✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जय श्रीराम...!!!

प
प्यारे१ यांनी
Tue, 04/12/2011 - 09:49  ·  लेख
लेख
प्रभू रामचंद्र की जय! रामनवमीच्या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम राम जन्मले. सर्वार्थाने आदर्श एक माणूस आणि त्याचे चरित्र म्हणूनही जर रामचरित्राचा वापर केला तरी आपली नैय्या पार व्हावी एवढी शक्ती त्यामध्ये आहे. रघुकुलवीर श्रीराम आपल्या कृपेने समस्त लोकांचे सर्वार्थाने कल्याण करोत हीच प्रार्थना. श्रीराम जयराम जयजय राम। श्रीराम जयराम जयजय राम। श्रीराम जयराम जयजय राम। श्रीराम जयराम जयजय राम। श्रीराम जयराम जयजय राम।
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धर्म
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना
शुभेच्छा
अभिनंदन

प्रतिक्रिया द्या
14827 वाचन

💬 प्रतिसाद (89)

प्रतिक्रिया

जय श्रीराम!

सहज
Tue, 04/12/2011 - 10:07 नवीन
सुंठवडा आठवून ड्वोळे पाणाव्ले
  • Log in or register to post comments

श्रीराम जयराम जयजय राम।

स्पा
Tue, 04/12/2011 - 10:15 नवीन
श्रीराम जयराम जयजय राम।
  • Log in or register to post comments

स्वतःच्या बायकोच्या

शिल्पा ब
Tue, 04/12/2011 - 10:17 नवीन
स्वतःच्या बायकोच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या कोण्या धोब्याच्या मताचा आदर म्हणून तिला परत वनवासात पाठवणाऱ्या रामाचा मला अजिबात आदर नाही. आजकाल असे राम याही पुढे जाऊन बायकोचा खून करायला मागे पुढे पहात नाहीत. आपले महत्त्व ओळखून असलेल्या रामाने आपल्या स्त्रीवर विश्वास दाखवावा असा आदर्श निर्माण करण्याऐवजी उगाचच एखाद्या अनोळखी माणसाने संशय घेतल्या कारणाने तिला (पोटुशी असतानाही आणि १४ वर्ष काहीही चूक नसताना वनवासात काढले तरी) सोडून देण्याचा आदर्श ठेवला यातच काय ते आले. तरीही ज्यांना तो अनुकरणीय वाटतो त्यांना शुभेच्छा. (शेवटी इतिहास पुरुषांनी लिहिलेला आहे.)
  • Log in or register to post comments

कल्याणमस्तु....!!!

प्यारे१
Tue, 04/12/2011 - 10:24 नवीन
नवीन धागा काढावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

निर्णय घ्यायला मी समर्थ आहे,

शिल्पा ब
Tue, 04/12/2011 - 10:27 नवीन
निर्णय घ्यायला मी समर्थ आहे, काळजी नसावी. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

पुन्हा एकदा....

प्यारे१
Tue, 04/12/2011 - 10:41 नवीन
कल्याणमस्तु!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

शिल्पा ताई, (निदान आजच्या

नरेशकुमार
Tue, 04/12/2011 - 10:47 नवीन
शिल्पा ताई, (निदान आजच्या दिवशी तरी) थोडं दमानी घ्या. रामाच्या नावानी आज घरात माझी ही गोड्धोड करुन राहीली आहे. बादवे रामानी सितेला सोडली नव्हती, सिताच निघुन गेली होति. : इती : लव-कुश बाय रामानंद सागर. पन जे काय झालतं ते लयी वाईट झालं (होत). पन आपन त्यातुन चांगल घेउया. हो ना ? श्री राम जय राम....जय जय राम !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

हे राम..

गवि
Tue, 04/12/2011 - 10:50 नवीन
हे राम.. १००+ (+१०० नव्हे हे कृ ल घे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

स्वतःच्या

प्रचेतस
Tue, 04/12/2011 - 11:00 नवीन
स्वतःच्या बायकोला पळवून १ वर्ष कैदेत ठेवणार्‍या रावणाविरुद्ध समुद्रापार जाउन युद्ध करून तिला परत आणणारा तो मर्यादापुरुषोत्तम श्रीरामच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

मनाला अतिशय यातना झाल्या ही प्रतिक्रीया वाचुन

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 04/12/2011 - 11:34 नवीन
रामनवमी आहे म्हणुन मोठ्या उत्साहाने धागा उघडला होता. पण त्याचे अधीच मातेरे झालेले पाहुन अतिशय वाईट वाटले. कदाचीत झालीही असेल चुक रामाची, पण त्या मुळे त्याने केलेल्या इतर कार्याचे महत्व कमी होते असे मला वाटत नाही. पुरुष स्त्री हा वादाचा उल्लेखही अप्रस्तुत वाटला. आजच्या कलीयुगात रामाची जशी गरज आहे तशी शुर्पणखेचे नाक कापणार्‍या लक्ष्मणाची पण आहे याची प्रकर्षाने जाणिव झाली. राम सर्वांचे कल्याण करो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

माऊलि, धोबी (वृत्ती) फक्त

प्यारे१
Tue, 04/12/2011 - 11:48 नवीन
माऊलि, धोबी (वृत्ती) फक्त रामकालातच होते/ ती असे कोणी सांगितले तुम्हाला....???? चालायचंच. मोराच्या फुललेल्या पिसार्‍याकडे लक्ष न देता त्याच्या मागे उभे राहून नको त्या गोष्टी बघणे आवडत असेल तर काय करणार????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

<<<आजच्या कलीयुगात रामाची जशी

शिल्पा ब
Tue, 04/12/2011 - 19:25 नवीन
<<<आजच्या कलीयुगात रामाची जशी गरज आहे तशी शुर्पणखेचे नाक कापणार्‍या लक्ष्मणाची पण आहे याची प्रकर्षाने जाणिव झाली. अशा लोकांची कमी नाहीच...स्वतःचे मत असणारे फारच थोडे लोक असतात. बाकी रामाने काय मोठे काम केले आहे? रावणाशी युद्ध त्याची स्त्री परत मिळवण्यासाठीच केले लोकसेवा म्हणुन नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

जय श्रीराम!!! जय

मराठमोळा
Tue, 04/12/2011 - 11:44 नवीन
जय श्रीराम!!! जय सीताराम!! शिल्पा ताई, रामाचा तो निर्णय एका पतीचा नव्हता. तो निर्णय पतीपेक्षा मोठ्या जबाबदारीच्या पदावर असलेल्या राजाला घ्यावा लागला होता. स्पायडर मॅन सिनेमामधला एक ड्वायलॉक आठवला.. Great Power comes with Great Responsibility. रामाला स्वतःच्या पत्नीच्या चारित्र्यावर कणभरही शंका नव्हती, पण त्यावेळच्या परिस्थितीमधे एका राजाने जे करणे योग्य होते तेच रामाने केले, रामाला किती यातना झाल्या असतील ते प्रभू श्रीरामच जाणे. आपण जसे रामाच्या निर्णयावर पटकन शंका घेतलीत आणि अनादर करुन मोकळ्या झाल्यात तशीच एका त्या अनोळखी व्यक्तीने विचार न करता सीतामाईच्या चारित्र्यावर पटकन शंका घेतली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

ममो, मस्त आणि नेमके. सीतेला

यशोधरा
Tue, 04/12/2011 - 11:49 नवीन
ममो, मस्त आणि नेमके. सीतेला वनवासात सोडायचा आदेश दिल्यापासून श्रीरामानेही वैयक्तिकरीत्या राजवाड्यात राहून "वनवासातले" जिणे पत्करले होते असे वाचलेले आठवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

<<<आपण जसे रामाच्या निर्णयावर

शिल्पा ब
Tue, 04/12/2011 - 19:30 नवीन
<<<आपण जसे रामाच्या निर्णयावर पटकन शंका घेतलीत अगदी अगदी...कालपरवाच घडलेली घटना आहे त्यामुळे शंका जरा पटकनच घेतली म्हणायची. आता जरा स्पायडरमॅन पाहुन ज्ञान वाढवते. Great Power comes with Great Responsibility. याच्याशी सहमत. बाकी नेमका काय विचार करून बायकोला सोडायचा निर्णय घेतला म्हणता? आणि तो जर योग्य असेल तर धन्यच म्हणायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

