Skip to main content

विश्वचषक २०११ भारत वि. पाक दुसरे सेमिफायनल

लेखक प्रशांत यांनी बुधवार, 30/03/2011 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
भारत वि. पाक हा सामना बघण्याची उत्सुकता सर्वांना असते त्यात आजचा सामना म्हणजे विश्वचषक २०११ चे दुसरे सेमिफायनल त्यामुळे प्रत्येकाने सामना बघण्यासाठी विषेश तयारी केली असेलच.. आपल्या पंतप्रधानांनी तर हा सामना बघण्यासाठी फारच विषेश तयारी करत त्याच्या खास......... आमंत्रण दिलेले आहे.. तर आजचा सामना बघ्याण्यासाठी तुम्ही काय काय आणि कशी तयारी केली... सामना चालु झाल्यानंतर सामन्याचे धावते वर्णन आपण आपल्या मिपाच्या खास शैलित करुच..

वाचने 68555
प्रतिक्रिया 300

प्रतिक्रिया

फेसबुकवर वाचलेला विनोद डबंग डायलॉग बाय धोनी.. अख्तर आफ्रिदीसे डर नही लगता साब..मुनाफ नेहरा से लगता है! ;) बाकी सामना पाहायची कसली तयारी न कसले काय? ऑफिसातच अपडेट पाहत राहायचे!

In reply to by आत्मशून्य

२६०/९... पुर्ण ५० ओव्हर खेळल्याचा हबिमान... चला आता हगर्‍या बॉलरांच्या हातात आहे सग्ळं.. तेंडुलकर, भज्जी, युवराज अन रैना मिळुन ३५ ओव्हर टाकतील असं वाट्टंय.... काय म्हंता...

आफ्रिदी: हम सचिन को किसी भी हाल मी संचूरी कि संचूरी नही बनाने देंगे . शोयब : मगर हम उसे रोकेंगे कैसे ?? वो तो गजब कि फॉर्म मैं हें...? आफ्रिदी : साले ...!! हम १०० के अंदर आउट हो जायेंगे ना ...!!

मॅच बघायची आहे म्हणून आधीच झालेला प्रवास आज मॅचच्या वेळेस करणार आहे अशी घोषणा केलीये. म्हणजे कुणाचा मध्ये फोन नको. येथे नागपुर येथे मॅच बघण्यासाठी छत्रपती चौकात एका मित्राच्या फ्लॅटवर सर्व मंडळी जमणार आहेत. एकट्याने मॅच बघण्यात काय मजा ना? :) मॅच बघता बघता जे जे काही लागणार आहे त्याची तरतुद करणे चालले आहे. सर्वांसोबत दंगा घालत अशी मॅच बघण्याची मजा काही औरच आहे. मी सहसा मॅच बघत नाही मात्र अशी लढत न पाहून कसं व्हायचं ना? - नीलकांत

In reply to by नीलकांत

>>>>एकट्याने मॅच बघण्यात काय मजा ना? Smile खरं आहे... मी तर मॅच ऑफिसमधेच बघणार.... फुल टु राडा असतो..

In reply to by नीलकांत

टॉस जिंकला. मॅच बघता बघता जे जे काही लागणार आहे त्याची तरतुद करणे चालले आहे. मस्त. मजा करा. आपण जिंकणार आहोत.

सामना पाहताना घ्यायची काळजी 1) ज्यांना हृदयाचा त्रास आहे किंवा ब्लॉकेज आहेत त्यांना असे सामने पाहताना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्‍यता अधिक असते. अशा सामन्यांमध्ये थरार टीपेला पोहोचलेला असतो त्या वेळी उत्साह वाढलेला असतो हृदयाचे ठोकेही वाढलेले असतात आणि त्यामुळे हृदयावर ताण येऊ शकतो. 2) भावना अधिक प्रमाणात गुंतलेल्या असल्यामुळे पराभव पचविणे कठीण असते आणि त्यामुळे येणारा स्ट्रेस फार घातक ठरू शकतो. 3) अति मध्यमान, शरीरातील वाढलेले तापमान आणि एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून राहणेसुद्धा धोकादायक ठरू शकते. 4) सामना पाहत असताना जंक फूड, साखरेचे प्रमाण अधिक असलेल्या पदार्थांचे सेवन करत राहणे हृदयावर परिणामकारक ठरू शकते. मुंबई - विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा फिव्हर चढलेला आहे आणि प्रत्येक जण बुधवारचे भारत-पाकिस्तान हे क्रिकेट युद्ध पाहण्याची तयारी करत आहे. एकत्रितपणे सामना पाहण्यासाठी मोठ्या स्क्रीनचीही तयारी करण्यात आलेली आहे. भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान गिलानी यांनाही हा सामन्याने भुरळ पाडली आहे. अशा हायव्होल्टेज सामन्यात भावना गुंतलेल्या असतात. सामना पाहताना दडपण येत असते आणि त्याचा शरीरावर परिणाम होतो. 2006 मध्ये विश्‍वकरंडक फुटबॉल सामने पाहताना 11 चिनी प्रेक्षकांचा हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाल्याचे वृत्त बीजिंगमधील एका वर्तमानपत्राने प्रसिद्ध केले होते. भावनांवर आवर घालू न शकल्याने मानसिक ताण आला आणि त्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. हृदयरोगतज्ज्ञ शल्यचिकित्सक डॉ. रमाकांत पांडा यांनी सांगितले की, जेव्हा एक्‍झाइटमेंट वाढली जाते तेव्हा रक्तदाब वाढला जातो आणि ज्यांना मधुमेह, कॉलेस्ट्रॉल आदींचा त्रास असतो अशांना हृदयरोगाचा झटका येण्याची शक्‍यता असते. बुधवारचा भारत-पाक सामना पाहताना जर तुमच्या छातीत दुखू लागले किंवा हातातून कळा येऊ लागल्या तर जराही वेळ न घालविता 126126 या क्रमांकावर कॉल करा.

