✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जय श्रीराम...!!!

प
प्यारे१ यांनी
Tue, 04/12/2011 - 09:49  ·  लेख
लेख
प्रभू रामचंद्र की जय! रामनवमीच्या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम राम जन्मले. सर्वार्थाने आदर्श एक माणूस आणि त्याचे चरित्र म्हणूनही जर रामचरित्राचा वापर केला तरी आपली नैय्या पार व्हावी एवढी शक्ती त्यामध्ये आहे. रघुकुलवीर श्रीराम आपल्या कृपेने समस्त लोकांचे सर्वार्थाने कल्याण करोत हीच प्रार्थना. श्रीराम जयराम जयजय राम। श्रीराम जयराम जयजय राम। श्रीराम जयराम जयजय राम। श्रीराम जयराम जयजय राम। श्रीराम जयराम जयजय राम।
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धर्म
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना
शुभेच्छा
अभिनंदन

प्रतिक्रिया द्या
14827 वाचन

💬 प्रतिसाद (89)

प्रतिक्रिया

नाशकातला काळ्या रामाचा उत्सव

रेवती
Tue, 04/12/2011 - 17:54 नवीन
नाशकातला काळ्या रामाचा उत्सव आठवला.
  • Log in or register to post comments

'काळा राम' मंदिर फार आवडतं

असुर
Tue, 04/12/2011 - 19:00 नवीन
'काळा राम' मंदिर फार आवडतं आपल्याला. आणि मंदिरातील उत्सव! आहाहाहाहा!!! पद्मजा फेणाणी काल येऊन मैफिल करुन गेल्याचं कळलं! --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

नाशिकमधील काळ्यारामाचा महिमा

पक्का इडियट
Tue, 04/12/2011 - 19:23 नवीन
नाशिकमधील काळ्यारामाचा महिमा अपार आहे. अनेकांना देवपूजेला लावतो... http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7932241.cms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर

***********************************

ईन्टरफेल
Tue, 04/12/2011 - 21:12 नवीन
महारस्ट्रात आलेला पहिला भैया कोन?
  • Log in or register to post comments

सरदारजीचा विनोद आठवला...

योगप्रभू
Tue, 04/12/2011 - 21:41 नवीन
हनुमान कुणाचा यावरुन एक हिंदू, एक मुसलमान व एक सरदार यांच्यात वाद सुरु असतो. हिंदू म्हणतो, की हनुमानाच्या गळ्यात जानवे आहे आणि कपाळाला टिळा आहे, म्हणजे तो हिंदूच आहे. त्यावर मुसलमान म्हणाला, ' पण त्याचे नाव बघा. ही अशी नावे म्हणजे रहमान, सुलेमान आमच्यातच असतात. पुन्हा आम्ही मुसलमान म्हणून ओळखले जातो. म्हणून हनुमान पण मुसलमान असणार. शेवटी सरदारजी म्हणाला, 'अरे यारो! झगडा मत करो. किसी दुसरेकी बीबी, भगाई किसी तिसरेने और इसने खामखा अपनी पूंछ जला डाली. यकीनन हनुमान तो सरदारही होगा.' (विनोद आहे हलके घ्या) तर ही चर्चा वाचताना मनात आले, की बायको रामाची, तिला वनात सोडल्यावर ते दोघे आणि त्यांचे नातलग बघून घेतील की. आपला संबंध नाही तिथे कशाला पिसे फुलवून थयथयाट करायचा? एकतर राम काही शाळा कॉलेजात गेला नव्हता. तेव्हाच्या प्रचलित रुढींच्या चौकटीत त्याने जे केले त्याची चिकित्सा पाच हजार वर्षानंतरच्या सुधारित निकषांवर करणे अजबच आहे. तसं बघायला गेलं तर मलाही कृष्णाचा फार फार म्हणजे फारच राग येतो. आमच्या नशिबात एकच, पण याला मात्र खुशाल १६१०८ बायका. सरासर नाईन्साफी :)
  • Log in or register to post comments

LOL! भारी!

यशोधरा
Tue, 04/12/2011 - 21:45 नवीन
LOL! भारी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

एकीचे नखरे भागवा मग पुढचं बघु

शिल्पा ब
Tue, 04/12/2011 - 21:49 नवीन
एकीचे नखरे भागवा मग पुढचं बघु ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

क्या करेगा पांडू?

