✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

विश्वचषक २०११ भारत वि. पाक दुसरे सेमिफायनल

प
प्रशांत यांनी
Wed, 03/30/2011 - 10:25  ·  लेख
लेख
भारत वि. पाक हा सामना बघण्याची उत्सुकता सर्वांना असते त्यात आजचा सामना म्हणजे विश्वचषक २०११ चे दुसरे सेमिफायनल त्यामुळे प्रत्येकाने सामना बघण्यासाठी विषेश तयारी केली असेलच.. आपल्या पंतप्रधानांनी तर हा सामना बघण्यासाठी फारच विषेश तयारी करत त्याच्या खास......... आमंत्रण दिलेले आहे.. तर आजचा सामना बघ्याण्यासाठी तुम्ही काय काय आणि कशी तयारी केली... सामना चालु झाल्यानंतर सामन्याचे धावते वर्णन आपण आपल्या मिपाच्या खास शैलित करुच..
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
68383 वाचन

💬 प्रतिसाद (300)

प्रतिक्रिया

फेसबुकवर वाचलेला विनोद डबंग

कानडाऊ योगेशु
Wed, 03/30/2011 - 10:53 नवीन
फेसबुकवर वाचलेला विनोद डबंग डायलॉग बाय धोनी.. अख्तर आफ्रिदीसे डर नही लगता साब..मुनाफ नेहरा से लगता है! ;) बाकी सामना पाहायची कसली तयारी न कसले काय? ऑफिसातच अपडेट पाहत राहायचे!
  • Log in or register to post comments

+१

आत्मशून्य
Wed, 03/30/2011 - 12:09 नवीन
हॅहॅहॅ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

बॅटिंग टॉस जिंकला...

वपाडाव
Wed, 03/30/2011 - 18:28 नवीन
२६०/९... पुर्ण ५० ओव्हर खेळल्याचा हबिमान... चला आता हगर्‍या बॉलरांच्या हातात आहे सग्ळं.. तेंडुलकर, भज्जी, युवराज अन रैना मिळुन ३५ ओव्हर टाकतील असं वाट्टंय.... काय म्हंता...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

काय म्हणायला वेळ कूठय इथं, फक्त हे एंजोय करा

आत्मशून्य
गुरुवार, 03/31/2011 - 06:26 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

हापीसातच बघणार :)

दिपक
Wed, 03/30/2011 - 11:00 नवीन
Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments

फेसबुकवर वाचलेला विनोद

प्रशांत
Wed, 03/30/2011 - 11:38 नवीन
आफ्रिदी: हम सचिन को किसी भी हाल मी संचूरी कि संचूरी नही बनाने देंगे . शोयब : मगर हम उसे रोकेंगे कैसे ?? वो तो गजब कि फॉर्म मैं हें...? आफ्रिदी : साले ...!! हम १०० के अंदर आउट हो जायेंगे ना ...!!
  • Log in or register to post comments

मॅच बघायची म्हणून

नीलकांत
Wed, 03/30/2011 - 11:49 नवीन
मॅच बघायची आहे म्हणून आधीच झालेला प्रवास आज मॅचच्या वेळेस करणार आहे अशी घोषणा केलीये. म्हणजे कुणाचा मध्ये फोन नको. येथे नागपुर येथे मॅच बघण्यासाठी छत्रपती चौकात एका मित्राच्या फ्लॅटवर सर्व मंडळी जमणार आहेत. एकट्याने मॅच बघण्यात काय मजा ना? :) मॅच बघता बघता जे जे काही लागणार आहे त्याची तरतुद करणे चालले आहे. सर्वांसोबत दंगा घालत अशी मॅच बघण्याची मजा काही औरच आहे. मी सहसा मॅच बघत नाही मात्र अशी लढत न पाहून कसं व्हायचं ना? - नीलकांत
  • Log in or register to post comments

एकट्याने मॅच बघण्यात काय मजा ना? Smile

प्रशांत
Wed, 03/30/2011 - 11:56 नवीन
>>>>एकट्याने मॅच बघण्यात काय मजा ना? Smile खरं आहे... मी तर मॅच ऑफिसमधेच बघणार.... फुल टु राडा असतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत

टॉस जिंकला. मॅच बघता बघता जे

चिंतामणी
Wed, 03/30/2011 - 14:11 नवीन
टॉस जिंकला. मॅच बघता बघता जे जे काही लागणार आहे त्याची तरतुद करणे चालले आहे. मस्त. मजा करा. आपण जिंकणार आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत

सामना पाहताना घ्यायची

स्पा
Wed, 03/30/2011 - 11:52 नवीन
सामना पाहताना घ्यायची काळजी 1) ज्यांना हृदयाचा त्रास आहे किंवा ब्लॉकेज आहेत त्यांना असे सामने पाहताना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्‍यता अधिक असते. अशा सामन्यांमध्ये थरार टीपेला पोहोचलेला असतो त्या वेळी उत्साह वाढलेला असतो हृदयाचे ठोकेही वाढलेले असतात आणि त्यामुळे हृदयावर ताण येऊ शकतो. 2) भावना अधिक प्रमाणात गुंतलेल्या असल्यामुळे पराभव पचविणे कठीण असते आणि त्यामुळे येणारा स्ट्रेस फार घातक ठरू शकतो. 3) अति मध्यमान, शरीरातील वाढलेले तापमान आणि एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून राहणेसुद्धा धोकादायक ठरू शकते. 4) सामना पाहत असताना जंक फूड, साखरेचे प्रमाण अधिक असलेल्या पदार्थांचे सेवन करत राहणे हृदयावर परिणामकारक ठरू शकते. मुंबई - विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा फिव्हर चढलेला आहे आणि प्रत्येक जण बुधवारचे भारत-पाकिस्तान हे क्रिकेट युद्ध पाहण्याची तयारी करत आहे. एकत्रितपणे सामना पाहण्यासाठी मोठ्या स्क्रीनचीही तयारी करण्यात आलेली आहे. भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान गिलानी यांनाही हा सामन्याने भुरळ पाडली आहे. अशा हायव्होल्टेज सामन्यात भावना गुंतलेल्या असतात. सामना पाहताना दडपण येत असते आणि त्याचा शरीरावर परिणाम होतो. 2006 मध्ये विश्‍वकरंडक फुटबॉल सामने पाहताना 11 चिनी प्रेक्षकांचा हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाल्याचे वृत्त बीजिंगमधील एका वर्तमानपत्राने प्रसिद्ध केले होते. भावनांवर आवर घालू न शकल्याने मानसिक ताण आला आणि त्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. हृदयरोगतज्ज्ञ शल्यचिकित्सक डॉ. रमाकांत पांडा यांनी सांगितले की, जेव्हा एक्‍झाइटमेंट वाढली जाते तेव्हा रक्तदाब वाढला जातो आणि ज्यांना मधुमेह, कॉलेस्ट्रॉल आदींचा त्रास असतो अशांना हृदयरोगाचा झटका येण्याची शक्‍यता असते. बुधवारचा भारत-पाक सामना पाहताना जर तुमच्या छातीत दुखू लागले किंवा हातातून कळा येऊ लागल्या तर जराही वेळ न घालविता 126126 या क्रमांकावर कॉल करा.
  • Log in or register to post comments

उत्तम माहिती रे

गणपा
Wed, 03/30/2011 - 13:30 नवीन
उत्तम माहिती रे सापवड्या... (अश्या एका काळ्या घटनेचा साक्षिदार.) गणा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

म्हणुनच मी शेवटचे ५ ओव्हार्स

कुळाचा_दीप
गुरुवार, 03/31/2011 - 06:25 नवीन
म्हणुनच मी शेवटचे ५ ओव्हार्स राजाराम पुलावर जाऊन उभा होतो..उगाच सहन होत नाही तर पाहाव कशाला ...पण कान मात्र सतत लोकांच्या फटाक्यांकड़े होते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

