Skip to main content

विश्वचषक २०११ भारत वि. पाक दुसरे सेमिफायनल

लेखक प्रशांत यांनी बुधवार, 30/03/2011 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
भारत वि. पाक हा सामना बघण्याची उत्सुकता सर्वांना असते त्यात आजचा सामना म्हणजे विश्वचषक २०११ चे दुसरे सेमिफायनल त्यामुळे प्रत्येकाने सामना बघण्यासाठी विषेश तयारी केली असेलच.. आपल्या पंतप्रधानांनी तर हा सामना बघण्यासाठी फारच विषेश तयारी करत त्याच्या खास......... आमंत्रण दिलेले आहे.. तर आजचा सामना बघ्याण्यासाठी तुम्ही काय काय आणि कशी तयारी केली... सामना चालु झाल्यानंतर सामन्याचे धावते वर्णन आपण आपल्या मिपाच्या खास शैलित करुच..

वाचने 68555
प्रतिक्रिया 300

प्रतिक्रिया

च्यायला एवढा लक बाय चान्स सुरू असतांनाही शतक पुरे नाही करता आले. :(

छे गेला ८५ वर, आणि त्या आफ्रिदिनेच कॅच घेतला :(

रैना हैना. बारा ओव्हर शिल्लक आहेत. आता विकेटा टीकल्या पाहिजेत तेव्हा तिनशे धावा होतील. १९१/५. ३८.२ षटके.

धोनी पण गेला... भारत पूर्ण ५० ओवर खेळेल की नाही शंका वाटतेय :(

च्यायला, या धोणीच्या. पॉवरप्ले कधी घेणार. नेहरा फलंदाजीला आल्यावर ?

In reply to by गणपा

गेला आपला आवाज त्यांच्यापर्यंत घेतला पॉवरप्ले एकदाचा. आता जे होईन ते होईन. सहा षटकात कमीत कमी सत्तरची अपेक्षा. दोनशे सत्तर ऐंशी व्हावा स्कोर. -दिलीप बिरुटे

In reply to by सखी

आठ धावा वसूल. पुढील पाच षटकात चाळीस-पन्नास धावा व्हाव्यात. रैनाने चांगली सुरुवात केली. कमॉन इंडिया.........! :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तिसरी फोर पण मारीली पण त्या सेहवागसारखे नको व्हायला, तो फोरशिवाय बोलत नव्हता, पण गेला ना लवकर.

प्रेशर प्लेइंग इट्स रोल!! मेंटल टफनेसची कसोटी लागणार आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. सगळ्या ओवर्स खेळून काढणे आणि नंतर अशक्य चांगली फील्डिंग आणि बॉलिंग करावी लागणार!!!

६ सोनकेळी,पाव किलो वेफर्स संपले. आता खायची ईच्छा गेली.

भज्जी भी गया.... २४६/७, ४८ ओवर.. शेवटचे षटक... ४ चेंडु बाकी... झहीर गेला.... २५६/८.. पुर्ण षटकं तरी खेळा म्हणावं.... नेहराने १ रन काढला...

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

झहीर केला आता येणार आमचे करन अर्जुन. नेहरा आणी मुनाफ नेहरा मुनाफ ला म्हणालाय तयार रहा . मी हजेरी लावून येतो .( ह्या लोकांमुळे रैनाची उडाली दैना )

चला पुर्ण ओवर्स खेळणार... २ चेंडु... २५८/८ हाण्ण तिच्या आयला... नेहराच्या आयचा घो.... साला आवट झाला... मुनाफ येतो आहे....

भारताच्या ९ गडी गमावून २६० धावा झाल्या आहेत. बातम्या दिल्यासारखं वाटलं ;)

आपले गोलंदाज आता काय करतात बघुया. प्रभादेवी/दादरचे कोणी आहे का? सिद्धिविनायकाला जरा जावून या,ह्यांच्यातर्फे.

नेहराचे १० हुकले १ रन नी :( :( :( : ( आय अ‍ॅम वेरी वेरी अपसेट आनि सचिनचे १०० :( लै फ्रेन्डली आनि सौजन्यसप्ताहात मॅच चाल्लिये. बघु आता काय होते ते.

राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम

In reply to by गणपा

इच्छा असली तरी बघू शकत नाही कारण हापिसात आहे.... :( त्यामुळे रिमोट कंट्रोल हातात नाही! माझ्याकडून कुठलीही चूक होत नाही आहे. कल्जी नसावी! :)

In reply to by विकास

लै भारी. :)

In reply to by यशोधरा

यशो माझे बाई २४० नको, थोडं त्याच्या आधी नाही का चालणार, २४० होईपर्यंत आम्ही आमचा जीव कुठं टांगुन ठेवायचा?

In reply to by पुष्करिणी

अनामिक आणि पुष्करिणी अहो यशो २४० म्हणत होती, म्या तिला बार्गेन करुन २३० वर तयार केलं, मला पण ५०% पाहीजे हां :) आणि यशो ते इरसाल पार्टीचं काहीतरी म्हणत होते, आपल्याला काय पाहीजे ते मिळल, तेव्हा तुझी लिस्ट तयार ठेव गं, माझी झालीच आहे ऑलमोस्ट :)

मंडळी सामना आपण जिंकायची शक्यता ३०-७० अशी दिसत आहे. सामन्याचा निकाल धक्कादायक लागण्याची शक्यता ग्रहित धरुन मित्र म्हणत आहेत कुठेतरी 'बसून' सामन्याचा आनंद लूटू. :) तेव्हा आम्ही आपली रजा घेतो. धन्यवाद......! :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रीत-मोहर

आमची मते बहुतेक वेळा खरी ठरतात . आता घी घरी नाही आहे पण बटर मे शक्कर मिलाके काम चला लेंगे. ''चक दे इंडिया''

आयला रन रेट बरा दाब्लाय......आता युवराज आलाय बघू काय होतेय ते ???????????????

In reply to by मराठे

अरे वा! युनिस खान पण गेला - मराठे तुम्ही म्हणताय ते खरं होतयं बरका तिस-या वेळेस :)

हे लिहीत असताना: Pakistan RR 4.07 Last 5 ovs 13/2 RR 2.60 Required RR 6.45 India RR 5.2

एक दो, एक दो.. पाकिस्तान की ठोंक दो.. पाकडे- ४ डाऊन... १०६/४, २६ ओव्हर्स..

युनीस खान गेला ....ये धत्तड तत्तड!!..ये धत्तड तत्तड!!..ये धत्तड तत्तड!!..ये धत्तड तत्तड!!..ये धत्तड तत्तड!!

सामना जिंकतोय अशी शक्यता वाटल्यामुळे पुन्हा हजर झालोय. लवकर दोन विकेट पाडा बरं. आपापले सर्व कुलदैवत वगैरेंना प्लीज नवस वगैरे बोला. :) सालं वर्ल्ड कप नको पण पाकिस्तावर विजय मिळवलाच पाहिजे. :) -दिलीप बिरुटे