योगप्रभू
Tue, 04/12/2011 - 22:00 नवीन
श्रीकृष्णाच्या बायका कशा आज्ञाधारक होत्या. सेवा करायला नाही म्हणायच्या नाहीत. फार नखरेपण नसायचे. :) जाऊदे असतं एकेकाचं नशीब.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

आज रामनवमी आहे तेव्हा रामावर बोलूया.....! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 04/12/2011 - 22:06 नवीन
श्रीकृष्ण जन्माष्टमीला श्रीकृष्णाच्या मागे लागूया ! :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

" बिरुटे पंचमी " कधी आहे ?

टारझन
Tue, 04/12/2011 - 23:07 नवीन
" बिरुटे पंचमी " कधी आहे ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जय श्रीराम!!! बाकी

प्रीत-मोहर
Tue, 04/12/2011 - 21:59 नवीन
जय श्रीराम!!! बाकी चालुद्यात ----------
  • Log in or register to post comments

काय सॉल्लिड चालू आहे

प्राजु
Tue, 04/12/2011 - 23:21 नवीन
काय सॉल्लिड चालू आहे सिनेमा!! चालूद्या! माझ्यासाठी ,श्रीराम हा एक आदर्श राजपुत्र आणि मग नंतर आदर्श राजा होता. बस्स!
  • Log in or register to post comments

हे राऽऽम!!!

धमाल मुलगा
Tue, 04/12/2011 - 23:28 नवीन
प्रभु रामचंद्रांनी हे सगळं वाचलं तर म्हणतील, 'बा हनुमंता, उचल ती गदा आणि हाण माझ्याच डोक्यात!' अरे, काय चाललंय काय? कशाचा कशाला काही धरबंध? हे म्हंजे, 'रानात लावली कपाशी अन पोरं घरी उपाशी' अशी गत झाली की! असो! हे दयाघना, हे नीलकांती पुरुषोत्तमा, ह्या अजाण लेकरांना माफ कर. आजच्या मुहुर्तावर माझा तुला प्रणाम! हे रघुनंदना, तुझ्या अंगच्या गुणांपैकी एक सहंस्त्रांश तरी मज अंगी बाणवले जावे असा आशिर्वाद दे भगवंता!!!!
  • Log in or register to post comments

वा वा रामनवमी!

चतुरंग
Tue, 04/12/2011 - 23:34 नवीन
नगरच्या लेले ह्यांच्या देवळातला रामनवमीचा उत्सव आठवला! सकाळपासून गडबड असायची. आम्ही लवकर आंघोळी करुन देवळात जायचो. फुलांची सजावट, मखर करणे सगळे मन लावून बघायचे. त्यादिवशी देवाला नवीन वस्त्रे असत. पाळणा बांधून फुलांची सजावट असे. मग हळूहळू गर्दी होई. देवळात पाय ठेवायला जागा उरत नसे. कीर्तन असे. बाराला रामजन्म झाला की मोठ्या आवाजात रामनामाचा गजर होई. घंटा, थाळे, झांजा ह्यांचा मोठा आवाज फार भारी वाटायचा! गीतरामायण लावलेले असे. सुंठवडा वाटला जाई. लेले आजी खडिसाखर द्यायच्या. चटचटणार्‍या उन्हातून चपला न घालता पळत पळत घरी यायचं. मग जेवणं करुन खेळायला पळायचं. कैर्‍यांचे दिवस असल्याने आईने स्वयंपाकातच कैर्‍या उकडलेल्या असत त्याचं पन्हं व्हायचं. वेलदोडा, गूळ घालून केलेलं तांबूस पिवळसर कैरीचे पन्हे हाणून पोटोबा थंड करायचा की पुन्हा खेळायला पळायचे. संध्याकाळी कैरीची डाळ खायची आणि मगच दिवस संपायचा! सगळं सगळं अगदी आत्ता घडल्यासारखं आठवतंय! :) -चैत्ररंग
  • Log in or register to post comments

मी असे म्हणतो.