स्वतःच्या बायकोच्या

पक्का इडियट
Tue, 04/12/2011 - 13:09 नवीन
स्वतःच्या बायकोच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या कोण्या धोब्याच्या मताचा आदर म्हणून तिला परत वनवासात पाठवणाऱ्या रामाचा मला अजिबात आदर नाही. अगदी सहमत आहे. रेल्वे अपघातात स्वतःचा काही संबंध नसतांना नैतिकतेच्या कारणावरून राजीनामा देणारे लालबहादूरशास्त्रींबद्दल सुद्धा मला आदर नाही. * पण काय करणार ? मी रहातो त्या परिसरातील बिनडोक लोकांना दोघांबद्दल आदर आहे. :) वर तुम्ही उद्धृत केलेला धोब्याचे मत, त्याचा परिणाम, सीतेचा त्याग इत्यादी वाल्मिकी रामायणातील कोणत्या कांडात, कोणत्या सर्गात आहे, ते श्लोक, तो सर्ग, ते कांड तज्ञ लोक मूळ रामायणातले मानतात का? भवभुतीच्या नाटकाचा रामायण कथेवर काय परिणाम झाला असले प्रश्न मी विचारणार नाही. कारण तुम्हाला त्याची उत्तरे माहित नसणार याची पूर्ण खात्री आहे. जय श्रीराम !! * शास्त्रींबद्दलचे वाक्य उपरोधाने होते हे सुज्ञांना कळले असेलच, बाकीच्यांना आता कळावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

वरील सर्व गोष्टी ऐकीव आहेत असे गृहित धरुन...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 04/12/2011 - 13:18 नवीन
वर तुम्ही उद्धृत केलेला धोब्याचे मत, त्याचा परिणाम, सीतेचा त्याग इत्यादी वाल्मिकी रामायणातील कोणत्या कांडात, कोणत्या सर्गात आहे, ते श्लोक, तो सर्ग, ते कांड तज्ञ लोक मूळ रामायणातले मानतात का? आपणच आमचे आणि मिपाकरांचे रावनवमीनिमित्त प्रबोधन करावे ही नम्र विनंती. बाय द वे, जालावर वरीजनल रामायण कुठे वाचायला मिळेल. सुबोध अर्थासहित. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्का इडियट

तज्ज्ञांच्या मते दशरथाकडे

पक्का इडियट
Tue, 04/12/2011 - 13:26 नवीन
तज्ज्ञांच्या मते दशरथाकडे विश्वामित्रांनी केलेली रामाची मागणी इथपासून सुरु झालेले रामायण (राम + अयन ) {अयन म्हणजे प्रवास} रामाने लंकेत रावणाचा वध केल्यावर अयोध्येला परत आल्यावर झालेला राज्याभिषेक हाच मूळ रामायणाचा गाभा आहे. बालकांडातील रामलीला, उत्तर कांडातील सीतेचे डोहाळे, त्याग, जंबुकाचा वध, लक्ष्मणाचा त्याग, रामाचे सरयु नदीत आत्मसमर्पण हे सर्व तसेच मधल्या कथेतील अनेक भाग हे प्रक्षिप्त असल्याचे मानले जाते. मात्र सर्वसामान्य माणुस (माझ्यासह) हे सर्व असेच घडले होते असे मानतो. रामाला देव मानतो. त्याला रामकथा काल्पनिक आहे की खरी याचा काहीही फरक पडत नाही. >>बाय द वे, जालावर वरीजनल रामायण कुठे वाचायला मिळेल. सुबोध अर्थासहित. संस्कृत शिकाच. ;) जय श्रीराम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>तज्ज्ञांच्या मते दशरथाकडे

मराठमोळा
Tue, 04/12/2011 - 13:36 नवीन
>>तज्ज्ञांच्या मते दशरथाकडे विश्वामित्रांनी केलेली रामाची मागणी इथपासून सुरु झालेले रामायण (राम + अयन ) {अयन म्हणजे प्रवास} रामाने लंकेत रावणाचा वध केल्यावर अयोध्येला परत आल्यावर झालेला राज्याभिषेक हाच मूळ रामायणाचा गाभा आहे. बालकांडातील रामलीला, उत्तर कांडातील सीतेचे डोहाळे, त्याग, जंबुकाचा वध, लक्ष्मणाचा त्याग, रामाचे सरयु नदीत आत्मसमर्पण हे सर्व तसेच मधल्या कथेतील अनेक भाग हे प्रक्षिप्त असल्याचे मानले जाते. मात्र सर्वसामान्य माणुस (माझ्यासह) हे सर्व असेच घडले होते असे मानतो. रामाला देव मानतो. त्याला रामकथा काल्पनिक आहे की खरी याचा काहीही फरक पडत नाही. ही शैली ओळखीची आहे असे राहुन राहुन का वाटते ब्वॉ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्का इडियट