In reply to by स्पा

म्हणुनच मी शेवटचे ५ ओव्हार्स राजाराम पुलावर जाऊन उभा होतो..उगाच सहन होत नाही तर पाहाव कशाला ...पण कान मात्र सतत लोकांच्या फटाक्यांकड़े होते !

In reply to by कुळाचा_दीप

बरंय, नाहीतर कुलदीपकाची प्राणज्योत ..........
पण कान मात्र सतत लोकांच्या फटाक्यांकड़े होते !
अन डोळे काय पुलावर चाललेल्या चलचित्रपटाकडॅ (PDA) होते की काय?

In reply to by वपाडाव

PDA आपल्या साठी काय नवीन नाही ...आणि पहायची इच्छा झालीच तर राजाराम पुला पेक्षा उत्तम ठिकाणं आहेत ना :)

आपली टीम आणि मंडळी आणि आजची मॅच आणि फ़िक्सिंग आणि..... ... .. ..... भारताची कुंडली ही मकर लग्नाची असून सप्तमस्थानी रवि , शुक्र , बुध , शनि , चंद्र व प्लूटो असे सहा ग्रह आहेत. दशमात तूळेचा गुरु आहे. सहाव्या स्थानी मंगळ आणि पंचमात राहू व लाभात केतू अशी स्थिती आहे. या कुंडलीशी ३० मार्च २०११ चे ग्रहमान अनुकूल आ...हे. ३० तारखेला धनिष्ठा नक्षत्र असून नक्षत्र असून चंद्र मकर राशीच आहे. भारताचे मकर लग्न आणि रवि , गुरु , मंगळ, हर्षल मीन राशीत असल्याने भारत प्रतिस्पर्ध्याला लोळवेल. मुळ कुंडलीचा दशमेश शुक्र गोचरीचा दशमाच्या लाभात आहे. आपल्या टीम मधे सचिन, धोनी, झहीर, युवराज सारखे मातब्बर खेळाडू आहेत असा माझा समज होता, जो साफ़ चुकीचा निघाला. वरील सहा ग्रह हे आपले अष्टपैलू आहेत आणि उरलेल्या राशी बॉलर्स. but it seems match is already fixed :) लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधतात ठाऊक होते, मॅचच्याही गाठी स्वर्गात? :D मकर आजची राशी ऑफ़ द मॅच. :)

In reply to by स्पा

लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधतात ठाऊक होते...
आहे का नाही... कसा पकडला चोराला... दिल मे शादी के लड्डु फूटरेले इस्के तो... पण साला हे वाक्य हर्षदने भेळेत टाकायला पाहिजे होते..

वा वा. अगदी सर्व अंगांनी होणार्‍या सामन्याचा 'अभ्यास' चालू आहे.खालील माहिती हवी आहे- १)मोहालीचा ईतिहास. २)मोहालीकरांच्या क्रिकेटवेडाच्या काही कहाण्या. ३)१९५० पासून मोहालीला झालेले सामने. ४)पाक खेळाडू जिथे उतरले आहेत तिकडची सुरक्षा व्यवस्था. बाकी आम्ही तयार आहोतच- १२ सोनकेळी/अर्धा किलो बटाटा वेफर्स्/खारे दाणे/धारवाडी पेढे/दर अर्ध्या तासाने चहा/लिंबु सरबत. दोन्ही गालांवर तिरंगा/India असे लिहिलेली टोपी घालूनच सामना बघायचा आहे.

In reply to by चिरोटा

>>>दोन्ही गालांवर तिरंगा/India असे लिहिलेली टोपी घालूनच सामना बघायचा आहे. तुमचा फटु अपलोड करा.

In reply to by चिरोटा

>>>>>> टोपी घालूनच सामना बघायचा आहे....>>>>>> ................ कोणाला टोपी घालूनच सामना बघायचा आहे ????? ..... :wink:

In reply to by सुधीर१३७

स्वतालाच की वो. आय सी सी वाले स्वतःचे खिसे भरणार्,खेळाडू रग्गड पैसा मिळवणार्,जाहिरातबाजी करून कंपन्या नफा मिळवणार.'देशप्रेम' जागवून सरकार लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधणार. आपण स्वतःलाच टोपी घालायची अन म्याच बघायची.

