सहल १६०१२०११ ची.. रिपोर्ट. - भाग ०१
नमस्कार,
इथे आमंत्रण दिलं होतं त्याला प्रतिसाद देणा-या सर्वांचे आभार. आमंत्रण खरंच शॉर्ट नोटिस वर होतं त्याबद्दल क्षमस्वः. रविवारी दिवसभर फिरुन आलो त्याचा हा व्रुतांत.
हो नाही हो नाही करत आम्ही ४ जण उरलो होतो ट्रिपला जायला, मी, आत्मशुन्य, गणेशा व भरत. रविवारी सकाळी जरा लवकर उठुन तयारी सुरु केली, गाडी धुतली, पाण्याच्या बाटल्या, इंजिन ऑईल, ब्रेक, लाईट व महत्वाचे गाणि, दिवसभरासाठी.
सव्वा दहाला आत्मशुन्य वारजेला आला होता, आणि गणेशा त्याच्या घरुन निघालेला होता, त्याच्या गाडित काही तांत्रिक प्रॉब्लेम झाल्याने त्याला वारजेला पोहोचायला पावणेअकरा वाजले, तो आल्यावर लगेच निघालो, कात्रजला भरतला उचललं आणि खडी मशिन मार्गे एकदा रस्ता चुकुन सोलापुर हायवेला लागलो. एक वाजण्याच्या सुमारास आम्ही भुलेश्वरला पोहोचलो. खाली काही फोटो टाकत आहे आत्मशुन्यने काढलेले, गणेशाने काढलेले फोटो नंतर अपडेट करेन. (त्याचा कॅमेरा पुण्यातच विसरला आहे.) श्री. वल्लि व माझ्या या पुर्वीच्या धाग्यांत बरेच फोटो आहेत त्यामुळे फक्त नवेच फोटो टाकत आहे.
यात मध्यभागी असलेल्या शंकराच्या मुर्तीच्या हातात त्रिशुलाबरोबर नरमुंड असलेले एक शस्त्र आहे. तसेच या सर्व प्रतिमा या त्या त्या देवतांच्या स्त्री रुपातील आहेत. या वरुन हे स्थान वामपंथीयांचे असावे काय अशी चर्चा करणेत आली.
हे शिल्प कशाचे असावे ह्यावर सुद्धा ब-याच चर्चा होउन आपल्याला काही कळत नाही हा निष्कर्ष काढणेत आला.
हा शिखराचा भाग पेशव्यांनी बांधला आहे. (इति श्री. पुजारी.)
त्या शिखरातला हा बागुलबुवा.
या मंदिराची बाहेरची पुर्ण भिंत ही अशा छोट्या खोल्यांनी बांधलेली आहे, या खोल्यात आता एक -दोन विठोबा रखुमाईच्या मुर्ती आहेत, पण प्राचीन का़ळी या खोल्या असुन तांत्रिक साधना करणारे त्या वापरत असावेत असा एक आमचा अंदाज आहे.
अशा सर्व खोल्याच्या दाराजवळच्या खांबावर असे हत्ती कोरलेले आहेत ज्यांच्या सोंड व डोक्यावर या खोल्यासमोरचे छत तोलुन धरलेले आहे.
हे पण असेच कशाचे आहे हे न ठरु शकलेले शिल्प, यात दोन धनुर्धारी आहेत, एकाच्या मागे माकडे आहेत, वर बायका आहेत घरकाम करणा-या, त्यामुळे ह्यावर सुद्धा ब-याच चर्चा होउन आपल्याला काही कळत नाही हा निष्कर्ष काढणेत आला.
मंदिराच्या बाहेरुन एका बाजुला दिसणा-या फुलांच्या शेतीचा हा एक फोटो.
मग इथुन निघुन आम्ही सासवडला काही माहितगारांना विचारपुस करुन मोहीनि हॉटेल मध्ये आलो. तिथं व्यवस्थित मिसळपाव हाणुन, त्यावर चहा व लस्सीने पोटं पॅक करुन पुढे निघालो. वाटेत चांगवटेश्वर नावाचे शंकराचे मंदिर आहे. एकदम शांत आणि आडबाजुला असलेलं हे मंदिर आत्मशुन्य यांनी दाखवले त्याबद्दल त्यांना धन्यवाद. हे मंदिर तथाकथितपणे भारतीय पुरातत्विय खात्याच्या ताब्यातआहे, आणि त्यांनी आपल्या सवयीप्रमाणे किंवा नियमाप्रमाणे त्याची वाट लावणे सुरु केले आहे. सगळीकडे फोटो काढल्यास जबरदस्त शिक्षेची भिती दाखवलेली आहे तसेच फोटो काढल्यास आपणच कोणाला फोन करुन सांगायचे ते लिहिले आहे.
श्री. संत ज्ञानेश्वरांच्या वे़ळेचे श्री. चांगदेव हे दरवर्षी काही काळ अंधत्व व मॉनत्व स्विकारुन साधना करीत अशी काहीशी कथा या मंदिराची आहे. येथे असलेले शिवलिंग स्वयंभु आहे असे लिहिले आहे. मंदिरात १५- २० पाय-या चढुन जावे लागते आणि त्यावर मंदिर जोत्यावर बांधलेले आहे. समोरच्या अंगणात दोन बाजुला दोन दिपमाळा आहेत. येथे ही एक मोठा दगडी नंदी आहे, ज्यावर कर्मदरिद्री भापुखाने सिमेंट पेंट मारुन त्याच्या बो-या वाजवला आहे. हीच त-हा मंदिराची व कळसाची आहे.
चांगवटेश्वर मंदिरातील शिवलिंग.
अतिशय अक्कलशुन्य व कल्पनादारिद्य असणा-या कोण्यातरी टेंडरचा आयट्म करायचा म्हणुन रंग दिलेला कळस. हा कळस त्याच्या मुळ रुपात खुप सुंदर दिसला असता पण ... या फोटोत दिसणा-या चाफाच्या झाडाच्या जाळीवर भारताचे पहिले राष्ट्र्पती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी या मंदिराला १९५८ साली भेट दिलेली होती अशी पाटि आहे.
मंदिराच्या अंगणातील दोन दिपमाळा.
आता पुढे मंदिरातील नंदी व खांबाचे काही फोटो आहेत. या मंदिरातील बहुतेक सगळया खांबांवर वेगवेगळे प्रसंग किंवा कलाकसुर आहे.
फोटो मधील जिवंत मनुक्ष श्री. आत्मशुन्य.
फोटो मधील जिवंत मनुक्ष श्री. गणेशा.
फोटो मधील जिवंत मनुक्ष श्री. भरत.
फोटो मधील जिवंत मनुक्ष म्हणजे प्रत्यक्ष मी, माझ्यासहित एवढा मोठा खांब एका फोटोत बसवल्याबद्दल आत्म्शुन्य यांना धन्यवाद.
यानंतर पुढे नारायणपुर येथे श्री. एकमुखी दत्त व नारायणेश्वर (शंकर) या दोन्ही देवळात गेलो. दत्ताचे देऊळ म्हणजे मोठा हॉल आहे, पण नारायणेश्वराचे देऊळ मात्र जुने दगडी आहे, आणि आत छान अंधार व खुप धुप लावुन वातावरण निर्मिती छान केलेली होती.
क्रमशः - ( लंच टाईम संपला, पुढचा भाग उद्या टाकेन, क्षमस्वः)
हर्षद.
Book traversal links for सहल १६०१२०११ ची.. रिपोर्ट. - भाग ०१
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सर्व फोटो अप्रतिम.....
वा छान झालीले आहे ट्रिप आता
>>छान झालीले आहे ट्रिप....आता
व हर्षद शेठ, फोटू आणि वर्णन
+१
@ नंदादीप, नाही रे गणेशा
अमृतेश्वरला जाणार
फोटो दुन्या भारी
मस्त मस्त फोटो
छान फोटो मंडळी!!!
व्वा..
खुपच छान ...
झक्कास
मस्त. रविवार स्त्कारणी लागला
फोटो सुंदर! खरंच
मुळ मंदिर १३ व्या शतकात
गणेशा, आठवणीबद्दल धन्यवाद,
हॅहॅहॅ
सहमत
मंदीरावरची कलकुसर किती छान
केवळ अप्रतिम फोटो
वा वा वा वा वा वा
श्री. विनायक, आपला अनुभव अगदी
\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\
भारी रे.....!!! छान छान फटू!
फोटो मस्तच
सर्व मूर्त्या/कलाकूसर खरोखरच इतक्या सूदंर आहेत की
फोटो व वृत्तांत दोन्ही छान .
"आणी शेवटी ज्याला पूर्णब्रम्ह
मस्त फोटो आहेत.
सगळी छायाचित्रे छान आली
ट्रिपचे फोटो आणि वर्णन सुंदर,
फारच छान जमलाय ! मला पण यायचे
मस्तच फोटो झकास आणि प्रवास
छान...
:) गूड कॅच, बारीक लक्ष.
छान आले आहेत सगळे फोटो. आता
छान झाली आहे ट्रिप. पुढचा भाग
धन्यवाद
हे पण असेच कशाचे आहे हे न ठरु
नमस्कार, काल दुसरा भाग टाकणे