Skip to main content

मिसळपाव आता पोलिसांच्या ताब्यात! :)

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 05/07/2008 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, आता येथे जरा जपून लेखन करा बरं! कारंण आपलं मिसळपाव आता महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात गेलं आहे! :) अतिशय कष्टाने व जीव लावून मिसळपाव हे संकेतस्थळ उभारणारे मिसळपावचे तांत्रिक सल्लागार नीलकांतराव हे एम पी एस सी ची परिक्षा उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची पोलिस उप-निरिक्षक (PSI) या पदाकरता निवड झाली आहे. लवकरच ते नाशिक येथील पोलिस प्रशिक्षण संस्थेत पोलिस उपनिरिक्षकाच्या पदाकरता प्रशिक्षण घेण्याकरता दाखल होतील! मी संपूर्ण मिसळपाव परिवाराच्यावतीने नीलकांतचे हार्दिक अभिनंदन करतो व त्याला त्याच्या पुढील वाटचालीकरता सुयश चिंतितो! एक अतिशय प्रामाणिक, सच्चा व कर्तबगार पोलिस अधिकारी म्हणून त्यांनी नाव कमवावे हीच विठोबाच्या चरणी प्रार्थना! तात्या.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 29099
प्रतिक्रिया 79

प्रतिक्रिया

कुठे पोस्टिंग सध्या ?

निलकांत, अतिशय अभिनंदन, पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा. माझे भावजी नाशिकच्याच पोलिस ट्रेनिंग अ‍ॅकॅडमीचे पास आउट आहेत. काही मदत लागली तर त्यांना विचारेन. हर्षद.

ग्रेट !! मूळ धागा तब्बल दोन वर्षापूर्वीचा असल्याने व मी २०१० च्या मध्यास इथला सदस्य झालो असल्याने [त्यातही श्री.नीलकांत यांच्याकडे ज्या आठवड्यात श्री.तात्यांनी मिपाची सूत्रे दिल्याचे जाहीर केले, त्याच आठवड्यात...] नीलच्या प्रत्यक्षातील करीअरविषयी काहीच माहिती नव्हते. पुढे त्यांच्यासमवेत ज्या ज्या वेळी इथे खरडीतून वा अन्यत्र प्रतिसादातून विचाराची देवाणघेवाण झाली त्यावेळीही माझी समजूत अशी झाली की ते आय.टी. क्षेत्राशी निगडीत आहेत. पण आज अचानक या धाग्याचे पुनर्रज्जीवन झाल्याने श्री.नीलकांत हे पोलिस दलात आपले कर्तृत्व दाखवित आहे. आनंद झाला. या क्षेत्रात तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !! इन्द्रा

अभिनंदन. इनामदार साहेब, नांगरे पाटील साहेब यांच्यासारखेच कर्तॄत्व तुम्ही गाजवाल अशी आशा बाळगतो.