निमंत्रण - इंक्रेडीबल फोर्टस ऑफ इंडिया !
दुर्गअभ्यासक प्रमोद मांडे यांनी टिपलेल्या देशभरातील दुर्गांच्या छायाचित्र प्रदर्शनाला शुक्रवारपासून बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात सुरवात होत आहे. येत्या २२ ते २७ एप्रिल च्या दरम्यान सकाळी नऊ ते रात्री आठ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.
सर्व दुर्गप्रेमी,शिवप्रेमींनी याचा लाभ घ्यावा.
या प्रदर्शनात महाराष्ट्रातील दुर्गम किल्ल्यांच्या छायाचित्रांसह कर्नाटक, राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, केरळ अशा विविध राज्यांतील किल्ल्यांची चारशेहून अधिक छायाचित्रे प्रदर्शित करण्यात येणार आहेत. ज्या किल्ल्यांबाबत दुर्गप्रेमी आणि अभ्यासकांना विशेष माहिती नाही, अशा किल्ल्यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचा या प्रदर्शनात समावेश करण्यात आला आहे.
तसेच या काळात प्रफुल्ल केशव घाणेकर,आनंद पाळंदे,निनाद बेडेकर,भगवान चिले या इतिहासतज्ञ, दुर्गतज्ञांशी संवाद साधण्याची संधी दुर्गप्रेमींना मिळेल.
सर्व दुर्गप्रेमी,शिवप्रेमींना आग्रहाचे निमंत्रण !
" ट्रेकिंगच्या माध्यमातून, डोंगर-द-या पायाखाली घालत, पायवाटांनी मनमुराद
भटकंती केल्यावरच महाराष्ट्राचा इतिहास, निसर्ग, जीवनपद्धती, श्रद्धा,
सामाजिक स्थिती, संस्कृती आदींचा परिचय जवळून होऊ शकतो "
" ट्रेकिंगच्या माध्यमातून, डोंगर-द-या पायाखाली घालत, पायवाटांनी मनमुराद
भटकंती केल्यावरच महाराष्ट्राचा इतिहास, निसर्ग, जीवनपद्धती, श्रद्धा,
सामाजिक स्थिती, संस्कृती आदींचा परिचय जवळून होऊ शकतो "
प्रतिक्रिया
अरे वा! नक्कीच पाहणार हे
छान छान ! सर्व
नक्कीच ... धन्यवाद
नक्की बघणार !
माहिती दिल्याबद्दल
हेला म्हनत्यात खरा
अरे वा, खुप छान
झक्कास सगळे मिपाकर आले तर
धन्यवाद मालोजी राजे , नक्की
छान माहिती अमोल केळकर