं? मुळात माझे आक्षेप तुम्हाला खोडता आले नाहीत तेव्हा तुम्ही पळवाटाच शोधनार.... असो वर सांगितल्या प्रमाणे फक्त २ उतारे इथे महत्वाचे वाटले म्हणुन ते उदा.दाखल घ्यावे लागले (ते सोडुन बाकी सगळे माझे आक्षेप /मुद्दे आहेत) तसे आपण इतर पुस्तक किंवा वर्तमानपत्रां मधून वानगी दाखल घेतच असतो कि..मग ती पण चोरीच का? आणी तशीही लिंक दिलेली आहेच तर जरा तिथे जाण्याची तसदी घेतली असतीत तर फार बरे झाले असते, तो संपुर्ण लेख मी जसाच्या तसा इथे आणलेला नाही आहे(हे सिद्ध आहे) त्यातले फक्त २ उतारेच इथे आहेत, आणी मुळ लेखकाचे नावही मी जाहीर केलेय ते माझ्या नावावर न खपवता.. त्या मुळे ही चोरी होउ शकत नाही उगा उसना आविर्भाव आणून = कॉपी-पेस्ट केलेल्या आक्षेपांचे खंडन मी करत नसतो असे म्हणने म्हणजे चर्चेला बगल देण्यासारखं आहे. त्यापेक्षा मि उपस्थित केलेले मुद्दे खोटे असुन त्याचा मनुस्म्रुती शी दुरान्वये संबंध नाहि असं सिद्ध करुन दाखवा, @तुम्ही मोठे आणि प्रगल्भ झालात की तुमची दखल घ्यायचा विचार करु. तुर्तास तुम्हाला आणि तुमच्या चौर्यकर्माला फाट्यावर देखील मारायची इच्छा नाही.# प.रा. यावर काय बोलणार.... इथे(म्हणजे फक्त मि. पा. वर)तुम्हीच एक थोर मोठे आणि प्रगल्भ विचारवंत दिसत आहात (निरीक्षण) त्यामूळे अशा थोर माणसाच्या शेपटीवर आमच्या सारख्या पामराचा चुकून पाय पडला.. हे निमीत्त मात्र, नाहीतर आपल्या प्रतिक्रीये वरुन आपण फारच सज्जन दिसत आहात.. अवांतर: कामामुळे आणी संस्थलाच्या टेक्निकल प्रोब्लेम (२ वेळा लिहिला होता पण प्रकाशित होउ शकला नाहि) त्यामूळे हा प्रतिसाद इतक्या उशारा देत आहे, अतिअवांतर : माझे सगळे आक्षेप /मुद्दे यांचं जर कुणी (पुरावासिद्ध) खंडण केलं तर मि इथे जाहिर माफी मागेन, एक राहिलं संपादक/ संपादक मंडळ यांनी "ते" (कॉपी-पेस्ट)लिखाण उडविले नाहि त्याबद्दल त्यांचे जाहिर आभार ( ज्यांनी आक्षेप घेतला होता त्यांनी पण याची दखल घ्या.आक्षेप टिकला नाही) आणी पुढच्यावेळी मि ही खबरदारी घेइन ( उल्लेख करायची).. तुर्तास रजा........

In reply to by अजातशत्रु

उगा उसना आविर्भाव आणून = कॉपी-पेस्ट केलेल्या आक्षेपांचे खंडन मी करत नसतो असे म्हणने म्हणजे चर्चेला बगल देण्यासारखं आहे. जे पुराव्याने सिद्ध झालं आहे ते सूर्यप्रकाशासारखं स्वच्छच आहे. याउप्पर तुम्ही स्वत:च्या मनाची हवी तशी समजूत घालून घेऊ शकता. चर्चेला बगल दिली, चर्चेतून पळ काढला, सूंबाल्या केला काय हवं ते म्हणून स्वतःच्या मनाचे समाधान करुन घ्यायची मोकळीक तुम्हाला आहेच. आणी पुढच्यावेळी मि ही खबरदारी घेइन ( उल्लेख करायची).. शुभेच्छा.