In reply to by चिरोटा

.. चर्चा अश्लिलतेकडे झुकल्या जाते आहे असे वाटते . लवकरंच वर्तन सुधारा :) - चोती तिन्गी

मी एक खम्बा व भरपुर चकणा आणुन ठेव्ला आहे

दोन्ही देशांचे पंतप्रधान मैदानावर आले आहेत. ही केवळ मॅच आहे असं वाटतच नाहीये :) सचीन विरू मैदानावर आलेत. ( दे घुमा के !) - नीलकांत

विरू एका ओव्हर मध्ये ५ चौके? सचीन सुध्दा दे घुमा के करतोय. सुंदर मॅच चाललीये.

आज सचीनचा दिवस दिसतोय. दोन वेळा जीवदान आणि कॅच सुध्दा सोडली. भारताचे शंभर रन होण्याच्या मार्गावर आहेत. ९९ झालेत.

झाले १०२.. शंभर गाठले. तेही बर्‍या स्पीडने. पाटा खेळपट्टी म्हणावी काय? पाकिस्तानलाही असाच फायदा होईल काय.

विराट युवराज गेले. धोनी जाण्याच्या मार्गावर (तो आला आहे हेच त्याच्या जाण्याचे द्योतक आहे). सचिन असाही आउट होण्यासाठी खुप प्रयत्न करतो आहे. मॅच संपली.

२७५ किंवा ३०० पेक्षा अधिक धावा झाल्या पाहिजेत. धोणीने आज धावा भरपूर धावा केल्या पाहिजेत. आता मागे फक्त रैना आहे. धोणी चेंडुला नुसतं ढकलून ढकलून किती धावा काढेल कोणास ठाऊक ? --दिलीप बिरुटे

In reply to by निखिल देशपांडे

>>>भारत पुर्ण ५० ओव्हर बॅटिंग करेल का?? सच्याला अजून दोनतीन जीवदान आणि दोन तीन जीवदान धोणी मिळाले तर पन्नास ओव्हर खेळणे अवघड नाही.;) -दिलीप बिरुटे

In reply to by निखिल देशपांडे

सचिनचे ४ झेल सोडले आहेत. एक स्टंपिंग जस्ट मिस झाले. एक एलबी जस्ट मिस आहे. तो नक्की काय करतो आहे? औट होण्यासाठी याहुन अजुन जास्त प्रयत्न कोणी करु शकणार नाही

In reply to by मृत्युन्जय

भारतीय क्रिडा रसिकांनी देवाला केलेल्या प्रार्थना कामी येत आहेत.:) -दिलीप बिरुटे

धोनीचा फॉर्म पुरता गेला आहे, नुसता ढकला ढकली, मला तर वाटत त्याने हॉकीत जायला हवं,....... आज नेहराला घ्यायची चूक त्याला जाम महागात पडणार आहे

In reply to by स्पा

>>>नुसता ढकला ढकली, मला तर वाटत त्याने हॉकीत जायला हवं,....... हॉकीत कॉर्नर मारायला चांगला खेळाडू आहे. :) >>>आज नेहराला घ्यायची चूक त्याला जाम महागात पडणार आहे शेवटच्या ओव्हरीत पंचवीस धावा लागत असल्यावर नेहरा चार ते पाचच चेंडूत हे आव्हान पूर्ण करण्यास मदत करेल असे वाटते :) काय सांगावे आज त्याला विकेटा मिळाल्या तर....! सच्याचे शंभर होतात बॉ.....! -दिलीप बिरुटे

मागच्या म्याच मध्ये, मुनाफ च्या राहिलेल्या ओवर सचिन ला टाकाव्या लागलेल्य, आज नेहराच्या अजून ४ ५ ओवर ची भर पडेल

काळजी नको.... सच्याचे शतक नक्कि होणार.....धोनी... अरे नीट मारे रे ...

शेवटच्या ओव्हर्स धाडधाड मारायला कुणीतरी रहा रे बाकी. सचीनचे शतक नक्की आहे आज. धोनी टिकला पाहीजे. सुरूवातीला अतिशय फटकेबाज खेळ आता संथावला आहे . - नीलकांत

आणि २५-३० आणखीन असते तर्?....असे वाटेल की काय....असे खेळत आहेत बॉलिंग वर लोड येणार आहे....

आता ६व्यांदा सचीन वाचलाय. आज सचीनचा दिवस आहे नक्की :)

सोडला बॉ झेल सच्याचा. अजून दहा ओव्हरीपर्यंत तरी सच्या आणि माहीची जोडी फूटू नये. -दिलीप बिरुटे

फिल्डिन्ग फार महत्वाची असणार आहे,.... catches win matches.... एक हि झेल सुटता कामा नये.