Skip to main content

पाऊस माझा

लेखक नगरीनिरंजन यांनी शनिवार, 16/04/2011 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येकाचं पावसाशी स्वतःचं असं एक नातं असतंच शिवाय ते वेगवेगळ्यावेळी वेगवेगळंही असतं. माझं पावसाशी असलेलं नातं सांगण्याचा हा प्रयत्न. आजीचा जणू देवघरात मंत्रपाठसे मंद सुरात ईशस्तवने मंगल गात कधी जागवी सुप्रभात पाऊस माझा पाऊस माझा ||१|| रानावनात घुमवी पावा हवेत धुंद गंध शिडकावा लपाछपीचा डाव नवा भटकंतीला साथी हवा पाऊस माझा पाऊस माझा ||२|| तृषार्त तप्त रसा दुपारी जल वर्षता होय गोजिरी इंद्रधनूचा वेल अंबरी फुलवी खुलवी प्रीत अंतरी पाऊस माझा पाऊस माझा ||३|| कधी तरी अन् कातरवेळी डोह मनाचा निर्मम घुसळी गतकाळाच्या आठवणींनी भरतो डोळा माझ्या पाणी पाऊस माझा पाऊस माझा ||४|| प्रभू चरणी एक मागणी सरणावरती देता अग्नी धूर निरंजन मेघ व्हावा आणि भूवर या बरसावा पाऊस माझा पाऊस माझा ||५||
लेखनविषय:

वाचने 2551
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

अतिसुंदर रचना. तृषार्त तप्त रसा दुपारी जल वर्षता होय गोजिरी इंद्रधनूचा वेल अंबरी फुलवी खुलवी प्रीत अंतरी पाऊस माझा पाऊस माझा ||३|| कधी तरी अन् कातरवेळी डोह मनाचा निर्मम घुसळी गतकाळाच्या आठवणींनी भरतो डोळा माझ्या पाणी पाऊस माझा पाऊस माझा ||४|| हे खूपच आवडले. अभिनंदन.

नगरीनिरंजन - रानावनात घुमवी पावा हवेत धुंद गंध शिडकावा लपाछपीचा डाव नवा भटकंतीला साथी हवा पाऊस माझा पाऊस माझा ||२||- खूपच छान कविता .मस्त .आवडली !!

रानावनात घुमवी पावा हवेत धुंद गंध शिडकावा लपाछपीचा डाव नवा भटकंतीला साथी हवा पाऊस माझा पाऊस माझा ||२|| तृषार्त तप्त रसा दुपारी जल वर्षता होय गोजिरी इंद्रधनूचा वेल अंबरी फुलवी खुलवी प्रीत अंतरी पाऊस माझा पाऊस माझा ||३|| हे खासचं!! आवडले!!

पावसांची वेगवेगळी रुपे दाखवणारी ओलीचिंब रचना

कधी तरी अन् कातरवेळी डोह मनाचा निर्मम घुसळी गतकाळाच्या आठवणींनी भरतो डोळा माझ्या पाणी पाऊस माझा पाऊस माझा ||४|| प्रभू चरणी एक मागणी सरणावरती देता अग्नी धूर निरंजन मेघ व्हावा आणि भूवर या बरसावा पाऊस माझा पाऊस माझा ||५||
सुरेख.

परत एकदा व्वाह ! निरंजन सुन्दर अगदी पहिल्या ओळी पासुन काही तरी दिसायला लागत , ओळीतला गंध मनात पोहोचतो .