माझे मराठी बरेच कच्चे आहे पण तुम्ही मला हसू नका.
तुमच्या लिखाणात तर कुठेही कच्चेपणा दिसत नाही.
मलाही येथे काही लिहायला आवडेल नक्की. तुम्हाला आवडेल की नाही हे सांगता येत नाही कारण मला नीट मराठी येत नाही.
वर सांगितल्याप्रमाणेच तसे कुठेही जाणवले नाही. चांगले मराठी तर लिहीताय. आणि पहिल्यांदाच लिहीताय म्हणून थोडी भिती वाटत असेल्,तर घाबरण्याचे अजिबात कारण नाही. मिपाकर नेहमीच प्रोत्साहन देतात.
मुक्तसुनीत हे या साईटचे मालक आहेत का?
नाही हो! तात्या(विसोबा खेचर उर्फ सरपंच उर्फ जनरल डायर) या साईटचे मालक आहेत.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
प्रमोद देवांचे फोटोपण चांगले असतात. ते पण आर्टिस्ट आहेत का?
हाहाहा! मी आणि आर्टिस्ट? खरंच वाचून मजा वाटली. असा गोड गैरसमज कसा झाला बॉ?
अहो इथे चिकटवलेली एकूण एक छायाचित्रं मी महाजालावरूनच इथे उतरवलेली आहेत. मला साधा कॅमेराही पकडता येत नाही.
चित्रकला,हस्तकला,गायन-वादन-नृत्य आदि कोणत्याही प्रकारची कला दुरान्वयानेही माझ्या जवळपास फिरकत नाही.
मी एक न-कलाकार आहे पण रसिक नक्की आहे आणित्या जोरावर थोडी लुडबुड करतो झाले.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
नवीन सदस्येचे स्वागत. तुमच्या व्यवसायाबद्दल , कलकत्ता शहराबद्दल जमल्यास थोडे लिहावे अशी मी विनंती करतो.
मी मालक नव्हे हे वर तुम्हाला कळलेले आहेच. मालक-मालकिणींची चित्रे तुम्हाला इथे सापडतील.
http://www.misalpav.com/node/1997
:-)
मी मालक नव्हे हे वर तुम्हाला कळलेले आहेच. मालक-मालकिणींची चित्रे तुम्हाला इथे सापडतील.
हा हा हा! मुक्तराव, तुम्ही म्हणजे अंमळ मजेशीरच आहात! आमचा व अनुष्काचा 'मालक मालकीण' असा उल्लेख केल्यामुळे आम्हाला अगदी कस्सं कस्सं वाटतंय बघा! :)
असो,
आसावरी, तुझं स्वागत गं बाई! रहा इथे आणि लिही अगदी निवांत, स्वान्तसुखाय! कॉन्व्हेन्टच्या मानाने तुझं मराठी चांगलं आहे. थोड्या सवयीने टंकलेखनाचा वेगही वाढू शकेल.
आणि हो, तुझा योग्यच समज झाला आहे. आमचा मुक्तरावच मालक आहे बरं या संस्थळाचा! :)
तात्या.
तुमचे लिखाण चांगले आहे. मराठीत नवखेपणा नाहीये. लिहित रहा.
वरती मुक्तसुनीत यांनी म्हटल्याप्रमाणे कोलकत्त्याबद्दल लिखाण करावे, वाचायला आवडेल.
आपल्या व्यवसायात येणार्या वेगवेगळ्या अनुभवांबद्दलही वाचणे आवडेल.
चतुरंग
आसावरी, तुमचे स्वागत. तुमचे मराठी तर खूपच छान आहे आणि महत्वाचे म्हणजे तुम्ही काहिही चुका न करता टंकले आहे. वाचताना ही छान वाटले.
बिपिन.
अवांतरः :D गटणे साहेब, बघा हो... नीट टंकणे सोपे आहे हो... (ह.घ्या.)
आसावरीताई,तुमचे येथे मनःपूर्वक स्वागत. मराठी टंकलेखन करण्यात जरा वेळ जाईल;काही चुका होतील,पण लिहीत रहा.तुमचे शालेय शिक्षण,नोकरी/व्यवसायातले अनुभव,इतर ललित लेखन वगैरे वाचायला आवडेल.
(स्वागतोत्सुक)बेसनलाडू
हे घ्या ...
आर्किटेक्ट : वास्तुविशारदकार
युनिक : एकमेव / वेगळे [ येथील संदर्भाने ]
ऍट्रॅक्टिव्ह : सो सिंपल [ कळेल ना, का मराठी सांगू ] आकर्षक
मेनू होमपेजवर : [ येथील अर्थाने ] खाद्यपदार्थ येथील मुखपृष्ठावर
टायपिंग : टंकन
कॉन्व्हेन्टमधेच : इंग्रजी / ख्रीस्ती शाळा
रेसिपिज : पाककॄती ...
पण काय हो, कशासाठी पाहिजे होते हे अर्थ ???
आता माहित होऊन काय करणार आहात ???
अवांतर : आसावरीताई , मिपावर तुमचे स्वागत ...
हे आपलेच एक "समांतर कुटुंब" समजा, बाकीचे चालूच राहिल ...
[सविस्तर ] छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
हे म्हणजे दुसरा विद्यार्थी बसवून परीक्षा उत्तीर्ण होण्यासारखे आहे...
हाहाहा....
असो. आसावरी ,जरी उत्तरं आली नसती तरी काही बिघडत नव्हतं...
मिपावर सगळ्यांचं मुक्त स्वागत होत असतं..
छोटा डॉन ...
'डॉन'ला मराठी प्रतिशब्द काय आहे???
डॉन ला मराठी प्रतिशब्द भौ
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
डॉन ला मराठी प्रतिशब्द भौ
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
आसावरी तै तुमचे स्वागत
इथली मंडळी जर्रा वेगळी आहेत चांगले वाइट जे काय असेल ते सरळ सांगतील. थोडे तिरके विनोद करतील. पण प्रेमळ आहेत. तरी बरे तुम्ही मराठीटाईप नीट केले आहे. इथले लोक तुम्हाला काही स्पष्ट बोलले तर वाईट मानु नका. कोणी थट्टा केली तर घाबरुन जाऊ नका. या इथल्या मंडळींची सवय होईपर्यन्त थोडा धीर धरावा लागेल. बाकी तुम्हाला कळेलच.
एक मात्र खरे तुमचे मराठी वाचन वाढवावे लागेल.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
प्रतिक्रिया
मिपावर
स्वागत.
मिपा परिवारात स्वागत आहे!
प्रमोद
हाहाहा!
स्वागत आणि स्पष्टीकरण
:)
मिपा वर स्वागत!
स्वागत.
स्वागत...
सुस्वागतम्
स्वागत .
असं कसं?असं कसं?
मी सांगतो ना ...
छोटा डॉन यांना...
डॉन ला
डॉन ला
सुस्वागतम
आसावरी तै तुमचे स्वागत
आसावरी.