नमस्कार लोकहो,
गेल्या महिन्यात मिपाकरांची सहल यशस्वि झाल्यापासुन सगळ्यांनी एकत्र जेवायला जावं असा विचार मनात होता, मागच्या सोमवारी मला श्री. स्पा यांच्या पंगतीचा लाभ झालाच होता तसंच श्री. वल्लींबरोबर ही खादाडी चर्चा चालुच होती,म्हणुन खालील प्रमाणे कार्यक्रम ठरवलेला आहे त्याचं हे खुलं आमंत्रण.
कार्यक्रम फक्त जेवणाचा आहे, -
हॉटेल पंचवटी (गुजराथी थाळी) , भांडारकर रोड, पुणे.
दिनांक - १४ फेब्रुवारी २०११. वेळ - संध्याकाळी ०७.१५.
जे येणार असतील, त्यांनी नुसतं इथे प्रतिसादात हो म्हणुन चालणार नाही, नंतर व्यनिने कळवावे च अगदी मोबाईल नंबर सहित. ह्यांचा कुठेही गैरवापर होणार नाही याची खात्री बा़ळगा. मोबाईल नंबर देणार नसाल तर न चुकता येण्याची जबाबदारी आपली आपण घ्यावी. आमंत्रण सोमवारी दुपारी १२ वाजेपर्यंतच खुलं राहील,( टेबल रिझर्वेशनचा प्रश्न येउ नये यासाठी) नंतर ३ वाजेपर्यंत मी सगळ्यांना व्यनिने येणा-या मित्र मैत्रिणींची युआयडींची यादि कळवेन.
या आधी पण काही जणांना खव मध्ये विचारणा केलेली आहे, त्यांनी खव मध्ये उत्तर पण दिलेलं आहे, परंतु , त्यांना सुद्धा नम्र विनंती की पुन्हा एकदा प्रतिसाद देण्याचे किंवा व्यनि करण्यावे कष्ट घ्यावेत.
वाहतुक व्यवस्था - सर्वांनी आपली आपली सोय करायची आहे.
खर्च - मी शेवटी गेलो होतो त्यानुसार रु. १९० की २१० प्रति थाळी अनलिमिटेड असा दर होता, हे पण व्यनितुन कन्फर्म करेनच.
अजुन एक नम्र विनंती की, सर्वांनी आपले आपले मिपावरचे परस्पर वाद मिपावरच सोडुन यावेत. ते सोडवायला पुन्हा मिपावर यायचे आहेच. ही सुचना फक्त खबरदारी म्हणुन आहे,इथलं फक्त हसतं खेळतं वातावरण तिथं यावं हाच उद्देश आहे. ( काही जुन्या व्हर्चुअल ग्रुपच्या, (विशेषत: अॅटो ग्रुप,)रिअल मिटिंगचे अनुभव आहेत अशा प्रकारचे) स्वानुभव हो अजुन काय ?
चला, सोमवार संध्याकाळ बुक करा तर मग खादाडिसाठी.
आमची प्रेरणा - श्री.विजुभॉ यांचा धागा - http://misalpav.com/node/16453 आणि त्यावरचा माझाच प्रतिसाद - http://misalpav.com/node/16453#comment-280995
हर्षद.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
4538
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
येणार ..येणार.....
गुजराती
फक्त
महत्वाचा बदल
२१० रुपये!
मा. सं.मं वरील धाग्यांत
खादाडी
दुबईत असती तर मी पण आले असते
In reply to खादाडी by मीली
हर्षद, या कार्यक्रमा साठी तू
somvar pakadalaat mhanoon
हर्षद साहेब.. चायला सोमवार
स्पाकाकांना 'माडी'चा बराच
In reply to हर्षद साहेब.. चायला सोमवार by स्पा
त्यामुळे माडीवरी चल गं गडे
In reply to स्पाकाकांना 'माडी'चा बराच by सूड
कशाला कशाला !! तुमच्यासोबत
In reply to त्यामुळे माडीवरी चल गं गडे by स्पा
सोमवार का ?
बील कोण
गोईंग ड्च, सगळ्यांनी शेअर
In reply to बील कोण by गोगोल
हा हा
In reply to गोईंग ड्च, सगळ्यांनी शेअर by ५० फक्त
कधी? कोठे?
सोमवारी मनसोक्त मैफल करण्याचा