✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

(एका अपरिमेयाचे मुक्तसुनीत)

च — चतुरंग, Wed, 04/13/2011 - 22:51
साक्षात 'पाय' वर कविता करणार्‍या आमच्या घासू गुर्जींचे पाय पकडून! ;) :०()8= (वर्तुळ) मी पहिल्यांदा हा आकारबंध वस्रपटलांच्यामध्ये केला स्थानबद्ध केव्हापासून जागलिये खाद्यपिसासा मुक्ततुंदिलरेखी वलयरेषेपलिकडे खाद्यकणग्राही रसनापटापलिकडे घडले असे गारुड निशा'चर' जगतात शीतकपाटाच्या दारापल्याड मुक्त केकावलीचा दिसलाय भरलेला आवाका आवाक्याबरोबरच विस्तारलं एक जिव्हालौल्यसाधक दोंदाकारप्रसारक तुमानवेधी "शून्य" त्याच्या क्रीमगर्भरोलांचा नीलबेरीसामायिक पेस्ट्रीचा तो तनःचक्षुसाक्षात्कारच वजनउंचीवर्गछेद जो बीएमायगुणोत्तरी वजनकाट्याच्याही पल्याडी अपरिमेयसंख्यामय, जडशरीरभयकारी 'पायां'ना पुरते गोठवणारे हे "शून्य"... -('पूज्य')रंगा

प्रतिक्रिया द्या
8666 वाचन

💬 प्रतिसाद (41)

नमन

राजेश घासकडवी
Wed, 04/13/2011 - 23:02 नवीन
मी इकडे ठ्यॉ ठ्यॉ हसतोय, आणि माझे अमेरिकी ऑफिसमेट विचारताहेत, 'काय शेअर करणार का?' 'जिव्हालौल्यसाधक दोंदाकारप्रसारक' काय...'क्रीमगर्भरोलांचा' काय...'जडशरीरभयकारी 'पायां'ना' काय... एकेक शब्द वाचून धमाल आली... फुलटॉस दिला तरी यू हॅव टू पुट इट अवे असं आपले थोर कॉमेंटेटर सांगत असतात. इथे तुम्ही तो मैदानाच्या बाहेर मारलाय. पूज्य रंगा हेही भारीच. सलाम तुम्हाला.
  • Log in or register to post comments

ठ्ठ्यॉ!!!!!! वा वा वा!!

प्राजु
Wed, 04/13/2011 - 23:09 नवीन
ठ्ठ्यॉ!!!!!! वा वा वा!! चालूद्या नीलबेरीसामयिक!!
  • Log in or register to post comments

जोर्दार्र!!

मेघवेडा
Wed, 04/13/2011 - 23:15 नवीन
जोर्दार्र!!
  • Log in or register to post comments

हुच्च विडंबन!

प्रभो
Wed, 04/13/2011 - 23:15 नवीन
हुच्च विडंबन!
  • Log in or register to post comments

त्याच्या

रेवती
Wed, 04/13/2011 - 23:18 नवीन
त्याच्या क्रीमगर्भरोलांचा नीलबेरीसामायिक पेस्ट्रीचा हे सगळ्यात जास्त आवडले. बाकीचे विडंबनही जमले आहे.
  • Log in or register to post comments

हे काय ?

टारझन
गुरुवार, 04/14/2011 - 10:49 नवीन
असली बात नच्छ !! घरातल्या घरात प्रतिसाद देउन रडीचा डाव नकोय ;) रंगाभाय .. तुमचे शब्दसामर्थ्य , त्याला वृत्तात बसवायची हातोटी आणि त्या मागची गोलाकार प्रेरणा .. सर्वांना हातपाय जोडतो . - लंबगोल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

+१

चित्रा
Fri, 04/15/2011 - 03:59 नवीन
..तुमचे शब्दसामर्थ्य , त्याला वृत्तात बसवायची हातोटी आणि त्या मागची गोलाकार प्रेरणा .. सर्वांना हातपाय जोडतो . असेच म्हणते. बेफाम विडंबन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

+१

चित्रा
Fri, 04/15/2011 - 03:59 नवीन
..तुमचे शब्दसामर्थ्य , त्याला वृत्तात बसवायची हातोटी आणि त्या मागची गोलाकार प्रेरणा .. सर्वांना हातपाय जोडते . असेच म्हणते. बेफाम विडंबन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

दंडवत

श्रावण मोडक
Wed, 04/13/2011 - 23:19 नवीन
दंडवत देवा!!!
  • Log in or register to post comments

सह्ही म्हण्जे सह्हीच !!

पुष्करिणी
Wed, 04/13/2011 - 23:26 नवीन
सह्ही म्हण्जे सह्हीच !!
  • Log in or register to post comments

साष्टांग नमस्कार!

