Skip to main content

ग्रो अप बेब्ज..!!

लेखक गवि यांनी बुधवार, 16/02/2011 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
नाही नाही.."आजकालचे तरुण-तरुणी".."पाश्चात्यांचं अंधानुकरण"..असा त्रिफळाचूर्णी लेख नाही हा..तरीही हा यापूर्वी पहिल्यांदा लिहीला तेव्हा मला कोणीतरी आधुनिक बुरख्याआड लपलेले कृष्णराव हेरंबकर (अश्लीलमार्तंड) म्हणाले होते. त्या रात्री मात्र मी त्रिफळाचूर्ण नाही तरी जरा हवाबाण हरडे घेतले..असो.. तर .. वक्षखिंड (Cleavage ला मराठी शब्द सुचेना म्हणून वापरावा लागतोय) दाखवणारे काचोळीसदृश (Bra ला मराठी शब्द सुचेना म्हणून वापरावा लागतोय) उत्तरीय घालून महाविद्यालयात येणा-या पात्रांवर ड्रेस कोड नावाचा काहीतरी निर्बंधवजा अत्याचार होतोय असं पेपरमध्ये मध्यंतरी कळलं. आणि अधूनमधून कळतच असतं. युवावर्गाची (मी पण युवा हं..!!) मुख्य तणतण ही की हे कपडे (म्हणजे सूक्ष्म वस्त्रे) कम्फर्टेबल असतात म्हणून आम्ही घालतो. त्यावर बंदी घालणारे हे कोण प्रिन्सिपॉल.. इट्स आवर लाईफ.. मी अजिबात संस्कृतीरक्षक नाही बाबा. आधीच सांगतो. मी अजिबात कुठल्याही फॅशन विरोधात नाही. उलट नव्या नव्या कपड्यांत नटलेल्या पोरी पाहून मी कौतुक करतो. पोरांचं मला कौतुक नाही. कारणं नैसर्गिक आहेत. मी पोरींविषयीच सगळं लिहिणार. तंग किंवा लहान कपडे घालू नका असा प्रचार इथे नाही. मी तो करणारही नाही. मला उलट असल्या फटाकड्या पोरी बघायला आवडेलच. पण "कम्फर्ट"च्या मुद्दयामुळे आंबट ताक प्यायल्यासारखी माझ्या कपाळावर आठी आली आहे. ज्या निर्वस्त्रांवर "उपाय" म्हणून ड्रेस कोड आला असावा ती निर्वस्त्रं मी नीट पहिली आहेत. हो. पहिली आहेत. बेंबीवर संपलेला शर्ट:- हा घालून मुलगी बाईकवर कुमारमित्रापाठी (Boyfriend ला मराठी शब्द सुचेना म्हणून वापरावा लागतोय) बसते, तेव्हा ती दर तीस सेकंदांनी हात मागे नेऊन शर्ट चिमटीने खाली कमरेवर खेचते. त्याखाली असलेला थालीपीठ भाजणी, उडदाचं डांगर, मोदकाची उकड यापैकी एका शेडचा मांसल भाग झाकावा अशी इच्छा तिला वारंवार होते. म्हणजेच माय लॉर्ड..तो शर्ट कम्फर्टेबल नाही. दो-यायुक्त अंतर्वस्त्रं (याचं नक्की नाव सांगून सहकार्य करावं):- हा कपडा मी घालू का असं मुलीनं विचारल्यावर "पण बाकीचे कपडे कुठे आहेत?" असा भाबडा प्रश्न जातो.. ही स्ट्रिंग स्कंधखळग्यांच्या दोन्ही बाजूस आणि कमरबंदाच्या जागेतून दिसत असते (चू.भू.द्या.घ्या.). ती ही मुलगी सारखी ओढत असते आणि कापडाच्या आत झाकायला बघत असते. म्हणजे लाज वाटते. म्हणजे कम्फर्टेबल नाहीच ना? खूप कमी उंचीचा स्कर्ट:- (वारा आला तरी उडणार नाही कारण उडायला काही शिल्लकच नाही असा.) तो घालून एअरपोर्टवर बसलेली मुलगी पाय अत्यंत आवळून क्रॉस करून बसते. मोकळेपणानं सरळ पाय पसरून बसू शकत नाही. दोन मांड्यांत उरला सुरला स्कर्ट खुपसून घट्ट धरून बसायचं..