(एका अपरिमेयाचे मुक्तसुनीत)
साक्षात 'पाय' वर कविता करणार्या आमच्या घासू गुर्जींचे पाय पकडून! ;)
:०()8=
(वर्तुळ)
मी पहिल्यांदा हा आकारबंध
वस्रपटलांच्यामध्ये केला स्थानबद्ध
केव्हापासून जागलिये खाद्यपिसासा
मुक्ततुंदिलरेखी वलयरेषेपलिकडे
खाद्यकणग्राही रसनापटापलिकडे
घडले असे गारुड
निशा'चर' जगतात शीतकपाटाच्या
दारापल्याड मुक्त केकावलीचा
दिसलाय भरलेला आवाका
आवाक्याबरोबरच विस्तारलं एक
जिव्हालौल्यसाधक दोंदाकारप्रसारक
तुमानवेधी "शून्य"
त्याच्या क्रीमगर्भरोलांचा
नीलबेरीसामायिक पेस्ट्रीचा
तो तनःचक्षुसाक्षात्कारच
वजनउंचीवर्गछेद जो बीएमायगुणोत्तरी
वजनकाट्याच्याही पल्याडी
अपरिमेयसंख्यामय,
जडशरीरभयकारी 'पायां'ना
पुरते गोठवणारे
हे "शून्य"...
-('पूज्य')रंगा
नमन
ठ्ठ्यॉ!!!!!! वा वा वा!!
जोर्दार्र!!
हुच्च विडंबन!
त्याच्या
हे काय ?
+१
+१
दंडवत
सह्ही म्हण्जे सह्हीच !!
साष्टांग नमस्कार!
+१
लै भारी.
हहहहह.. क्रीमगर्भरोल... मज्जा
हेच म्हण्तो! पूज्य विडंबन!
हा हा हा.... रंगाशेठ
हुच्च! तुमानवेधी शून्य!! =))
सं प लो ! ! !
खल्लास! मजा आली.
ये बात है ..बहोत खूब.
असेच म्हणतो
जबरदस्त विडंबन!!!!
अत्युच्च.... ह्याला 'विडंबन'
बर्या दिवसानी
हा हा हा..
+१
झकास!
_/\_
हा हा हा
बाबौ
वाहवा
मस्त
मायला^२
जबर्याच ! यक
वाहावा. मी
सर्व प्रतिसादकांचे आभार!
कडक !!
झक्कास झक्कास झक्कास.
जोरदार !! टाळ्या !!
लै लै भारी!
ब्बाब्बौ !!