Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by शुचि on Fri, 12/24/2010 - 21:19
वा रे वा आम्हा बायकांच्याच त्रासदायक सवयी नसतात काही. नवर्‍याच्या देखील काही सवयी त्रासदायक असतात. त्यापैकी टॉप १० (मुख्य १०). (१) टूथपेस्ट मधूनच दाबून ठेवणे. ज्यायोगे पुनर्वापरास ती निरुपयोगी होऊन बसते. (२) टॉयलेट सीट वरचे वरच ठेवणे. या भयंकर अ‍ॅनॉयींग सवयीबद्दल जितकं बोलाल तितकं कमीच आहे. पण आवरतं घेते. :P (३) घुमेपणा - अभिव्यक्तीची किमान गरज असणे. (४) ऊठ्सूठ युद्ध चित्रपट पाहणे आणि घरातल्यांचे डोके त्यातील कर्णकर्कश्श आवाजाने उठविणे. (५) "मेल बाँडींग" या गोंडस नावाखाली देवाला सोडलेल्या वळूगत उनाडगिरी करणे. (६) मॉलमध्ये पाय टाकल्याच्या ५ मिनीटाच्या आत हवी असलेली वस्तू घेऊन बाहेर पडणे आणि एवढा तीर मारून काय करणे तर घरी येऊन ढाराढूर झोपणे. (७) एखादा सामान्य पदार्थ बकवास बनवून, दुप्पट सांडलवण करून, आरडाओरड करून घर डोक्यावर घेऊन, शेवटी बायकोकरता तिप्पट काम वाढवून ठेवणे. (८) रस्ता चुकल्यास पृथ्वी प्रदक्षिणा घालून पेट्रोल वाया घालविणे पण पत्ता न विचारणे. (९) क्रिकेट्/फूट्बॉल आदिची मॅच असल्यास जगबुडी का होइना पण आंघोळ/दाढी वगैरे न करता टी व्ही ला चिकटून बसणे आणि फर्मान (ऑर्डरी) सोडणे. (१०) आपल्या आईच्या हातचं खाणं साक्षात अन्नपूर्णा आली तरी बनवू शकणार नाही असा अंधविश्वास बाळगणे. या यादीमध्ये सर्व सदस्यांनी आपल्या परीने भर घालावी ही विनंती.
  • Log in or register to post comments
  • 16556 views

प्रतिक्रिया

Submitted by नरेशकुमार on Fri, 12/24/2010 - 21:24

Permalink

ग्रेट

ग्रेट
  • Log in or register to post comments

Submitted by इंटरनेटस्नेही on Fri, 12/24/2010 - 21:24

Permalink

क्रमांक सात (७) ची सवय मला

क्रमांक सात (७) ची सवय मला देखील आहे! छान लेख, शुचिताई! :) - (पुरुष) इंट्या.
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Fri, 12/24/2010 - 21:26

In reply to क्रमांक सात (७) ची सवय मला by इंटरनेटस्नेही

Permalink

आँ?

लग्न न होताच? असो! ह्या धाग्यावर आम्ही सोईस्कर मौन पाळलेले आहे. आमचे प्रेरणास्थान श्री. अरुणकाका मनोहर आले की त्यांच्याशी सल्लामसलत करुन योग्य ते बोलू. :P
  • Log in or register to post comments

Submitted by अनाम on Fri, 12/24/2010 - 21:26

Permalink

हा धागा केवळ द्वेशातुन आल्या

हा धागा केवळ द्वेशातुन आल्या सरखा वाटतोय. ;) (कही कही मुद्देतर एकदम ढकलपत्रातले फिट्ट बसणारे )
  • Log in or register to post comments

Submitted by प्रीत-मोहर on Fri, 12/24/2010 - 21:31

Permalink

तै एक्दम सही

तै एक्दम सही ओब्सर्वेशण्स... चि. सौ चुचु. ह्यांचा प्रतिसाद वाचण्यास उत्सुक :)
  • Log in or register to post comments

Submitted by पंगा on Fri, 12/24/2010 - 21:37

Permalink

८ आणि १०बद्दल...

बाकीच्या मुद्द्यांबद्दल चालू द्या, पण क्र. ८ आणि १०बद्दल माझे दोन सेंट:
(८) रस्ता चुकल्यास पृथ्वी प्रदक्षिणा घालून पेट्रोल वाया घालविणे पण पत्ता न विचारणे.
कदाचित आपल्या गावी नसावे, परंतु या क्षेत्रात आम्ही किंचित प्रगती केली आहे. आजकाल आम्ही जीपीएसला पत्ता विचारतो (आणि जीपीएसने दिलेल्या चुकीच्या सूचना पाळून रस्ता चुकतो).
(१०) आपल्या आईच्या हातचं खाणं साक्षात अन्नपूर्णा आली तरी बनवू शकणार नाही असा अंधविश्वास बाळगणे.
या मुद्द्याबद्दल काहीसा साशंक आहे. "You cook just like my mother. She was a lousy cook, too." असे आपल्या पत्नीस सुनावणार्‍या महाभागांबद्दलचा विनोद ऐकून आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Fri, 12/24/2010 - 21:37

Permalink

ये शुची काकु तु अग तक्रारीसाठी हा धागा काढला आहेस कि

नवर्‍याचे कौतुक करण्यासाठी ते आधी सांग.मला तर कौतुकपर धागा वाटत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Fri, 12/24/2010 - 21:40

Permalink

नवरा नसलो झालो म्हणुन काय झालं ? वा रे वा !!