बाथरूम सापडत नसल्यासारखा चेहरा करून. म्हणजे कम्फर्टेबल नाहीच. मुलीच्या टी शर्टच्या छातीच्या उभारावरच्या एरियात जर लक्षणीय मजकूर छापलेला असला (भले गायत्री मंत्र का असेना..) तर तो आम्ही वाचायचा की नाही वाचायचा? वाचायचा नाही तर मग तो तिथे कशाला ? मैत्रिणींनो..जर उत्तम वक्ष आणि मांड्या दाखवणारा ड्रेस तुम्ही घातलात तर त्यात तुम्हाला फक्त कम्फर्ट हवा असतो का? की उकडतं म्हणून घालता? की आपले असेट इतरांनी बघावेत असं वाटतं? खरं सांगू? इतरांनाही ते बघावेसे वाटतात. तुम्ही ते दाखवलेत तर आम्ही बघू. लाजून खाली मान घालूच असं नाही. ऑफिसात एक मुलगी पूर्ण मांड्या दाखवणारा स्कर्ट घालून आली होती. बराच वेळ तिच्यासोबत काम (मराठी अर्थानं..) करताना, बोलताना छताकडे बघ, पूर्वेकडे बघ, ईशान्येकडे बघ असं केल्यावर माझ्या लक्षात आलं की मी कशाला लाजतोय? मी कशाला टेन्शन घेतोय? मी कपडे घातलेत. आता माझी नजर चोरायची मला काही गरज नाही. पण ते अवघड होतंच. पावसात पांढरा टी शर्ट घातलात तर तो भिजल्यावर कोणी तुम्हाला बघू नये आणि बघितलं तर "तसल्या ओलेत्या" नजरेनं बघू नये अशी अपेक्षा जरा अनरियल नाही वाटत? अरे माझ्या (सारख्याच) तरुण मित्र मंडळींनो. तुम्ही म्हणता की कॉलेजनं आमच्या कपड्यांत लक्ष घालू नये. तुम्ही म्हणता की "यहां का सिस्टीम ही है खराब". तुम्ही म्हणता की "आम्हाला व्यक्तिस्वातंत्र्य हवं." तर मग घसा खरवडून विरोध करण्यापूर्वी "सारासार विचार" नावाची एक सोपी गोष्ट का करून बघत नाही? त्यासाठी आधी नुसता "विचार" करण्याची सवय का लावून घेत नाही? साधा शुद्ध शांत विचार. मग तो कसलाही असो. भिरभिर न करता शांत बसून "विचार". रोज थोडी थोडी सवय केली तर हळू हळू जमेल. काय आहे तो ड्रेस कोड? कशासाठी केला गेलाय? नागडं फिरायची परवानगी मिळाली तर तुम्ही फिराल का? आपण तथाकथित "प्रगत" होत जाताना नुसते "कपडे" स्वीकारलेले नाहीत, त्यासोबत काही संकोचाच्या कल्पनाही तयार केल्या आहेत.. अपरिहार्यपणे. कपडे बदलून समाज तातडीने बदलणार नाही. त्याची नजर असे कपडे घालून रातोरात मरणार नाही. त्याला वेळ लागेल. समाजाने बदलावं आणि नजर सुधारावी ही अपेक्षा चूक नसली तरी अतिआदर्शवादी आहे. ते होणे नाही. तोपर्यंत तरी स्वातंत्र्याची आजच्या दिवशी अस्तित्वात असणारी एक किंमत आहे. ती द्यायची तयारी आहे का? निसर्गाकडे परत जाऊन वल्कलं नेसायची (किंवा तीही नाही) तर त्याच मार्गावर पुढे निसर्गाकडेच जाऊन मुक्त नर मादी संभोग चालेल का? तशी दुर्घटना घडली तर ती हलकी घेऊ शकणार आहात का? पाकीट मारलं गेल्यावर आपण दु:ख करतो पण आयुष्यातून उठत नाही..तसंच याही दुर्घटनेला घेऊ शकू का? विचार..विचार.. किंमत द्यायची तयारी असेल तर जरुर घ्या ते स्वातंत्र्य.. हरकत घेणारे देणारे समाज किंवा कॉलेजचे प्रिन्सिपल यापैकी कोणी कोणी नाही..प्लीज गैरसमज करू नका..तुम्हीच आहात स्वातंत्र्य घेणारे, किंमत देणारे आणि हरकत घेऊ शकणारे.. ग्रो अप बेब्ज. .. !! ... (आता यात कोणी डबल मीनिंग घेतलं तर तो प्रस्तुत लेखकाच्या आधीच डागाळलेल्या चारित्र्यावरचा आणखी एक दुर्दैवी डाग ठरेल..)

वाचने 64519
प्रतिक्रिया 157

प्रतिक्रिया

शॉर्ट शर्ट घालणाऱ्या युवती या मनोगतावरील चर्चेची आठवण झाली. इथल्या आंतरजालीय स्त्रीमुक्तीवाद्यांच्या प्रतिसादाच्या अपेक्षेत. (थोडी काडीः तुम्हाला फक्त स्त्रियांचेच छोटे कपडे दिसले का?)

In reply to by आजानुकर्ण

(थोडी काडीः तुम्हाला फक्त स्त्रियांचेच छोटे कपडे दिसले का?) हो.. पुरुषांचे पाहून सुदैवाने मनात फरक पडला नाही. त्यामुळे त्यावर लिहिले नाही. :)

In reply to by गवि

पुरुषांचे पाहून मनात फरक पडत नाही आणि स्त्रियांचे पाहून फरक पडतो हा 'तुमचा' प्रॉब्लेम आहे की ते कंफर्टेबल कपडे घालणाऱ्यांचा?

In reply to by आजानुकर्ण

याचे उत्तर न देऊन वादाला वाव दीड वाव राखून ठेवतो.. ;)

लढव रे खिंड लढव... झकास ल्हिलयस. किंग फिशर एअरलाईन्स ने जे टाईट हिपहगर ( याला मराठी शब्द माहीत नाही) त्यांच्या हवाइसुंदर्‍यांसाठी मुक्रर केलेले असतात त्याम्चे प्रयोजन काय असते? जेट एअरवेज त्यांच्या हवाई सुम्दर्‍याना तोकडे स्कर्ट्स देते आणि उघडे पाय झाकायला काळे तलम मोजे देते या ड्रेस कोडचा अर्थ कधी लागतच नाही

In reply to by विजुभाऊ

प्रयोजन "उघड" आहे. असो. विरोध प्रयोजनाला, कमीजास्त कपड्यांना यापैकी कशाला नाही. खरंतर "विरोध" नाहीच. त्याविषयी सतत कॉन्शस राहूनही त्याउप्पर त्यांना "कंफर्टेबल" म्हणण्यातला "विरोधाभास" फक्त.. आता प्रत्युत्तरे आवरतो.. अन्यथा पराभाऊ यायचे धाग्याची खव केल्याबद्दल सत्कार करायला.. ;)

लेखन एकदम छान आहे.. जे सांगायचे आहे ते त्यांच्याच भाषेत सांगुन उगाच संस्क्रुती रक्षकाची भुमिका न घेता त्या ही पेक्षा जास्त जागरुकता दाखवण्यात लेखक या लेखा मार्फत यशस्वी होतो आहे असे वाटते.. अवांतर : निर्लज्ज पणे उघड्या मांड्या किंवा अस्लिल चाळे करणार्‍यांसाठी एक घोष वाक्य रुढ होत गावाकडे.. बघणार्या ने लाजावे पण करणार्‍या ने लाजु नये....

गवि, तुम्ही पुन्हा एकदा मुद्द्याला हात घातला आहात! खुपच सुरेख विचार! मनापासुन पटले!

In reply to by स्वैर परी

आता गविंनी मुद्याला घातलेले "हात" आखडते घ्यावेत, असा काहींचा मानस दिसतोय. ;-) सुरेख मांडणी. मेरी बिल्ली मेरेकोच म्याउ असं झालंय हे लेखन.

बेंबीवर संपलेला शर्ट:- हा घालून मुलगी बाईकवर कुमारमित्रापाठी (Boyfriend ला मराठी शब्द सुचेना म्हणून वापरावा लागतोय) बसते, तेव्हा ती दर तीस सेकंदांनी हात मागे नेऊन शर्ट चिमटीने खाली कमरेवर खेचते. त्याखाली असलेला थालीपीठ भाजणी, उडदाचं डांगर, मोदकाची उकड यापैकी एका शेडचा मांसल भाग झाकावा अशी इच्छा तिला वारंवार होते. अशा मुलींना आमच्यात ABCD म्हणतात. म्हणजे "अमेरिकन बॉर्न कन्फ्युजड देसी" नव्हे तर "अग्ग बाई चड्डी दिसते!!!" बाकी लेख छानच आहे...

भारतातील या परिस्थितीशी सहमत. हिरव्या देशात मात्र आता आमचीच नजर मेलिये. लेख खुसखुशीत झालाय. आमच्याकडे सहा महिने थंडीच असते म्हणून का होइना पूर्ण, म्हणजे अगदी गळाबंद कपडे सगळेजणच घालतात. जर्रा स्प्रिंग सुरु झाला की पुन्हा आपले तोकडे कपडे आहेतच. इतकी वर्ष काही वाटलं नाही पण आता मुलगा मोठा (आणि बिनधास्त) होतोय आणि "हा प्रश्न आईवडीलांना कसा विचारू?" असं त्याला अजिबात वाटत नाही. पण या प्रश्नाचं उत्तर त्याला कसं देऊ असं मला मात्र वाटत असतं.;)

त्या निदान म्हणतायत "कम्फर्टेबल" वाटतं. तुम्हाला बघायला कम्फर्टेबल वाटायची सवय करून घ्या हळूहळू! जुन्या हिरोलोकांकडून शिका काहीतरी. ते बिचारे बुरख्यातल्या हिरोईनला बघून पण प्रेमात पडायचे. जरा आधुनिक व्हा! नायतर तुमचा दुसरा "मुतालिक " व्हायचा! आता हा कोण म्हणून विचारू नका!

'कम्फर्ट' या शब्दाला धरुन जे काही धोबी पछाड टाइप लिहलय त्याला तोड नाही. एक अन एक शब्द पटला, अन मी स्वतः सुंदर सुंदर स्कर्ट्स घालते पण निदान गुडघ्या पर्यंत तरी उंची हवीच. ट्राउझर्स मध्यंतरी आम्हाला घालताच येनार नाहीत अश्या लो- कट च्या निघाल्या तेंव्हा भारतात येउन रेमंड मधुन एक दम स्टायलिश अश्या शिवुन नेल्या. अगदी थाम्बवुन विचारल गेल मला कुठ मिळाल्या म्हणुन. कपडे छान दिसाव म्हणुन घालायचे असतात, गरीब दिसाव म्हणुन नव्हे. बाकि मराठीची शब्द संपदा वाढविल्या बद्दल हाबिनंदन!!

In reply to by स्पंदना

अर्पणाताई... उत्तम बोल्लात..."कपडे छान दिसाव म्हणुन घालायचे असतात, गरीब दिसाव म्हणुन नव्हे."...जोरदार टाळ्या... - शिंपी वाट्या

आमची मतं ह्यावर काही वेगळीच आहेत :) आमच्या मते , एखाद्याला जे शोभेल तेच करावे ... ड्रेसिंग सेण्स नसेल तर ते सौंदर्या ऐवजी "ध्याण " होउन बसतं :) थ्री फोर्थ घातली तर किमान वॅक्सिंग केलेले असावे :) असो , आम्ही सौंदर्योपासक असल्याने एफसी रोड किंवा एमजी रोड ला मस्त पैकी ललना बघत हिंडत टाईमपास करतो :) णॉर्थ च्या किंवा फॉरिनच्या पोरी सहसा टाईट आणि शॉर्ट टी शर्ट खाली ओढताना दिसणार नाहीत. . पण मराठी पोरी हमखास .. !! त्यांना एक तर स्टाईल पण मारायची असते आणि त्यात त्यांना संकोचही वाटत असतो :) त्यांची द्विधा मणस्थिती पहाणे मात्र रोचक ठरते :) ’सगळ्या गोष्टी उघड सांगता येत नाहीत - जालमहापुरुषवाक्यम -( सौंदर्य प्रेमी) तम्मा टार्‍या

In reply to by टारझन

>>त्यांना एक तर स्टाईल पण मारायची असते आणि त्यात त्यांना संकोचही वाटत असतो यावरून एका जुन्या इंग्रज उमरावाची आठवण आली. हे महाशय आपल्या मिशा लाल रंगाने रंगवीत असत आणि मग त्यावर रुमाल धरून झाकून ठेवत असत.

In reply to by टारझन

आयला, तुझं बरं लक्ष असतं पोरींच्याकडे त्यांनी वॅक्सिंग केलं का नाय ते बघायला...मला वाटलं का तु लेका पोरी बघायलाच फक्त जातोस 'तिकडे' ? मरतय आता...टार्‍या काय फिरु देत नाय यफशी रोडाव..;) - (न्हावी ) वाट्या...

In reply to by वाटाड्या...

प्रिय वाटाड्या जी , सदर महाभयानक प्रकार आमच्या एका पुर्वकंपनीत अनुभवायला मिळाला होता. तो अभिणव प्रकार सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरल्यामुळे ठाऊक होता . आणि केवळ उदाहरणादाखल दिला होता. :) बाकी आपल्या सही वरुन आपण सगळ्या प्रकारचे केशकर्तन करुन देता असे कळते :) रोचक आहे :) -(अस्वल) टार्णिल कपुर

In reply to by टारझन

नाय रे बाबा... अरे तेच म्हणतो...हे केशकर्तन कधी डोळे घालुन बघितले नाही...कोणाची भादरायची वेळच आली नाही बघ..;) आणि हे काय रे.. वाटाड्या जी वगैरे... तु जसा टार्‍या तसा मी सुद्धा वाट्या..काय? - (टार्‍याचा उजवा शिकाऊ न्हावी) वाट्या...

In reply to by टारझन

थ्री फोर्थ घातली तर किमान वॅक्सिंग केलेले असावे बरोब्बर! आणि ती तयारी नसेल तर त्या मुलींनी एफसी किंवा एमजी रोडवर न फिरता जंगलीमहाराज रोडवर फिरावं!!! ;)

In reply to by पिवळा डांबिस

त्या मुलींनी एफसी किंवा एमजी रोडवर न फिरता जंगलीमहाराज रोडवर फिरावं!!! पिडांकाका गल्ली चुकलत तो जे एम रोड नाही हो. गणेश रोड ( कसबा पेठ ), शिवाजी रोड ,बाजीराव रोड , दाणे आळी , चोळखण आळी , असे बरेच रोड आहेत पुण्यात . अजून थोड्या मोठ्या जागा हव्या असतील तर फुले मंडै , मार्केट यार्ड , आहेतच ( पुणे तेथे काय उणे असे कोणीतरी म्हंटलेच आहे. तेथे शाळेत सुद्धा वजाबाकी करताना उणे करायच्या ऐवजी वन्स कॉंप्लीमेन्ट करून बेरीजच कली जाते असे ऐकलय )

बेस लिहिलय गवि. मध्यंतरी एका कार्यक्रमात स्मिता तळवलकर आल्या होत्या. त्यांनी असाच एक किस्सा सांगितला. त्या सिग्नलवर थांबलेल्या असताना एक तरुणी बाईकवर तिच्या कुमारमित्रापाठी अशीच लो राइज जीन्स घालुन बसली होती. मागुन काही मवाली मुलं आली आणि त्यांनी चक्क जळती सिगारेट त्या जीन्स मधुन आत टाकली. त्यानंतर त्या रस्त्यावर भर दिवसा लोकांनी जे काही बघितले ते शब्दातीत असावे. त्या पोरीला भर रस्त्यात जीन्स काढुन टाकावी लागली. आणि लो राइज जीन्स म्हणजे...........

In reply to by मृत्युन्जय

चक्क जळती सिगारेट त्या जीन्स मधुन आत टाकली. हा महानालायकपणा झाला. अश्या मुलांना सिगरेटचे चटके द्यायला हवेत. या थट्टेपायी काही कायमचं कमीजास्त होवून बसलं तर काय? विचार करण्याजोगी गोष्ट आहे. मान्य आहे की त्या मुलीने काहीतरी विनोदी कपडा घातला असेल. मुलं तरूण असताना वेड्यागत काहीही करून हिंडताना पाहत नाही काय? पण त्यामुळं त्यांना असल्या जीवघेण्या मस्करीला सामोरं जावं लागलं नसेल.

In reply to by रेवती

महा क्रूरपणा. अशानी कमीजास्त होऊ तर शकतच पण जगावरचा विश्वास उडतो. काय बोलणार . तारुण्यात कधीच दुसर्‍याच्या भावना कळत नाहीत.

In reply to by शुचि

खरे आहे असा क्रूरपणा करू नये. या मुलांची घरे शोधून त्यांच्या सकाळच्या टमरेलात पाण्याऐवजी बॅटरीचे अ‍ॅसिड भरून ठेवण्याची कल्पना सुचते मला! ;)

In reply to by मृत्युन्जय

बहुतेक संस्कृति रक्षक असावेत. या पाशवी मुली त्यांच्या विनंत्याना भीक घालत नसतील. म्हणुनच आपल्या महान संस्कृतिच्या रक्षणासाठी बिचार्‍याना असे टोकाचे उपाय करावे लागत असतील.

In reply to by नेत्रेश

साधी गोष्ट आहे....अशा फटाकड्या पोरी यांच्याबरोबर गाडीवरून फिरायचं तर दूर बघतही नसतील मग अशी जळफळ निघते दुसरे काही नाही.... आणि बाकीचे लोक गम्मत बघत असतील? हो ना? जिथे रस्त्यावर बाईला अखंड पेटवून दिले तरी कोणी मदत करत नाही तिथे अजून काय होणार?

In reply to by नेत्रेश

बहुतेक संस्कृति रक्षक असावेत. या पाशवी मुली त्यांच्या विनंत्याना भीक घालत नसतील. म्हणुनच आपल्या महान संस्कृतिच्या रक्षणासाठी बिचार्‍याना असे टोकाचे उपाय करावे लागत असतील.
ते करणारे बिचारे :( नेत्रेश , दुर्दैवाने तुम्हाला कोनी ही शिक्षा केल्यास काय वाटेल जरा इमॅजीन करुन बघा.

In reply to by मुलूखावेगळी

नविन लेख लिहायला पाहिजे ग्रो अप गायज! ग्रो अप ! कसले आलेत रक्षक ?? अश्या Pseudo-Culture Protectors च्या कानाखाली जाळ काढायला पाहिजे नाहीतर त्याच्या तोंडावर अ‍ॅसिड च फेकायला पाहीजे म्हणजे परत कोणाच्या वाटेला जाणार नाही .नीच मेला !

In reply to by मुलूखावेगळी

अहो ते मी उपहासाने (Sarcasm) बोललो आहे. अशा स्वयंघोशीत मोरल पोलिसांना फटकेच दिले पाहीजेत.

In reply to by नेत्रेश

अशा पाशवी प्रतिसादांपासून वाचण्यासाठी sarcasm sign घेऊन फिरावे. संदर्भ :- http://www.youtube.com/watch?v=DF7MroTLDfU

In reply to by मृत्युन्जय

ढुंगणाला चटके दिले पाहीजेत साल्यांना... त्यांना भाव देत नसतील मुली म्हणून जळते *****ची.. खरेतर त्या मुलीनी काय केलं ह्यापेक्षा लोकांनी त्या मवाल्यांना काय केलं (किंवा केलं नाही) ते महत्वाचे आहे... बाकी गविंनी ह्या मुलींच्या विरोधाभासी अ‍ॅटीट्युड वर लिहीलंय ते मस्तच आहे.

In reply to by मृत्युन्जय

त्या पोरीला भर रस्त्यात जीन्स काढुन टाकावी लागली हे कसं शक्य आहे? एकतर सिगरेट लगेच विझून गेली असणार. थोडासा चटका लागला असणं शक्य आहे. पण तेवढ्यासाठी जीन्स काढून टाकावी लागली हे अशक्य वाटतं.

In reply to by अप्पा जोगळेकर

कसं शक्य आहे ते स्मितातैंनाच विचारावे लागेल. जीन्स मध्ये एक्स्प्लोझिव्स असावेत बहुधा.

In reply to by अप्पा जोगळेकर

थोडासा चटका? आप्पा, सिगारेटच्या चटक्याचा अनुभव नाही तुम्हाला असं दिसतंय. जळत्या सिगारेटच्या टोकाला १५०० अंश तापमान असते हे बहुतेकांना माहिती नसते. अशी जळती सिगारेट कापड आणि त्वचेमध्ये दाबून विझणे शक्य आहे?

In reply to by नगरीनिरंजन

जळत्या सिगारेटच्या टोकाला १५०० अंश तापमान असते हे बहुतेकांना माहिती नसते. टेक्निकल डिटेल्स बद्दल काही अंदाज नाही. आप्पा, सिगारेटच्या चटक्याचा अनुभव नाही तुम्हाला असं दिसतंय. कॉलेजात असताना इतर लोक करतात म्हणून फुकाची स्टाईल मारण्यासाठी हातावर चेचून सिगरेट विझवली होती. निदान तेंव्हा तरी तो चटका तुम्ही म्हणताय तितका जहरी वाटला नव्हता.

In reply to by अप्पा जोगळेकर

>>कॉलेजात असताना इतर लोक करतात म्हणून फुकाची स्टाईल मारण्यासाठी हातावर चेचून सिगरेट विझवली होती. निदान तेंव्हा तरी तो चटका तुम्ही >>म्हणताय तितका जहरी वाटला नव्हता. चेचण्याऐवजी एकदा नुसती टेकवून पाहा. विशेषत: मांडीचा मागचा भाग आणि पोटरी यांच्या मध्ये धरून विझवून पाहिली तर कळू शकेल कितपत त्रास होतो. ;-) (ह. घ्या.)

In reply to by नगरीनिरंजन

लोखंड वितळते १५३८ से. ला. १० वी मधली झोत भट्टी विसरलात का? सिगरेटच्या टोकाला ५०० से च्या आसपास तापमान असते. अशी जळती सिगारेट कापड आणि त्वचेमध्ये दाबून विझणे शक्य आहे? अंगाला आग लागल्यास जीव वाचवायला जमीनीवर लोळायला सांगतात (Stop, Drop & Roll). जर पेटलेले शरीर आणि कपडे विझू शकतात तर एक छोटी सिगरेट का नाही विझणार?

आल्प्सच्या पर्वतरांगांत बागडणार्‍या बॉलिवूड नट्या सोडल्यास कुणीही कंफर्टेबल नसणारे कपडे घालत असतील वाटत नाही...तसे त्या नट्यांनाही पैसा आणि शाहरुखची मिठी यांची उब असतेच म्हणा ! कॉलेजात ड्रेस-कोड ठरवण्याचा कॉलेजवाल्यांना हक्क असावा असे वाटते. लिखाण आवडले :)

In reply to by शाहरुख

>>आल्प्सच्या पर्वतरांगांत बागडणार्‍या बॉलिवूड नट्या सोडल्यास कुणीही कंफर्टेबल नसणारे कपडे घालत असतील वाटत नाही...तसे त्या नट्यांनाही पैसा आणि शाहरुखची मिठी यांची उब असतेच म्हणा ! प्रेषक : शाहरुख... ;) मिठी भिडली.... :) -सूर्यपुत्र.

उत्तम विचारमाला आणि हो तुझ्या नवीन शब्दबंबाळाला हात जोडुन वंदन... हसुन हसुन मेलो लेका... ह्यावरुन एक जोक आठवला... प्रश्नः एकदा मल्लिका शेरावत तिचे कपडे कसे धुत असेल... उत्तरः सोप्पय...अरे सोप्पय...मिक्सर मधे घालुन... - (धोबी) वाट्या...

माझ्या मुलीने असे कपडे घातलेले मला बिलकुल चालणार नाहीत पण इतरांनी घातले तर माझा आक्षेप नाही. दुट्ट्प्पीपणा म्हणा हवं तर. इथे बायका सर्रास स्लीव्हलेस घालतात, मिनीस्कर्ट घालतात. पण बेंबीखाली जीन वगैरे फारच अंगावर येतं. कॅलिफोर्नियात पाहीलं होतं पण ईस्ट कोस्ट जरा पारंपारीक (कॉन्झरव्हेटीव्ह शिवाय इंटूक समजला जातो) आहे.

In reply to by शुचि

बायकाच का? टीनएजर्स बघितले असशीलच. मुलांच्या कमरेवरून आत्ता निसटतील कि मग निसटतील अश्या जीन्स आणि बॉक्सर घालून हिंडताना पाहून कितीतरीवेळा डोळे मिटून घ्यावेत (कायमचे नाहीत) असे वाटते. पुढचा रस्ता दिसणार नाही म्हणून मी तसे करीत नाही.;) माझ्या कालेजात एक मुलगी केशरी स्कर्ट आणि केसही केशरी करून आली होती. नंतर जांभळे कपडे घातल्यावर फक्त काही बटा जांभळ्या केल्या होत्या. अगदीच ज्वालाग्रही वाटत होती.;)

In reply to by रेवती

टीन मुलं भयानक खाली पडतील असे बर्म्युडा घालतात गं. बाकी केसांचा काहीबाही प्रकार मीही केलाय :( त्यामुळे त्याबाबत मौन. नवरा भयंकर रागवला होता. :P

In reply to by शुचि

कॅलिफोर्नियात पाहीलं होतं पण ईस्ट कोस्ट जरा पारंपारीक (कॉन्झरव्हेटीव्ह शिवाय इंटूक समजला जातो) आहे. हवामानाचा परिणाम! बाकी अमेरिकन बाया सहसा स्लॅक्स / ट्राऊझर्समध्येच जास्त दिसतात. स्कर्ट-स्टॉकिंग्सची रेलचेल युरोपात पहावी!

In reply to by सुनील

ते मात्र असेल बुवा! आमच्याकडे बर्‍या टाऊनमध्ये अगदी आपल्याकडे आया काळजी करतील अश्याच अमेरिकन आया मुलांच्या कपड्यांच्या लांबीची काळजी करताना दिसतात. आपल्याकडे जसा (आपल्या पद्धतीचा) रोज स्वयंपाक करणे वगैरे प्रकार असतात तसेच माझ्या मुलाच्या मित्र मैत्रिणींच्या आया स्वयंपाक करून न्युट्रीशनबद्दल काळजी करत असतात.

अरे काय हे? कपड्यांचे काय इतके घेऊन बसलात? घालू द्या ज्या जे घालायचे ते. तुम्हाला का अडचण होते रे? माझा पूर्ण पाठिंबा आहे असले सगळे काही करण्याला. काय ते केस रंगवले तर तुमचे जळते हो? वयोमानाने मला डोक्यावर केसच उरले नाहीत म्हणून, नाही तर मलाही जांभळे करावेसे वाटतात. करा रे पोरा पोरींनो हवी ती फ्याशन करा! मस्त मजेत जगा! दुसर्‍यांचे कपडे पाहून स्वतःला काचवणारे हे असले खत्रुड लोक जगात असतातच. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून मजा करा! तेव्हा गवि जा आपल्या बनियन-चड्ड्यांची लेबलं कापा ते उलट करून घाला नि निवांत बसा - वय गेलं नि असले काही आपल्यावेळी मिळाले नाही, म्हणून त्रागा करू नका!

In reply to by गुंडोपंत

नाही गुंडोपंत.माझे काही वय बिय झालेले नाही.केस शाबूत आणि योग्य वयात सौंदर्य बघायला मिळतंय. Thats why I am in unique position to write this thought. मीही हेच म्हणतो.आवडते ते घाला.जे घातल्यावर सदैव एक हात ते सावरुन झाकपाक करण्यात जाईल आणि मोकळे बसण्याचंही स्वातंत्र्य राहणार नाही असले घालण्याबाबतीत फक्त सारासार विचार करा.तोही नसेल करायचा तरी आनंद आहे.पाहात बसतो गंमत.असो. मला अडचण होते हा ज्योक झाला. In fact "त्यांना" क्षणोक्षणी अडचण,संकोच होतोय हे दिसतं म्हणून विचार येतो. बाकी परवानगी नाकारणारा मी कोण आणि जा रे माझा पठिंबा आहे म्हणून ती देणारे तुम्ही तरी कोण? आपण दोघेही काही कोणी राजे नव्हेत.आपण जे वाटते तेच लिहितोय ना? आय होप यू समझींग्ड.

In reply to by गवि

बाकी मला तुझा मुद्दा समजला आहे. पण... तरी माझा 'पण' शिल्लकच आहे. अरे कपडे आहेत म्हणून सौंदर्य आहे. ते तोकडे असल्याने सौंदर्य मादक 'वाटते' आहे. नरमादीच्या गूजनातला हा एक मात्र 'इव्हेंट' आहे. ते कपडे तोकडे असण्यात ते 'नेमकेपणाने' सावरण्यातपण एक मजा आहे. त्यात अडचण कसली? नेमक्या कपड्यांची हळू कळू सवय होते. मग नेमकेपणाने कसे बसले आणि बाईकवर कशी मिठी मारली तर आपला शर्ट आणि स्कर्ट उडत नाही ते कळते! हा नुभवाचा भाग आहे. लोक अनुभवातून बिनधास्तपणा शिकतात. मात्र जे झेपत नाही ते घालू नये हा मुद्दा कळला. पण मग ज्यांना तोकडे घालायची सवयच नाही त्यांनी ती सवय तरी कशी करावी?

जमत असेल आणि चांगलं दिसत असेल तर कोणतेही कपडे घाला....इतरांचं माहित नाही पण मी घालते..भारतात असतानाही घालायचे.... अर्थात मोठ्या शहरात फ्याशन चालते....छोट्या शहरात, गावात वगैरे मानसिकता बदललेली नाही त्यामुळे... बाकी पारंपारिक कपडे घातलेल्या बायकांना किमती द्याव्या लागत नाहीत हे वाचून डोळे भरू भरू आले आणि मग वाहू लागले..

In reply to by शिल्पा ब

जमत असेल आणि चांगलं दिसत असेल तर कोणतेही कपडे घाला.... हेच म्हणतो मी. म्हणून मी माझी कोपरी नेहमी घालत असतो :) नुसत्या कोपरी आणि चड्डीवर आंगणात गेलो म्हणून ही ओरडत असते. पण माझी नाडीची चड्डी असते गुडघ्या पर्यंत. त्यामुळे काय बिघडते. शिवाय मला का कुणी माझी फिगर पाहून पळवून नेणार आहे? ;)

In reply to by गुंडोपंत

>> नुसत्या कोपरी आणि चड्डीवर आंगणात गेलो म्हणून ही ओरडत असते पंत, टार्‍या तेच म्हणत होता लोक वॅक्सिंग न करता चड्डीवर बाहेर फिरतात. वॅक्सिंग करुन बघा, बहुतेक तुमची ही ओरडणार नाही ;)

In reply to by शेखर

आयडीया चांगली आहे. आमच्या ही ला विचारून पाहतो. तुम्हाला माहिती आहे का पुरुषांचे व्याकसींग करणारे कुणी? तुम्ही कुठे केलेत?

In reply to by गुंडोपंत

व्यॅक्सींग म्हणजे काय गंमत आहे का? मुळापासुन केस उपटुन निघतात...आणि या वयात कशाला नाही ते सोंग !! ;) आहात तसेच रहा..जुने जमाने की निशाणी..

In reply to by शिल्पा ब

उपटून? अरे बापरे!! हे तर भलतेच अवघड आहे म्हणायचे! व्याकसिंग साठी काही लोकल अनास्थेशिया वगैरे देत असतील ना? नसेल तर आपल्याला काही जमायचं नाही बॉ! मग मी जुणे जमाणे की णिशानी म्हणूनच बरा!

In reply to by गुंडोपंत

वा गुंडोपंत वा :) तुम्ही वॅक्सिंग च्या भाणगडीत ण पडता सरळ वस्तारा फिरवा .. हाय काय नाय काय :) आणि जरा ती चट्ट्यापट्यांची णाडी वाली शॉर्ट्स सोडुन बदामाचं किंवा फुलांचं किंव्हा ट्विटीबर्ड चं चित्र असलेली बॉक्सर वापरत चला .. हल्लीच्या म्हैलांमधे ते जास्त प्रिय आहे असे मी "टाईम" ह्या मासिकात वाचले आहे :)

In reply to by टारझन

हल्लीच्या म्हैल्लान्ना जाऊद्या हो...त्यांच्या म्हैलेला काय आवडतंय अन त्यांना काय झेपतंय ते महत्वाचं...अशा रंगीबेरंगी ब्वाक्सर लेन्ग्यासारख्या थोडीच घालता येणारयेत? टैम मराठीत यायला लागला कि काय !! का तुम्हाला विंग्रजी येतंय याची जाहिरात म्हणायची? का तुम्ही काय वापरताय याचा निनाद आहे हा? उगीच प्रश्न पडले इतकंच...

In reply to by टारझन

अरे बाळा मला महिलांमध्ये लोकप्रियतेची गरज नाही रे बाबा! महिलाप्रिय झालो तरी या वयात ती लोकप्रियता 'झेपली' पण पाहिजे ना? आता काही आमचे लाल बदामाच्या चड्ड्या घालायचे वय नाही राहिले. ते तुमच्या सारख्यांवर सोपवले आहे राजे! लढा! आमच्या 'ही' ला मी प्रिय आहे इतकेच पुरे. त्यामुळे मला माझी निळी, नाडीवाली, बिना लेबलाची चट्टेरी चड्डीच बरी!