[आघात ] : एक उल्लेखनीय प्रयत्न
![]() | अलीकडेच विक्रम जोशी दिग्दर्शित 'आघात' हा चित्रपट पाहण्याचा योग आला. ज्यांना तो पाहायचा होता त्यांनी आत्ता पर्यंत तो पहिला असेलच असे गृहीत धरून मी विषयाला हात घालणार आहे. आजकाल अनेक ठिकाणी रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या इस्पितळाच्या तोडफोडीच्या अनेक घटना आपण ऐकतो. त्यावर त्यांच्या असंस्कृतपणाबद्दल त्यांना बोलही लावतो. मात्र त्यातील रुग्णांचे किंवा त्यांच्या नातेवाईकांचे वर्तन जरी बरोबर नसेल तरी ह्या नाण्याची जी दुसरी बाजू आहे, त्यावर प्रकाश टाकण्याचा हा चित्रपट प्रयत्न करतो. डॉक्टरी पेशा हा नेहमीच एक आदराने पाहिला जाणारा पेशा आहे. या व्यवसायातील लोक, त्याकडे निव्वळ उपजीविकेचं साधन म्हणून पाहत नाहीत तर एक समाजकार्य म्हणून ह्याचा उल्लेख होतो. |
वाचने
2007
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
मी हा चित्रपट बघितलाय.
मध्यंतरानंतर हा दोन व्यक्तींच्या संघर्षावर येऊन ठेपतो. जरी हे टाळण्याजोग नसलं तरीही मुक्ता बर्वे आणि विक्रम गोखले हळूहळू त्यांच्या भूमिकेच्या बाहेर येतात. आणि उरतो तो एकाने दुसर्याला नेस्तनाबूत करण्यासाठी चालवलेला संघर्ष. आनि तो फारच डार्क केलाय. करा किन्वा मरा टाइप
डॉक्टर आणि त्यांच्या चुकीवर सुरु होऊन कथानक हळू हळू विक्रम गोखले ह्यांना दुराभिमानी, दुष्ट, खलनायक बनवत जाते. आणि सगळ्याच वाईट गोष्टीसाठी त्यांना जबाबदार ठरवत जाते. इथे चित्रपट तसा थोडा भरकटला असे मानता येईल.सहमत असे न दाखवता फक्त यशाच्या शिखरावरच तो दुराभिमानी झालाय हे दाखवले असते तरी चाल्ले असते. पुर्वआयुष्यातील सन्दर्भ न दाखवता.
एकदा तर तो जरूर पाहण्या जोगा आहेअसेच म्हनते
सध्या तरी हा चित्रपट पाहाण्याचा योग आलेला नाही. विक्रम गोखले यांनी केलेला दिग्दर्शनाचा प्रयत्न पाहाण्यासाठी जरुर पाहिला पाहिजे!
खूप अपेक्षा वगेरे नाहीत, पण तरीही ट्रेलर बघून चित्रपट पहायची इच्छा आहेच!
अवांतरः कुणी रीटा पाहिलाय का?
परीक्षण आवडलं. किमान शब्दात कमाल आशय मांडला आहे.
परिक्षण आवडलं. बघू केव्हा मिळतोय हा चित्रपट पहायला.
परिक्षण छान.
In reply to पैसे वाचवल्याबद्दल मानावे तेव्हढे आभार कमीच आहेत. by आत्मशून्य
असे जरी असले, तरी चित्रपट मुळीच टाकाउ नाही. तसे पाहता त्यात उद्धृत केलेल्या सर्व बाबींसाठी एकदा तर तो जरूर पाहण्या जोगा आहे हे नक्कीच.जरूर पहा हो एकदा !
याची पटकथा ज्याने लिहिली आहे त्याला थोडाफार ओळखतो...
पण अजून सिनेमा पाहिलेला नाहीये.. पाहणार आहे...

मी हा चित्रपट