१) टूथपेस्ट मधूनच दाबून ठेवणे. ज्यायोगे पुनर्वापरास ती निरुपयोगी होऊन बसते.
पुणर्वापरास निरुपयोगी कशी होते ? तुम्ही नक्की टुथपेस्ट वापरता की क्विकसिमेंट ? आमची टुथपेस्ट संपेपर्यंत कुठुनही आणि कशीही दाबा , वापरता येते.
(२) टॉयलेट सीट वरचे वरच ठेवणे. या भयंकर अ‍ॅनॉयींग सवयीबद्दल जितकं बोलाल तितकं कमीच आहे. पण आवरतं घेते.
जाणे बंद करा . बंद होत नसेल तर दुसरा बांधा. अनॉयिंग होण्या पेक्षा बरं ;)
(३) घुमेपणा - अभिव्यक्तीची किमान गरज असणे.
मुद्दा व्यक्तिसापेक्ष आहे. वैज्ञानिक दृष्ट्या बायका जास्त घुम्या असतात असा वैज्ञानिकांचा दावा आहे. ( सौजन्य : दैनिक संध्यानंद)
(४) ऊठ्सूठ युद्ध चित्रपट पाहणे आणि घरातल्यांचे डोके त्यातील कर्णकर्कश्श आवाजाने उठविणे.
त्यात थ्रिल असतंय .. उगा गुळचाट प्रेमकहाण्या पाहुन बायका "मेरे लिये चाँद सितारे लाके दो " म्हणतात त्या पेक्षा बरंय ते :)
(५) "मेल बाँडींग" या गोंडस नावाखाली देवाला सोडलेल्या वळूगत उनाडगिरी करणे.
टु विमेन कॅन नेव्हर बी गुड फ्रेंड्स .. तेंव्हा कोल्ह्याला द्राक्षं आंबटंच ... =))
(६) मॉलमध्ये पाय टाकल्याच्या ५ मिनीटाच्या आत हवी असलेली वस्तू घेऊन बाहेर पडणे आणि एवढा तीर मारून काय करणे तर घरी येऊन ढाराढूर झोपणे.
ह्याला वेळेचा अपव्यय टाळने असं म्हणतात. एका २० रुपायच्या वस्तुसाठी २०० रुपयांचं रक्त आटवुन २ रुपये वाचवणे ह्यात लै मोठी हुशारी नसते.
(७) एखादा सामान्य पदार्थ बकवास बनवून, दुप्पट सांडलवण करून, आरडाओरड करून घर डोक्यावर घेऊन, शेवटी बायकोकरता तिप्पट काम वाढवून ठेवणे.
घरात कामं काय असतात बाकी ? तेवढंही नको करायला ? तासंतास मिपाला चिटकुन बसायला सांगा यांना ... तिथे एका बुडावर तयार ...
(८) रस्ता चुकल्यास पृथ्वी प्रदक्षिणा घालून पेट्रोल वाया घालविणे पण पत्ता न विचारणे.
१% चान्स असतो ह्याचा. बर्‍याचदा लॉजिक ने पत्ता घावतो बरोबर माणसाला ;) पृथ्विप्रदक्षिणेसाठी किमान ५०० वेळा टँक फुल करावा लागेल .
(९) क्रिकेट्/फूट्बॉल आदिची मॅच असल्यास जगबुडी का होइना पण आंघोळ/दाढी वगैरे न करता टी व्ही ला चिकटून बसणे आणि फर्मान (ऑर्डरी) सोडणे.
दाढी / अंघोळ नंतर केल्याने काही फरक पडत नसतो. गेलेले म्याच चे क्षण परत येत नसतात.
(१०) आपल्या आईच्या हातचं खाणं साक्षात अन्नपूर्णा आली तरी बनवू शकणार नाही असा अंधविश्वास बाळगणे.
ह्हा ह्हा ... अंधविश्वासाच्या गोष्टी .. लुक व्हु इज टॉकिंग .. निम्म्या वेळा बायका स्वयंपाकाचा कंटाळा करणार , "चल ना र जाणु हॉटिलात, मल्ला ना आज गडे कंटाळा आलाय " असे डायलॉग ऐकल्यावर एक डायलॉग येणारंच ना ? ;) बाकी सवडीने.
  • Log in or register to post comments

Submitted by निवेदिता-ताई on Sat, 12/25/2010 - 14:43

In reply to नवरा नसलो झालो म्हणुन काय झालं ? वा रे वा !! by टारझन

Permalink

हा हा हा ...................