>>>>ही शैली ओळखीची आहे असे

पक्का इडियट
Tue, 04/12/2011 - 13:39 नवीन
>>>>ही शैली ओळखीची आहे असे राहुन राहुन का वाटते ब्वॉ? रामकथा कुणीही गायली तरी लवकुशांच्या मुखातुनच ऐकत आहोत असे श्रोत्यांना वाटते असे म्हणतात. जय श्रीराम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

कही तुम वही तो नही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 04/12/2011 - 13:38 नवीन
>>>>संस्कृत शिकाच. हाहाहा. लै भारी .....! बालकांडातील रामलीला, उत्तर कांडातील सीतेचे डोहाळे, त्याग, जंबुकाचा वध, लक्ष्मणाचा त्याग, रामाचे सरयु नदीत आत्मसमर्पण हे सर्व तसेच मधल्या कथेतील अनेक भाग हे प्रक्षिप्त असल्याचे मानले जाते. रामायणाचे खरे अभ्यासक-तज्ञ कोण आहेत ? च्यायला, आम्ही वर्षानुवर्ष जे रामायण ऐकत आलो ते खोट म्हणायचं का ? वरीजनल रामायण कोणतं ? रामायणातला प्रक्षिप्त भाग कोणता यावर एकदा जोरदार काथ्याकूट झाला पाहिजे, असो. आज नको. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्का इडियट

>>>>रामायणाचे खरे

पक्का इडियट
Tue, 04/12/2011 - 13:42 नवीन
>>>>रामायणाचे खरे अभ्यासक-तज्ञ कोण आहेत ? च्यायला, आम्ही वर्षानुवर्ष जे रामायण ऐकत आलो ते खोट म्हणायचं का ? ते कशाला खोटे मानायचे? बौद्धांच्या जातक कथेत रामायणाची वेगळी आवृत्ती आहे. जैनांच्या आगमात वेगळे उल्लेख आहेत. राम सर्वांचा आहे. आपल्या आदर्शांचा प्रसार करण्यासाठी रामकथा प्रत्येकाने गायली आहे. इतिहास तज्ज्ञांना त्यांचे काम करु द्या. ते सांगतील कशी कशी राम कथा बदलत गेली. आपण मान डोलावुन होकार भरायचा आणि जय श्रीराम आवाज द्यायचा. >>>वरीजनल रामायण कोणतं ? रामायणातला प्रक्षिप्त भाग कोणता यावर एकदा जोरदार काथ्याकूट झाला पाहिजे, असो. आज नको. काथ्याकुट करुन फायदा नाही. कोंबडे अंडयाप्रमाणे प्रलंबित प्रश्न आहे तो. कशाला वेळ घालवायचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तज्ञ कोण ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 04/12/2011 - 13:49 नवीन
>>> रामायणाचे खरे अभ्यासक-तज्ञ कोण आहेत ? या विषयी जर काही माहिती मिळाली असती तर बरे झाले असते. आम्ही डॉ.प.वि.वर्तकांचे वास्तव रामायण आणले होते. काही विवेचन वाचल्यावर वेड लागायचे बाकी राहीले होते. [माझं मत आहे] बाकी, खर्रच काही तज्ञांची नावे आणि काही पुस्तके सांगितली असती तर वाचन होईल तेव्हा होईल पण अशी पुस्तके संग्रही ठेवली असती असे म्हणायचे होते...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्का इडियट

आम्ही डॉ.प.वि.वर्तकांचे

मुलूखावेगळी
Tue, 04/12/2011 - 14:07 नवीन
आम्ही डॉ.प.वि.वर्तकांचे वास्तव रामायण आणले होते. काही विवेचन वाचल्यावर वेड लागायचे बाकी राहीले होते. [माझं मत आहे] बाकी,
+११ हो मी पण वाचले थोडेसे, माझ्या घरी हे पुस्तक आणले होते . ५-७ पाने वाचुनच मी बंद केले असले वाचने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पून्हा सांगतो. कोणत्याही

