(काही वर्षांपुर्वी एका कम्युनिटीवर हा लेख मी इंग्रजीत लिहीला होता. त्याचेच रुपांतर थोडा संपादित करून येथे ठेवत आहे.)
३-४ वर्षांपुर्वी विविध भारतीला ५० वर्षे पुर्ण झाली. त्यानिमीत्ताने जे विविध कार्यक्रम प्रसारीत व्हायचे त्यात "सुहाना सफर" नावाचा एक कार्यक्रम वर्षभर प्रसारीत व्हायचा. त्यात एकाच संगीतकाराची/संगीतकार जोडीची वाटचाल गाण्यासहीत प्रसारीत व्हायची.
क्रमाक्रमाने नौशाद, बर्मन पिता व पुत्र, शंकर जयकीशन, लक्षीकांत प्यारेलाल, रोशन, मदन मोहन, सी.रामचंद्र, वसंत देसाई इत्यादी आघाडीच्या संगीतकारांबद्दल प्रसंगी २-४ भागात कार्यक्रम प्रसारीत व्हायचा.
एकदा मात्र BEST SONGS OF LESS KNOWN MUSIC DIRECTORS अर्थात दुस-या फळीतील संगीतकारांची प्रसीध्द गाणी सादर करण्यात आली. हा कार्यक्रमामु़ळे मी त्या संगीतकार आणि त्यांच्या प्रसीध्द गाण्यांबद्दल लिहायचे ठरवले.
याची सुरवात एस. एन. उर्फ श्री नाथ त्रिपाठी यांचे पासुन करतो.
यांनी आपल्या प्रदिर्ध कारकिर्दीत अनेक प्रकारे चित्रपट विश्वात काम केले. संगीत दिग्दर्शक, गायक, नट, कथा आणि पटकथा लेखक आणि निर्माते म्हणून काम केले.
त्यांची काही प्रसीध्द गाणी पुढील प्रमाणे
चित्रपट- राणी रूपमती (१९५९))
आ लौट के आजा मेरे मीत तुझे मेरे गीत बुलाते हैं
मेरा सूना पड़ा रे संगीत तुझे मेरे गीत बुलाते हैं
( मुकेश आणि लतादिदींनी गाइलेले प्रसीध्द युगलगीत)
बाट चलत नई चुनरी रँग डारी
हे ऽ ऽ ऐसो है बेदर्दी बनवारी
बाट चलत ...
(म.रफी आणि कृष्णराव चोणकर)
चित्रपट- संगीत सम्राट तानसेन (१९६२)
बदली बदली दुनिया है मेरी
जादू है ये क्या तेरे नैनन का
(स्व. महेंद्र कपुर आणि लतादिदींनी गाइलेले प्रसीध्द युगलगीत)
हे नटराज, आ आ
गँगाधर, शम्भो भोलेनाथ, जय हो
(महेंद्र कपुर आणि कमल बारोट)
झूमती चली हवा, याद आ गया कोई
बुझती बुझती आग को, फिर जला गया कोई
( मुकेश आणि लतादिदींनी गाइलेले प्रसीध्द युगलगीत)
राग भैरव प्रथम शान्त रस जाके
शंकर को प्रिय लागे
(मन्ना डे यांनी गाइलेली रागमाला)
सप्त सुरन तीन ग्राम, उनंचास कोटि तान
गुनिजन सब करत ध्यान नाद ब्रह्म जाके
(मन्ना डे यांनी गाइलेली "धृपद" बंदीश)
चित्रपट- लाल किला (१९६०) यातील काव्ये "बहादुर शाह जफर" यांची आहेत
म.रफी यांनी गाइलेले हे गाणे आतड्याला पिळ पाडते.
न किसी की आँख का नूर हूँ
न किसी के दिल का क़रार हूँ
जो किसी के काम न आ सका
मैं वो एक मुश्त-ए-गुबार हूँ
म.रफी यांनी गाइलेली ही अजून एक "बहादुर शाह जफर" यांची रचना.
लगता नहीं है जी मेरा उजड़े दयार में
किस की बनी है आलम-ए-ना-पायेदार में
चित्रपट- जनम जनम के फेरे (१९५७)
ज़रा सामने तो आओ छलिये
छुप छुप छलने में क्या राज़ है
(पै.म. रफी आणि लतादिदींनी गाइलेले प्रसीध्द युगलगीत)
चित्रपट- चंद्रमुखी(१९६०)
नैन का चैन चुराकर ले गई
कर गई नींद हराम
चन्द्रमा सा मुख था उसका
चन्द्रमुखी था नाम
(मुकेश)
चित्रपट- हतीमताई(१९५६)
पर्वरदिगार-ए-आलम तेरा ही है सहारा
तेरे सिवा जहाँ में कोई नहीं हमारा
( म.रफी.)
ही काही उदाहरणा दाखल गाणी येथे ठेवली आहेत. अजून खूप गाणी आपणसुद्धा यात लिहू शकता.
(क्रमशः)
वाचने
3797
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्यवाद
होय.
In reply to धन्यवाद by शुचि
'एस.मोहिंदर' ह्यांचे 'शिरी
आवडलं
देउ शक्शिल नाहे ..द्याच!!!
In reply to आवडलं by पैसा
घ्या लिंक
In reply to देउ शक्शिल नाहे ..द्याच!!! by प्रीत-मोहर
छान धागा...
मुकेश यांचे झूमती चली
ही आम्हा गरीबांसाठी पहिली फळी
फळा-फळी
In reply to ही आम्हा गरीबांसाठी पहिली फळी by सुहास..
'झूमती चली हवा, याद आ गया
येवुद्या आनखिन