हा हा हा ...................
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Wed, 02/02/2011 - 18:07

In reply to नवरा नसलो झालो म्हणुन काय झालं ? वा रे वा !! by टारझन

Permalink

>>पुणर्वापरास निरुपयोगी कशी

>>पुणर्वापरास निरुपयोगी कशी होते ? तुम्ही नक्की टुथपेस्ट वापरता की क्विकसिमेंट ? आमची टुथपेस्ट संपेपर्यंत कुठुनही आणि कशीही दाबा , वापरता येते.>> टारुभाऊ शप्पथ सांगू का... माईच्यान लई हसलो ब्वा आपण... टुथपेस्ट चा प्वाइंट जबरा वाटला
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Fri, 12/24/2010 - 21:50

Permalink

हाहाहा! एक्दम सहमत! आणखी एक

हाहाहा! एक्दम सहमत! आणखी एक म्हणजे.. जवळ सुट्टे पैसे नसतील तर कोणत्याही दुकानात जाऊन सुट्टे न करून घेता.. काम न करता तसेच परत येणे. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by पंगा on Fri, 12/24/2010 - 22:26

In reply to हाहाहा! एक्दम सहमत! आणखी एक by प्राजु

Permalink

बराचसा असहमत

क्रेडिटकार्डांच्या जमान्यात हल्ली असा प्रसंग सहसा येत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by निवेदिता-ताई on Sat, 12/25/2010 - 14:46

In reply to हाहाहा! एक्दम सहमत! आणखी एक by प्राजु

Permalink

हाहाहा! एक्दम सहमत! आणखी एक

एखादी वस्तू तिन तिनदा आठवण करुन सुद्धा विसरणे....आणी आले की अरर्र म्हणणे...
  • Log in or register to post comments

Submitted by पिंगू on Fri, 12/24/2010 - 22:06

Permalink

च्यामारी धागा हाय का उट्टे

च्यामारी धागा हाय का उट्टे काढताय एकमेकांचे.... - तटस्थ (सध्यातरी एकटा असलेला) पिंगू
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 12/24/2010 - 22:17

Permalink

शुची तै अजून काही भर मी

शुची तै अजून काही भर मी घालतो. ११) एखादा पदार्थ चांगला झाला आहे असे अज्जीबात न म्हणणे. पण पातेलेभर एकट्यानेच हादडून वर" एवढाच केला होतास" असे म्हणणे १२) ज्या दिवशी रात्री बायकोला नवर्‍याअशी काही बोलायचे असते त्या दिवशी तुम्ही तिचे आवरून व्ह्यायच्या अगोदरच ढाराढूर झोपून जातात १३) ज्या दिवशी बायकोला थकव्यामुळे लवकर झोपायचे असते त्या दिवशी हमखास याना मोठ्या लाइट्मध्ये काहितरी वाचायचे असते. १४) कधी चुकून चहा केला तर एकट्यासाठीच करतात. आणि बायकोला "चहा मस्त झाला होता" असे सांगतात. १५) माहेरच्या कोणाकडे मुलाना पाठवायचे आहे आसे सांगितले तर " कपाळावर सत्तर आठ्या" पडतात. पण याच्या बहीणीकडे जायचे असेल तर लग्गेच तयार रहायचं
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Fri, 12/24/2010 - 22:20

In reply to शुची तै अजून काही भर मी by विजुभाऊ

Permalink

हा हा

धन्यवाद :) खिलाडूवृत्तीने घेतल्याबद्दल आणि इतक्या मस्त प्रतिसादाबद्दल.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Fri, 12/24/2010 - 23:05

In reply to हा हा by शुचि

Permalink

+१

धन्यवाद खिलाडूवृत्तीने घेतल्याबद्दल आणि इतक्या मस्त प्रतिसादाबद्दल असेच म्हन्तो - गोचि
  • Log in or register to post comments

Submitted by प्रीत-मोहर on Fri, 12/24/2010 - 23:14

In reply to +१ by स्पा

Permalink

सहमत - का

सहमत - का
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 12/24/2010 - 22:35

Permalink

शुचि वा!

याला म्हणतात, "ईंट का जवाब पत्थर से!"
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Sat, 12/25/2010 - 04:06

In reply to शुचि वा! by पैसा

Permalink

(विषय दिलेला नाही)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Fri, 12/24/2010 - 22:40

Permalink

समोरची वस्तू अजिबात म्हणजे

समोरची वस्तू अजिबात म्हणजे अजिबात दिसत नाही. त्यासाठी १७६० हाका मारणार आणि समोरून ती वस्तू काढून दिली की.. "कुठे आता ठेवून दिली होतीस.. कशी सापडणार मला?" असंही म्हणतात.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 12/24/2010 - 23:11

In reply to समोरची वस्तू अजिबात म्हणजे by प्राजु

Permalink

प्राजु...आठवून आठवून सांगतेय.