पक्का इडियट
Tue, 04/12/2011 - 14:12 नवीन
पून्हा सांगतो. कोणत्याही तज्ज्ञाचे मत वाचू नका. वाल्मिकी रामायण संस्कृत आणि त्याचा मराठी अनुवाद उपलब्द्ध आहे. ७ कांडांची १० पुस्तके आहेत. साधारणतः ७००-८०० रु खर्च येईल. (सहावा आयोग नो टेन्शन) वाचा. त्यातुन तुमच्या बुद्धीनेच ठरवा काय घ्यायचे; काय सोडायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ते

विकास
Tue, 04/12/2011 - 19:14 नवीन
आम्ही डॉ.प.वि.वर्तकांचे वास्तव रामायण आणले होते. ते "वर्तकी रामायण" ;) जे "वाल्मिकी रामायणा" नंतरचे आहे :-) त्यात त्यांनी रामाने सीतेचा त्याग केला या संदर्भातील मुद्दा मांडताना, सीतेने कसे वनवाश्यांबरोबर निषेध मोर्चा काढला नाही वगैरे शब्दप्रयोग करत करमणूक केली होती. बाकी, सीतात्यागा संदर्भात अनेक वर्षांपुर्वी दुर्गा भागवतांनी मला वाटते लोकसत्ता का (माधव गडकरी असतानाच्या) मुंबई सकाळच्या रविवार आवृतीमधे एक खुप छान लेख लिहीला होता, त्याची आठवण झाली. असो. रामनवमीच्या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत !!

सुहास..
Tue, 04/12/2011 - 19:33 नवीन
बौद्धांच्या जातक कथेत रामायणाची वेगळी आवृत्ती आहे. >>> सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्का इडियट

एकदम बरोबर

चिंतामणी
Wed, 04/13/2011 - 00:01 नवीन
तज्ज्ञांच्या मते दशरथाकडे विश्वामित्रांनी केलेली रामाची मागणी इथपासून सुरु झालेले रामायण (राम + अयन ) {अयन म्हणजे प्रवास} रामाने लंकेत रावणाचा वध केल्यावर अयोध्येला परत आल्यावर झालेला राज्याभिषेक हाच मूळ रामायणाचा गाभा आहे. बालकांडातील रामलीला, उत्तर कांडातील सीतेचे डोहाळे, त्याग, जंबुकाचा वध, लक्ष्मणाचा त्याग, रामाचे सरयु नदीत आत्मसमर्पण हे सर्व तसेच मधल्या कथेतील अनेक भाग हे प्रक्षिप्त असल्याचे मानले जाते. १०० % बरोबर आणि सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्का इडियट

काही हरकत नाही...आपणच

शिल्पा ब
Tue, 04/12/2011 - 19:44 नवीन
काही हरकत नाही...आपणच ज्ञानप्रबोधन करावे ही विनंती (आपल्याला ही सगळी माहीती असेलच असे गृहीत धरते, त्यानिमीत्ताने खरे रामायण कोणते याचा तरी उलगडा होईल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्का इडियट

श्री प्यारे१ यांची माफी मागुन अवांतर प्रतिसादावर अवांतर :

टारझन
Tue, 04/12/2011 - 13:54 नवीन
हा हा हा :) शिल्पा काकुंचे कॉमेडी प्रतिसाद मला नेहमीच भुरळ घालत असतात ... अगदी पोट दुखेस्तो हसवलेत . अजुन एक अशीच कॉमेडी करण्याचा छोटासा प्रयत्न सिता ही मुर्ख स्त्री होती. तिचा आघाऊपणा लक्षात घेऊनच रामाने लक्ष्मणाला कुटी मधे प्रोटेक्शन साठी ठेवले होते. नंतर जेंव्हा मारिच ने रामाची मिमिक्री करुन "लक्ष्मणा धाव .. " अशी आरोळी टाकली तेंव्हा ही मंद सिता मैय्या लक्ष्मणाला तिकडे भाग पाडते . श्रीराम कोण आहेत हे सितेलाच ठाऊक नव्हते काय ? श्रिरामाच्या पराक्रमावर खुद्द सितेचा विश्वास नव्हता हे यातुन दिसते . दोन पावले पुढे जात सिता लक्ष्मणाच्या नितिमत्तेवर पण टिपण्णी करण्यास विसरत नाही. तो डायलॉग बोलताना सितेची चिड न येता स्त्रीबुद्धीची किव वाटते. बिचारा लक्ष्मण , मुर्खापुढे काय डोकं लावणार म्हणुन जातो , पण जाताना लाईन मारण्याचे कर्तव्य विसरत नाही. ह्या नंतर ची हाईट म्हणजे भिक्षुकाला भिक्षा देण्यासाठी लाईन क्रॉस करुन जाणे . एवढा सगळा मंदपणा करण्यात बिचार्‍या श्रीरामाचा काही हात नव्हता . पण हे झाले स्त्रीहट्टामुळे .. नंतरचे रामायण आपणास ठाऊक आहे. ह्या एका स्त्री साठी पुर्ण रामायण घडले . एका स्त्रीमुळेच महाभारतही घडले . ह्या महायुद्धांत जिव केला तो करोडो अरबो पुरुषांचाच . ह्याचा शिल्पा काकुंनी विचार केला आहे का ? उत्तर रामायणात सितेचा मुर्खपणा पुढे जाऊन अहंकारात परिवर्तीत होतो . रामाने जे कृत्य केले ते समाजाचे डोळे उघडण्यासाठी केले होते असे जाणकार सांगतात . परंतु आपल्याच नवर्‍याला समजुन न घेता आपलंच घोडं दामटंत स्वतःच्या पोरांना घेऊन पुन्हा वनवास भोगण्यास गेलेल्या सिते ला रामाने रोखण्याचा खुप प्रयत्न केला होता असे ही जाणकार सांगण्यास विसरत नाहीत . थोडक्यात काय ? रामाची ( सो कॉलड् ) एक चुक सितेच्या १०० मुर्खपणांवर भारी पडते असे आज की नारी i.e. शिल्पा काकुंचे म्हणने आहे . खुप एंटरटेनमेंट झाली एवढं असुनही राम आणि सिता दोघे ही आमच्या साठी आयडीयल स्त्री - पुरुष आहेत . एवढे बोलुन मी माझे दोन शब्द संपवतो , जय हिंद जय महाराष्ट्र - (आधुनिक जां'ब'वंत ) टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

आपण आंतरजालीय लालुप्रसाद आहात

शिल्पा ब
Tue, 04/12/2011 - 19:37 नवीन
आपण आंतरजालीय लालुप्रसाद आहात हे कायम सिद्ध करता, पण तो मान आपलाच आहे. बाकी शूर्पणखा नावाच्या स्त्रीने रामाला माझा हो अशी मागणी घातल्यावर तिला स्पष्ट "नाही " असे न सांगता तिच्या भावनांशी खेळ करून माझ्या भावाकडे जा मग त्याने परत राम तुला नक्की स्वीकारेल असे काहीसे सांगितले अन त्यामुळे तीचा तोल गेला, मग तिचे नाक-कान कापण्यात आले अन मग पुढचे काय ते घडले असे काहीसे ऐकून आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

आपण आंतरजालीय लालुप्रसाद आहात

टारझन
Tue, 04/12/2011 - 20:35 नवीन
आपण आंतरजालीय लालुप्रसाद आहात हे कायम सिद्ध करता, पण तो मान आपलाच आहे.
तर तर !! आपणही एक टॉप च्या ललिता पवार आहात ना :)
बाकी शूर्पणखा नावाच्या स्त्रीने रामाला माझा हो अशी मागणी घातल्यावर
< फालतु> राम ही तिला मिरिंडा हो म्हणाला होता , ऐकलं का तिनं ? < / फालतु>
तिला स्पष्ट "नाही " असे न सांगता तिच्या भावनांशी खेळ करून माझ्या भावाकडे जा मग त्याने परत राम तुला नक्की स्वीकारेल असे काहीसे सांगितले अन त्यामुळे तीचा तोल गेला, मग तिचे नाक-कान कापण्यात आले अन मग पुढचे काय ते घडले असे काहीसे ऐकून आहे.
तिचा तोल गेला म्हणजे काय ? जाणकारांच्या मते शुर्पणखेचा बोळा तुंबलेला होता. त्यात पाकिटांची सोय नसल्याने पुरुषांनी जबाबदारीने वागणे जरुरी असते. आणि राम-लक्ष्मण हे मर्यादा पुरुषोत्तम होते . त्यांच्या हातुन असं पाप घडणं अशक्यंच ! ह्या उलट त्यांच्यापैकी कोणी जर शुर्पणखेवर अतिप्रसंग केला असता तर तुमच्या सारख्या आज की नारी .. आयोध्येत "लाटणं मोर्चा" घेउन आल्या असत्या ! बाकी शुर्पणखा तुमची आयडोल आहे काय ? =)) - चाकु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

अजून मागे...

