Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by गवि on Wed, 02/16/2011 - 17:10
नाही नाही.."आजकालचे तरुण-तरुणी".."पाश्चात्यांचं अंधानुकरण"..असा त्रिफळाचूर्णी लेख नाही हा..तरीही हा यापूर्वी पहिल्यांदा लिहीला तेव्हा मला कोणीतरी आधुनिक बुरख्याआड लपलेले कृष्णराव हेरंबकर (अश्लीलमार्तंड) म्हणाले होते. त्या रात्री मात्र मी त्रिफळाचूर्ण नाही तरी जरा हवाबाण हरडे घेतले..असो.. तर .. वक्षखिंड (Cleavage ला मराठी शब्द सुचेना म्हणून वापरावा लागतोय) दाखवणारे काचोळीसदृश (Bra ला मराठी शब्द सुचेना म्हणून वापरावा लागतोय) उत्तरीय घालून महाविद्यालयात येणा-या पात्रांवर ड्रेस कोड नावाचा काहीतरी निर्बंधवजा अत्याचार होतोय असं पेपरमध्ये मध्यंतरी कळलं. आणि अधूनमधून कळतच असतं. युवावर्गाची (मी पण युवा हं..!!) मुख्य तणतण ही की हे कपडे (म्हणजे सूक्ष्म वस्त्रे) कम्फर्टेबल असतात म्हणून आम्ही घालतो. त्यावर बंदी घालणारे हे कोण प्रिन्सिपॉल.. इट्स आवर लाईफ.. मी अजिबात संस्कृतीरक्षक नाही बाबा. आधीच सांगतो. मी अजिबात कुठल्याही फॅशन विरोधात नाही. उलट नव्या नव्या कपड्यांत नटलेल्या पोरी पाहून मी कौतुक करतो. पोरांचं मला कौतुक नाही. कारणं नैसर्गिक आहेत. मी पोरींविषयीच सगळं लिहिणार. तंग किंवा लहान कपडे घालू नका असा प्रचार इथे नाही. मी तो करणारही नाही. मला उलट असल्या फटाकड्या पोरी बघायला आवडेलच. पण "कम्फर्ट"च्या मुद्दयामुळे आंबट ताक प्यायल्यासारखी माझ्या कपाळावर आठी आली आहे. ज्या निर्वस्त्रांवर "उपाय" म्हणून ड्रेस कोड आला असावा ती निर्वस्त्रं मी नीट पहिली आहेत. हो. पहिली आहेत. बेंबीवर संपलेला शर्ट:- हा घालून मुलगी बाईकवर कुमारमित्रापाठी (Boyfriend ला मराठी शब्द सुचेना म्हणून वापरावा लागतोय) बसते, तेव्हा ती दर तीस सेकंदांनी हात मागे नेऊन शर्ट चिमटीने खाली कमरेवर खेचते. त्याखाली असलेला थालीपीठ भाजणी, उडदाचं डांगर, मोदकाची उकड यापैकी एका शेडचा मांसल भाग झाकावा अशी इच्छा तिला वारंवार होते. म्हणजेच माय लॉर्ड..तो शर्ट कम्फर्टेबल नाही. दो-यायुक्त अंतर्वस्त्रं (याचं नक्की नाव सांगून सहकार्य करावं):- हा कपडा मी घालू का असं मुलीनं विचारल्यावर "पण बाकीचे कपडे कुठे आहेत?" असा भाबडा प्रश्न जातो.. ही स्ट्रिंग स्कंधखळग्यांच्या दोन्ही बाजूस आणि कमरबंदाच्या जागेतून दिसत असते (चू.भू.द्या.घ्या.). ती ही मुलगी सारखी ओढत असते आणि कापडाच्या आत झाकायला बघत असते. म्हणजे लाज वाटते. म्हणजे कम्फर्टेबल नाहीच ना? खूप कमी उंचीचा स्कर्ट:- (वारा आला तरी उडणार नाही कारण उडायला काही शिल्लकच नाही असा.) तो घालून एअरपोर्टवर बसलेली मुलगी पाय अत्यंत आवळून क्रॉस करून बसते. मोकळेपणानं सरळ पाय पसरून बसू शकत नाही. दोन मांड्यांत उरला सुरला स्कर्ट खुपसून घट्ट धरून बसायचं..बाथरूम सापडत नसल्यासारखा चेहरा करून. म्हणजे कम्फर्टेबल नाहीच. मुलीच्या टी शर्टच्या छातीच्या उभारावरच्या एरियात जर लक्षणीय मजकूर छापलेला असला (भले गायत्री मंत्र का असेना..) तर तो आम्ही वाचायचा की नाही वाचायचा? वाचायचा नाही तर मग तो तिथे कशाला ? मैत्रिणींनो..जर उत्तम वक्ष आणि मांड्या दाखवणारा ड्रेस तुम्ही घातलात तर त्यात तुम्हाला फक्त कम्फर्ट हवा असतो का? की उकडतं म्हणून घालता? की आपले असेट इतरांनी बघावेत असं वाटतं? खरं सांगू? इतरांनाही ते बघावेसे वाटतात. तुम्ही ते दाखवलेत तर आम्ही बघू. लाजून खाली मान घालूच असं नाही. ऑफिसात एक मुलगी पूर्ण मांड्या दाखवणारा स्कर्ट घालून आली होती. बराच वेळ तिच्यासोबत काम (मराठी अर्थानं..) करताना, बोलताना छताकडे बघ, पूर्वेकडे बघ, ईशान्येकडे बघ असं केल्यावर माझ्या लक्षात आलं की मी कशाला लाजतोय? मी कशाला टेन्शन घेतोय? मी कपडे घातलेत. आता माझी नजर चोरायची मला काही गरज नाही. पण ते अवघड होतंच. पावसात पांढरा टी शर्ट घातलात तर तो भिजल्यावर कोणी तुम्हाला बघू नये आणि बघितलं तर "तसल्या ओलेत्या" नजरेनं बघू नये अशी अपेक्षा जरा अनरियल नाही वाटत? अरे माझ्या (सारख्याच) तरुण मित्र मंडळींनो. तुम्ही म्हणता की कॉलेजनं आमच्या कपड्यांत लक्ष घालू नये. तुम्ही म्हणता की "यहां का सिस्टीम ही है खराब". तुम्ही म्हणता की "आम्हाला व्यक्तिस्वातंत्र्य हवं." तर मग घसा खरवडून विरोध करण्यापूर्वी "सारासार विचार" नावाची एक सोपी गोष्ट का करून बघत नाही? त्यासाठी आधी नुसता "विचार" करण्याची सवय का लावून घेत नाही? साधा शुद्ध शांत विचार. मग तो कसलाही असो. भिरभिर न करता शांत बसून "विचार". रोज थोडी थोडी सवय केली तर हळू हळू जमेल. काय आहे तो ड्रेस कोड? कशासाठी केला गेलाय? नागडं फिरायची परवानगी मिळाली तर तुम्ही फिराल का? आपण तथाकथित "प्रगत" होत जाताना नुसते "कपडे" स्वीकारलेले नाहीत, त्यासोबत काही संकोचाच्या कल्पनाही तयार केल्या आहेत.. अपरिहार्यपणे. कपडे बदलून समाज तातडीने बदलणार नाही. त्याची नजर असे कपडे घालून रातोरात मरणार नाही. त्याला वेळ लागेल. समाजाने बदलावं आणि नजर सुधारावी ही अपेक्षा चूक नसली तरी अतिआदर्शवादी आहे. ते होणे नाही. तोपर्यंत तरी स्वातंत्र्याची आजच्या दिवशी अस्तित्वात असणारी एक किंमत आहे. ती द्यायची तयारी आहे का? निसर्गाकडे परत जाऊन वल्कलं नेसायची (किंवा तीही नाही) तर त्याच मार्गावर पुढे निसर्गाकडेच जाऊन मुक्त नर मादी संभोग चालेल का? तशी दुर्घटना घडली तर ती हलकी घेऊ शकणार आहात का? पाकीट मारलं गेल्यावर आपण दु:ख करतो पण आयुष्यातून उठत नाही..तसंच याही दुर्घटनेला घेऊ शकू का? विचार..विचार.. किंमत द्यायची तयारी असेल तर जरुर घ्या ते स्वातंत्र्य.. हरकत घेणारे देणारे समाज किंवा कॉलेजचे प्रिन्सिपल यापैकी कोणी कोणी नाही..प्लीज गैरसमज करू नका..तुम्हीच आहात स्वातंत्र्य घेणारे, किंमत देणारे आणि हरकत घेऊ शकणारे.. ग्रो अप बेब्ज. .. !! ... (आता यात कोणी डबल मीनिंग घेतलं तर तो प्रस्तुत लेखकाच्या आधीच डागाळलेल्या चारित्र्यावरचा आणखी एक दुर्दैवी डाग ठरेल..)
  • Log in or register to post comments
  • 64169 views

