प्रत्येकाचं पावसाशी स्वतःचं असं एक नातं असतंच शिवाय ते वेगवेगळ्यावेळी वेगवेगळंही असतं. माझं पावसाशी असलेलं नातं सांगण्याचा हा प्रयत्न.
आजीचा जणू देवघरात
मंत्रपाठसे मंद सुरात
ईशस्तवने मंगल गात
कधी जागवी सुप्रभात
पाऊस माझा पाऊस माझा ||१||
रानावनात घुमवी पावा
हवेत धुंद गंध शिडकावा
लपाछपीचा डाव नवा
भटकंतीला साथी हवा
पाऊस माझा पाऊस माझा ||२||
तृषार्त तप्त रसा दुपारी
जल वर्षता होय गोजिरी
इंद्रधनूचा वेल अंबरी
फुलवी खुलवी प्रीत अंतरी
पाऊस माझा पाऊस माझा ||३||
कधी तरी अन् कातरवेळी
डोह मनाचा निर्मम घुसळी
गतकाळाच्या आठवणींनी
भरतो डोळा माझ्या पाणी
पाऊस माझा पाऊस माझा ||४||
प्रभू चरणी एक मागणी
सरणावरती देता अग्नी
धूर निरंजन मेघ व्हावा
आणि भूवर या बरसावा
पाऊस माझा पाऊस माझा ||५||
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2591
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
अतिसुंदर रचना.
अतिसुंदर रचना.
तृषार्त तप्त रसा दुपारी
जल वर्षता होय गोजिरी
इंद्रधनूचा वेल अंबरी
फुलवी खुलवी प्रीत अंतरी
पाऊस माझा पाऊस माझा ||३||
कधी तरी अन् कातरवेळी
डोह मनाचा निर्मम घुसळी
गतकाळाच्या आठवणींनी
भरतो डोळा माझ्या पाणी
पाऊस माझा पाऊस माझा ||४||
हे खूपच आवडले. अभिनंदन.
उन्हाळयात पावसाचा गारवा दिला
उन्हाळयात पावसाचा गारवा दिला कवितेनं....
नगरीनिरंजन - रानावनात घुमवी
नगरीनिरंजन -
रानावनात घुमवी पावा
हवेत धुंद गंध शिडकावा
लपाछपीचा डाव नवा
भटकंतीला साथी हवा
पाऊस माझा पाऊस माझा ||२||-
खूपच छान कविता .मस्त .आवडली !!
खासचं
रानावनात घुमवी पावा
हवेत धुंद गंध शिडकावा
लपाछपीचा डाव नवा
भटकंतीला साथी हवा
पाऊस माझा पाऊस माझा ||२||
तृषार्त तप्त रसा दुपारी
जल वर्षता होय गोजिरी
इंद्रधनूचा वेल अंबरी
फुलवी खुलवी प्रीत अंतरी
पाऊस माझा पाऊस माझा ||३||
हे खासचं!! आवडले!!
चिंब!
चिंब!
क्लास!! जियो!!
क्लास!! जियो!!
मस्त
पावसांची वेगवेगळी रुपे दाखवणारी ओलीचिंब रचना
एक औंस ग्रेस +एक औंस महानोर
काठोकाठ भरेपर्यंत निरंजन.
पावसाचा प्य्ला भरला आहे.
कधी तरी अन् कातरवेळी डोह
सुरेख.
सुरेखच!
खूप सुंदर रचना.
अप्रतिम
अप्रतिम
मनःपूर्वक धन्यवाद!
मनःपूर्वक धन्यवाद!
परत एकदा व्वाह ! निरंजन
परत एकदा व्वाह ! निरंजन सुन्दर अगदी पहिल्या ओळी पासुन काही तरी दिसायला लागत , ओळीतला गंध मनात पोहोचतो .