विकास
Tue, 04/12/2011 - 21:03 नवीन
अवांतर, कुणाशीही वाद म्हणून नाही! :-) अजून थोडे मागे गेले तर... कैकयीने हट्ट केला (कारण की मंथरेने सुचवले) म्हणून राम वनात गेला. ;) जाताना सीता म्हणाली "जेथे राघव तेथे सीता" म्हणून तिला पण नेले. तो थोडेच म्हणत होता चल माझ्याबरोबर म्हणून? जर नंतर ती, "जसे राघव तशीच सीता" असे म्हणाली असती तर कदाचीत वेगळे झाले असते. पण तिला तसे वाटले नसावे. :-) त्याहूनही मागे गेले तर दशरथाने एक्स्पायरी डेट नसलेले दोन वर कैकयीला दिले म्हणून रामायण घडले असे देखील म्हणता येईल. ;) बाकी एकदा आमच्या एका तामिळ मित्राकडून समजले: काही तामिळवासीय, रावण हा सीतेचे पिता होता असे समजतात. आणि त्यांच्यात रावण आपल्या मुलीला केवळ माहेरपणासाठी घेऊन गेला होता असे समजले जाते, असे कळले! खरे खोटे माहीत नाही, पण अनेक कथात ही देखील असल्यास नवल नाही. फक्त ऐकल्यावर ह.ह.पु.वा. झाली. एखादे वडील आपल्या मुलीला माहेरपणास कसे नेऊ शकतात हे कळले! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

+१

टारझन
Tue, 04/12/2011 - 21:25 नवीन
असेच म्हणतो .. ह्या मंथरा , कैकै , द्रौपदी , सिता , इत्यादी स्त्रीया नेहमी महाविनाशाला कारणीभुत ठरल्या आहेत असे जाणकार सांगतात. तसेच आजकाल घरामधे दुही पडायला की "कोण ब" रं कारणीभुत असतं ? चाळा पाने ? बाकी करडा मजकुर वाचुन लोळलो =)) शिल्पा ब ह्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे हिडिंबा म्हणण्यात येत आहे :) शिवाय रामाने स्त्रीयांशी रुड पणे न वागता म्हणजेच "नाही"म्हणुन तोडुन न फेकता त्या मंद स्त्रीला समजदारीची भाषा वापरली म्हणुन रामाची चिड आली. - ( यदाकदाचित ) बलभिमं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

समजदारीच्या भाषेत काय

शिल्पा ब
Tue, 04/12/2011 - 21:52 नवीन
समजदारीच्या भाषेत काय सांगीतलं हे सांगाल का? तुम्हाला भलतीच माहीती आहे म्हणुन विचारलं. बाकी मागणी न करता पुरवठा करणारे आपण अगदीच दानशुर म्हणायचे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

<<<त्याहूनही मागे गेले तर

शिल्पा ब
Tue, 04/12/2011 - 21:51 नवीन
<<<त्याहूनही मागे गेले तर दशरथाने एक्स्पायरी डेट नसलेले दोन वर कैकयीला दिले म्हणून रामायण घडले असे देखील म्हणता येईल. यात कैकयीची काय चुक? वर देणार्‍यानी नको विचार करायला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

काहीच नाही!

विकास
Tue, 04/12/2011 - 22:06 नवीन
यात कैकयीची काय चुक? वर देणार्‍यानी नको विचार करायला? काहीच नाही! म्हणूनच तर तेथे म्हणले होते ना की या (म्हणजे त्या) प्रतिसादात कुणाशिही वाद नाही म्हणून! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

<<<बाकी शुर्पणखा तुमची आयडोल

शिल्पा ब
Tue, 04/12/2011 - 21:06 नवीन
<<<बाकी शुर्पणखा तुमची आयडोल आहे काय ? =)) शुर्पणखा ही ललिता पवारची आयडोल कशी असेल? हीडींबा म्हंटलं तर ठीक कदाचीत ;) बाकी बोळे तुंबुन राहु नाहीतर अजुन काही होवो पण स्पष्ट "नाही" म्हणायला पाकीटांची गरज का पडावी हा एकच प्रश्न पडला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

हॅप्पी बड्डे.