प्रतिक्रिया

Submitted by शुचि on गुरुवार, 02/17/2011 - 01:00

Permalink

माझ्या मुलीने असे कपडे

माझ्या मुलीने असे कपडे घातलेले मला बिलकुल चालणार नाहीत पण इतरांनी घातले तर माझा आक्षेप नाही. दुट्ट्प्पीपणा म्हणा हवं तर. इथे बायका सर्रास स्लीव्हलेस घालतात, मिनीस्कर्ट घालतात. पण बेंबीखाली जीन वगैरे फारच अंगावर येतं. कॅलिफोर्नियात पाहीलं होतं पण ईस्ट कोस्ट जरा पारंपारीक (कॉन्झरव्हेटीव्ह शिवाय इंटूक समजला जातो) आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 02/17/2011 - 01:21

In reply to माझ्या मुलीने असे कपडे by शुचि

Permalink

बायकाच का? टीनएजर्स बघितले

बायकाच का? टीनएजर्स बघितले असशीलच. मुलांच्या कमरेवरून आत्ता निसटतील कि मग निसटतील अश्या जीन्स आणि बॉक्सर घालून हिंडताना पाहून कितीतरीवेळा डोळे मिटून घ्यावेत (कायमचे नाहीत) असे वाटते. पुढचा रस्ता दिसणार नाही म्हणून मी तसे करीत नाही.;) माझ्या कालेजात एक मुलगी केशरी स्कर्ट आणि केसही केशरी करून आली होती. नंतर जांभळे कपडे घातल्यावर फक्त काही बटा जांभळ्या केल्या होत्या. अगदीच ज्वालाग्रही वाटत होती.;)
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on गुरुवार, 02/17/2011 - 01:29

In reply to बायकाच का? टीनएजर्स बघितले by रेवती

Permalink

टीन मुलं भयानक खाली पडतील असे

टीन मुलं भयानक खाली पडतील असे बर्म्युडा घालतात गं. बाकी केसांचा काहीबाही प्रकार मीही केलाय :( त्यामुळे त्याबाबत मौन. नवरा भयंकर रागवला होता. :P
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on गुरुवार, 02/17/2011 - 02:05

In reply to माझ्या मुलीने असे कपडे by शुचि

Permalink

हवामान

कॅलिफोर्नियात पाहीलं होतं पण ईस्ट कोस्ट जरा पारंपारीक (कॉन्झरव्हेटीव्ह शिवाय इंटूक समजला जातो) आहे. हवामानाचा परिणाम! बाकी अमेरिकन बाया सहसा स्लॅक्स / ट्राऊझर्समध्येच जास्त दिसतात. स्कर्ट-स्टॉकिंग्सची रेलचेल युरोपात पहावी!
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 02/17/2011 - 02:53

In reply to हवामान by सुनील

Permalink

ते मात्र असेल बुवा! आमच्याकडे

ते मात्र असेल बुवा! आमच्याकडे बर्‍या टाऊनमध्ये अगदी आपल्याकडे आया काळजी करतील अश्याच अमेरिकन आया मुलांच्या कपड्यांच्या लांबीची काळजी करताना दिसतात. आपल्याकडे जसा (आपल्या पद्धतीचा) रोज स्वयंपाक करणे वगैरे प्रकार असतात तसेच माझ्या मुलाच्या मित्र मैत्रिणींच्या आया स्वयंपाक करून न्युट्रीशनबद्दल काळजी करत असतात.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on गुरुवार, 02/17/2011 - 05:30

In reply to हवामान by सुनील

Permalink

स्कर्ट-स्टॉकिंग्सची रेलचेल

स्कर्ट-स्टॉकिंग्सची रेलचेल युरोपात पहावी! >> +१
  • Log in or register to post comments

Submitted by गुंडोपंत on गुरुवार, 02/17/2011 - 03:33

Permalink

अरे काय रे हे?

अरे काय हे? कपड्यांचे काय इतके घेऊन बसलात? घालू द्या ज्या जे घालायचे ते. तुम्हाला का अडचण होते रे? माझा पूर्ण पाठिंबा आहे असले सगळे काही करण्याला. काय ते केस रंगवले तर तुमचे जळते हो? वयोमानाने मला डोक्यावर केसच उरले नाहीत म्हणून, नाही तर मलाही जांभळे करावेसे वाटतात. करा रे पोरा पोरींनो हवी ती फ्याशन करा! मस्त मजेत जगा! दुसर्‍यांचे कपडे पाहून स्वतःला काचवणारे हे असले खत्रुड लोक जगात असतातच. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून मजा करा! तेव्हा गवि जा आपल्या बनियन-चड्ड्यांची लेबलं कापा ते उलट करून घाला नि निवांत बसा - वय गेलं नि असले काही आपल्यावेळी मिळाले नाही, म्हणून त्रागा करू नका!
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 02/17/2011 - 07:51

In reply to अरे काय रे हे? by गुंडोपंत

Permalink

नाही गुंडोपंत.माझे काही वय

नाही गुंडोपंत.माझे काही वय बिय झालेले नाही.केस शाबूत आणि योग्य वयात सौंदर्य बघायला मिळतंय. Thats why I am in unique position to write this thought. मीही हेच म्हणतो.आवडते ते घाला.जे घातल्यावर सदैव एक हात ते सावरुन झाकपाक करण्यात जाईल आणि मोकळे बसण्याचंही स्वातंत्र्य राहणार नाही असले घालण्याबाबतीत फक्त सारासार विचार करा.तोही नसेल करायचा तरी आनंद आहे.पाहात बसतो गंमत.असो. मला अडचण होते हा ज्योक झाला. In fact "त्यांना" क्षणोक्षणी अडचण,संकोच होतोय हे दिसतं म्हणून विचार येतो. बाकी परवानगी नाकारणारा मी कोण आणि जा रे माझा पठिंबा आहे म्हणून ती देणारे तुम्ही तरी कोण? आपण दोघेही काही कोणी राजे नव्हेत.आपण जे वाटते तेच लिहितोय ना? आय होप यू समझींग्ड.
  • Log in or register to post comments

Submitted by गुंडोपंत on गुरुवार, 02/17/2011 - 09:47

In reply to नाही गुंडोपंत.माझे काही वय by गवि

Permalink

अरे

बाकी मला तुझा मुद्दा समजला आहे. पण... तरी माझा 'पण' शिल्लकच आहे. अरे कपडे आहेत म्हणून सौंदर्य आहे. ते तोकडे असल्याने सौंदर्य मादक 'वाटते' आहे. नरमादीच्या गूजनातला हा एक मात्र 'इव्हेंट' आहे. ते कपडे तोकडे असण्यात ते 'नेमकेपणाने' सावरण्यातपण एक मजा आहे. त्यात अडचण कसली? नेमक्या कपड्यांची हळू कळू सवय होते. मग नेमकेपणाने कसे बसले आणि बाईकवर कशी मिठी मारली तर आपला शर्ट आणि स्कर्ट उडत नाही ते कळते! हा नुभवाचा भाग आहे. लोक अनुभवातून बिनधास्तपणा शिकतात. मात्र जे झेपत नाही ते घालू नये हा मुद्दा कळला. पण मग ज्यांना तोकडे घालायची सवयच नाही त्यांनी ती सवय तरी कशी करावी?
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on गुरुवार, 02/17/2011 - 03:47

Permalink

जमत असेल आणि चांगलं दिसत असेल

जमत असेल आणि चांगलं दिसत असेल तर कोणतेही कपडे घाला....इतरांचं माहित नाही पण मी घालते..भारतात असतानाही घालायचे.... अर्थात मोठ्या शहरात फ्याशन चालते....छोट्या शहरात, गावात वगैरे मानसिकता बदललेली नाही त्यामुळे... बाकी पारंपारिक कपडे घातलेल्या बायकांना किमती द्याव्या लागत नाहीत हे वाचून डोळे भरू भरू आले आणि मग वाहू लागले..
  • Log in or register to post comments

Submitted by गुंडोपंत on गुरुवार, 02/17/2011 - 07:14

In reply to जमत असेल आणि चांगलं दिसत असेल by शिल्पा ब

Permalink

हेच

जमत असेल आणि चांगलं दिसत असेल तर कोणतेही कपडे घाला.... हेच म्हणतो मी. म्हणून मी माझी कोपरी नेहमी घालत असतो :) नुसत्या कोपरी आणि चड्डीवर आंगणात गेलो म्हणून ही ओरडत असते. पण माझी नाडीची चड्डी असते गुडघ्या पर्यंत. त्यामुळे काय बिघडते. शिवाय मला का कुणी माझी फिगर पाहून पळवून नेणार आहे? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by शेखर on गुरुवार, 02/17/2011 - 07:30

In reply to हेच by गुंडोपंत

Permalink

वॅक्सिंग

>> नुसत्या कोपरी आणि चड्डीवर आंगणात गेलो म्हणून ही ओरडत असते पंत, टार्‍या तेच म्हणत होता लोक वॅक्सिंग न करता चड्डीवर बाहेर फिरतात. वॅक्सिंग करुन बघा, बहुतेक तुमची ही ओरडणार नाही ;)
  • Log in or register to post comments

Submitted by गुंडोपंत on गुरुवार, 02/17/2011 - 09:52

In reply to वॅक्सिंग by शेखर

Permalink

आयडीया

आयडीया चांगली आहे. आमच्या ही ला विचारून पाहतो. तुम्हाला माहिती आहे का पुरुषांचे व्याकसींग करणारे कुणी? तुम्ही कुठे केलेत?
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on गुरुवार, 02/17/2011 - 09:54

In reply to आयडीया by गुंडोपंत

Permalink

व्यॅक्सींग म्हणजे काय गंमत

व्यॅक्सींग म्हणजे काय गंमत आहे का? मुळापासुन केस उपटुन निघतात...आणि या वयात कशाला नाही ते सोंग !! ;) आहात तसेच रहा..जुने जमाने की निशाणी..
  • Log in or register to post comments

Submitted by गुंडोपंत on गुरुवार, 02/17/2011 - 10:08

In reply to व्यॅक्सींग म्हणजे काय गंमत by शिल्पा ब

Permalink

अरे बापरे

उपटून? अरे बापरे!! हे तर भलतेच अवघड आहे म्हणायचे! व्याकसिंग साठी काही लोकल अनास्थेशिया वगैरे देत असतील ना? नसेल तर आपल्याला काही जमायचं नाही बॉ! मग मी जुणे जमाणे की णिशानी म्हणूनच बरा!
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on गुरुवार, 02/17/2011 - 10:30

In reply to अरे बापरे by गुंडोपंत

Permalink

वा गुंडोपंत वा तुम्ही

वा गुंडोपंत वा :) तुम्ही वॅक्सिंग च्या भाणगडीत ण पडता सरळ वस्तारा फिरवा .. हाय काय नाय काय :) आणि जरा ती चट्ट्यापट्यांची णाडी वाली शॉर्ट्स सोडुन बदामाचं किंवा फुलांचं किंव्हा ट्विटीबर्ड चं चित्र असलेली बॉक्सर वापरत चला .. हल्लीच्या म्हैलांमधे ते जास्त प्रिय आहे असे मी "टाईम" ह्या मासिकात वाचले आहे :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on गुरुवार, 02/17/2011 - 10:33

In reply to वा गुंडोपंत वा तुम्ही by टारझन

Permalink

=))=))=))=)) गचकेश !!

=))=))=))=)) गचकेश !!
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on गुरुवार, 02/17/2011 - 10:39

In reply to वा गुंडोपंत वा तुम्ही by टारझन

Permalink

हल्लीच्या म्हैल्लान्ना

हल्लीच्या म्हैल्लान्ना जाऊद्या हो...त्यांच्या म्हैलेला काय आवडतंय अन त्यांना काय झेपतंय ते महत्वाचं...अशा रंगीबेरंगी ब्वाक्सर लेन्ग्यासारख्या थोडीच घालता येणारयेत? टैम मराठीत यायला लागला कि काय !! का तुम्हाला विंग्रजी येतंय याची जाहिरात म्हणायची? का तुम्ही काय वापरताय याचा निनाद आहे हा? उगीच प्रश्न पडले इतकंच...
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on गुरुवार, 02/17/2011 - 12:19

In reply to हल्लीच्या म्हैल्लान्ना by शिल्पा ब

Permalink

हीहीहीहीही !!! एका

हीहीहीहीही !!! एका प्रतिसादात किती विकेटा काढाल ??
  • Log in or register to post comments

Submitted by गुंडोपंत on गुरुवार, 02/17/2011 - 11:15

In reply to वा गुंडोपंत वा तुम्ही by टारझन

Permalink

लाल बदामाच्या चड्ड्या

अरे बाळा मला महिलांमध्ये लोकप्रियतेची गरज नाही रे बाबा! महिलाप्रिय झालो तरी या वयात ती लोकप्रियता 'झेपली' पण पाहिजे ना? आता काही आमचे लाल बदामाच्या चड्ड्या घालायचे वय नाही राहिले. ते तुमच्या सारख्यांवर सोपवले आहे राजे! लढा! आमच्या 'ही' ला मी प्रिय आहे इतकेच पुरे. त्यामुळे मला माझी निळी, नाडीवाली, बिना लेबलाची चट्टेरी चड्डीच बरी!
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on गुरुवार, 02/17/2011 - 11:04

In reply to व्यॅक्सींग म्हणजे काय गंमत by शिल्पा ब

Permalink

+१

बेष्ट ... वेण्या घाला :D
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 02/17/2011 - 10:53

In reply to जमत असेल आणि चांगलं दिसत असेल by शिल्पा ब

Permalink

बाकी पारंपारिक कपडे घातलेल्या

बाकी पारंपारिक कपडे घातलेल्या बायकांना किमती द्याव्या लागत नाहीत हे वाचून डोळे भरू भरू आले आणि मग वाहू लागले.. >>> "बाकी पारंपारिक कपडे घातलेल्या बायकांना किमती द्याव्या लागत नाहीत" -1 आसे म्हटले नाही. दुरित हे दुरितच.. कंफर्ट कशाला म्हणायचं आणि कशाला नाही याचा मुद्दा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by खादाड अमिता on Mon, 02/21/2011 - 12:42

In reply to बाकी पारंपारिक कपडे घातलेल्या by गवि

Permalink

हे ऐकुन अनन्द झाला

>>>बाकी पारंपारिक कपडे घातलेल्या बायकांना किमती द्याव्या लागत नाहीत" -1 आसे म्हटले नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by योगी९०० on गुरुवार, 02/17/2011 - 04:15

Permalink

लेख वाचताना मजा आली..पण मांडणी खटकली..

उत्तम लेख..चांगला विषय..पण मांडणी? पुर्वी काही पाक्षिके "अरेरे कितीही अश्लिलता" असे म्हणत अश्लिल फोटो दाखवून द्यायची.. म्हणजे दोन्ही लोकांची हौस भागते..ज्या लोकांना फोटो पहायचे आहेत ते फोटो पहात..ज्यांना अश्लिलतेच्या विरूद्धात काही वाचायचे आहे ते ले़ख वाचत...म्हणजे असे केल्याने आपण अश्लिलतेच्या विरूद्धात काहीतरी करत आहोत असे दाखवून आपल्या मॅगॅझिनचा खप वाढवायचा प्रयत्न असायचा.. तुमचा लेख मला थोडाफार या प्रकारातला वाटला..म्हणजे असले शब्द दर तीन चार वाक्यानंतर वापरून पण वरकरणी लेखाचा रोख मात्र काहीतरी या विरूद्ध उपदेश द्यायचा..म्हणजे तुम्ही तसले लिहायची हौस भागवून घेतली आहे असे वाटले..(माफ करा थोडे स्पष्ट बोललो म्हणून..जे मनात आले तेच लिहीले..)
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 02/17/2011 - 08:46

In reply to लेख वाचताना मजा आली..पण मांडणी खटकली.. by योगी९००

Permalink

मुद्दा मांडण्यासाठी मसाला

मुद्दा मांडण्यासाठी मसाला मारावा लागतो.ते अधूनमधून हिरवट शब्द नसते तर तुमच्यासहित कोणी काय मुद्दा आहे तेही शेवटापर्यंत वाचले नसते. हिरवट नव्हे,मी अजून हिरवाच आहे. एकूण रोचक वाटले ना?भरुन पावलो.
  • Log in or register to post comments

Submitted by गुंडोपंत on गुरुवार, 02/17/2011 - 09:53

In reply to मुद्दा मांडण्यासाठी मसाला by गवि

Permalink

गवि

गगनविहारी की गगन हिरवाई?
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Fri, 02/18/2011 - 02:16

In reply to लेख वाचताना मजा आली..पण मांडणी खटकली.. by योगी९००

Permalink

विषय ठीक पण विशेष महत्त्वाचा नाही

मांडणीबाबतीत अतिशय सहमत. पौगंडावस्थेत समवयस्कांबरोबर ह्या प्रकारचे जोक किंवा चर्चा होत असतात, ते विषय तेव्हा चघळणे, किंवा काही विशिष्ट शब्दसंपत्ती तयार होते तिचा वापर किंवा तसे चारचौघात मित्रांमध्ये बोलून गंमत घेणे हे त्या वयाला अनुरूप असते. पण आपण त्यातून कधीतरी बाहेर पडतो किंवा पडावे अशी अपेक्षा असते. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by नीधप on Mon, 02/21/2011 - 21:30

In reply to विषय ठीक पण विशेष महत्त्वाचा नाही by चित्रा

Permalink

+ १

+ १
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on गुरुवार, 02/17/2011 - 05:49

Permalink

कोणी काय कपडे घालावे तो

कोणी काय कपडे घालावे तो ज्याचा त्याचा प्रश्न असावा असं मला वाटतं. काही लोकांच्या लैंगिक भावना चाळवल्या जातात म्हणून किंवा नुसतंच एक सामाजिक बंधन म्हणून स्वतःची हौस का मारायची? ज्यांना बघायचं आहे ते तसंही टकामका बघतच असतात. पूर्ण बुरख्यात झाकलेल्या स्त्रीची पाऊले पाहून पुरुषांच्या मनात पाप येते वगैरे किस्से ही ऐकलेलेच आहेत. जेवढं झाकाल तेवढी उत्सुकता आणि अप्रूप वाढतं. कमी आणि उत्तान कपडे घातल्याने बलात्कार वगैरे गुन्हे होतात याला काहीही आधार नाही. विशेषतः चित्रपट, दूरचित्रवाणी वगैरे माध्यमांमध्ये सगळं चालवून घ्यायचं आणि लोकांनी मात्र त्याचं अनुकरण करू नये अशी अपेक्षा बाळगायची हे चुकीचं आहे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 02/17/2011 - 06:22

Permalink

ओ विहारी... लयं जबराट लिवलं

ओ विहारी... लयं जबराट लिवलं हायेत तुम्ही. :) बाकी मुली आणि मुलींचे कपडे यावर एक विश्वकोष नक्कीच बनु शकेल हो !!! ;) लो वेस्ट जिन्स घालुन फिरणार्‍या मुलींच्या मनात नक्की काय भावना असतात, ते जाणुन घ्यायची लयं इच्छा हाय. चिर दर्शन सोहळाच असतो सगळा !!! ;) जाता जाता :--- ते शेफाली झरीवालाचं काटा लगा आठवलं... का ते समजलचं असेल तुम्हाला. ;) तिच्या हातातल "ते" पुस्तक पाहुन तिच्या "बाल मनावर" झालेला परिणाम लगेच कळला... ;) आणि ते गाणं तसं का ते कळलं... असो... एकदा ओरडुन घेतो :--- घोर कलियुग हो !!! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सन्जोप राव on गुरुवार, 02/17/2011 - 06:46

Permalink

शब्द

लेखकाच्या शब्दकळेला सलाम. वक्षखिंड काय, कुमारमित्र काय,दो-यायुक्त अंतर्वस्त्रं काय, अगदी मस्त शब्द.दो-यायुक्त अंतर्वस्त्रं (इथे स्पाघेटी म्हणायचं असेल तर) ला शेवयासदृश असं का म्हटलं नाही याचं नवल वाटलं. असो. हिपहगरला कुल्लाकुरवाळक किंवा नितंबनेसण असे शब्द रुढ व्हावेत का?
  • Log in or register to post comments

Submitted by पंगा on गुरुवार, 02/17/2011 - 07:53

In reply to शब्द by सन्जोप राव

Permalink

हिपहगर

हिपहगरला कुल्लाकुरवाळक किंवा नितंबनेसण असे शब्द रुढ व्हावेत का?
स्वभाषा आत्मविश्वासाने वापरणार्‍याच्या हक्काने केल्यास तज्ज्ञांच्या मते ग्राह्य ठरावेत, असे वाटते. पण त्याऐवजी 'नितंबालिंगक' किंवा 'नितंबचुंबक' हे पर्याय कसे वाटतात?
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on गुरुवार, 02/17/2011 - 07:33

Permalink

चमचमीत

चमचमीत शब्दांत, सुंदर शैलीत, वाचत राहावासा वाटणारा लेख. पण विषयाच्या व मांडणीच्या बाबतीत योगी९०० यांच्याशी सहमत. एकाच वेळी संस्कृतीरक्षणाचा आनंद, व हिरवटपणाचा मजा. तरीही एक मान्य केलंच पाहिजे की तुम्ही केवळ 'कंफर्टेबल' या कारणाला आक्षेप घेतला आहे. म्हणजे मी असं गृहीत धरतो की समस्त कुमारमित्रस्वयंचलितदुचाकीपार्श्वजागारोहित मुलींनी जर आपला तोकडा शर्ट उडला तरी पर्वा नाही अशा कंफर्टेबली वावरलं तर तुम्ही हा लेख जाहीरपणे मागे घ्याल. किंवा उडण्यास जागा नसलेला स्कर्ट घालून शेरॉन स्टोनगिरी केली तर तुम्ही 'वा, कंफर्टेबल राहाणं म्हणतात ते यालाच' असं म्हणाल. मी असं म्हणण्याचा प्रयत्न करतो आहे की कंफर्ट हे केवळ शारीरिक नसतं तर मानसिकही असतं. शरीराला जे कंफर्टेबल आहे, ते संस्कृतीरक्षकांच्या आणि टवाळांच्या नजरेला हीन वाटतं त्याचा परिणाम ते कपडे घालणाऱ्या मुलींच्या मानसिक कंफर्टवरही होतो. जर संपूर्ण समाजाने मानसिकता बदलली व आपली नजर निर्मळ केली तर हे डिसकंफर्ट जाणार नाही का?
तशी दुर्घटना घडली तर ती हलकी घेऊ शकणार आहात का? पाकीट मारलं गेल्यावर आपण दु:ख करतो पण आयुष्यातून उठत नाही..तसंच याही दुर्घटनेला घेऊ शकू का?
हे फारच खुपलं. बलात्कार हा शब्द न वापरता तुम्ही संभाव्य 'दुर्घटनां'ची जबाबदारी तसले कपडे घालणाऱ्या मुलींवर टाकत आहात. यापेक्षा अधिक डिसकंफर्टिंग काय असेल?
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on गुरुवार, 02/17/2011 - 08:05

In reply to चमचमीत by राजेश घासकडवी

Permalink

<<<हे फारच खुपलं. बलात्कार हा

<<<हे फारच खुपलं. बलात्कार हा शब्द न वापरता तुम्ही संभाव्य 'दुर्घटनां'ची जबाबदारी तसले कपडे घालणाऱ्या मुलींवर टाकत आहात. यापेक्षा अधिक डिसकंफर्टिंग काय असेल? +१ अगदी १००% आणि "तसले " (यात वाईट काय ते नक्की समजत नाही कारण नौवारीच्या सुमारास पाचवारी उथळ ठरवली गेली होती असे काहीसे ऐकून आहे ) कपडे घातलेल्यांवरच अशी दुर्घटना कोसळू शकते का? गम्मत म्हणजे अशी मानसिकता केवळ पुरुषांचीच असते असे नाही....अन आया सुद्धा त्यांच्या मुलांवर आणि मुलींवर हेच संस्कार करताना दिसतात त्यावेळी दया येते...त्याच त्या घाणेरड्या मानसिकतेत गुंतवून टाकायचं कि त्यांचा त्यांना विचार करून ठरवू द्यायचं?
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 02/17/2011 - 09:02

In reply to <<<हे फारच खुपलं. बलात्कार हा by शिल्पा ब

Permalink

साडी हे काही खास वस्त्र आहे

साडी हे काही खास वस्त्र आहे आणि ते घातले की सर्व उत्तम कंफर्टेबल अशी घोर गैरसमजूत आहे. As seen on traditional day, साडी सवय नसताना नेसली की तीच स्कर्टवाली डिसकंफर्ट लेव्हल येते.आपण ज्यात सदा कॉन्शस होतो आणि सतत चाचपून ठीकठाक ठेवत राहतो ते वस्त्र,मग साडी,धोतर,पीतांबर,धाबळी,कद,मुकटा,लुंगी,हाप्पँट काही का असेना.कोणीही ते केवळ इतरजण घालतात म्हणून घालावे का? जाऊदे. By the way.. त्याच त्या घाणेरड्या मानसिकतेत गुंतवून टाकायचं कि त्यांचा त्यांना विचार करून ठरवू द्यायचं?>>> Vichaar karaayalaach madat karatoy.. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 02/17/2011 - 08:35

In reply to चमचमीत by राजेश घासकडवी

Permalink

मी असं गृहीत धरतो की समस्त

मी असं गृहीत धरतो की समस्त कुमारमित्रस्वयंचलितदुचाकीपार्श्वजागारोहित मुलींनी जर आपला तोकडा शर्ट उडला तरी पर्वा नाही अशा कंफर्टेबली वावरलं तर तुम्ही हा लेख जाहीरपणे मागे घ्याल. किंवा उडण्यास जागा नसलेला स्कर्ट घालून शेरॉन स्टोनगिरी केली तर तुम्ही 'वा, कंफर्टेबल राहाणं म्हणतात ते यालाच' असं म्हणाल. >>>> 100 % Just mean dont do whats not comfortable just under pressure to look so called attractive like peers. जबाबदारी नाही हो टाकली. तुम्ही अमुक कपडे घातलेत तर बलात्कार योग्य ठरेल असे मूर्ख विचार मी करतोय असं तुम्हाला वाटलं हे अजून discomforting. जबाबदार नाहीत पण बळी त्याच ठरतात ना? बलात्कार सरळसरळ दुरितच आहे हो.त्याला करणाराच जबाबदार. But ते पाकीट गेल्याइतके सहजतेने नाही ना घेता येणार? असो.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on गुरुवार, 02/17/2011 - 09:11

In reply to मी असं गृहीत धरतो की समस्त by गवि

Permalink

जबाबदार नाहीत पण बळी त्याच

जबाबदार नाहीत पण बळी त्याच ठरतात ना? बलात्कार सरळसरळ दुरितच आहे हो.त्याला करणाराच जबाबदार.
बलात्कार होणं वाईट हे तुमचं मत आहे याबाबत मला जराही शंका नाही. विशिष्ट पद्धतीने कपडे घातले तर बलात्काराला बळी पडतात या विधानाला काय आधार आहे हे सांगू शकाल का? अन्यथा हा सोयीस्कर पूर्वग्रह वाटतो. तसले कपडे घालणाऱ्या मुलीवर जबाबदारी न टाकता या विधानाची कारणपरंपरा सांगता येईल का? माझा मुद्दा असा आहे की आपल्याला हवे तसे कंफर्टेबल कपडे घालताना मानसिक डिसकंफर्ट वाढवण्याचं काम तथाकथित संस्कृतीरक्षक करतात. मग तो डिसकंफर्ट हा शारीरिकच आहे असा दावाही करणं हे अन्याय्य होतं.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 02/17/2011 - 10:03

In reply to जबाबदार नाहीत पण बळी त्याच by राजेश घासकडवी

Permalink

दोन्ही प्रतिसाद उत्तम, राजेश

"मंगळसूत्र घातलं की इतर पुरूष वाईट नजरेने बघत नाहीत" या वाक्याएवढं हास्यास्पद आणखी काही वाचायला मिळेल असं वाटलं नव्हतं. "मँचेस्टरमधल्या मुलींचे कपडे ऋतूप्रमाणे बदलत नाहीत," अशी 'तक्रार' एका साठीच्या कलीगने केली होती. मँचेस्टरमधे असताना, असे काय काय विनोदी शब्द वापरता येतील असे कपडे वापरताना, कधीही अनकंफर्टेबल वाटलं नाही. मात्र तत्सम संस्कृतीरक्षकांच्या 'गावा'त अंगभर कपडे घालूनही अनेकदा अनकंफर्टेबल वाटतं. याच्याच उलट गंमत माझ्या मैत्रिणीने सांगितली. तिचा स्विमिंग कॉस्चुम अगदीच "भारतीय" आहे. इटलीत बीचवर पोहायला जाताना ती तोच कॉस्चुम घालून गेली तर इतरांना थोडं अनकंफर्टेबल वाटलं. फुलं बडवायला चपला किंवा फ्लोटर्स घालून गेलं तरीही अनकंफर्टेबल वाटतं. एकेकाळी स्त्रियांना शिक्षणाची काय गरज असं म्हणत त्यांचं शिक्षणच बंद केलं. आता ते नाही तर अभिव्यक्तीवर हल्ला! स्वतः कायम शर्ट-ट्राऊझर्स घालणारे ढुढ्ढाचार्य "स्त्रियांचं सौंदर्य साडीतच खुलून दिसतं", वगैरे ड्वायलाक मारायला लागले की त्यांच्या सौंदर्यदृष्टीच्या नावाने बोटं मोडण्यात भयंकर मौज वाटते. बाकी माझे स्वतःचे कपडे फक्त ऋतूमानाप्रमाणेच नाही तर गरज आणि स्वतःच्या आकारमानाप्रमाणेही बदलतात. शिल्पा, त्याबाबतीत तुझ्याबद्दल नक्कीच असूया वाटते. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 02/17/2011 - 10:43

In reply to दोन्ही प्रतिसाद उत्तम, राजेश by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

राजेशजी आणि आदितीतै..

"विशिष्ट पद्धतीने कपडे घातले तर बलात्काराला बळी पडतात या विधानाला काय आधार आहे हे सांगू शकाल का?" आणि "मंगळसूत्र घातलं की इतर पुरूष वाईट नजरेने बघत नाहीत" राजेशजी, थेट बलात्कारापर्यंत कशाला पोहोचताय? ती एक एक्स्ट्रीम गोष्ट झाली. नुसत्या नजरासुद्धा टोचत असतील तर आणि त्यामुळे कॉन्शस होऊन ते जे काही अंगात घातलंय त्याच्या आनंदापेक्षा संकोच आणि अवघडलेपण जास्त होत असेल तर अशा मनोवृत्तीने ते का घालावेत असा फक्त विचार करायला सांगितला. शिवाय एका दृष्टिक्षेपात कदाचित तुम्ही केवळ "तोकडे" कपडे म्हणजे वाईट अशी समजूत करुन घेतलीत. मी अजून स्पष्ट करतो: मी नुकतीच एअरपोर्टवर खुर्चीत बसलेली एक मुलगी पाहिली. तिचा स्कर्ट असा होता की तिला घट्ट पाय एकमेकांशी जुळवून बसण्याखेरीज इलाजच नव्हता. समोर बसलेला मी, माझी पत्नी आणि तीनवर्षीय मुलगा या तिघांनाही अन्यत्र नजरा वळवून बसणं भाग पडत होतं. तरीही समोरच असल्याने नजर जातच होती. आमचं जाऊ द्या. ती मुलगी स्वतः पूर्ण दोन तासांच्या वेटिंगमधे आपली पोझिशन घट्ट पाय जुळवून सांभाळणे याखेरीज कशातच लक्ष लावू शकत नव्हती. तरीही जर तिला त्या ड्रेसचा नंतर अन्यत्र काही आनंद / लाभ / आराम होणार असेल तर काही हरकत नाही पण त्याच जागी ती पँट शर्ट घालून बसली असती तर मोकळेपणाने चारचौघांसारखे तिचे ते दोन तास गेले असते. मी अनेक स्कूल गोईंग मुली स्कर्ट घालून सायकल चालवताना पाहिल्या आहेत. प्रत्येक पेडलला एक हात हँडलवरुन सोडून त्या आपला स्कर्ट गुढग्याखाली सरकवत राहतात. हा ड्रेस कंफर्टेबल आहे का? मी संस्कृतीरक्षक आहे किंवा माझे काही बुरसटलेले जुने विचार (साडी वगैरे नेसा) असे थोपतो आहे अशी समजूत झाली असेल तर नक्कीच लेख वरवर वाचला आहे असं म्हणता येईल. तुमच्या समाजाकडून अपेक्षा रास्त आहेत पण आयडिअलिस्टिक आणि फास्ट आहेत. मी खाली लेखातलंच वाक्य हायलाईट करतो. कपडे बदलून समाज तातडीने बदलणार नाही. त्याची नजर असे कपडे घालून रातोरात मरणार नाही. त्याला वेळ लागेल. पूर्ण कपडे घालूनही जे व्हायचं ते होणारच हे अगदी खरं पण तुम्ही जे कपडे घालताय त्याचा समोरच्यावर काय इम्पॅक्ट व्हावा याची अपेक्षा आधी ठेवूनच ते ड्रेसिंग केलेलं असावं ना? आपण क्षणभर शरीरप्रदर्शन हा ढोबळ मुद्दा बाजूला ठेवू. हे पहा: Image removed. किंवा हे: Image removed. यापैकी काही स्टाईल मला / तुम्हाला आवडते म्हणून करुन आपण बाहेर गेलो, तर लोकांनी मला /आपल्याला पाहूनही न पाहिल्यासारखे करावे किंवा "विचित्र" नजरांनी पाहू नये आणि त्या नजरांनी मला संकोचून जायला होऊ नये अशी अपेक्षा ठेवणे हे अति नाही होत? तुम्हीही माझ्याकडे विचित्रपणेच बघाल. अमेरिकेत समजा बरेच लोक असे रहात असतील तर मग लोकांनाही ओव्हर द ईअर्स सवय झालीच असेल. तिथे संकोच वाटूच नये. मी त्या त्या सराउंडिंगमधे कंफर्टेबल नसलेल्या कपड्यांना (पेहराव म्हणू हवं तर) कंफर्टेबल म्हणण्याविषयी म्हणतोय्..कारण नीट विचार केला तर असं दिसेल की हे पीअर प्रेशरने अ‍ॅडॉप्ट केलं गेलेलं असतं. उदाहरण हे उदाहरणच आहे म्हणून किंचित अतिरेकी घेतलंय. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on गुरुवार, 02/17/2011 - 11:03

In reply to राजेशजी आणि आदितीतै.. by गवि

Permalink

केवळ दुसऱ्याची बरोबरी

केवळ दुसऱ्याची बरोबरी करण्यासाठी वगैरे आपले मत, वागणे, कपडे अजून काय असेल ते बदलू नये.... कपड्यांच्या किंवा इतर कोणत्याही फ्याशनविषयी : आपण जर ती फ्याशन करीत असू तर बिनधास्त करावी....याला काय वाटेल, त्याला काय वाटेल असे विचार कशाला करायचे? वरील उदा. दिलेले विचित्र लोकसुद्धा त्यांच्या विचित्रपणात संकोचत नसतील तर तर त्यांच्यापुरते ते ठीकच म्हणायचे...इथे मी यापेक्षा भयानक प्रकार पाहिलेत. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 02/17/2011 - 11:09

In reply to केवळ दुसऱ्याची बरोबरी by शिल्पा ब

Permalink

हुश्श..

हुश्श.. हेच म्हणायचंय..निदान अर्धा भाग तरी यातला. बघणार्‍याची नाही तरी स्वतःच्या कंफर्ट लेव्हलची फिकीर किमान करावी. सुटलो..आता कुणाला समजवण्यासाठी लेखाहून मोठ्या कॉमेंट टाकायला नकोत. यू हिट बुल्जआय शिल्पातै. थँक्स.. :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on गुरुवार, 02/17/2011 - 11:13

In reply to राजेशजी आणि आदितीतै.. by गवि

Permalink

करेक्ट !

+१ च हो गगनदा !! नुसत्या नजरासुद्धा टोचत असतील तर आणि त्यामुळे कॉन्शस होऊन ते जे काही अंगात घातलंय त्याच्या आनंदापेक्षा संकोच आणि अवघडलेपण जास्त होत असेल तर अशा मनोवृत्तीने ते का घालावेत असा फक्त विचार करायला सांगितला. >>> माझ्या मते पुरुषाकडे (अनफॉर्च्युनेटली) एक नजर (सातवा सेन्स म्हणा हवे तर) असते , तो स्त्री ने काही ही घातल तरी ही आर-पार बघु शकतो, अर्थात ही नजर, (जगभर, सवयींची , आधुनिकेतची, प्रांताची आकडेमोड मोडुन) बाय डिफॉल्ट असली तरी कोणाकडे कशा नजरेने बघाव, हे , निव्वळ त्याच्या मानसिकतेवर अवलंबुन असते. आता जर एखाद्याने भुकेल्या समोर वाढुन ठेवले तर तो जेवणार नाही का ? प्रश्नाचे उत्तर सोप्प आहे..पण हाच मुद्दा रिव्हर्स थिन्किन्ग ने नेमका उलटा ही लागु होवुन शकतो , म्हणजे ..तो भुकेला आहे की नाही याचा प्रश्नच नाही, त्या नजरेने बघीतले तर ताट हे नेहमी साठी वाढुनच ठेवले आहे .. आहे की नाही गम्मत ;)
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on गुरुवार, 02/17/2011 - 12:06

In reply to करेक्ट ! by सुहास..

Permalink

तो भुकेला आहे की नाही याचा

तो भुकेला आहे की नाही याचा प्रश्नच नाही, त्या नजरेने बघीतले तर ताट हे नेहमी साठी वाढुनच ठेवले आहे .. +१ जेवायचे तर जेवा किंवा पाहुनच ढेकर द्या (जेवण झाले असेल तर). उपवास असेल तर कोंबडी वाचली.
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Fri, 02/18/2011 - 11:57

In reply to करेक्ट ! by सुहास..

Permalink

माझ्या मते पुरुषाकडे

माझ्या मते पुरुषाकडे (अनफॉर्च्युनेटली) एक नजर (सातवा सेन्स म्हणा हवे तर) असते , तो स्त्री ने काही ही घातल तरी ही आर-पार बघु शकतो, अर्थात ही नजर, (जगभर, सवयींची , आधुनिकेतची, प्रांताची आकडेमोड मोडुन) बाय डिफॉल्ट असली तरी कोणाकडे कशा नजरेने बघाव, हे , निव्वळ त्याच्या मानसिकतेवर अवलंबुन असते. आता जर एखाद्याने भुकेल्या समोर वाढुन ठेवले तर तो जेवणार नाही का ? प्रश्नाचे उत्तर सोप्प आहे..पण हाच मुद्दा रिव्हर्स थिन्किन्ग ने नेमका उलटा ही लागु होवुन शकतो , म्हणजे ..तो भुकेला आहे की नाही याचा प्रश्नच नाही, त्या नजरेने बघीतले तर ताट हे नेहमी साठी वाढुनच ठेवले आहे .. सहमत आहे रे.. यावर कोणी प्रतिवाद नाही केला वाटतं?
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 02/17/2011 - 12:22

In reply to राजेशजी आणि आदितीतै.. by गवि

Permalink

काही प्रश्न

मुळात आपले कपडे इतरांसाठी असतात का स्वतःसाठी? ऋतूप्रमाणे, गरजेप्रमाणे कपडे बदलावेत अशी अपेक्षा असेल तर कपडे स्वतःसाठीच असतात हे ही मान्य असावं. शाळेतल्या इतर मुलींचं तर आहेच, पण मी सुद्धा शाळेत जाताना पिनोफॉल ओढत शाळेत जायचे. सायकलने मुलीसुद्धा शाळेत येतात हे माहित असताना असले युनिफॉर्म ठेवणार्‍या शाळांबद्दल तुमचं काय मत? हे असले केस एकाने वाढवले म्हणून केस वाढवणार्‍या, कापणार्‍या सगळ्याच पुरूष जातीच्या नावाने शंख करायचा का? किंवा काही पुरूष स्त्रियांनी कपडे घातले नाहीच्चेत असेच्च बघतात म्हणून मी समस्त पुरूष जातीला दोष द्यावा का? तुम्ही गळा काढताय मोठ्या गळ्यावर! पण माझ्या बाबतीत हे ही झालं आहे की रात्री झोपताना अत्यंत आरामदायक असणार्‍या आणि वरपासून खालपर्यंत सर्व शरीर झाकणार्‍या अशा अतिशय लूझ अशा पायजमा-टॉपकडे पाहून आमच्या बिल्डींगमधल्या म्हातार्‍यांनी नाकं मुरडली होती. मला तो ड्रेस अतिशय कंफर्टेबल वाटायचा. आता तुमची तक्रार ती रास्त आणि त्या म्हातार्‍यांची रास्त नाही असं म्हणावं का? तुम्ही साडी नेसण्याबद्दलचे विचार थोपता आहात असं नाही, पण असं वागणारे लोकं भेटतात तेव्हा तुम्ही त्यांना काही सल्ले देता का? का ही सगळी विनोदनिर्मिती फक्त मुलींच्या कपड्यांवर गोळ्या झाडूनच?? मूळ मुद्दाच तुमचा, कॉलेजात घालायच्या कपड्यांबद्दल सेन्सॉर येणं, ज्या मुली अशा कपड्यांमधे कंफर्टेबल आहेत, त्यांनी का घालू नयेत? तुम्ही एयरपोर्टवर पाहिलेल्या मुलीने छोटा स्कर्ट घातला होता म्हणून कदाचित तिचा प्रॉब्लेम झाला, त्याच लांबीची शॉर्ट्स घातली असती तरीही तक्रार करायची का?
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 02/17/2011 - 12:45

In reply to काही प्रश्न by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

मुळात आपले कपडे इतरांसाठी

मुळात आपले कपडे इतरांसाठी असतात का स्वतःसाठी? ऋतूप्रमाणे, गरजेप्रमाणे कपडे बदलावेत अशी अपेक्षा असेल तर कपडे स्वतःसाठीच असतात हे ही मान्य असावं. मान्य..म्हणूनच मग इतरांची पर्वा न करता ते ग्रेसफुली कॅरी करावेत. शाळेतल्या इतर मुलींचं तर आहेच, पण मी सुद्धा शाळेत जाताना पिनोफॉल ओढत शाळेत जायचे. सायकलने मुलीसुद्धा शाळेत येतात हे माहित असताना असले युनिफॉर्म ठेवणार्‍या शाळांबद्दल तुमचं काय मत? शाळेवरच टीका. मुलीवर का बरे करीन? का वाटलं तुम्हाला तसं ? तिथे त्या मुलीने स्वखुषीने तो ड्रेस घातला नाहीये हे कळतंयच.. शाळा हीच या बाबतीत दोषी. हे असले केस एकाने वाढवले म्हणून केस वाढवणार्‍या, कापणार्‍या सगळ्याच पुरूष जातीच्या नावाने शंख करायचा का? किंवा काही पुरूष स्त्रियांनी कपडे घातले नाहीच्चेत असेच्च बघतात म्हणून मी समस्त पुरूष जातीला दोष द्यावा का? कुठे आहे सगळ्या स्त्रीजातीच्या नावाने शंख? मनातच नाही ते लिखाणात कुठून येईल? पॅरेनॉईड विचार वाटला हा मला. एखाददोन वाक्ये काढून देता का लेखातली ज्यात सगळ्या स्त्रीजातीच्या नावाने शंख किंवा काहीही आहे अशी? तुम्ही गळा काढताय मोठ्या गळ्यावर! पण माझ्या बाबतीत हे ही झालं आहे की रात्री झोपताना अत्यंत आरामदायक असणार्‍या आणि वरपासून खालपर्यंत सर्व शरीर झाकणार्‍या अशा अतिशय लूझ अशा पायजमा-टॉपकडे पाहून आमच्या बिल्डींगमधल्या म्हातार्‍यांनी नाकं मुरडली होती. मला तो ड्रेस अतिशय कंफर्टेबल वाटायचा. आता तुमची तक्रार ती रास्त आणि त्या म्हातार्‍यांची रास्त नाही असं म्हणावं का? गळा काढतोय ? केव्हा घडली ही सुरस घटना? तुम्हाला कंफर्टेबल वाटायचा हे गृहीतक धरुन तुमचे राहणे अत्यंत योग्य, रास्त आहेच.. इथे उल्लेख केलेत त्यात स्पेसिफिकली ते परिधान करणार्‍या व्यक्तीला व्हिजिबली ऑकवर्ड्/कॉन्शस/ अनकंफर्टेबल होत आहेत अशा दिसणार्‍या घटनांवर भाष्य आहे. तुम्ही साडी नेसण्याबद्दलचे विचार थोपता आहात असं नाही, पण असं वागणारे लोकं भेटतात तेव्हा तुम्ही त्यांना काही सल्ले देता का? का ही सगळी विनोदनिर्मिती फक्त मुलींच्या कपड्यांवर गोळ्या झाडूनच?? मुली मुलं असा काही स्पेसिफिक टार्गेट ग्रूप नाही माझा. मी एवढंच म्हणत होतो की कंफर्टेबल नसेल तरी केवळ चालू स्टाईल आहे म्हणून खेचत ओढत लाजत काही परिधान करण्याऐवजी सारासार विचार करुन ज्यात तुम्हाला छान वाटेल ते घाला. त्या स्कर्ट किंवा शॉर्ट शर्टमधे (कोणाच्या नजरांनी म्हणा किंवा आणि कशानेही) सतत सावरावासा झाकावासा वाटेल असं फीलिंग असताना कसला कंफर्ट? अशा वेळी बघणार्‍याला फावतेच आहे आणि ज्याला नाही बघावेसे वाटत किंवा शिष्टाचार / संकोच आड येतो त्यांनाही ऑकवर्ड होते. त्यांचे जाऊ द्या...स्वतःला तरी निदान कंफर्टेबल वाटू दे म्हणजे झालं. मूळ मुद्दाच तुमचा, कॉलेजात घालायच्या कपड्यांबद्दल सेन्सॉर येणं, ज्या मुली अशा कपड्यांमधे कंफर्टेबल आहेत, त्यांनी का घालू नयेत? तुम्ही एयरपोर्टवर पाहिलेल्या मुलीने छोटा स्कर्ट घातला होता म्हणून कदाचित तिचा प्रॉब्लेम झाला, त्याच लांबीची शॉर्ट्स घातली असती तरीही तक्रार करायची का? तक्रार अशीही नाही.. आणि जोपर्यंत तिला ते दोन तास अवघडलेपणाने काढायला लागत नाहीयेत तोपर्यंत सर्व वेषभूषा ठीकच आहे. पण दिसलेला डिसकंफर्ट शब्दातून मांडायचाही नाही ..तसं केलं तर विचारांची सक्ती, संस्कृतीसंवर्धनाचा बुरखा, गोळीबार, पुरुषप्रधान असं काहीतरी होत असेल आणि जणू आमच्या सांगण्याने कायदा / फतवा निघतोय असे मत बनत असेल तर एकूणच काही सूचना, प्रकटन, विचार मांडायलाच नकोत. कशाला तसे विभाग उघडले आहेत मग? :)
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 02/17/2011 - 13:26

In reply to मुळात आपले कपडे इतरांसाठी by गवि

Permalink

>> म्हणूनच मग इतरांची पर्वा न

>> म्हणूनच मग इतरांची पर्वा न करता ते ग्रेसफुली कॅरी करावेत.<< शिकाऊ असू शकेल. पण इतरांनी कसं वागावं हे आपण सांगणं मला नाही जमत/पटत! >> शाळेवरच टीका. << धन्यवाद. >> गळा काढतोय ? केव्हा घडली ही सुरस घटना? << का हो, तुम्ही लिहीता ते विनोदी आणि आम्ही लिहीलं की शब्दशः अर्थ घेणार का? ज्या सगळ्या वस्त्र्याप्रावरणांची वर्णनं तुम्ही केली आहेत तशी घालून, अतिशय आरामात फिरणार्‍या मुली मला बहुसंख्येने दिसल्या आहेत. विनोदनिर्मितीसाठी का होईना, तुम्हाला फक्त अशा कपड्यात अनकंफर्टेबल होणार्‍या मुली का दिसल्या हा प्रश्न पडला आहे. तुमच्याकडून विनोदासाठी विनोद न करता खरोखर चांगल्या लिखाणाची अपेक्षा आहे म्हणून लिहीलं.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 02/17/2011 - 13:40

In reply to >> म्हणूनच मग इतरांची पर्वा न by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

ज्या सगळ्या

ज्या सगळ्या वस्त्र्याप्रावरणांची वर्णनं तुम्ही केली आहेत तशी घालून, अतिशय आरामात फिरणार्‍या मुली मला बहुसंख्येने दिसल्या आहेत. कुठे ? ते महत्वाचं आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on गुरुवार, 02/17/2011 - 13:42

In reply to ज्या सगळ्या by गवि

Permalink

मलाही

ज्या सगळ्या वस्त्र्याप्रावरणांची वर्णनं तुम्ही केली आहेत तशी घालून, अतिशय आरामात फिरणार्‍या मुली मला बहुसंख्येने दिसल्या आहेत.
हो अशा मुली कुठे असतात हे मलाही जाणून घ्यायचे आहे. :D पिंपरी चिंचवड परिसरात अशा मुली दिसत नाहीत. :(
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on गुरुवार, 02/17/2011 - 13:54

In reply to मलाही by आजानुकर्ण

Permalink

मलाही ..

जाणुन घेणे जरुरी वाटते ... काय आहे .. तेवढंच अजुन एक पर्यटण स्थळ मिळेल हुंदडायला :) डीवाय च्या कँपस मधे उत्तरेकडील मुली एकदम बिण्धास्त असतात तर मराठी मुली कॉपी करण्याच्या प्रयत्नात जोक होउन बसतात असं माझा मित्र मिलींद म्हणायचा :) दे वर सो अनकंफर्टेबल यु नो :)
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com