बरंय, नाहीतर कुलदीपकाची

वपाडाव
गुरुवार, 03/31/2011 - 10:31 नवीन
बरंय, नाहीतर कुलदीपकाची प्राणज्योत ..........
पण कान मात्र सतत लोकांच्या फटाक्यांकड़े होते !
अन डोळे काय पुलावर चाललेल्या चलचित्रपटाकडॅ (PDA) होते की काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुळाचा_दीप

PDA आपल्या साठी काय नवीन नाही

कुळाचा_दीप
Fri, 04/01/2011 - 06:29 नवीन
PDA आपल्या साठी काय नवीन नाही ...आणि पहायची इच्छा झालीच तर राजाराम पुला पेक्षा उत्तम ठिकाणं आहेत ना :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

आपली टीम आणि मंडळी आणि आजची

स्पा
Wed, 03/30/2011 - 11:53 नवीन
आपली टीम आणि मंडळी आणि आजची मॅच आणि फ़िक्सिंग आणि..... ... .. ..... भारताची कुंडली ही मकर लग्नाची असून सप्तमस्थानी रवि , शुक्र , बुध , शनि , चंद्र व प्लूटो असे सहा ग्रह आहेत. दशमात तूळेचा गुरु आहे. सहाव्या स्थानी मंगळ आणि पंचमात राहू व लाभात केतू अशी स्थिती आहे. या कुंडलीशी ३० मार्च २०११ चे ग्रहमान अनुकूल आ...हे. ३० तारखेला धनिष्ठा नक्षत्र असून नक्षत्र असून चंद्र मकर राशीच आहे. भारताचे मकर लग्न आणि रवि , गुरु , मंगळ, हर्षल मीन राशीत असल्याने भारत प्रतिस्पर्ध्याला लोळवेल. मुळ कुंडलीचा दशमेश शुक्र गोचरीचा दशमाच्या लाभात आहे. आपल्या टीम मधे सचिन, धोनी, झहीर, युवराज सारखे मातब्बर खेळाडू आहेत असा माझा समज होता, जो साफ़ चुकीचा निघाला. वरील सहा ग्रह हे आपले अष्टपैलू आहेत आणि उरलेल्या राशी बॉलर्स. but it seems match is already fixed :) लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधतात ठाऊक होते, मॅचच्याही गाठी स्वर्गात? :D मकर आजची राशी ऑफ़ द मॅच. :)
  • Log in or register to post comments

-

अमोल केळकर
Wed, 03/30/2011 - 12:46 नवीन
:) भारतीय संघास विजयासाठी आणि सचिनला शतकांचे शतक करण्यासाठी हार्दीक शुभेच्छा अमोल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

लग्नाच्या गाठी स्वर्गात

वपाडाव
Wed, 03/30/2011 - 13:38 नवीन
लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधतात ठाऊक होते...
आहे का नाही... कसा पकडला चोराला... दिल मे शादी के लड्डु फूटरेले इस्के तो... पण साला हे वाक्य हर्षदने भेळेत टाकायला पाहिजे होते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

एक शंका

रमताराम
Wed, 03/30/2011 - 16:26 नवीन
तुम्ही भारताची कुंडली पाहिलीत की बीसीसीआयची?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

वा

चिरोटा
Wed, 03/30/2011 - 12:27 नवीन
वा वा. अगदी सर्व अंगांनी होणार्‍या सामन्याचा 'अभ्यास' चालू आहे.खालील माहिती हवी आहे- १)मोहालीचा ईतिहास. २)मोहालीकरांच्या क्रिकेटवेडाच्या काही कहाण्या. ३)१९५० पासून मोहालीला झालेले सामने. ४)पाक खेळाडू जिथे उतरले आहेत तिकडची सुरक्षा व्यवस्था. बाकी आम्ही तयार आहोतच- १२ सोनकेळी/अर्धा किलो बटाटा वेफर्स्/खारे दाणे/धारवाडी पेढे/दर अर्ध्या तासाने चहा/लिंबु सरबत. दोन्ही गालांवर तिरंगा/India असे लिहिलेली टोपी घालूनच सामना बघायचा आहे.
  • Log in or register to post comments

तुमचा फटु अपलोड करा.

प्रशांत
Wed, 03/30/2011 - 12:32 नवीन
>>>दोन्ही गालांवर तिरंगा/India असे लिहिलेली टोपी घालूनच सामना बघायचा आहे. तुमचा फटु अपलोड करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

>>>>>> टोपी घालूनच सामना

सुधीर१३७
Wed, 03/30/2011 - 12:33 नवीन
>>>>>> टोपी घालूनच सामना बघायचा आहे....>>>>>> ................ कोणाला टोपी घालूनच सामना बघायचा आहे ????? ..... :wink:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

स्वतालाच

चिरोटा
Wed, 03/30/2011 - 12:41 नवीन
स्वतालाच की वो. आय सी सी वाले स्वतःचे खिसे भरणार्,खेळाडू रग्गड पैसा मिळवणार्,जाहिरातबाजी करून कंपन्या नफा मिळवणार.'देशप्रेम' जागवून सरकार लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधणार. आपण स्वतःलाच टोपी घालायची अन म्याच बघायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर१३७

टोपी घालणे

टारझन
Wed, 03/30/2011 - 12:49 नवीन
.. चर्चा अश्लिलतेकडे झुकल्या जाते आहे असे वाटते . लवकरंच वर्तन सुधारा :) - चोती तिन्गी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

मला नाही वाटले तसे, तुला कसे

नरेशकुमार
Fri, 04/01/2011 - 09:05 नवीन
मला नाही वाटले तसे, तुला कसे काय वाटले ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

त या रि

१.५ शहाणा
Wed, 03/30/2011 - 14:00 नवीन
मी एक खम्बा व भरपुर चकणा आणुन ठेव्ला आहे
  • Log in or register to post comments

नेहरा खेळणार... का??? का??

निखिल देशपांडे
Wed, 03/30/2011 - 14:05 नवीन
नेहरा खेळणार... का??? का??
  • Log in or register to post comments

नेहरा खेळणार.

चिंतामणी
Wed, 03/30/2011 - 14:17 नवीन
का?? धोनीची मर्जी एक खम्बा व भरपुर चकणा असे वरती १.५ शहाण्याने लिहीले आहे. त्याची गरज पडणार. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

बॅटिंग टॉस जिंकला...

वपाडाव
Wed, 03/30/2011 - 14:06 नवीन
बॅटिंग टॉस जिंकला...
  • Log in or register to post comments

आयला नेहराला घेतलाय? अश्विन

स्पा
Wed, 03/30/2011 - 14:08 नवीन
आयला नेहराला घेतलाय? अश्विन कुठेय?
  • Log in or register to post comments

बसवला टेंपोत... धोण्याच्या...

वपाडाव
Wed, 03/30/2011 - 14:17 नवीन
बसवला टेंपोत... धोण्याच्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

म्हणजे आज १२ विरुद्ध १०

गणपा
Wed, 03/30/2011 - 14:40 नवीन
म्हणजे आज १२ विरुद्ध १० :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

दोन्ही पंतप्रधान मैदानावर :)

नीलकांत
Wed, 03/30/2011 - 14:30 नवीन
दोन्ही देशांचे पंतप्रधान मैदानावर आले आहेत. ही केवळ मॅच आहे असं वाटतच नाहीये :) सचीन विरू मैदानावर आलेत. ( दे घुमा के !) - नीलकांत
  • Log in or register to post comments

नेहरा खेळणार????

चावटमेला
Wed, 03/30/2011 - 14:38 नवीन
नही!!!!!!! केहदो कि ये झूठ है :(
  • Log in or register to post comments

ये धत्तड तत्तड धत्तड तत्तड

गणपा
Wed, 03/30/2011 - 14:38 नवीन
ये धत्तड तत्तड धत्तड तत्तड मिटींग कँसल्ड..... आणि मी लगेच आजारी पडलो ;)
  • Log in or register to post comments

सचीन विरू ठोकताहेत

नीलकांत
Wed, 03/30/2011 - 14:52 नवीन
विरू एका ओव्हर मध्ये ५ चौके? सचीन सुध्दा दे घुमा के करतोय. सुंदर मॅच चाललीये.
  • Log in or register to post comments

सेहवाग ओउट

स्पा
Wed, 03/30/2011 - 15:06 नवीन
सेहवाग ओउट
  • Log in or register to post comments

गंभिरला साईडला घ्या रे

वपाडाव
Wed, 03/30/2011 - 15:22 नवीन
गंभिरला साईडला घ्या रे जरा....
  • Log in or register to post comments

तेंडल्या जाण्याच्या

वपाडाव
Wed, 03/30/2011 - 15:27 नवीन
तेंडल्या जाण्याच्या मार्गावर.... नाही...... वाचलो....
  • Log in or register to post comments

दोनदा वाचला :)

सखी
Wed, 03/30/2011 - 15:31 नवीन
दोन जीवदानं लागोपाठ मिळाली. खरचं आज हार्ट अ‍ॅटक येणार वाटतं :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

चला पहिल्यांदा रिव्हुव चा

निखिल देशपांडे
Wed, 03/30/2011 - 15:29 नवीन
चला पहिल्यांदा रिव्हुव चा फायदा झाला.. सच्या वाचला.. परत एकदा वाचला..
  • Log in or register to post comments

तेंडुलकर नॉट आउट.

चिंतामणी
Wed, 03/30/2011 - 15:32 नवीन
तेंडुलकर नॉट पुन्हा एकदा आउट. तिस-या अंपायरचा निर्णय.
  • Log in or register to post comments

ते येड** अकमल उगाच्या उगाच

गणपा
Wed, 03/30/2011 - 15:36 नवीन
ते येड** अकमल उगाच्या उगाच केकाटतय
  • Log in or register to post comments

ड्रॉप केला.

चिंतामणी
Wed, 03/30/2011 - 15:39 नवीन
सचीनचा कॅच ड्रॉप केला.
  • Log in or register to post comments

सचिनची कॅच सोडली

निखिल देशपांडे
Wed, 03/30/2011 - 15:39 नवीन
सचिनची कॅच सोडली
  • Log in or register to post comments

आज सचीनचा दिवस दिसतोय

नीलकांत
Wed, 03/30/2011 - 15:48 नवीन
आज सचीनचा दिवस दिसतोय. दोन वेळा जीवदान आणि कॅच सुध्दा सोडली. भारताचे शंभर रन होण्याच्या मार्गावर आहेत. ९९ झालेत.
  • Log in or register to post comments

झाले १०२.. शंभर गाठले. तेही

गवि
Wed, 03/30/2011 - 15:55 नवीन
झाले १०२.. शंभर गाठले. तेही बर्‍या स्पीडने. पाटा खेळपट्टी म्हणावी काय? पाकिस्तानलाही असाच फायदा होईल काय.
  • Log in or register to post comments

पाकिस्तानचे स्पीनर पहाता

निखिल देशपांडे
Wed, 03/30/2011 - 16:15 नवीन
पाकिस्तानचे स्पीनर पहाता आपल्याला अश्वीन ची कमी जानवणार
  • Log in or register to post comments

विकेट पडायला लागल्यात!

चतुरंग
Wed, 03/30/2011 - 16:25 नवीन
सचिन प्रेशराईज आहे आणी ४ औट!!!!!
  • Log in or register to post comments

अगगागागागा युवी आणि कोहली,

स्पा
Wed, 03/30/2011 - 16:26 नवीन
अगगागागागा युवी आणि कोहली, छान पैकी हागून गेलेले आहेत
  • Log in or register to post comments

विराट युवराज गेले. धोनी

मृत्युन्जय
Wed, 03/30/2011 - 16:27 नवीन
विराट युवराज गेले. धोनी जाण्याच्या मार्गावर (तो आला आहे हेच त्याच्या जाण्याचे द्योतक आहे). सचिन असाही आउट होण्यासाठी खुप प्रयत्न करतो आहे. मॅच संपली.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा