चीगोंच्या मार्गाथा वरून आम्हाला आणी एक किस्सा आठवला...
आणी हो तो सांगण्यासारखा पण आहे..
त्याची अगोदर पार्श्वभूमी सांगणे गरजेचे आहे. म्हणून हा परिच्छेद !!!
टीप: हा भीत-भीत का होईना इतक्या दिवसानंतर पहिला-वहिला लेख (वाटला तर लेख, नाहीतर टवाळगिरी म्हणा) मिपावर टाकतोय, विशाल मनाने ह्याला झोळीत घ्या. आणी काही चुका असतील तर कळवाव्यात.
त्याचे झाले असे की,
आमचे तीर्थरूप मुळचे पोलीस,
शाळा-कोलेज पासून खेळण्याची आवड, अंग-पिंडानेही बळकट,
आणी आम्हा भावंडावर तुफ्फ्फान जरब-वचक-दरारा,
अगदी नंदनच्या मी सखाराम गटणेतील अप्पांसारखेच !!
(अहो म्हणजे जास्त एक्स्प्लेन करावं लागू नये म्हणून, पुन्हा मिपाकर रटाळ नि तेच ते वर्णन म्हणून टोचण देतील),
पण कधी-कद्धी म्हणून मार दिला नाही....
(अशी आमची शाळेच्या नववी पर्यन्तची समजूत)
आणी पोलीस म्हटल्यावर बांबूच्या काठ्या नि अस्सल चामडी पट्टे (काही जण यालाच "सुंदरी" असे पण संबोधतात) यांची वानवा घरात कधी नव्हतीच...
त्यांचा उपयोग मातोश्रींनीच जास्त केला यावर आम्हाला खाऊन राग..
(पोकळ बांबूचे पेकाटात बसलेले फटके अगदी दुष्मनालाही मिळायला नकोत, येणारी सूज लै वाईटटट राव....)
बरं ते बाजूला, विषय पिताश्रीवरून मातोश्रींकडे कसा गेला कळतंच नाही..
तर दहावीच्या समर वेकेशनचा (नववीनंतरचा) काळ होता. दुपारी जेवण करून वडील TV चा समाचार घेत होते..
आणी थोड्या वेळाने आम्हाला अभ्यासाला बसण्याचं "फर्मान" जाहीर झालं.. (या गोष्टीचा आम्ही बराच निषेध करायचो पण फायदा नाही झाला कधी)
बाहेरच्या खोलीच्या दरवाजातून सूर्यप्रकाश येत होता, नि त्याच्या शेजारीच आमचा टेबल.
आतून दरवाजा बंद करण्याची आज्ञा झाली. मी उठून दरवाज्याकडे गेलो, बाहेर डोकावतोय तर तिथे काही मुलं क्रिकेट खेळत होती.मग आतली खबर बात घेऊन(मंडळी झोपी गेली आहेत का हे तपासून?) मी हळुवार दरवाजा लोटून घेतला अन टांगा टाकीत अंगणात पोचलो.
काही वेळाने (खेळून पोट भरल्यावर) आम्ही परतून आलो. मग लोटलेला दरवाजा ढकलून पाहतो तर काय, दार पुढे सरकेचना ! काहीतरी अडकले असेल म्हणून पुन्हा एकदा थोड्याशा बळानिशी दार ढकलले, पण व्यर्थ!! सर्व काही ठीक आहे (बहुदा नाहीच?) हे पडताळण्याकरता, डोळे किल्मिले करून, एकदा फटीतून आत डोकावून पहिले. वडील सोफ्यावर झोपले होते, नि आई पण खाली पहुडली होती.
पुन्हा एक-एक क्लृप्ती वापरून "दरवाजा कसा उघडावा?" यावर तर्क-वितर्क बांधण्यात माझ डोकं गुंतलं होत. (अर्थातच अभ्यासात कधीच गुंतत नाहीच ते!) तेवढ्यात, माझा तोल जाऊन माझे मुखकमल चौकटीवर आदळले. आमचे फादर, दार उघडून दाराच्या मागे उभे !! ४४० चा का काय झटका लागल्यागत झालं मला?? माझा सावरून उभे राहण्याचा प्रयत्न निष्फळ करीत, डाव्या हाताने एक हात पकडून, (तेंडूलकरने शोईब अख्तरचा चेंडू सीमापार करावा तसा) हात भिरकावून एक श्रीमुखात ठेऊन दिली. (हा प्रसाद काल चोरून चालवायला नेलेल्या गाडीच्या कोपर्यावर झालेल्या धडकेत फुटलेल्या डाव्या हाताच्या साइड ग्लासच्या परिणामार्थ असावा कदाचित !!)
अर्धवट उभा असलेला मी, वाण्याच्या दुकानातील मजुराच्या पाठीवरून गोणी जशी गोदामात आदळते, तसा फरशीवर आदळलो. "धाडडडड!" दार लावण्यात आले. माझ्या चमूतील मुलांना, मी आत किती धपाटे खातोय?, हे कळू नये म्हणून!! ती एकंच चपराक एवढी भयानक लागली की, मला खरंच १९४५ साली हिरोशिमा, नागासाकी किती हादरले असेल, याची पुरेपूर अनुभूती झाली. मी अडवाच पडून होतो, कारण उठून बाजूला जाणे शक्य हि नव्हते नि कामाचे पण, फक्त बसणारा मार कमी व्हावा याचीच याचना करत होतो. मोर्चा मला सोडून कुठेही वळणार नव्हता याची खात्री होतीच. पण "वेड्या मनाच्या, वेड्या आशा!"
टायगर वूड्सच्या गोल्फ स्टिकला लाजवेल या वेगात, एक लात माझ्या डोळ्यांना पाठीच्या दिशेने येताना दिसली, लगेच तिचा वेग नि तुटणाऱ्या बरगड्यांचे CALCULATION आमच्या तल्लख, चोख बुद्धीने केले, नि मेंदूने मेसेज पाठवला, "याक्षणी वळणे हितकारक ठरेल." डोळे मिटून वळलो आणी हात चेहर्यासमोर धरले, आणी यावेळी फुटबॉल सारखा उडून समोरच्या स्टुलावर पडलो. एव्हाना आई, ताई झोपेतून जागी झालेल्या. धडपड करत आई न ताई आमच्यापर्यंत पोचली. आई फ्रंटफुटवर येऊन फादरचे MEDIUM PACE चेंडू अडवून धरत होती, आणी तिने एकदा माझ्याकडे पाहिलं!!
तिच्या डोळ्यात पाणीच तरळलं. माझ्या जब्ड्यांची अवस्था विचित्र झाली होती म्हणे. मी आरशात पाहिलं, तेव्हा मला कळाले की आई का रडत होती? पाठीवरच्या चुकवलेल्या लातेने आमच्या चेहर्याचा CANVAS केला होता, नि मकबूल फिदा हुसेनच्या चित्रात नसतील एवढे रंग उमटीवले होते! खालचा जबडा डावीकडे नि वरचा उजवीकडे झाला होता. आतापस्तोर आमच्या फादरचा राग शांत झाला नि त्येंच लक्ष पण आमच्या थोबडाकडे गेलं. उभ्याउभ्या मला लगेच आमच्या FAMILY DOCTOR कडे नेण्यात आलं. योग्य ती सुश्रुषा करण्यात आली. नि जेवणाची आबाळ, अबबब !! तांदळाची पेज, शेवायांची खीर ती सुधा चमचाने. (दातखिळी वगैरे काही बसली नव्हती, त्यासाठी निदान दाताखाली दात तर यायला हवेत ना....)
यापुढची ५ दिवस शाळेत-घरी, शेजारी-पाजारी, गल्ली-बोळात, जाता-येता हा एकंच चर्चेचा विषय होता. ह्याच्या जबड्यात जो दिसतोय तो गुलाबजामून की कालाजामून?? माझ सुजलेल बोळक पाहून शाळेतली पोर तर हनम्या म्हणून हिणवायला लागली.
तिथून पुढं आजतागायत कधी आमच्या तीर्थरूपांनी आमच्यावर हात नाही उगारला. (किंबहुना आम्ही त्यांच्यावर ही वेळच येऊ दिली नाही.)
नोट: ह्या लिखाणाला क्रमश: नाही.
कृपा करून मंडळींनी अजून येऊ द्या ही मागणी धरू नये.
वाचने
9385
प्रतिक्रिया
51
मिसळपाव
प्रतिक्रिया
बापरे! असा मार? हे अतिच आहे
'ह्या लिखाणाला क्रमश: नाही.'
मस्त रे वडापाव ... वाक्य
+१
In reply to मस्त रे वडापाव ... वाक्य by टारझन
मस्त!
अरे बापरे..
आपले पिताश्री सुद्धा मिपावर
In reply to अरे बापरे.. by सूर्यपुत्र
मार खाल्याचा किस्सा खरा आहे
In reply to अरे बापरे.. by सूर्यपुत्र
मार खाल्ल्याचा किस्सा खरा की मेंदू वाहून गेल्याचा?
In reply to मार खाल्याचा किस्सा खरा आहे by वपाडाव
यशोधरा, टारोबा, हर्षद, परी नि
वड्या जाम मार खाल्लास रे..
घड्याळ!
आईच्या मारावर लवकरच एक वेगळा
In reply to घड्याळ! by स्वैर परी
लिखान आवडले
छान लेखन !!
मला कधीच असा मार रक्त बंबाळ
असेच लिहित रहा. पुढील लेखनास
मस्त लिहिले आहे... आवडल
अगायायायाया...
धन्यवाद....
लहान मुलाना अशी मारहाण करणे
म्हणजे ?
In reply to लहान मुलाना अशी मारहाण करणे by विजुभाऊ
असे अप्रगल्भासारखे बोलु नकोस
In reply to म्हणजे ? by टारझन
पालक हे विकृत आहेत असं का
In reply to म्हणजे ? by टारझन
ते त्या क्षणी विकृतच होते
In reply to पालक हे विकृत आहेत असं का by विजुभाऊ
तरी जरा जास्तच वाटते
In reply to ते त्या क्षणी विकृतच होते by वपाडाव
आयुष्यात मी फक्त एकदा
आमच्या शेजारचे मात्र म्हणे
In reply to आयुष्यात मी फक्त एकदा by मृत्युन्जय
नाही. खरं आहे. माणूस एरवी
In reply to आमच्या शेजारचे मात्र म्हणे by यशोधरा
बापरे
In reply to नाही. खरं आहे. माणूस एरवी by मृत्युन्जय
लहान मुलाना मारणे हे विकृतच.
ज्यांचे लहानपण वाईट अवस्थेत
In reply to लहान मुलाना मारणे हे विकृतच. by विजुभाऊ
नाजुक रिलेशन्शिप
In reply to लहान मुलाना मारणे हे विकृतच. by विजुभाऊ
छान
जगात समदुखि माणसे आहेत हे
देवा! एवढा मार! बाकी अनुभव
ड्यूटीमुळे आलेला संताप....!
चोरून चालवायला नेलेल्या
In reply to ड्यूटीमुळे आलेला संताप....! by इन्द्र्राज पवार
पोलिसाच्या घरी जन्माला येणे
लेखनाचा विषय आवडण्यासारखा
आता नवर्यालाही ही सवय
In reply to लेखनाचा विषय आवडण्यासारखा by रेवती
धपाटा खाल्यानंतर की आधीच? हे
In reply to आता नवर्यालाही ही सवय by अनामिक
मागे लागलीच आहेस तर ते
In reply to धपाटा खाल्यानंतर की आधीच? हे by रेवती
हो, विचारले तर अठवडा दहा
In reply to मागे लागलीच आहेस तर ते by यशोधरा
ओके, धन्यवाद रेवती.
In reply to हो, विचारले तर अठवडा दहा by रेवती
माझ्या बहिणीला सुधा याच
In reply to लेखनाचा विषय आवडण्यासारखा by रेवती
छान!
काही कारण नव्हते... पण मला
In reply to छान! by झुळूक
लेखन आवडले... असेच लिहीत
फारसा मार कधी खाल्लेला आठवत
दोन तिनदा वाचला हा लेख पण