Skip to main content

लग्न करणां-याना तज्ञ माणसाचे मार्गदर्शन अर्थात पुन्हा एकदा अभीनंदन

लेखक चिंतामणी यांनी शनिवार, 22/01/2011 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
लग्न करणां-याना तज्ञ माणसाचे मार्गदर्शन अर्थात पुन्हा एकदा अभीनंदन आजच्या सामनात पुन्हा एकदा आपले आघाडीचे सभासद प.रा उर्फ प्रसाद ताम्हणकर याचा एक लेख प्रसीध्द झाला आहे. विषय आहे. "लग्न डॉट कॉम" लग्नाळुंना प.रा.ने मार्गदर्शन केले आहे. प्रथमतः त्याचे पुन्हा एकदाअभीनंदन. सामनात फुलोरावर क्लिक करा आणि इच्छुकांनी मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. (इतरांनी काय करायचे हे मी सांगायला नको) http://www.saamana.com/

वाचने 5722
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

आणि लग्न झाल्यावर पैसा लागणारच तेव्हा तो कसा कमवावा यावर रामदासांनीही मार्गदर्शन केले आहेच. शिवाय नवरोबांनाही प्रश्न पडणारच की बायकोला काय खायला करून घालावे तेव्हा त्यांचेसाठी स्वाती दिनेशची पाकृती पण आहेच.

In reply to by प्रचेतस

इतर काही "विशेष" सिक्रेट फॉर्म्युलासाठी मला अथवा धम्याला व्य नी केला तरी चालेल. ;-)

कहीतरी गडबड झालेली दिसत्ये. कारण या लिंकवरून फुलोरा सदर उघडलं तिथे परा नाही तर धमु म्हणजे 'कैवल्य देशमुखचा' लेख सापडला. पराच्या लेखाची लिंक दुसरी आहे का? असेल तर त्याच्याबरोबर धमुचंही अभिनंदन!

In reply to by पैसा

कैवल्य देशमुख उर्फ ध.मु.च्या लेखाचे वरची लिंक प.रा.च्या लेखाची आहे. स्वाती दिनेशची रेसीपीसुद्धा आहे तेथे. (या सगळ्यांनी सामनावर कब्जा केलेला दिसत आहे)

In reply to by कुंदन

लोकां सांगे ब्रम्हज्ञान..... आता तरी मनावर घ्या म्हणाव पर्‍याला. ;) -(लाडूंची वाट्पाहाणारा) गण्या

In reply to by डावखुरा

आधीच्या लेखावर आत्ता प्रतिक्रीया देत आहेस. आजच्या लेखावर कधी देणार?????? (देवसुध्दा सांगु शकेल की नाही ही शंका आहे.) :-/

धन्यवाद सगळ्यांचे :) माझ्या आधी धमाल मुलगा उर्फ कैवल्य देशमुख आणि स्वाती माळी उर्फ मस्त कलंदर ह्यांचे कौतुक करा. त्यांची मदत केल्याने आणि लेखन केल्यानेच हा चार गोष्टींचा संपुर्ण लेख बनवता आला.

अभिनंदन परा. स्वातीताई, रामदासकाका यांचेदेखील अभिनंदन.

अरे वा वा !! साला परा आमचा दोस्त आहे याचा आम्हाला अभिमान आहे. परा ! पूनमवर बसू रे रातच्याला... ये साडेनऊ वाजेपर्यंत ... (माहित आहे तुझी चतुर्थी आहे... मला नुसती कंपनी दे आणि बील भर)

अरे वा! अभिनंदन परा! :)

चला, या निमित्ताने अनेक आयडींचे मालक कळले. परा, धमुचे अभिनंदन.

अभिनंदन

अगदी ३-४ वर्षांपूर्वीपर्यंत लग्नसंस्थेवर अज्जिबात विश्वास नसलेले आणि मुक्तव्यवस्थेचा प्रसार आणि प्रचार करणारे धमालआबा देशमुख यांनी लग्न या विषयावर मार्गदर्शनपर लेख लिहावा ही आजच्या समाजाची एक मोठीच शोकांतिका आहे असे म्हणावे लागेल. मात्र आमच्या स्वातीताईंनी मात्र अगदी मस्त आणि चपखल लेख लिहिला आहे. परायक साहेबांनी पण उत्तम कामगिरी बजावलेली आहे.

आजच्या सामनामधे परा आणि रामदास यांचे पुढील लेख आले आहेत. मायमराठीत संगणक ज्ञान- परा पैसा कसा कमवाल? रामदास पुन्हा एकदा अभिनंदन. (आता यांचे लेख येणे हि नित्याचीच बाब झाली असल्याने वेगळा धागा काढला नाही.)