प्राजु...आठवून आठवून सांगतेय.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Sat, 12/25/2010 - 04:05

In reply to समोरची वस्तू अजिबात म्हणजे by प्राजु

Permalink

हाहा ..... माझी आई तर नेहमी

हाहा :) ..... माझी आई तर नेहमी म्हणायची बाबानी जिथे शोधलीये वस्तू तिथेच शोध. नक्की सापडेल. आणि तसच व्हायचं.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रीत-मोहर on Fri, 12/24/2010 - 22:47

Permalink

विसरभोळेपणा..कोणतीही गोश्ट

विसरभोळेपणा..कोणतीही गोश्ट कुठे ठेवल्ये हे कद्धिच लक्शात राहत नाय या नवरा नावाच्या प्राण्याच्या :)
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Sat, 12/25/2010 - 10:05

In reply to विसरभोळेपणा..कोणतीही गोश्ट by प्रीत-मोहर

Permalink

विसरभोळेपणा..कोणतीही गोश्ट

विसरभोळेपणा..कोणतीही गोश्ट कुठे ठेवल्ये हे कद्धिच लक्शात राहत नाय या नवरा नावाच्या प्राण्याच्या विसराळुपणाचा कळस माझा एक मित्र आमच्या कडे त्याच्या बायकोसहीत आला. त्या नन्तर त्याला बाहेर कोणीतरी भेटला .मित्र त्याच्या बायकोला आमच्याइथेच विसरून त्याच्याबरोबर स्वतःच्या घरी गेला
  • Log in or register to post comments

Submitted by Pain on Fri, 12/24/2010 - 22:58

Permalink

टूथपेस्ट मधूनच दाबून ठेवणे.

टूथपेस्ट मधूनच दाबून ठेवणे. ज्यायोगे पुनर्वापरास ती निरुपयोगी होऊन बसते. पुनर्वापर? म्हणजे काय ? कसा ? तुम्ही संपलेली टूथपेस्ट रिफील वगैरे करता का काय ?
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Sat, 12/25/2010 - 01:08

In reply to टूथपेस्ट मधूनच दाबून ठेवणे. by Pain

Permalink

लवचिक नसलेल्या टूथ्पेस्ट्स जर

लवचिक नसलेल्या टूथ्पेस्ट्स जर मधेच दाबल्या तर खालची (म्हणजे मागची) पेस्ट मागून कापून काढावी लागते :) ..... खरच होतं असं. पुढ्च्या तोंडातून पुढची पेस्ट निघते हो. पण मागची वाया जाते.
  • Log in or register to post comments

Submitted by नरेशकुमार on Sat, 12/25/2010 - 05:05

In reply to लवचिक नसलेल्या टूथ्पेस्ट्स जर by शुचि

Permalink

खालची (म्हणजे मागची) पेस्ट

खालची (म्हणजे मागची) पेस्ट मागून कापून काढावी लागते तर मग वाया कशी जाते ?
  • Log in or register to post comments

Submitted by Pain on Tue, 12/28/2010 - 07:12

In reply to लवचिक नसलेल्या टूथ्पेस्ट्स जर by शुचि

Permalink

मला ही एवढी एकच प्रकारची

मला ही एवढी एकच प्रकारची टूथपेस्ट माहित आहे (पॅकिंगवाईज). त्यामुळे तुम्ही काय म्हणालात ते कळले नाही. Image removed. http://www.google.com/imgres?imgurl=http://grandviewdentalcare.com/blog/wp-content/uploads/2010/07/toothpaste.jpg&imgrefurl=http://grandviewdentalcare.com/blog/2010/07/01/unique-uses-for-toothpaste/&usg=__tjetVsygb90TzC10zK_hp7IdntA=&h=200&w=200&sz=15&hl=en&start=0&zoom=1&tbnid=RNugPmeY_wN9fM:&tbnh=154&tbnw=149&prev=/images%3Fq%3Dtoothpaste%26um%3D1%26hl%3Den%26sa%3DN%26biw%3D1557%26bih%3D933%26tbs%3Disch:10,400&um=1&itbs=1&iact=hc&vpx=954&vpy=352&dur=1205&hovh=160&hovw=160&tx=98&ty=89&ei=7D4ZTaP5KcO88gad08HfBw&oei=7D4ZTaP5KcO88gad08HfBw&esq=1&page=1&ndsp=28&ved=1t:429,r:25,s:0&biw=1557&bih=933
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Fri, 12/24/2010 - 23:39

Permalink

हा हा हा !!