पैसा
गुरुवार, 04/14/2011 - 09:36 नवीन
अत्युच्च आदर्श विडंबन!!! (मूळ कवितेतला पायच्या किमतीचा आकृतीबंध जसाच्या तसा सांभाळलेला आहे त्याबद्दल तुम्हाला हजार "प्रतिसाद"!)
  • Log in or register to post comments

+१

सूड
गुरुवार, 04/14/2011 - 19:15 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

लै भारी.

Nile
गुरुवार, 04/14/2011 - 00:27 नवीन
ह्या शून्याचा प्रभाव नुकताच आम्हालाही जाणवू लागला आहे. च्यायला, कोठल्याही समीकरणात टपकतोच. अशी विडंबंन रोज वाचायला मिळाली तर अतीवापराने त्याचं अस्तित्व कमी होईल का?
  • Log in or register to post comments

हहहहह.. क्रीमगर्भरोल... मज्जा

भडकमकर मास्तर
गुरुवार, 04/14/2011 - 00:32 नवीन
हहहहह.. क्रीमगर्भरोल... मज्जा आली... अवांतर :: हल्ली रंगाबाबूंना ते व्यायाम, बी एमाय, तुंदिलतनु पासून सुघटनापर्यन्त वगैरे वगैरे विषय फार अपील कर्तात बुवा... त्यांचे याच विषयाला वाहिलेले एक संपादकीयही आठवले...
  • Log in or register to post comments

हेच म्हण्तो! पूज्य विडंबन!

मनिष
गुरुवार, 04/14/2011 - 10:11 नवीन
हेच म्हण्तो! पूज्य विडंबन! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

हा हा हा.... रंगाशेठ

गणपा
गुरुवार, 04/14/2011 - 01:00 नवीन
हा हा हा.... रंगाशेठ साष्टांग दंडवत.
  • Log in or register to post comments

हुच्च! तुमानवेधी शून्य!! =))

नगरीनिरंजन
गुरुवार, 04/14/2011 - 03:52 नवीन
हुच्च! तुमानवेधी शून्य!! =))
  • Log in or register to post comments

सं प लो ! ! !

असुर
गुरुवार, 04/14/2011 - 04:15 नवीन
सं प लो ! ! ! रंगाकाका, पाय पाठवा आपले, खरडवहीत लावायचे आहेत. :-) ©º°¨¨°º© खाद्यकथेतील तुंदिलकुमार ©º°¨¨°º© आमचे खाद्य Only Dairytales Have Happy Butterings
  • Log in or register to post comments

खल्लास! मजा आली.

विंजिनेर
गुरुवार, 04/14/2011 - 06:20 नवीन
खल्लास! मजा आली.
  • Log in or register to post comments

ये बात है ..बहोत खूब.

तर्री
गुरुवार, 04/14/2011 - 06:43 नवीन
मूळ काव्य आणि हे तुमान वेधी काव्य...समसमा...जबरदस्त.
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

गणेशा
गुरुवार, 04/14/2011 - 14:42 नवीन
असेच म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री

जबरदस्त विडंबन!!!!

प्रीत-मोहर
गुरुवार, 04/14/2011 - 06:46 नवीन
जबरदस्त विडंबन!!!!
  • Log in or register to post comments

अत्युच्च.... ह्याला 'विडंबन'

प्यारे१
गुरुवार, 04/14/2011 - 10:20 नवीन
अत्युच्च.... ह्याला 'विडंबन' म्हणू नये असा एकोळीचा प्रस्ताव आम्ही मांडतो. मूळ कवितेला कुठल्याही प्रकारे छेद न देता इथे हे एक नवकाव्यच जणू उभे राहिले आहे. त्यामुळे विडंबन म्हणणे नामंजूर. स्वगतः हे पू. रंगाकाका अजून थोडे अनाकलनिय झाले तर शरदिनी चा कविता व्यवसाय (धंदा म्हणणार होतो पण नको) बसेल की!
  • Log in or register to post comments

बर्‍या दिवसानी

रामदास
गुरुवार, 04/14/2011 - 11:01 नवीन
एखाद्या बॅट्समनला त्याची लय सापडल्यासारखे वाटले.अर्थात समोरून डिलीवरी पण हाप्पीच आलीच होती.
  • Log in or register to post comments

हा हा हा..

केशवसुमार
गुरुवार, 04/14/2011 - 12:17 नवीन
रंगाशेठ, विडंबन एकदम झक्कास!! (जडशरीरभयकारी) तुम्ही लिहिते झालात हे उत्तम!! आता थांबू नका..
  • Log in or register to post comments

+१

मूकवाचक
गुरुवार, 04/14/2011 - 20:17 नवीन
पु.ले.शु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार

झकास!

नंदन
गुरुवार, 04/14/2011 - 12:34 नवीन
त्याच्या क्रीमगर्भरोलांचा नीलबेरीसामायिक पेस्ट्रीचा तो तनःचक्षुसाक्षात्कारच वजनउंचीवर्गछेद जो बीएमायगुणोत्तरी वजनकाट्याच्याही पल्याडी अपरिमेयसंख्यामय
_/\_ ख ल्ला स!
  • Log in or register to post comments

_/\_

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 04/14/2011 - 14:16 नवीन
नमस्कार ... ("पाय"प्रेमी) अदिती
  • Log in or register to post comments

हा हा हा

स्मिता.
गुरुवार, 04/14/2011 - 14:30 नवीन
वाचून हसून खपले! अल्टिमेट! आधीच गुरूजींच्या कवितेतले शब्द नीट उच्चारण्याचा प्रयत्न करत होते, त्यात तुमचे हे नवीन शब्द... मराठी भाषा किती समृद्ध झाली या २ कवितांमुळे ;) त्याच्या क्रीमगर्भरोलांचा नीलबेरीसामायिक पेस्ट्रीचा तो तनःचक्षुसाक्षात्कारच वजनउंचीवर्गछेद जो बीएमायगुणोत्तरी वजनकाट्याच्याही पल्याडी अपरिमेयसंख्यामय, मला हे २ कडवे फार आवडले. क्रीमगर्भ रोल, नीलबेरी पेस्ट्री... अहाहा...
  • Log in or register to post comments

बाबौ

रमताराम
गुरुवार, 04/14/2011 - 14:38 नवीन
जबराट. अवांतरः 'जाल-ढसाळ' पुप्याच्या कवितेमुळे निर्माण झालेल्या कवितेच्या नव्या आकृतीबंधाचे टार्‍याने 'कविताभाभी' असे नामकरण केले. आता या 'पाय' 'शून्य' आदि गणिती संकल्पनाभोवती काव्यसौंदर्याची नवी परिमाणे देणार्‍या कवितेला गणिती कविता किंवा शॉर्टकटमधे 'गणिका' म्हणावे का?
  • Log in or register to post comments

वाहवा

विसुनाना
गुरुवार, 04/14/2011 - 15:05 नवीन
वाहवा! ना विडंबन हे, मुळापासूनी नवनवोन्मेषशालीन आहे आविष्कार 'केकावली' हा शब्द फार्फार आवडला.
  • Log in or register to post comments

मस्त

चेतन
गुरुवार, 04/14/2011 - 15:55 नवीन
विडंबन नेहमीच्या सुट्ण्यावर असलं तरी मस्त झालय चेतन अवांतरः विडंबनात ३.१३१७६० संख्या विसरलात काय आणि वर्तुळच्या ऐवजी गोल कसं वाटलं असतं अतिआवांतरः (आकार म्हणजे काय?)
  • Log in or register to post comments

मायला^२

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 04/14/2011 - 16:58 नवीन
मायला^२ :(
  • Log in or register to post comments

जबर्‍याच ! यक

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 04/14/2011 - 18:13 नवीन
जबर्‍याच ! यक नंबर. मुस्तफासुर --------------------------------- 'काका' म्हणाले खिशातली बिडी बदला, आम्ही म्हणालो 'फुर्र'!!!
  • Log in or register to post comments

वाहावा. मी

धनंजय
गुरुवार, 04/14/2011 - 21:08 नवीन
वाहावा. मी वरच्या या प्रतिसादकांशी सहमतीप्रदर्शनाचे कार्य करण्याबद्दल ठरवलेच.
  • Log in or register to post comments

सर्व प्रतिसादकांचे आभार!

चतुरंग
Fri, 04/15/2011 - 05:26 नवीन
(आ'भारी')शून्यरंग
  • Log in or register to post comments

कडक !!

पक्का इडियट
Fri, 04/15/2011 - 11:49 नवीन
कडक !!
  • Log in or register to post comments

झक्कास झक्कास झक्कास.

llपुण्याचे पेशवेll
Fri, 04/15/2011 - 12:16 नवीन
झक्कास झक्कास झक्कास.
  • Log in or register to post comments

जोरदार !! टाळ्या !!

लिखाळ
Fri, 04/15/2011 - 20:21 नवीन
जोरदार !! टाळ्या !!
  • Log in or register to post comments

लै लै भारी!

क्रान्ति
Mon, 04/18/2011 - 20:04 नवीन
दंडवत!!!!!!!!!!!! हे मूळ काव्यापेक्षा जास्त जवळचं आणि आवडीच्या प्रांतातलं, अगदीच खास! हसूनच पोट दुखल्यामुळे रोल, पेस्ट्री लांबच ठेवावे लागणार! :)
  • Log in or register to post comments

ब्बाब्बौ !!

सुहास..
Tue, 04/19/2011 - 09:15 नवीन
_/\_ या उप्पर काही बोलु शकत नाही .
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा