नमस्कार,
माझे नाव आसावरी जोशी. मी आर्किटेक्ट आहे. गेल्या ३-४ महिन्यांपासून मी या संकेतस्थळावर (हा शब्द बरोबर आहे ना?) येत आहे. येथील सभसदांचे लेखन आणि प्रतिक्रिया नेहमी वाचते. इथले वातावरण खूप छान आणि मनमुराद आहे. मला या संकेतस्थळाची सर्वात कोणती गोष्ट आवडली असेल तर ती आहे या संकेतस्थळाचे नाव! मिसळपाव हे नाव खरेच खूप युनिक आहे आणि ऍट्रॅक्टिव्ह आहे. मिसळपाव हा खूप फेमस पदार्थ आहे व तो सगळ्यांनाच आवडतो. त्यामुळेच या संकेतस्थळाचे नाव लगेच लक्ष वेधून घेते. येथे दर दोन तीन दिवसाअंनी खाण्याचे छान छान मेनू होमपेजवर बघायला मिळतात त्याची गंमत वाटते. आज विचार केला की आपणही याचे सभासद होऊ म्हणून झाले. मला सवय नाही पण आज प्रथमच मी मराठी टायपिंग करत आहे. (खूप वेळ लागतो आहे) इथे फार चांगले मराठी वाचायला मिळते पण माझे सर्व शिक्षण दिल्ली, कलकत्ता येथे कॉन्व्हेन्टमधेच झाले. माझे मराठी बरेच कच्चे आहे पण तुम्ही मला हसू नका.
मला चतुरंग, रामदास, तात्या, मुक्तसुनीत आणि अनेकान्चे लेखन फार आवडते. मुक्तसुनीत हे या साईटचे मालक आहेत का?
रेसिपिज पण खूप छान असतात. मलाही येथे काही लिहायला आवडेल नक्की. तुम्हाला आवडेल की नाही हे सांगता येत नाही कारण मला नीट मराठी येत नाही.
आपली सर्वांची मैत्रिण,
आसावरी.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
7601
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
मिपावर
स्वागत.
मिपा परिवारात स्वागत आहे!
प्रमोद
हाहाहा!
In reply to प्रमोद by आसावरी जोशी
स्वागत आणि स्पष्टीकरण
:)
In reply to स्वागत आणि स्पष्टीकरण by मुक्तसुनीत
मिपा वर स्वागत!
स्वागत.
स्वागत...
सुस्वागतम्
स्वागत .
असं कसं?असं कसं?
मी सांगतो ना ...
In reply to असं कसं?असं कसं? by शेखस्पिअर
छोटा डॉन यांना...
In reply to मी सांगतो ना ... by छोटा डॉन
डॉन ला
In reply to छोटा डॉन यांना... by शेखस्पिअर
डॉन ला
In reply to छोटा डॉन यांना... by शेखस्पिअर
सुस्वागतम
आसावरी तै तुमचे स्वागत
आसावरी.