शुचे !! आय वाज एक्पेक्टिंग ईट !! ' मज्जिम निकाय ' लवकरच !!
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Sat, 12/25/2010 - 01:10

In reply to हा हा हा !! by सुहास..

Permalink

'मज्जिम निकाय"??????

'मज्जिम निकाय"??????
  • Log in or register to post comments
Profile picture for user डावखुरा

Submitted by डावखुरा on Fri, 12/24/2010 - 23:51

Permalink

मनोरंजनात्मक धागा(सध्या तरी

मनोरंजनात्मक धागा(सध्या तरी काही अनुभव नाही बॉ ;) )
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Sat, 12/25/2010 - 00:38

Permalink

आणि ओले टॉवेल्स बेडवर टाकून

आणि ओले टॉवेल्स बेडवर टाकून निघून जाणे. हापिसच्या कामातून कधीच सवड नसणे वगैरे.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Sat, 12/25/2010 - 01:10

In reply to आणि ओले टॉवेल्स बेडवर टाकून by रेवती

Permalink

खी: खी: ओल्या टॉवेल्स चा

खी: खी: ओल्या टॉवेल्स चा किस्सा भारी :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Sat, 12/25/2010 - 00:45

Permalink

असूदेत हो...

५-१० अती कीर्कोळ गोष्टी वगळता बाकी एकूणच नवरा फारसा त्रासदायक नसतो... यातच सर्व कही ते आले.
  • Log in or register to post comments

Submitted by क्लिंटन on Sat, 12/25/2010 - 01:18

Permalink

+१/-१

मॉलमध्ये पाय टाकल्याच्या ५ मिनीटाच्या आत हवी असलेली वस्तू घेऊन बाहेर पडणे आणि एवढा तीर मारून काय करणे तर घरी येऊन ढाराढूर झोपणे.
अगदी बरोबर.मी अमेरिकेत असताना सिंगलच होतो आणि मी वॉलमार्टमध्ये दूध,कॉर्नफ्लेक्स,भाज्या अशा गोष्टी मिळतात त्याच सेक्शनमध्ये जाऊन भराभरा वस्तू कार्टमध्ये टाकून पुढे होत असे.बहुतेक वेळेला २० पेक्षा कमी वस्तूवाल्या फास्ट लेनमध्ये माझे चेक-आऊटचे काम होत असे.आणि समजा काही कारणांनी नॉर्मल लेनमध्ये जावे लागले तर चेकआऊटच्या रांगेत माझा खरेदीपेक्षा जास्त वेळ जाई म्हणून +१.पण शुचिताईंनी म्हटलेला दुसरा भाग -- ढाराढूर झोपणे हे मात्र माझ्यासारख्यांना लागू होत नाही.माझे परत आल्यानंतर करायचे उद्योग वेगळेच म्हणून -१. आमची हिलरी म्हणजे वॉलमार्ट आणि मॉलमध्ये सबंध दिवसपण काढेल.लग्न झाल्यानंतर भारतातच आहे त्यामुळे हा प्रश्न आलेला नाही. पुढचे पुढे बघून घेऊ. अवांतर: घोरणे ही वाईट सवय यादीमध्ये लिहायला विसरलात का शुचिताई?
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Sat, 12/25/2010 - 02:03

Permalink

हा धाग्यावरील जहाल

हा धाग्यावरील जहाल प्रतिक्रिया युवा पिढीचा ओढा फायर संस्कृतीकडे न वळो म्हणजे झाले . @मॉलमध्ये पाय टाकल्याच्या ५ मिनीटाच्या आत हवी असलेली वस्तू घेऊन बाहेर पडणे आणि एवढा तीर मारून काय करणे तर घरी येऊन ढाराढूर झोपणे. बाकी मॉल मध्ये बायको खरेदी करत असेल व मी खूपच कंटाळलो तर सरळ चक्षु मोदन सुरु करतो (अत्यंत निरुपद्रवी प्रकार जो बहुतांशी विवाहित अगर अविवाहित पुरुष तन्मयतेने करतो .)तात्पर्य सार्वजिक ठिकाणी हिंडायला माझी काहीच हरकत नाही . @घुमेपणा - अभिव्यक्तीची किमान गरज असणे. (हा मुद्दा माझ्या बायकोसाठी लागू ) मी लेख /प्रतिक्रिया एवढ्या लांबलचक देतो तर प्रत्यक्ष मुखातून ..... @ क्रिकेट्/फूट्बॉल आदिची मॅच असल्यास जगबुडी का होइना पण आंघोळ/दाढी वगैरे न करता टी व्ही ला चिकटून बसणे आणि फर्मान (ऑर्डरी) सोडणे सचिन खेळत नसेल तर क्रीडा सामने मी फारसे पाहत नाही (पूर्वी पंचतारांकित हॉटेलात मुंबईत काम केल्याने ह्या सामन्याचे भाग्य क्रीडांगण नाही तर वातानुकुलीन खोल्यातून ठरते .हे पहिले आहे .सचिन आउट झाल्यावर मग हे निर्धास्तपणे आपल्या धंद्याला लागतात .) @७) एखादा सामान्य पदार्थ बकवास बनवून, दुप्पट सांडलवण करून, आरडाओरड करून घर डोक्यावर घेऊन, शेवटी बायकोकरता तिप्पट काम वाढवून ठेवणे. जेवण तिने बनवले. तर मला भांडी घासावी लागतात .( च्यायला युरोपात स्त्री पुरुष समानता कुणी काढली राव .आता त्याचा फटका मुस्लीम जगत सोडून उर्वरित सर्व जगाला बसतोय ) @४) ऊठ्सूठ युद्ध चित्रपट पाहणे आणि घरातल्यांचे डोके त्यातील कर्णकर्कश्श आवाजाने उठविणे. सिनेमे (बहुदा हॉरर /आणि किलबिल सारखे लाल रंगाची रंगपंचमी असलेले सिनेमे आवडीने एकत्र पाहतो .) बाकी एरवी जेव्हा ती जर्मन डेली सोप (ज्यात आपल्यासारखीच मारुतीच्या शेपटासारखी वाढत जाणारी कथा असते ) तेव्हा मी मीप वर असतो .(अधीन मधून बायकोचे बाजूला लाडिक आवाजात आता त्या सोप मध्ये काय चाललाय ते सांगणे चालू असते .आता कळल माझ्या लेखनात शुध्द लेखनाची वानवा का असते .) @आपल्या आईच्या हातचं खाणं साक्षात अन्नपूर्णा आली तरी बनवू शकणार नाही असा अंधविश्वास बाळगणे. माझ्या आईसमोर तुझ्या सासू सारखे जेवण तुला जमत नाही . तर बायकोसमोर माझ्या सासुसारखे जेवण तुला जमत नाही . दोन्ही गोष्टी खर्या आहेत पण तरीही ह्या दोन्हींना त्यावर उघडपणे आपला विरोध माझ्यापुढे प्रदर्शित करता येत नाही .कारण मी लगेच ....... @टूथपेस्ट मधूनच दाबून ठेवणे. ज्यायोगे पुनर्वापरास ती निरुपयोगी होऊन बसते. वेगवेगळे ब्रश असतात ,तर मग पेस्ट का नको .माझ्यासाठी वेगळी पेस्ट आहे .(कर काय करायचे आहे ते ) @टॉयलेट सीट वरचे वरच ठेवणे. या भयंकर अ‍ॅनॉयींग सवयीबद्दल जितकं बोलाल तितकं कमीच आहे. ह्या कारनाम्यासाठी इंग्रजांनी माझ्या मित्राला होस्टेल वरील आमच्या मजल्यावरील सर्व टोयलेत साफ करून घेतली त्यामुळे जातीने प्रसाधन गृह नीटनेटके ठेवण्याकडे माझा कटाक्ष त्यावेळेपासून सुरु झाला .(काय तो साहेब काय त्याची शिस्त ... ) पण आवरतं घेते. तर थोडक्यात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती
  • Log in or register to post comments

Submitted by योगी९०० on Sat, 12/25/2010 - 03:51

Permalink

हा हा हा मस्त

शुचि...माझ्या बायकोने ह्यातल्या बर्‍याचशा मुद्दांवर तुला सहमती दिली आहे. तिचे मिपा खाते नसल्याने मलाच येथे टंकावे लागत आहे. आणखी भर.. १)उगाच रात्री जागरण करून लेट नाईट मुव्हीच पहाणे. २)बाहेर जरी खुप इज्जत असली तरी घरात बावळट रहाणे. ३)जेव्हा मुलांना समज द्यायचे गरज असते त्यावेळी त्यांच्यावरील प्रेम उतू जात असल्यासारखे भासवून त्यांचे लाड करणे. ४) एकदा बघीतलेला युद्धपट/मॅचच्या हायलाइट्स परत परत पहाणे. यातल्या एका गोष्टिबद्दल मी पुर्णपणे असहमत.. रस्ता चुकल्यास पृथ्वी प्रदक्षिणा घालून पेट्रोल वाया घालविणे पण पत्ता न विचारणे. GPSच्या जमान्यात हे होत नाही. अनोळख्या ठिकाणी जायचे असेल तर नवर्‍यांइतके चांगले planning (बस टायमिंग, मॅप पहाणे) कोणीच करत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Sat, 12/25/2010 - 04:03

In reply to हा हा हा मस्त by योगी९००

Permalink

सही! धन्यवाद.

सही! धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Sat, 12/25/2010 - 04:51

Permalink

अजून काही...