Nile
Wed, 04/13/2011 - 04:32 नवीन
चर्चा वाचुन रामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणजेच मराठीत हॅप्पी बड्डे करतो.
सिता ही मुर्ख स्त्री होती. तिचा आघाऊपणा लक्षात घेऊनच रामाने लक्ष्मणाला कुटी मधे प्रोटेक्शन साठी ठेवले होते. नंतर जेंव्हा मारिच ने रामाची मिमिक्री करुन "लक्ष्मणा धाव .. " अशी आरोळी टाकली तेंव्हा ही मंद सिता मैय्या लक्ष्मणाला तिकडे भाग पाडते .
अरे रे रे, कीती तो अरसिकपणा! मागे मी याच ओळी कीती काव्यत्मक लिहल्या होत्या (अन त्या कीती चटकन हवेत विरल्या) याची आठवण झाली. असो. त्या ओळी मागू मात्र नका, सभ्यतेच्या उल्लंघनाचं अजून एक तिकिट मिळायचं आम्हाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

श्रीराम जयराम जयजय राम।

चिंतामणी
Tue, 04/12/2011 - 10:20 नवीन
श्रीराम जयराम जयजय राम।
  • Log in or register to post comments

"राम रामेति रामेति रमे रामे

डावखुरा
Tue, 04/12/2011 - 10:33 नवीन
"राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे l सहस्त्र नाम तत्तुल्यम राम नाम वरानने ll"
  • Log in or register to post comments

राम : पती आणि राजा.

तर्री
Tue, 04/12/2011 - 11:45 नवीन
श्री राम हा आदर्श राजा होता. ह्या कालातील " स्त्री - वादी , मानवता वादी " द्रुष्टीने तो आदर्श पती नसेलही. पण आदर्श पती पेक्षा आदर्श राजा असणे माझ्या द्रुष्टीने खूप मोठे आहे. सामान्य नागरिकाच्या भावनेबाबत संवेदनशील पण तरिही कर्तव्य कठोर प्रभूरामचन्द्राना प्रणाम.
  • Log in or register to post comments

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 04/12/2011 - 12:35 नवीन
छान. चर्चा चालू ठेवा.........! :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

रामनवमी म्हंटल्यावर

sneharani
Tue, 04/12/2011 - 13:13 नवीन
श्रीराम जयराम जयजय राम। बाकीचे प्रतिसाद आय मीन चर्चा वाचत आहेच! :)
  • Log in or register to post comments

रामनवमीच्या सर्वांना हार्दिक

मृत्युन्जय
Tue, 04/12/2011 - 13:19 नवीन
रामनवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि या धाग्याचे रामायण होउ नये ही सदिच्छा.
  • Log in or register to post comments

श्रीराम जयराम जय जय

सुप्रिया
Tue, 04/12/2011 - 14:01 नवीन
श्रीराम जयराम जय जय राम. श्रीराम जयराम जय जय राम. श्रीराम जयराम जय जय राम.
  • Log in or register to post comments

एकंदर काय तर टाक्याचे घाव

गणपा
Tue, 04/12/2011 - 14:17 नवीन
एकंदर काय तर टाक्याचे घाव सोसल्या शिवाय देवाला देवपण येत नाही याची खात्री झाली.
  • Log in or register to post comments

रामो राजमणिः सदा विजयते रामं

पुष्करिणी
Tue, 04/12/2011 - 14:41 नवीन
रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे । रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः ॥ रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम् । रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥ श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

सर्वांना श्रीरामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

असुर
Tue, 04/12/2011 - 15:09 नवीन
श्रीरामचंद्रचरणौ मनसा स्मरामि| श्रीरामचंद्रचरणौ वचसा गृणामि| श्रीरामचंद्रचरणौ शिरसा नमामि| श्रीरामचंद्रचरणौ शरणं प्रपद्ये|| -श्रीरामरक्षास्तोत्रातून ज्याला जे हवे ते मिळो, प्रत्येकाला सद्सद्विवेकबुद्धी लाभो हीच त्या श्रीरामाला विनंती! श्रीरामाला शरण जायचे नसेल, हरकत नाही. त्याच्यातल्या मर्यादापुरुषोत्तमाला शरण जा. अर्थात, शेवटी ज्याची त्याची समज आणि ज्याची त्याची इच्छा!!! --असुर
  • Log in or register to post comments

लय भारी!

प्यारे१
Tue, 04/12/2011 - 15:43 नवीन
'असुर' 'रामरक्षा' म्हणतो हे पाहून ड्वाळे पाणावले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा