Skip to main content

जय श्रीराम...!!!

लेखक प्यारे१ यांनी मंगळवार, 12/04/2011 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
प्रभू रामचंद्र की जय! रामनवमीच्या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम राम जन्मले. सर्वार्थाने आदर्श एक माणूस आणि त्याचे चरित्र म्हणूनही जर रामचरित्राचा वापर केला तरी आपली नैय्या पार व्हावी एवढी शक्ती त्यामध्ये आहे. रघुकुलवीर श्रीराम आपल्या कृपेने समस्त लोकांचे सर्वार्थाने कल्याण करोत हीच प्रार्थना. श्रीराम जयराम जयजय राम। श्रीराम जयराम जयजय राम। श्रीराम जयराम जयजय राम। श्रीराम जयराम जयजय राम। श्रीराम जयराम जयजय राम।
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 14908
प्रतिक्रिया 89

प्रतिक्रिया

श्रीराम जयराम जयजय राम! श्रीराम जयराम जयजय राम! श्रीराम जयराम जयजय राम! श्रीराम जयराम जयजय राम! श्रीराम जयराम जयजय राम!

आपण शरयूप्रवेश का केलात याचं खरं कारण आज समजलं...! a

राम ही तो करुणा में हैं, शान्ति में राम हैं राम ही हैं एकता में, प्रगती में राम हैं राम बस भक्तों नहीं, शत्रु की भी चिंतन में हैं देख तज के पाप रावण, राम तेरे मन में हैं राम तेरे मन में हैं, राम मेरे मन में हैं राम तो घर घर में हैं, राम हर आँगन में हैं मन से रावण जो निकाले, राम उसके मन में हैं....

राम... बस नाम हि काफि है. बाकि सीतेसंबंधी रामाने केलेल्या अत्याचारांच्या कहाण्या वाचुन भडभडून येतं. राम व सीता... पति-पत्निच्या नात्यात गुंफलेली दोन शरीरे - एक मन. त्या दोघांची सुख-दु:खे स्वतंत्र तपासणे हे मुळातच चुक. व्यक्तीस्वातंत्र्याच्या अपरिपक्व कल्पना विलासामुळे एका अत्यंत तरल पण प्रचंड सशक्त अशा भावबंधाच्या मुकतो आपण. असो. अर्धवटराव

रामनवमी च्या उत्सव आमच्या बटाट्याच्या चाळीत नेहमीच उत्साहात साजरा करतात. मराठमोळी रामनवमी तर वर्षोवर्ष मुंबईत राहणारे आमच्या चाळीचा अविभाज्य भाग असणारे काही उत्तर भारतीय कुटुंब सुद्धा रामनवमी उत्साहात साजरी करायचे. तेव्हा त्याच्याकडे ऐकलेल्या ह्या भजनाची आज ह्या धाग्याच्या निमित्ताने आठवण झाली.

टळटळित दुपारी जन्मला रामराणा | म्हणुनि सकळ गाती ठाउके हे पुराणां | दशरथगृहमाथां सूर्य आला अहो तो | कुलतिलक पहाया तोचि मध्यान्ह होतो || - वामनपंडित. बाकी यथेच्छ रामायण झालेले पाहून मजा वाटली. अवांतरः रामही भारी, पण आमचे मत द्वारकाधीशाला :) त्याच्यावर असला प्रसंग आला असता तर उलटी युक्ती करून त्या धोब्यालाच अयोध्येतून हाकलला असता :)

In reply to by बॅटमॅन

त्याच्यावर असला प्रसंग आला असता तर उलटी युक्ती करून त्या धोब्यालाच अयोध्येतून हाकलला असता
हे बाकी खरं ... स्यमंतक मण्याची गोष्ट, जयद्रथाचं शीर त्याच्या बापाच्या मांडीत पडेल अशी ऐड्या काढणे वगैरे भारी डोकं लावतात किसनराव...

सहमत ताई! यावरुन मला प्रेशित मुह्म्मद सलम आठवले. त्यांची पत्नी आयेशावरदेखील त्यांनी संशय घेतला होता. पण प्रेषितांनी त्याकडे लक्ष दिले नाही. त्यानंतर ईश्वराकडून त्यांच्यावर हा श्लोक अवतरीत झाला- ''जे लोक शीलवान, अजाण श्रद्धावंत स्त्रियांवर आळ घेतात त्यांचा इहलोक व परलोकात धिक्कार केला गेला आणि त्यांच्यासाठी मोठा प्रकोप आहे. त्यांनी त्या दिवसाला विसरू नये की जेव्हा त्यांच्या स्वत:च्या जिभा, त्यांचे हात, पाय त्यांच्या कृत्यांची साक्ष देतील. त्या दिवशी अल्लाह तो बदला त्यांना पुरेपूर देईल ज्याला ते पात्र आहेत आणि त्यांना माहीत होईल की अल्लाहच सत्य आहे, खNयाला खरे करून दाखविणारा. - कुराण २४ : २३/२५

In reply to by नौशाद उस्मान

कृपया इथे एक चूक दुरुस्त करा, त्यांनी ऐवजी काही लोकांनी पाहिजे.

>>> रामनवमीच्या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम राम जन्मले. सर्वार्थाने आदर्श एक माणूस आणि त्याचे चरित्र म्हणूनही जर रामचरित्राचा वापर केला तरी आपली नैय्या पार व्हावी एवढी शक्ती त्यामध्ये आहे. श्रीप्रभूरामचंद्र गेली अनेक सहस्त्रके भारतीयांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. प्रभू श्रीरामांना भारतीयांच्या जीवनापासून विलग करता येणार नाही. एखादी व्यक्ती गेली की "त्याने/तिने शेवटचा राम म्हटला" असे म्हटले जाते. एखाद्या गोष्टीचे महत्त्व संपले की "आता त्याच्यात काही राम नाही राहिला" असे साहजिकच तोंडात येते. गांधीजींचे शेवटचे शब्द "हे राम" होते असे म्हणतात. श्रीरामनवमीच्या (उशिराने का होईना) सर्वांना शुभेच्छा! >>> मोराच्या फुललेल्या पिसार्‍याकडे लक्ष न देता त्याच्या मागे उभे राहून नको त्या गोष्टी बघणे आवडत असेल तर काय करणार???? सहमत

''इश्वर का जनम होता है ऐसा कनेवाले की जिभ जल कर राख हो जाये'' - गुरुनानक जी

इ.स.सनाच्या १६ व्या शतकात माझ्या एका देवाचा जन्म झाला ज्याने या भारतभुमीला स्वराज्य आनुन दाखवल.आणी दुसरा देव सध्या कसोटी क्रिकेट मध्ये भारताकडुन ४ थ्या नंबरवर फलंदाजी करतो.त्यामुळे देव जन्म घेतो आपला तर विश्वास आहे बुवा....

In reply to by बाबा पाटील

जो जन्मतो तो मरतोच! भावनेच्या भरात कुनि कबुल करत नाहि, पन जन्मनार्या प्रत्येक महापुरुशाला, पैगम्बराला म्र्युतु तालता आलेला नाहि, हे कतु सत्य आहे. जिवन्त फक्त निर्गुन निराकार इश्वरच (अल्लाहच)!

इथे फक्त चर्चाच होते.. त्यातुन निश्पन्न काहि होते असे आजिबत वाटत नाहि...दिवसिन्दिवस इथे यायला नको वाटते आहे.....खुप आपुलकि आहे या स्थला बद्दल्... ति नक्किच कमि होते आहे