१. इंजिनीअरिंगची डिग्री असली की आपल्याला मेकॅनिक, प्लंबर, इलेक्ट्रिशियन वगैरे सर्वांच्या वरताण अक्कल आहे असं समजून घरातली क्षुल्लक डागडुजी स्वतःच करायला जाणे. मग बोऱ्या वाजून मुळचं क्षुल्लक प्रकरण हा प्रचंड मोठा घोळ होतो. तो निस्तरण्यासाठी मेकॅनिक, प्लंबर, इलेक्ट्रिशियन वगैरेना बोलावण्याचं काम बायकोच्याच गळ्यात पडतं. कारण नवरा म्हणत राहातो, 'अगं मी घोळ केलेलना नाहीये. मला फक्त हे तीन पार्ट्स आणायचे आहेत हार्डवेअर स्टोअरमधून. थांब एवढी मॅच संपू दे' ती टेस्ट मॅच संपायला पाच दिवस लागतात. तोपर्यंत बाथरूममध्ये साचणाऱ्या पाण्याचं काय करायचं? २. दरवेळी नवीन खूळ डोक्यात शिरतं. एक प्रोजेक्ट धड पूर्ण करायचा नाही, मग तो अर्धवट सोडून दुसऱ्या प्रोजेक्टचा पसारा मांडायचा. ३. डॉक्टर वगैरे मंडळींना फारशी काही अक्कल नाही असं जाहीर करून स्वतःच शरीरावर काहीतरी प्रयोग करत बसणे. डॉक्टरांनी गोळ्या दिल्या तर त्या फेकून देऊन मुद्दामच 'रोज चार फेऱ्या मारल्या ग्राउंडला आणि अमुकतमुक काढा प्यायला की हिमोग्लोबिन/ब्लड शुगर /कोलेस्टरॉल /इ. इ कसं व्यवस्थित कंट्रोलमध्ये राहातं' वगैरे ठामपणे म्हणणे. ४. 'मी फार वेळा स्वयपाक करत नाही, पण जेव्हा करतो तेव्हा बायकोपेक्षा छान करतो' अशी प्रौढी बाळगणे. जळ्ळ्या मेल्या दोन डिशेस तर येतात धड. त्या करतानासुद्धा तयारी, आव आणि पसाराच जास्त. मग कोणी आलेलं असताना मुद्दामून 'मी केलंय बरं का हे अमुकतमुक चिकन. त्यात दालचिनी अशी बरोब्बर भरड कुटून घालायची, नाहीतर बरोबर वास लागत नाही.' वगैरे सांगून भाव खाणे व बिचाऱ्या भुकेजलेल्या पाहुण्यांकडून प्रशंसा उपटणे. ते वाईट थोडंच म्हणणार आहेत कशाला? ५. गरज नसताना दहापट महागाची साउंड सिस्टिम घेऊन ती ढाणढाण वाजवणे. कुठल्यातरी गाण्यात 'अमुक जागी तो व्हूश्श्श आवाज कसला जबरी ऐकू येतो' हे रिवाइंड करकरून, वेगवेगळी सेटिंग्ज लावून ऐकवून दाखवणे. बायकांना त्यात ढिम्म फरक जाणवत नाही, पण यांच्या चेहेऱ्यावर मात्र कोहिनूर दाखवल्याचा आनंद असतो. ६. गाडीची, मोटरसायकलची अतिरेकी काळजी घेणे. इंजिनाच्या आवाजात षड्जाचा कोमल रिषभ झाला तरी लगेच यांना ऐकू येतो. टायर प्रेशर चार टक्क्यांनी कमी झालं की यांची घालमेल होते. बायकोकडे त्याच्या निम्मं लक्ष द्यायला काय होतंय?
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Sat, 12/25/2010 - 05:27

In reply to अजून काही... by राजेश घासकडवी

Permalink

आई शप्पत मस्तच हा हाहा (५)

आई शप्पत मस्तच :) हा हाहा (५) आणि (६) खरच खरच अगदी TRUE!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by अरुण मनोहर on Sat, 12/25/2010 - 05:47

Permalink

चुरचुरीत लेखन! असे राई येवढे

चुरचुरीत लेखन! असे राई येवढे बारके मुद्दे घालून केलेली फोडणी खमंग आहे! (असेच बारके मुद्ये सांगून ह्या बायका खूष होतात हे बरे आहे. पुरषांच्या दगड धोंड्यांकडे त्यांचे लक्ष जात नाही!)
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Sat, 12/25/2010 - 06:45

Permalink

१.स्वतःचे सॉक्स धुण्यासाठी

१.स्वतःचे सॉक्स धुण्यासाठी लाँड्री बास्केट मध्ये न टाकणे. आणि जो पर्यंत बायको ते बास्केटमध्ये टाकत नाही तो पर्यंत तेच सॉक्स वापरत रहाणे.. २. बायको गाडी चालवत असताना, ती कितीही चांगली ड्रायव्हर असली तरी आपण तिचे ट्रेनर आहोत याच आविर्भावत शेजारी बसणे. आणि ड्रायव्हिंग करताना बायको कडून अगदी सिली मिस्टेक झाली तरी ती पुढे जेव्हा जेव्हा बायको ड्रायव्हिंग करते तेव्हा तेव्हा ऐकवत रहाणे.. ३. ग्रोसरी साठी पाठवले की ५ वस्तूंपैकी २ च आणणे , १ मिळाली नाही असे सांगणे आणि २ विसरणे. त्यातून कढीपत्ता चे पॅकेट्स सांगितले असले तर ७९ सेंटला १ पॅक आणि १ डॉलर ला दोन असे असताना आणि आपण नेहमी २ पॅक घेतो हे माहिती असताना.. १ च आणणे. ४. लॅपटॉप मध्ये डोकं खुसपून बसला की, बाकी घराला आग का लागेना अजिबात डोकं वर न काढणे. ५. सकाळी ऐन धावपळीच्या वेळी बाथरूमध्ये गाणी गात गात सगळी कामे उरकणे. ६. आणि जेवायला किमान १० हाका मारल्याशिवाय मान सुद्धा वर न करणे आणि मग १२ व्या रागाने मारलेल्या हाकेला उठून टेबल वर येणे..
  • Log in or register to post comments

Submitted by गोगोल on Sat, 12/25/2010 - 07:08

In reply to १.स्वतःचे सॉक्स धुण्यासाठी by प्राजु

Permalink

दहाव्या हाकेला मान वरती

आणी बाराव्या हाकेला टेबल वर येणे .. अकराव्या हाकेचं काय?
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Sat, 12/25/2010 - 07:12

In reply to दहाव्या हाकेला मान वरती by गोगोल

Permalink

ती हाक राग चढत जाण्यासाठी

ती हाक राग चढत जाण्यासाठी असते. मग १२ व्या हाकेला राग चढतो.. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Sat, 12/25/2010 - 09:42

In reply to ती हाक राग चढत जाण्यासाठी by प्राजु

Permalink

+१

अगदी मनातले. याच सवयीनी, माझा स्वतःबद्दलचा 'मी अजिबातच रागीट नाही' हा गैरसमज मोडून काढला, अजून काही, दर आठवड्याला १ तरी पेन हरवणे, आठवड्यातून २ वेळा टोपण! लॅप्टॉपच्या भोवती हजारो वायरीचा गुंता करुन ठेवणे. महागडे पर्फ्यूम रोज बुटांमध्ये मारून संपवणे. स्वैपाकघरातल्या वस्तूंबद्दल्चा उल्लेख, 'तुझी सुरी, तुझी विळी, तुझा ट्रे,......' असा करणे. पूर्वी मुलांबद्दल देखिल असे उल्लेख व्हायचे! अवेळी-अपरात्री चहा/कॉफी मागणे. वयस्कर नवर्‍यांच्या सवयी, सून्/नातसून यांच्या प्रत्येक गोष्टीची ( या गोष्टी शक्यतो कुपथ्यकारक पदार्थ्/महागड्या वस्तू असतात) फुकाची तारिफ करणे. 'आता वाकवत नाही' या कारणास्तव, स्वतःच्या चपला देखिल उचलत नाहीत, पण आंब्याच्या अढीतले चांगले आंबे वाकून वाकून निवडतात.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Sat, 12/25/2010 - 10:14

In reply to +१ by कवितानागेश

Permalink

'आता वाकवत नाही' या

'आता वाकवत नाही' या कारणास्तव, स्वतःच्या चपला देखिल उचलत नाहीत, पण आंब्याच्या अढीतले चांगले आंबे वाकून वाकून निवडतात. सहमत अगदी सहमत. माझ्या वडीलाना हे बरोब्बर लागु पडते.
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Sat, 12/25/2010 - 11:47

In reply to 'आता वाकवत नाही' या by विजुभाऊ

Permalink

विजुभाऊ, तुमच्या सवयी तुमच्या

विजुभाऊ, तुमच्या सवयी तुमच्या वडिलांच्या नांवावर ढकलू नका! पाप आहे ते!!! :)
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Sat, 12/25/2010 - 23:28

In reply to विजुभाऊ, तुमच्या सवयी तुमच्या by पिवळा डांबिस

Permalink

(विषय दिलेला नाही)

Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Sat, 12/25/2010 - 07:20

In reply to १.स्वतःचे सॉक्स धुण्यासाठी by प्राजु

Permalink

मस्त

मस्त :)
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: चिनू१९८५
    नोंदणी: Wed, 03/25/2026 - 09:02
  • सदस्य: साधक भूषण
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 19:02
  • सदस्य: दीपक चकवे
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 11:07
  • सदस्य: भूषण तळवेलकर
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 23:18
  • सदस्य: Jayashree15
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 18:55

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • पान 8
  • पान 9
  • …
  • Next page पुढे ›
  • Last page शेवटी »

© 2026 Misalpav.com