चिंतामणी
Tue, 04/12/2011 - 23:43 नवीन
हे मिपावर, हे नीलकांत घुमारेकुलोत्पन्ना, ह्या अजाण लेकरांना माफ कर, आजच्या मुहुर्तावर फक्त पोस्ट डिलीट कर!
  • Log in or register to post comments

लहानपणी डोंबिवली वेस्ट येथे

निनाद मुक्काम …
Wed, 04/13/2011 - 03:02 नवीन
लहानपणी डोंबिवली वेस्ट येथे घैसास ह्यांच्या पाळणाघरात आमच्या मावश्या दुपारी आम्हाला( कमीत कमी ४० पोर ) दामटवून झोपवत व मग वहीत '' श्रीराम जयराम जयजय राम '' असे लिहित '' त्या माझ्या मते १५ वर्षाहून अधिक काळ भर दुपारी हे लिखाण करत असे मग जरा मोठे झाल्यावर कळले .( त्यांनी लहानपणी रामरक्षा, बालोपासना) शिकवली ) आज रामरक्षा आठवत नाही ह्याबद्दल स्वतःची लाज वाटते .) आमचे अकोल्याचे मामा कारसेवक. .मंदीर झाले नाही पण ह्यांच्या केसेस झाल्या . मुंबईत केस ची तारीख असली की कुर्ल्यात आमच्याकडे मुक्काम असायचा .( जुन्या आठवणीना उजाळा मिळाला .) आज रामनवमी होती हेच मुळी मला माहीत नव्हते .( वृत्तपत्रात पहिल्या पानावर पांडे पुराण पण रामनवमीचा उल्लेख नाही ) लेख मालकाचे विशेष आभार . ''जय श्रीराम ''
  • Log in or register to post comments

श्रीराम जयराम जयजय राम!

प्यारे१
Fri, 04/19/2013 - 18:05 नवीन
श्रीराम जयराम जयजय राम! (हसू येतंय आज वरचं सगळं वाचून. डॉ. बाबासाहेब काय नि राम काय! दोघांनाही तोफांच्या तोंडी देणं चाललंय.)
  • Log in or register to post comments

+१

महेश हतोळकर
Fri, 04/19/2013 - 19:10 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

जय श्रीराम..

उपास
Fri, 04/19/2013 - 18:38 नवीन
श्रीरामचंद्रचरणौ मनसा स्मरामि| श्रीरामचंद्रचरणौ वचसा गृणामि| श्रीरामचंद्रचरणौ शिरसा नमामि| श्रीरामचंद्रचरणौ शरणं प्रपद्ये|| गिरगावातले काळ्यारामाचे/ गोर्‍यारामाचे रामजन्माचे उत्सव म्हणजे थाटच. सुंठवडा, पन्हे.. जुने दिवस आठवले.. राम जन्मला ग सखे राम जन्मला हे गीत आकाशवाणीवर लागायचेच.. - उपास
  • Log in or register to post comments

चैत्रमास, त्यांत शुद्ध नवमि

शुचि
Fri, 04/19/2013 - 19:23 नवीन
चैत्रमास, त्यांत शुद्ध नवमि ही तिथी गंधयुक्‍त तरिहि वात उष्ण हे किती ! दोन प्रहरिं कां ग शिरीं सूर्य थांबला ? राम जन्मला ग सखी राम जन्मला खरच इवलासं देखणं बाळ पाहायला सूर्यही पळभर थांबला - काय गोड कल्पना आहे.
  • Log in or register to post comments

ह्या अजाण लेकरांना माफ कर रे रामा !!!

भटक्य आणि उनाड
Fri, 04/19/2013 - 19:24 नवीन
श्रीराम जयराम जयजय राम! श्रीराम जयराम जयजय राम! श्रीराम जयराम जयजय राम! श्रीराम जयराम जयजय राम! श्रीराम जयराम जयजय राम!
  • Log in or register to post comments

हे रामप्रभू !

सस्नेह
Fri, 04/19/2013 - 23:05 नवीन
आपण शरयूप्रवेश का केलात याचं खरं कारण आज समजलं...! Image removed.
  • Log in or register to post comments

राम ही तो करुणा में हैं,

अप्रतिम
Fri, 04/19/2013 - 23:39 नवीन
राम ही तो करुणा में हैं, शान्ति में राम हैं राम ही हैं एकता में, प्रगती में राम हैं राम बस भक्तों नहीं, शत्रु की भी चिंतन में हैं देख तज के पाप रावण, राम तेरे मन में हैं राम तेरे मन में हैं, राम मेरे मन में हैं राम तो घर घर में हैं, राम हर आँगन में हैं मन से रावण जो निकाले, राम उसके मन में हैं....
  • Log in or register to post comments

जय रामजी कि !!

