वा रे वा आम्हा बायकांच्याच त्रासदायक सवयी नसतात काही. नवर्याच्या देखील काही सवयी त्रासदायक असतात. त्यापैकी टॉप १० (मुख्य १०).
(१) टूथपेस्ट मधूनच दाबून ठेवणे. ज्यायोगे पुनर्वापरास ती निरुपयोगी होऊन बसते.
(२) टॉयलेट सीट वरचे वरच ठेवणे. या भयंकर अॅनॉयींग सवयीबद्दल जितकं बोलाल तितकं कमीच आहे. पण आवरतं घेते. :P
(३) घुमेपणा - अभिव्यक्तीची किमान गरज असणे.
(४) ऊठ्सूठ युद्ध चित्रपट पाहणे आणि घरातल्यांचे डोके त्यातील कर्णकर्कश्श आवाजाने उठविणे.
(५) "मेल बाँडींग" या गोंडस नावाखाली देवाला सोडलेल्या वळूगत उनाडगिरी करणे.
(६) मॉलमध्ये पाय टाकल्याच्या ५ मिनीटाच्या आत हवी असलेली वस्तू घेऊन बाहेर पडणे आणि एवढा तीर मारून काय करणे तर घरी येऊन ढाराढूर झोपणे.
(७) एखादा सामान्य पदार्थ बकवास बनवून, दुप्पट सांडलवण करून, आरडाओरड करून घर डोक्यावर घेऊन, शेवटी बायकोकरता तिप्पट काम वाढवून ठेवणे.
(८) रस्ता चुकल्यास पृथ्वी प्रदक्षिणा घालून पेट्रोल वाया घालविणे पण पत्ता न विचारणे.
(९) क्रिकेट्/फूट्बॉल आदिची मॅच असल्यास जगबुडी का होइना पण आंघोळ/दाढी वगैरे न करता टी व्ही ला चिकटून बसणे आणि फर्मान (ऑर्डरी) सोडणे.
(१०) आपल्या आईच्या हातचं खाणं साक्षात अन्नपूर्णा आली तरी बनवू शकणार नाही असा अंधविश्वास बाळगणे.
या यादीमध्ये सर्व सदस्यांनी आपल्या परीने भर घालावी ही विनंती.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
16641
प्रतिक्रिया
95
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाचा सुंदर विनोद..
सिन्कमधे शु :ओ मी तर नव्राचा
छे! तीनवेळा प्रतिसाद टंकून मी
अरे काय हे!! चुचे तुलासुद्धा
एकदा कान्दे आणायला पाठ्विले
माझ्याबरोबर खरेदीला यायला
हा हा !!! शिल्पाबै... प्रिंट
In reply to माझ्याबरोबर खरेदीला यायला by शिल्पा ब
हॅ हॅ हॅ...खरं तेच लिहिलंय
In reply to हा हा !!! शिल्पाबै... प्रिंट by बबलु
छान
बग्ज आणि फीचर्समधे फारसा फरक नसतो
<<<त्याच्याच माझ्याबद्दल काही
In reply to बग्ज आणि फीचर्समधे फारसा फरक नसतो by ३_१४ विक्षिप्त अदिती
बाकीचे मला रोजच्या रोज, बनवून
In reply to <<<त्याच्याच माझ्याबद्दल काही by शिल्पा ब
पण तुम्ही केलेले खायची
In reply to बाकीचे मला रोजच्या रोज, बनवून by ३_१४ विक्षिप्त अदिती
बाकीच्यांच्या तक्रारी कुठे सारायच्या हे मला माहित आहे
In reply to बाकीचे मला रोजच्या रोज, बनवून by ३_१४ विक्षिप्त अदिती
>>>>>एकदा कान्दे आणायला
>>>>>एकदा कान्दे आणायला
अजुन एक सवय.. बाकिचे नवरे
१००% खात्री आहे तु जाशिल तिकडे निट जाशिलच..
In reply to अजुन एक सवय.. बाकिचे नवरे by पर्नल नेने मराठे
माझे बाबा पन असेच एक प्रश्न
हे सगळे मुलामुलींना आपोआपच
In reply to माझे बाबा पन असेच एक प्रश्न by पियुशा
अरेरे... शुचितै... तुमच्या
>>आपल्या आईच्या हातचं खाणं
तु म्हणतोस तो मुद्दा मान्य.
In reply to >>आपल्या आईच्या हातचं खाणं by सूड
बिचारे नवरे
शुची - काय देऊ प्रतिक्रिया.