अर्धवटराव
Sat, 04/20/2013 - 02:06 नवीन
राम... बस नाम हि काफि है. बाकि सीतेसंबंधी रामाने केलेल्या अत्याचारांच्या कहाण्या वाचुन भडभडून येतं. राम व सीता... पति-पत्निच्या नात्यात गुंफलेली दोन शरीरे - एक मन. त्या दोघांची सुख-दु:खे स्वतंत्र तपासणे हे मुळातच चुक. व्यक्तीस्वातंत्र्याच्या अपरिपक्व कल्पना विलासामुळे एका अत्यंत तरल पण प्रचंड सशक्त अशा भावबंधाच्या मुकतो आपण. असो. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

+१

यशोधरा
Sat, 04/20/2013 - 13:00 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

रामनवमी च्या उत्सव आमच्या

निनाद मुक्काम …
Sat, 04/20/2013 - 02:25 नवीन
रामनवमी च्या उत्सव आमच्या बटाट्याच्या चाळीत नेहमीच उत्साहात साजरा करतात. मराठमोळी रामनवमी तर वर्षोवर्ष मुंबईत राहणारे आमच्या चाळीचा अविभाज्य भाग असणारे काही उत्तर भारतीय कुटुंब सुद्धा रामनवमी उत्साहात साजरी करायचे. तेव्हा त्याच्याकडे ऐकलेल्या ह्या भजनाची आज ह्या धाग्याच्या निमित्ताने आठवण झाली.
  • Log in or register to post comments

टळटळित दुपारी जन्मला रामराणा

बॅटमॅन
Sat, 04/20/2013 - 02:33 नवीन
टळटळित दुपारी जन्मला रामराणा | म्हणुनि सकळ गाती ठाउके हे पुराणां | दशरथगृहमाथां सूर्य आला अहो तो | कुलतिलक पहाया तोचि मध्यान्ह होतो || - वामनपंडित. बाकी यथेच्छ रामायण झालेले पाहून मजा वाटली. अवांतरः रामही भारी, पण आमचे मत द्वारकाधीशाला :) त्याच्यावर असला प्रसंग आला असता तर उलटी युक्ती करून त्या धोब्यालाच अयोध्येतून हाकलला असता :)
  • Log in or register to post comments

त्याच्यावर असला प्रसंग आला

आदूबाळ
Sat, 04/20/2013 - 03:34 नवीन
त्याच्यावर असला प्रसंग आला असता तर उलटी युक्ती करून त्या धोब्यालाच अयोध्येतून हाकलला असता
हे बाकी खरं ... स्यमंतक मण्याची गोष्ट, जयद्रथाचं शीर त्याच्या बापाच्या मांडीत पडेल अशी ऐड्या काढणे वगैरे भारी डोकं लावतात किसनराव...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

बॅमॅ अन आबां शी अत्यंत सहमत!!

शुचि
Sat, 04/20/2013 - 06:49 नवीन
बॅमॅ अन आबां शी अत्यंत सहमत!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

कुणी नीलकांत कुणी तात्या ....

प्यारे१
Sat, 04/20/2013 - 19:00 नवीन
कुणी नीलकांत कुणी तात्या .... चालायचंच! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

स्वतःच्या बायकोच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या कोण्या धोब्याच्या

नौशाद उस्मान
Sat, 04/20/2013 - 11:31 नवीन
सहमत ताई! यावरुन मला प्रेशित मुह्म्मद सलम आठवले. त्यांची पत्नी आयेशावरदेखील त्यांनी संशय घेतला होता. पण प्रेषितांनी त्याकडे लक्ष दिले नाही. त्यानंतर ईश्वराकडून त्यांच्यावर हा श्लोक अवतरीत झाला- ''जे लोक शीलवान, अजाण श्रद्धावंत स्त्रियांवर आळ घेतात त्यांचा इहलोक व परलोकात धिक्कार केला गेला आणि त्यांच्यासाठी मोठा प्रकोप आहे. त्यांनी त्या दिवसाला विसरू नये की जेव्हा त्यांच्या स्वत:च्या जिभा, त्यांचे हात, पाय त्यांच्या कृत्यांची साक्ष देतील. त्या दिवशी अल्लाह तो बदला त्यांना पुरेपूर देईल ज्याला ते पात्र आहेत आणि त्यांना माहीत होईल की अल्लाहच सत्य आहे, खNयाला खरे करून दाखविणारा. - कुराण २४ : २३/२५
  • Log in or register to post comments

आयेशावरदेखील त्यांनी संशय घेतला होता

नौशाद उस्मान
Sat, 04/20/2013 - 11:33 नवीन
कृपया इथे एक चूक दुरुस्त करा, त्यांनी ऐवजी काही लोकांनी पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नौशाद उस्मान

>>> रामनवमीच्या दिवशी मर्यादा

श्रीगुरुजी
Sat, 04/20/2013 - 12:00 नवीन
>>> रामनवमीच्या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम राम जन्मले. सर्वार्थाने आदर्श एक माणूस आणि त्याचे चरित्र म्हणूनही जर रामचरित्राचा वापर केला तरी आपली नैय्या पार व्हावी एवढी शक्ती त्यामध्ये आहे. श्रीप्रभूरामचंद्र गेली अनेक सहस्त्रके भारतीयांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. प्रभू श्रीरामांना भारतीयांच्या जीवनापासून विलग करता येणार नाही. एखादी व्यक्ती गेली की "त्याने/तिने शेवटचा राम म्हटला" असे म्हटले जाते. एखाद्या गोष्टीचे महत्त्व संपले की "आता त्याच्यात काही राम नाही राहिला" असे साहजिकच तोंडात येते. गांधीजींचे शेवटचे शब्द "हे राम" होते असे म्हणतात. श्रीरामनवमीच्या (उशिराने का होईना) सर्वांना शुभेच्छा! >>> मोराच्या फुललेल्या पिसार्‍याकडे लक्ष न देता त्याच्या मागे उभे राहून नको त्या गोष्टी बघणे आवडत असेल तर काय करणार???? सहमत
  • Log in or register to post comments

देव जन्मतो का कधी ?

नौशाद उस्मान
Sat, 04/20/2013 - 12:13 नवीन
''इश्वर का जनम होता है ऐसा कनेवाले की जिभ जल कर राख हो जाये'' - गुरुनानक जी
  • Log in or register to post comments

त्याच गुरुनानकांनी

अर्धवटराव
Sun, 04/21/2013 - 09:07 नवीन
आजन्म रामभक्ती केली. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नौशाद उस्मान

आपल्या देवाचा तर जन्म झाला होता बुवा....

बाबा पाटील
Sat, 04/20/2013 - 12:43 नवीन
इ.स.सनाच्या १६ व्या शतकात माझ्या एका देवाचा जन्म झाला ज्याने या भारतभुमीला स्वराज्य आनुन दाखवल.आणी दुसरा देव सध्या कसोटी क्रिकेट मध्ये भारताकडुन ४ थ्या नंबरवर फलंदाजी करतो.त्यामुळे देव जन्म घेतो आपला तर विश्वास आहे बुवा....
  • Log in or register to post comments

आपल्या देवाचा तर जन्म झाला होता?

नौशाद उस्मान
Sat, 04/20/2013 - 13:22 नवीन
जो जन्मतो तो मरतोच! भावनेच्या भरात कुनि कबुल करत नाहि, पन जन्मनार्या प्रत्येक महापुरुशाला, पैगम्बराला म्र्युतु तालता आलेला नाहि, हे कतु सत्य आहे. जिवन्त फक्त निर्गुन निराकार इश्वरच (अल्लाहच)!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

बाजार आहे नुसता..

सुजित पवार
Sat, 04/20/2013 - 13:50 नवीन
इथे फक्त चर्चाच होते.. त्यातुन निश्पन्न काहि होते असे आजिबत वाटत नाहि...दिवसिन्दिवस इथे यायला नको वाटते आहे.....खुप आपुलकि आहे या स्थला बद्दल्... ति नक्किच कमि होते आहे
  • Log in or register to post comments

श्रीराम जय राम जय जय राम !

धन्या
Sat, 04/20/2013 - 15:41 नवीन
श्रीराम जय राम जय जय राम !
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा