वा रे वा आम्हा बायकांच्याच त्रासदायक सवयी नसतात काही. नवर्याच्या देखील काही सवयी त्रासदायक असतात. त्यापैकी टॉप १० (मुख्य १०).
(१) टूथपेस्ट मधूनच दाबून ठेवणे. ज्यायोगे पुनर्वापरास ती निरुपयोगी होऊन बसते.
(२) टॉयलेट सीट वरचे वरच ठेवणे. या भयंकर अॅनॉयींग सवयीबद्दल जितकं बोलाल तितकं कमीच आहे. पण आवरतं घेते. :P
(३) घुमेपणा - अभिव्यक्तीची किमान गरज असणे.
(४) ऊठ्सूठ युद्ध चित्रपट पाहणे आणि घरातल्यांचे डोके त्यातील कर्णकर्कश्श आवाजाने उठविणे.
(५) "मेल बाँडींग" या गोंडस नावाखाली देवाला सोडलेल्या वळूगत उनाडगिरी करणे.
(६) मॉलमध्ये पाय टाकल्याच्या ५ मिनीटाच्या आत हवी असलेली वस्तू घेऊन बाहेर पडणे आणि एवढा तीर मारून काय करणे तर घरी येऊन ढाराढूर झोपणे.
(७) एखादा सामान्य पदार्थ बकवास बनवून, दुप्पट सांडलवण करून, आरडाओरड करून घर डोक्यावर घेऊन, शेवटी बायकोकरता तिप्पट काम वाढवून ठेवणे.
(८) रस्ता चुकल्यास पृथ्वी प्रदक्षिणा घालून पेट्रोल वाया घालविणे पण पत्ता न विचारणे.
(९) क्रिकेट्/फूट्बॉल आदिची मॅच असल्यास जगबुडी का होइना पण आंघोळ/दाढी वगैरे न करता टी व्ही ला चिकटून बसणे आणि फर्मान (ऑर्डरी) सोडणे.
(१०) आपल्या आईच्या हातचं खाणं साक्षात अन्नपूर्णा आली तरी बनवू शकणार नाही असा अंधविश्वास बाळगणे.
या यादीमध्ये सर्व सदस्यांनी आपल्या परीने भर घालावी ही विनंती.
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
ग्रेट
ग्रेट
क्रमांक सात (७) ची सवय मला
क्रमांक सात (७) ची सवय मला देखील आहे! छान लेख, शुचिताई! :)
-
(पुरुष) इंट्या.
आँ?
In reply to क्रमांक सात (७) ची सवय मला by इंटरनेटस्नेही
लग्न न होताच?
असो! ह्या धाग्यावर आम्ही सोईस्कर मौन पाळलेले आहे.
आमचे प्रेरणास्थान श्री. अरुणकाका मनोहर आले की त्यांच्याशी सल्लामसलत करुन योग्य ते बोलू. :P
तै एक्दम सही
तै एक्दम सही ओब्सर्वेशण्स...
चि. सौ चुचु. ह्यांचा प्रतिसाद वाचण्यास उत्सुक :)
८ आणि १०बद्दल...
बाकीच्या मुद्द्यांबद्दल चालू द्या, पण क्र. ८ आणि १०बद्दल माझे दोन सेंट:
कदाचित आपल्या गावी नसावे, परंतु या क्षेत्रात आम्ही किंचित प्रगती केली आहे. आजकाल आम्ही जीपीएसला पत्ता विचारतो (आणि जीपीएसने दिलेल्या चुकीच्या सूचना पाळून रस्ता चुकतो).
या मुद्द्याबद्दल काहीसा साशंक आहे. "You cook just like my mother. She was a lousy cook, too." असे आपल्या पत्नीस सुनावणार्या महाभागांबद्दलचा विनोद ऐकून आहे.
ये शुची काकु तु अग तक्रारीसाठी हा धागा काढला आहेस कि
नवर्याचे कौतुक करण्यासाठी ते आधी सांग.मला तर कौतुकपर धागा वाटत आहे.
नवरा नसलो झालो म्हणुन काय झालं ? वा रे वा !!
पुणर्वापरास निरुपयोगी कशी होते ? तुम्ही नक्की टुथपेस्ट वापरता की क्विकसिमेंट ? आमची टुथपेस्ट संपेपर्यंत कुठुनही आणि कशीही दाबा , वापरता येते.
जाणे बंद करा . बंद होत नसेल तर दुसरा बांधा. अनॉयिंग होण्या पेक्षा बरं ;)
मुद्दा व्यक्तिसापेक्ष आहे. वैज्ञानिक दृष्ट्या बायका जास्त घुम्या असतात असा वैज्ञानिकांचा दावा आहे. ( सौजन्य : दैनिक संध्यानंद)
त्यात थ्रिल असतंय .. उगा गुळचाट प्रेमकहाण्या पाहुन बायका "मेरे लिये चाँद सितारे लाके दो " म्हणतात त्या पेक्षा बरंय ते :)
टु विमेन कॅन नेव्हर बी गुड फ्रेंड्स .. तेंव्हा कोल्ह्याला द्राक्षं आंबटंच ... =))
ह्याला वेळेचा अपव्यय टाळने असं म्हणतात. एका २० रुपायच्या वस्तुसाठी २०० रुपयांचं रक्त आटवुन २ रुपये वाचवणे ह्यात लै मोठी हुशारी नसते.
घरात कामं काय असतात बाकी ? तेवढंही नको करायला ? तासंतास मिपाला चिटकुन बसायला सांगा यांना ... तिथे एका बुडावर तयार ...
१% चान्स असतो ह्याचा. बर्याचदा लॉजिक ने पत्ता घावतो बरोबर माणसाला ;) पृथ्विप्रदक्षिणेसाठी किमान ५०० वेळा टँक फुल करावा लागेल .
दाढी / अंघोळ नंतर केल्याने काही फरक पडत नसतो. गेलेले म्याच चे क्षण परत येत नसतात.
ह्हा ह्हा ... अंधविश्वासाच्या गोष्टी .. लुक व्हु इज टॉकिंग .. निम्म्या वेळा बायका स्वयंपाकाचा कंटाळा करणार , "चल ना र जाणु हॉटिलात, मल्ला ना आज गडे कंटाळा आलाय " असे डायलॉग ऐकल्यावर एक डायलॉग येणारंच ना ? ;)
बाकी सवडीने.
हा हा हा ...................
In reply to नवरा नसलो झालो म्हणुन काय झालं ? वा रे वा !! by टारझन
हा हा हा ...................
>>पुणर्वापरास निरुपयोगी कशी
In reply to नवरा नसलो झालो म्हणुन काय झालं ? वा रे वा !! by टारझन
>>पुणर्वापरास निरुपयोगी कशी होते ? तुम्ही नक्की टुथपेस्ट वापरता की क्विकसिमेंट ? आमची टुथपेस्ट संपेपर्यंत कुठुनही आणि कशीही दाबा , वापरता येते.>>
टारुभाऊ शप्पथ सांगू का...
माईच्यान लई हसलो ब्वा आपण...
टुथपेस्ट चा प्वाइंट जबरा वाटला
हाहाहा! एक्दम सहमत! आणखी एक
हाहाहा! एक्दम सहमत!
आणखी एक म्हणजे..
जवळ सुट्टे पैसे नसतील तर कोणत्याही दुकानात जाऊन सुट्टे न करून घेता.. काम न करता तसेच परत येणे. ;)
बराचसा असहमत
In reply to हाहाहा! एक्दम सहमत! आणखी एक by प्राजु
क्रेडिटकार्डांच्या जमान्यात हल्ली असा प्रसंग सहसा येत नाही.
हाहाहा! एक्दम सहमत! आणखी एक
In reply to हाहाहा! एक्दम सहमत! आणखी एक by प्राजु
एखादी वस्तू तिन तिनदा आठवण करुन सुद्धा विसरणे....आणी आले की अरर्र म्हणणे...
च्यामारी धागा हाय का उट्टे
च्यामारी धागा हाय का उट्टे काढताय एकमेकांचे....
- तटस्थ (सध्यातरी एकटा असलेला) पिंगू
शुची तै अजून काही भर मी
शुची तै अजून काही भर मी घालतो.
११) एखादा पदार्थ चांगला झाला आहे असे अज्जीबात न म्हणणे. पण पातेलेभर एकट्यानेच हादडून वर" एवढाच केला होतास" असे म्हणणे
१२) ज्या दिवशी रात्री बायकोला नवर्याअशी काही बोलायचे असते त्या दिवशी तुम्ही तिचे आवरून व्ह्यायच्या अगोदरच ढाराढूर झोपून जातात
१३) ज्या दिवशी बायकोला थकव्यामुळे लवकर झोपायचे असते त्या दिवशी हमखास याना मोठ्या लाइट्मध्ये काहितरी वाचायचे असते.
१४) कधी चुकून चहा केला तर एकट्यासाठीच करतात. आणि बायकोला "चहा मस्त झाला होता" असे सांगतात.
१५) माहेरच्या कोणाकडे मुलाना पाठवायचे आहे आसे सांगितले तर " कपाळावर सत्तर आठ्या" पडतात. पण याच्या बहीणीकडे जायचे असेल तर लग्गेच तयार रहायचं
हा हा
In reply to शुची तै अजून काही भर मी by विजुभाऊ
धन्यवाद :) खिलाडूवृत्तीने घेतल्याबद्दल आणि इतक्या मस्त प्रतिसादाबद्दल.
+१
In reply to हा हा by शुचि
धन्यवाद खिलाडूवृत्तीने घेतल्याबद्दल आणि इतक्या मस्त प्रतिसादाबद्दल
असेच म्हन्तो
- गोचि
सहमत - का
In reply to +१ by स्पा
सहमत
- का
शुचि वा!
याला म्हणतात, "ईंट का जवाब पत्थर से!"
(विषय दिलेला नाही)
In reply to शुचि वा! by पैसा
:)
समोरची वस्तू अजिबात म्हणजे
समोरची वस्तू अजिबात म्हणजे अजिबात दिसत नाही. त्यासाठी १७६० हाका मारणार आणि समोरून ती वस्तू काढून दिली की.. "कुठे आता ठेवून दिली होतीस.. कशी सापडणार मला?" असंही म्हणतात.
प्राजु...आठवून आठवून सांगतेय.
In reply to समोरची वस्तू अजिबात म्हणजे by प्राजु
प्राजु...आठवून आठवून सांगतेय.
हाहा ..... माझी आई तर नेहमी
In reply to समोरची वस्तू अजिबात म्हणजे by प्राजु
हाहा :) ..... माझी आई तर नेहमी म्हणायची बाबानी जिथे शोधलीये वस्तू तिथेच शोध. नक्की सापडेल. आणि तसच व्हायचं.
विसरभोळेपणा..कोणतीही गोश्ट
विसरभोळेपणा..कोणतीही गोश्ट कुठे ठेवल्ये हे कद्धिच लक्शात राहत नाय या नवरा नावाच्या प्राण्याच्या :)
विसरभोळेपणा..कोणतीही गोश्ट
In reply to विसरभोळेपणा..कोणतीही गोश्ट by प्रीत-मोहर
विसरभोळेपणा..कोणतीही गोश्ट कुठे ठेवल्ये हे कद्धिच लक्शात राहत नाय या नवरा नावाच्या प्राण्याच्या
विसराळुपणाचा कळस
माझा एक मित्र आमच्या कडे त्याच्या बायकोसहीत आला. त्या नन्तर त्याला बाहेर कोणीतरी भेटला .मित्र त्याच्या बायकोला आमच्याइथेच विसरून त्याच्याबरोबर स्वतःच्या घरी गेला
टूथपेस्ट मधूनच दाबून ठेवणे.
टूथपेस्ट मधूनच दाबून ठेवणे. ज्यायोगे पुनर्वापरास ती निरुपयोगी होऊन बसते.
पुनर्वापर? म्हणजे काय ? कसा ? तुम्ही संपलेली टूथपेस्ट रिफील वगैरे करता का काय ?
लवचिक नसलेल्या टूथ्पेस्ट्स जर
In reply to टूथपेस्ट मधूनच दाबून ठेवणे. by Pain
लवचिक नसलेल्या टूथ्पेस्ट्स जर मधेच दाबल्या तर खालची (म्हणजे मागची) पेस्ट मागून कापून काढावी लागते :) ..... खरच होतं असं. पुढ्च्या तोंडातून पुढची पेस्ट निघते हो. पण मागची वाया जाते.
खालची (म्हणजे मागची) पेस्ट
In reply to लवचिक नसलेल्या टूथ्पेस्ट्स जर by शुचि
खालची (म्हणजे मागची) पेस्ट मागून कापून काढावी लागते तर मग वाया कशी जाते ?
मला ही एवढी एकच प्रकारची
In reply to लवचिक नसलेल्या टूथ्पेस्ट्स जर by शुचि
मला ही एवढी एकच प्रकारची टूथपेस्ट माहित आहे (पॅकिंगवाईज). त्यामुळे तुम्ही काय म्हणालात ते कळले नाही.
https://www.google.com/imgres?imgurl=https://grandviewdentalcare.com/bl…
हा हा हा !!
शुचे !! आय वाज एक्पेक्टिंग ईट !!
' मज्जिम निकाय ' लवकरच !!
'मज्जिम निकाय"??????
In reply to हा हा हा !! by सुहास..
'मज्जिम निकाय"??????
मनोरंजनात्मक धागा(सध्या तरी
मनोरंजनात्मक धागा(सध्या तरी काही अनुभव नाही बॉ ;) )
आणि ओले टॉवेल्स बेडवर टाकून
आणि ओले टॉवेल्स बेडवर टाकून निघून जाणे.
हापिसच्या कामातून कधीच सवड नसणे वगैरे.
खी: खी: ओल्या टॉवेल्स चा
In reply to आणि ओले टॉवेल्स बेडवर टाकून by रेवती
खी: खी:
ओल्या टॉवेल्स चा किस्सा भारी :)
असूदेत हो...
५-१० अती कीर्कोळ गोष्टी वगळता बाकी एकूणच नवरा फारसा त्रासदायक नसतो... यातच सर्व कही ते आले.
+१/-१
अगदी बरोबर.मी अमेरिकेत असताना सिंगलच होतो आणि मी वॉलमार्टमध्ये दूध,कॉर्नफ्लेक्स,भाज्या अशा गोष्टी मिळतात त्याच सेक्शनमध्ये जाऊन भराभरा वस्तू कार्टमध्ये टाकून पुढे होत असे.बहुतेक वेळेला २० पेक्षा कमी वस्तूवाल्या फास्ट लेनमध्ये माझे चेक-आऊटचे काम होत असे.आणि समजा काही कारणांनी नॉर्मल लेनमध्ये जावे लागले तर चेकआऊटच्या रांगेत माझा खरेदीपेक्षा जास्त वेळ जाई म्हणून +१.पण शुचिताईंनी म्हटलेला दुसरा भाग -- ढाराढूर झोपणे हे मात्र माझ्यासारख्यांना लागू होत नाही.माझे परत आल्यानंतर करायचे उद्योग वेगळेच म्हणून -१.
आमची हिलरी म्हणजे वॉलमार्ट आणि मॉलमध्ये सबंध दिवसपण काढेल.लग्न झाल्यानंतर भारतातच आहे त्यामुळे हा प्रश्न आलेला नाही. पुढचे पुढे बघून घेऊ.
अवांतर: घोरणे ही वाईट सवय यादीमध्ये लिहायला विसरलात का शुचिताई?
हा धाग्यावरील जहाल
हा धाग्यावरील जहाल प्रतिक्रिया युवा पिढीचा ओढा फायर संस्कृतीकडे न वळो म्हणजे झाले .
@मॉलमध्ये पाय टाकल्याच्या ५ मिनीटाच्या आत हवी असलेली वस्तू घेऊन बाहेर पडणे आणि एवढा तीर मारून काय करणे तर घरी येऊन ढाराढूर झोपणे.
बाकी मॉल मध्ये बायको खरेदी करत असेल व मी खूपच कंटाळलो तर सरळ चक्षु मोदन सुरु करतो (अत्यंत निरुपद्रवी प्रकार जो बहुतांशी विवाहित अगर अविवाहित पुरुष तन्मयतेने करतो .)तात्पर्य सार्वजिक ठिकाणी हिंडायला माझी काहीच हरकत नाही .
@घुमेपणा - अभिव्यक्तीची किमान गरज असणे. (हा मुद्दा माझ्या बायकोसाठी लागू )
मी लेख /प्रतिक्रिया एवढ्या लांबलचक देतो तर प्रत्यक्ष मुखातून .....
@ क्रिकेट्/फूट्बॉल आदिची मॅच असल्यास जगबुडी का होइना पण आंघोळ/दाढी वगैरे न करता टी व्ही ला चिकटून बसणे आणि फर्मान (ऑर्डरी) सोडणे
सचिन खेळत नसेल तर क्रीडा सामने मी फारसे पाहत नाही (पूर्वी पंचतारांकित हॉटेलात मुंबईत काम केल्याने ह्या सामन्याचे भाग्य क्रीडांगण नाही तर वातानुकुलीन खोल्यातून ठरते .हे पहिले आहे .सचिन आउट झाल्यावर मग हे निर्धास्तपणे आपल्या धंद्याला लागतात .)
@७) एखादा सामान्य पदार्थ बकवास बनवून, दुप्पट सांडलवण करून, आरडाओरड करून घर डोक्यावर घेऊन, शेवटी बायकोकरता तिप्पट काम वाढवून ठेवणे.
जेवण तिने बनवले. तर मला भांडी घासावी लागतात .( च्यायला युरोपात स्त्री पुरुष समानता कुणी काढली राव .आता त्याचा फटका मुस्लीम जगत सोडून उर्वरित सर्व जगाला बसतोय )
@४) ऊठ्सूठ युद्ध चित्रपट पाहणे आणि घरातल्यांचे डोके त्यातील कर्णकर्कश्श आवाजाने उठविणे.
सिनेमे (बहुदा हॉरर /आणि किलबिल सारखे लाल रंगाची रंगपंचमी असलेले सिनेमे आवडीने एकत्र पाहतो .) बाकी एरवी जेव्हा ती जर्मन डेली सोप (ज्यात आपल्यासारखीच मारुतीच्या शेपटासारखी वाढत जाणारी कथा असते )
तेव्हा मी मीप वर असतो .(अधीन मधून बायकोचे बाजूला लाडिक आवाजात आता त्या सोप मध्ये काय चाललाय ते सांगणे चालू असते .आता कळल माझ्या लेखनात शुध्द लेखनाची वानवा का असते .)
@आपल्या आईच्या हातचं खाणं साक्षात अन्नपूर्णा आली तरी बनवू शकणार नाही असा अंधविश्वास बाळगणे.
माझ्या आईसमोर तुझ्या सासू सारखे जेवण तुला जमत नाही .
तर बायकोसमोर माझ्या सासुसारखे जेवण तुला जमत नाही .
दोन्ही गोष्टी खर्या आहेत पण तरीही ह्या दोन्हींना त्यावर उघडपणे आपला विरोध माझ्यापुढे प्रदर्शित करता येत नाही .कारण मी लगेच .......
@टूथपेस्ट मधूनच दाबून ठेवणे. ज्यायोगे पुनर्वापरास ती निरुपयोगी होऊन बसते.
वेगवेगळे ब्रश असतात ,तर मग पेस्ट का नको .माझ्यासाठी वेगळी पेस्ट आहे .(कर काय करायचे आहे ते )
@टॉयलेट सीट वरचे वरच ठेवणे. या भयंकर अॅनॉयींग सवयीबद्दल जितकं बोलाल तितकं कमीच आहे.
ह्या कारनाम्यासाठी इंग्रजांनी माझ्या मित्राला होस्टेल वरील आमच्या मजल्यावरील सर्व टोयलेत साफ करून घेतली त्यामुळे जातीने प्रसाधन गृह नीटनेटके ठेवण्याकडे माझा कटाक्ष त्यावेळेपासून सुरु झाला .(काय तो साहेब काय त्याची शिस्त ... )
पण आवरतं घेते.
तर थोडक्यात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती
हा हा हा मस्त
शुचि...माझ्या बायकोने ह्यातल्या बर्याचशा मुद्दांवर तुला सहमती दिली आहे. तिचे मिपा खाते नसल्याने मलाच येथे टंकावे लागत आहे.
आणखी भर..
१)उगाच रात्री जागरण करून लेट नाईट मुव्हीच पहाणे.
२)बाहेर जरी खुप इज्जत असली तरी घरात बावळट रहाणे.
३)जेव्हा मुलांना समज द्यायचे गरज असते त्यावेळी त्यांच्यावरील प्रेम उतू जात असल्यासारखे भासवून त्यांचे लाड करणे.
४) एकदा बघीतलेला युद्धपट/मॅचच्या हायलाइट्स परत परत पहाणे.
यातल्या एका गोष्टिबद्दल मी पुर्णपणे असहमत..
रस्ता चुकल्यास पृथ्वी प्रदक्षिणा घालून पेट्रोल वाया घालविणे पण पत्ता न विचारणे.
GPSच्या जमान्यात हे होत नाही. अनोळख्या ठिकाणी जायचे असेल तर नवर्यांइतके चांगले planning (बस टायमिंग, मॅप पहाणे) कोणीच करत नाही.
सही! धन्यवाद.
In reply to हा हा हा मस्त by योगी९००
सही! धन्यवाद. :)
अजून काही...
१. इंजिनीअरिंगची डिग्री असली की आपल्याला मेकॅनिक, प्लंबर, इलेक्ट्रिशियन वगैरे सर्वांच्या वरताण अक्कल आहे असं समजून घरातली क्षुल्लक डागडुजी स्वतःच करायला जाणे. मग बोऱ्या वाजून मुळचं क्षुल्लक प्रकरण हा प्रचंड मोठा घोळ होतो. तो निस्तरण्यासाठी मेकॅनिक, प्लंबर, इलेक्ट्रिशियन वगैरेना बोलावण्याचं काम बायकोच्याच गळ्यात पडतं. कारण नवरा म्हणत राहातो, 'अगं मी घोळ केलेलना नाहीये. मला फक्त हे तीन पार्ट्स आणायचे आहेत हार्डवेअर स्टोअरमधून. थांब एवढी मॅच संपू दे' ती टेस्ट मॅच संपायला पाच दिवस लागतात. तोपर्यंत बाथरूममध्ये साचणाऱ्या पाण्याचं काय करायचं?
२. दरवेळी नवीन खूळ डोक्यात शिरतं. एक प्रोजेक्ट धड पूर्ण करायचा नाही, मग तो अर्धवट सोडून दुसऱ्या प्रोजेक्टचा पसारा मांडायचा.
३. डॉक्टर वगैरे मंडळींना फारशी काही अक्कल नाही असं जाहीर करून स्वतःच शरीरावर काहीतरी प्रयोग करत बसणे. डॉक्टरांनी गोळ्या दिल्या तर त्या फेकून देऊन मुद्दामच 'रोज चार फेऱ्या मारल्या ग्राउंडला आणि अमुकतमुक काढा प्यायला की हिमोग्लोबिन/ब्लड शुगर /कोलेस्टरॉल /इ. इ कसं व्यवस्थित कंट्रोलमध्ये राहातं' वगैरे ठामपणे म्हणणे.
४. 'मी फार वेळा स्वयपाक करत नाही, पण जेव्हा करतो तेव्हा बायकोपेक्षा छान करतो' अशी प्रौढी बाळगणे. जळ्ळ्या मेल्या दोन डिशेस तर येतात धड. त्या करतानासुद्धा तयारी, आव आणि पसाराच जास्त. मग कोणी आलेलं असताना मुद्दामून 'मी केलंय बरं का हे अमुकतमुक चिकन. त्यात दालचिनी अशी बरोब्बर भरड कुटून घालायची, नाहीतर बरोबर वास लागत नाही.' वगैरे सांगून भाव खाणे व बिचाऱ्या भुकेजलेल्या पाहुण्यांकडून प्रशंसा उपटणे. ते वाईट थोडंच म्हणणार आहेत कशाला?
५. गरज नसताना दहापट महागाची साउंड सिस्टिम घेऊन ती ढाणढाण वाजवणे. कुठल्यातरी गाण्यात 'अमुक जागी तो व्हूश्श्श आवाज कसला जबरी ऐकू येतो' हे रिवाइंड करकरून, वेगवेगळी सेटिंग्ज लावून ऐकवून दाखवणे. बायकांना त्यात ढिम्म फरक जाणवत नाही, पण यांच्या चेहेऱ्यावर मात्र कोहिनूर दाखवल्याचा आनंद असतो.
६. गाडीची, मोटरसायकलची अतिरेकी काळजी घेणे. इंजिनाच्या आवाजात षड्जाचा कोमल रिषभ झाला तरी लगेच यांना ऐकू येतो. टायर प्रेशर चार टक्क्यांनी कमी झालं की यांची घालमेल होते. बायकोकडे त्याच्या निम्मं लक्ष द्यायला काय होतंय?
आई शप्पत मस्तच हा हाहा (५)
In reply to अजून काही... by राजेश घासकडवी
आई शप्पत मस्तच :) हा हाहा
(५) आणि (६) खरच खरच अगदी TRUE!!!!
चुरचुरीत लेखन! असे राई येवढे
चुरचुरीत लेखन!
असे राई येवढे बारके मुद्दे घालून केलेली फोडणी खमंग आहे!
(असेच बारके मुद्ये सांगून ह्या बायका खूष होतात हे बरे आहे. पुरषांच्या दगड धोंड्यांकडे त्यांचे लक्ष जात नाही!)
१.स्वतःचे सॉक्स धुण्यासाठी
१.स्वतःचे सॉक्स धुण्यासाठी लाँड्री बास्केट मध्ये न टाकणे. आणि जो पर्यंत बायको ते बास्केटमध्ये टाकत नाही तो पर्यंत तेच सॉक्स वापरत रहाणे..
२. बायको गाडी चालवत असताना, ती कितीही चांगली ड्रायव्हर असली तरी आपण तिचे ट्रेनर आहोत याच आविर्भावत शेजारी बसणे. आणि ड्रायव्हिंग करताना बायको कडून अगदी सिली मिस्टेक झाली तरी ती पुढे जेव्हा जेव्हा बायको ड्रायव्हिंग करते तेव्हा तेव्हा ऐकवत रहाणे..
३. ग्रोसरी साठी पाठवले की ५ वस्तूंपैकी २ च आणणे , १ मिळाली नाही असे सांगणे आणि २ विसरणे. त्यातून कढीपत्ता चे पॅकेट्स सांगितले असले तर ७९ सेंटला १ पॅक आणि १ डॉलर ला दोन असे असताना आणि आपण नेहमी २ पॅक घेतो हे माहिती असताना.. १ च आणणे.
४. लॅपटॉप मध्ये डोकं खुसपून बसला की, बाकी घराला आग का लागेना अजिबात डोकं वर न काढणे.
५. सकाळी ऐन धावपळीच्या वेळी बाथरूमध्ये गाणी गात गात सगळी कामे उरकणे.
६. आणि जेवायला किमान १० हाका मारल्याशिवाय मान सुद्धा वर न करणे आणि मग १२ व्या रागाने मारलेल्या हाकेला उठून टेबल वर येणे..
दहाव्या हाकेला मान वरती
In reply to १.स्वतःचे सॉक्स धुण्यासाठी by प्राजु
आणी बाराव्या हाकेला टेबल वर येणे .. अकराव्या हाकेचं काय?
ती हाक राग चढत जाण्यासाठी
In reply to दहाव्या हाकेला मान वरती by गोगोल
ती हाक राग चढत जाण्यासाठी असते. मग १२ व्या हाकेला राग चढतो.. ;)
+१
In reply to ती हाक राग चढत जाण्यासाठी by प्राजु
अगदी मनातले.
याच सवयीनी, माझा स्वतःबद्दलचा 'मी अजिबातच रागीट नाही' हा गैरसमज मोडून काढला,
अजून काही,
दर आठवड्याला १ तरी पेन हरवणे, आठवड्यातून २ वेळा टोपण!
लॅप्टॉपच्या भोवती हजारो वायरीचा गुंता करुन ठेवणे.
महागडे पर्फ्यूम रोज बुटांमध्ये मारून संपवणे.
स्वैपाकघरातल्या वस्तूंबद्दल्चा उल्लेख, 'तुझी सुरी, तुझी विळी, तुझा ट्रे,......' असा करणे.
पूर्वी मुलांबद्दल देखिल असे उल्लेख व्हायचे!
अवेळी-अपरात्री चहा/कॉफी मागणे.
वयस्कर नवर्यांच्या सवयी,
सून्/नातसून यांच्या प्रत्येक गोष्टीची ( या गोष्टी शक्यतो कुपथ्यकारक पदार्थ्/महागड्या वस्तू असतात) फुकाची तारिफ करणे.
'आता वाकवत नाही' या कारणास्तव, स्वतःच्या चपला देखिल उचलत नाहीत, पण आंब्याच्या अढीतले चांगले आंबे वाकून वाकून निवडतात.
'आता वाकवत नाही' या
In reply to +१ by कवितानागेश
'आता वाकवत नाही' या कारणास्तव, स्वतःच्या चपला देखिल उचलत नाहीत, पण आंब्याच्या अढीतले चांगले आंबे वाकून वाकून निवडतात.
सहमत अगदी सहमत. माझ्या वडीलाना हे बरोब्बर लागु पडते.
विजुभाऊ, तुमच्या सवयी तुमच्या
In reply to 'आता वाकवत नाही' या by विजुभाऊ
विजुभाऊ, तुमच्या सवयी तुमच्या वडिलांच्या नांवावर ढकलू नका!
पाप आहे ते!!!
:)
(विषय दिलेला नाही)
In reply to विजुभाऊ, तुमच्या सवयी तुमच्या by पिवळा डांबिस
मस्त
In reply to १.स्वतःचे सॉक्स धुण्यासाठी by प्राजु
मस्त :)
लै भारी.
In reply to १.स्वतःचे सॉक्स धुण्यासाठी by प्राजु
:)
छ्या. पुरुषांमध्ये इतके
छ्या. पुरुषांमध्ये इतके दुर्गुण असूनही लेख आणि प्रतिसाद धरून इतके कमी आणि इतके फुटकळ दुर्गुण मांडले गेलेले पाहून निराशा झाली.
आपले ते फुटकळ.. आणि
In reply to छ्या. पुरुषांमध्ये इतके by नगरीनिरंजन
आपले ते फुटकळ.. आणि दुसर्याचे ते... ;)
मस्त
:)
-दिलीप बिरुटे
प्रॅक्टिकली करेक्ट
टॉयलेट सीट वरचे वरच ठेवणे. या भयंकर अॅनॉयींग सवयीबद्दल जितकं बोलाल तितकं कमीच आहे. पण आवरतं घेते.
सीट वर ठेवली की खालील फायदे होतात.
सीटच्या खाली काही घाण लागली असेल तर ती दिसते व साफ करता येते.
पुरुषांनी लघवीसाठी टॉयलेट वापरली तर सीटवर थेंब पडून ती खराब व दुसर्याला वापरण्यायोग्य रहाणार नाही.
मला वाटतं की पूर्वी ट्रेनमधल्या कमोडवर 'जंटलमेन विल लिफ्ट द सीट आफ्टर युज' असे लिहिलेले असायचे.
बाकी संवयी मात्र एकदम पटल्या.
मिपामुळे लग्नानंतर नवरा
मिपामुळे लग्नानंतर नवरा बायकोंना एकमेकांचे काय काय रमणीय अनुभव येतात हे वाचायला मिळत आहे ;)
पार्सिंग
In reply to मिपामुळे लग्नानंतर नवरा by परिकथेतील राजकुमार
यावर पंगांच्या 'पार्सिंगचा घोळ' अशा प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत.
*खंडीभर पाहुण्यांना बोलावुन
*खंडीभर पाहुण्यांना बोलावुन ठेवणे व पाहुणे आले असता ३-३दा चहा कॉफी करायला भाग पाडणे.
*हल्ली देवाला हात जोडायला विसरतोस असे म्हणताच ' मनात देव आहे' अश्या फुकाच्या बंडला मारुन आपल्या अचरट
वागण्याचे समर्थन करणे वर मी अथर्वशिर्श्य मनात म्हणतो असे खोटेच सान्गणे.
*स्व्तच्या आइला व बहिणींना गुपचुप बाहेरुन फोन करणे व त्यान्चाच खुशाली विचारण्यासाठी फोन आला होता असे
उगाचच सांगणे.
*४ चॉघात वाइट्ट्ट इन्ग्लिश बोलुन लाज आणणे.
* बाथरुमचा लाईट ऑफ करायला विसरणे.
भले शाब्बास!!
In reply to *खंडीभर पाहुण्यांना बोलावुन by पर्नल नेने मराठे
तुमच्या ह्यांची जरा गळाभेट घ्यायचीय हो!!!
कुठे भेटतील?
* बाथरुमचा लाईट ऑफ करायला विसरणे.
हे तर काहीच नाही! आमचा एक मित्र तर असा लाईट विसरुन आला आणि बायकोने लक्षात आणून दिल्यावर, "तू सुद्धा जाउन ये बरं! बराच वेळ झाला, गेली नाहीस!!" असं आमच्या पुढ्यातच तिला सांगून मोकळा झाला!!!!:)
नंतर जो काय हलकल्लोळ झालाय म्हणता!!!
ह्म्म अजुन राहिलेच
In reply to भले शाब्बास!! by पिवळा डांबिस
ह्म्म
अजुन राहिलेच कि,
*बिस्किटचे पुडेच्या पुडे एका दमात संपवुन कोणाला देण्यास ड्बा उघडल्यास पंचाइत करुन ठेवणे, रॅपर्स तशिच रिकामी आत ठेवणे.
* मनात येइल तसे वागणे... एकदा कान्दे आणायला पाठ्विले असता मोठा कुकर घेउन आला, एकदा उगाचच जाउन आयफोन, म्युसिक सिस्तिम घेउन आला. २घानी जाउन आणणे हा प्रकारच नाही. रोमॅन्तिक नाही म्हणजे किति नाही ते पहा.
एकदा कान्दे आणायला पाठ्विले
In reply to ह्म्म अजुन राहिलेच by पर्नल नेने मराठे
मग अजुन किती वर्षे कच्चे अन्न खायचे त्यांनी ?
>>>मग अजुन किती वर्षे कच्चे
In reply to एकदा कान्दे आणायला पाठ्विले by परिकथेतील राजकुमार
>>>मग अजुन किती वर्षे कच्चे अन्न खायचे त्यांनी ?
ठ्ठ्यॉ!!!!!
एकदम पडलेच खाली.. =)) =))
अरे मोठा कुकर आणलान्....छोटा
In reply to एकदा कान्दे आणायला पाठ्विले by परिकथेतील राजकुमार
अरे मोठा कुकर आणलान्....छोटा होताच माझ्याकडे..
पण तु म्हणालिस की त्याची
In reply to अरे मोठा कुकर आणलान्....छोटा by पर्नल नेने मराठे
पण तु म्हणालिस की त्याची शिट्टीच वाजत नाही म्हणुन ? :)
- (शिट्टी वाजवणारा) कुकु
भारी !
In reply to एकदा कान्दे आणायला पाठ्विले by परिकथेतील राजकुमार
भारी !
एकदा कान्दे आणायला पाठ्विले
एकदा कान्दे आणायला पाठ्विले असता मोठा कुकर घेउन आला
तुमची किती काळजी घेतात बघा ना. कांदे शिजायला वेळ लागेल म्हणून कुकरसारखी महत्वाची टिकाऊ वस्तु आणली त्याबद्दल ही बै धन्यवाद वगैरे काहीच देत नाही. शिवाय वर कांद्यासारखा क्षुल्लक पदार्थ आणला नाही म्हणुन दोषारोप आहेत्ते वेगळेच.
२घानी जाउन आणणे हा प्रकारच नाही. रोमॅन्तिक नाही म्हणजे किति नाही ते पहा.
२घानी जाऊन कान्दे आणणे यात कस्ला रोमॅन्तिक पणा? २घानी हनीमून ला जाणे यात रोमॅन्तिकपणा म्हणाल तर ते लॉजिकली बरोबर आहे.
अवांतरः बघा बघा....आता कसे आता कसे..... या बायका ना इथून तिथून सारख्याच. सगळ्या मेल्या एकजात सारख्या
टीप : होय मी "बायका" हा शब्द महिलाना सिंगलाआउट करण्यासाठीच वापरला आहे
२घानी हनीमून ला जाणे यात
In reply to एकदा कान्दे आणायला पाठ्विले by विजुभाऊ
२घानी हनीमून ला जाणे यात रोमॅन्तिकपणा म्हणाल तर ते लॉजिकली बरोबर आहे.
हल्ली कार्यबाहुल्य* आणि करीयर यामुळे एकेकटेच हनीमुनला जाऊन येण्याची फॅशन आहे.
*ह्याचा आणि बाहुल्यांनी होऊ शकणारे कार्य याचा काही संबंध नाही.
१ घर म्हणजे होस्टेल वाटणे. २
१ घर म्हणजे होस्टेल वाटणे.
२ स्वतःच्याच घरात परक्या सारखे (stranger) वावरणे.
लतिका धुमाळे
हा वर्मावर घाला आहे .(हेच
In reply to १ घर म्हणजे होस्टेल वाटणे. २ by लतिका धुमाळे
हा वर्मावर घाला आहे .(हेच शब्द /हेच वाक्य )
घायाळ
मुक्काम पोस्ट
जर्मनी
अजुन एक अजुन एक....
....सतत घुमेपणा....
....बोल ना काहीतरी ...असं म्हटलं की.....झालं कि आता अमुक वर्षं ...सारखं काय बोलायचं..... हे सुनवायचं
आणि हापिसातल्या पोरी सोर्री... पोरं टारं ...याच्याशी गुलुगुलु गप्पा......
......
वाचा सुंदर विनोद..
एक नवरा मानसोपचारतज्ज्ञाकडे गेला. डॉक्टरांनी विचारले, 'हं! काय त्रास आहे तुम्हाला?'
नवरा म्हणाला, ' मला काही त्रास नाही, पण माझ्या बायकोला बहुधा वेड लागायला सुरवात झालीय. तिच्या घाणेरड्या सवयींमुळे माझे डोके फिरायची वेळ आलीय.'
त्यावर विचारात पडून डॉक्टर म्हणाले, 'अस्सं. बरं पण तिच्या नक्की कोणत्या सवयी तुम्हाला त्रासदायक वाटतात?'
त्यावर नवरोबा म्हणाले, ' आता कालचेच उदाहरण घ्या. मी नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे सिंकमध्ये शू करायला गेलो, तर तिथे दोन दिवसांची खरकटी भांडी तशीच पडून आहेत. सिंक स्वच्छ नको का ठेवायला तिने? मला नाही खपत ही अस्वच्छता.'
सिन्कमधे शु :ओ मी तर नव्राचा
सिन्कमधे शु :ओ मी तर नव्राचा खुन्च करेन
छे! तीनवेळा प्रतिसाद टंकून मी
छे! तीनवेळा प्रतिसाद टंकून मी काढून टाकला.
रागानं तणतण होते आहे त्यामुळे आता लिहिणार नाही.
अरे काय हे!! चुचे तुलासुद्धा
अरे काय हे!! चुचे तुलासुद्धा स्वताच्या नवर्याला स्वताच्याच ताब्यात ठेवता येउ नये म्हणजे कमाल झाली आता.. ;)
एकदा कान्दे आणायला पाठ्विले
एकदा कान्दे आणायला पाठ्विले असता मोठा कुकर घेउन आला
माझ्या मामेबहिणीचा नवरा कढीपत्ता भरपूर आणायला सांगितला असता तमालपत्राचे दोन मोठे पुडे घेऊन आला होता.
त्याच्यामते कोणतीतरी पानं असण्याशी मतलब! माझ्या बाबांनी नवीन प्रकारची भाजी करताना त्यावर तवंग आला नाही म्हणून कच्च्या तेलात लाल फूडकलर घालून भाजीवर पसरवला होता. माझ्या नवर्याला एकदा मिक्सरमधून टोमॅटो काढून भाजीत घाल म्हटले तर पुन्हा पुन्हा कुठे, कुठे विचारत होता. मग मी त्याला रागानं सांगितले कि टाक ट्रॅशमध्ये तर त्याने खरच टाकला आणि म्हणाला कि अश्या क्लियर इंस्ट्रक्शन्स देत जा म्हणजे समजतं.
माझ्याबरोबर खरेदीला यायला
माझ्याबरोबर खरेदीला यायला नवर्याला फार्फारच त्रास होतो...झालं का ? झालं का? सुरु होतं...
आता समजा आपला नंबर आला अन त्या बाईने स्कॅन्निंग सुरु केले अन तेवढ्यात आपल्याला अजून काहीतरी घ्यायचे आठवले तर मी तिला बिनदिक्कत थोडं थांबायला सांगून पटकन ती वस्तू घेऊन येते...खासकरून ग्रोसरीच्या दुकानात...मग याची लगेच कटकट सुरु...त्या बाईला काही त्रास नसतो पण याचीच तडतड...
कपडे घ्यायचे तर दिवस दिवस पुरत नाहीत कारण खूप प्रकार, रंग, fashion , matching कानातले वगैरे घ्यावे लागते याला आम्ही तरी काय करणार? बरं गबाळं राहिलेलं चालत नाही...म्हणजे आधी नाही आवडायचं आणि आता आम्हाला नाही पटत , नाईलाज आहे...
हा हा !!! शिल्पाबै... प्रिंट
In reply to माझ्याबरोबर खरेदीला यायला by शिल्पा ब
हा हा !!!
शिल्पाबै... प्रिंट काढू का या प्रतिसादाची ?? :) :)
हॅ हॅ हॅ...खरं तेच लिहिलंय
In reply to हा हा !!! शिल्पाबै... प्रिंट by बबलु
हॅ हॅ हॅ...खरं तेच लिहिलंय हो... :)
छान
सुन्दर लेख
उत्तम सवयि आहेत
बग्ज आणि फीचर्समधे फारसा फरक नसतो
बग्ज आणि फीचर्समधे फारसा फरक नसतो असं आमचं दोघांचं मत आहे.
पण प्रॉब्लेम असा होतोय की मला जे फीचर वाटतं त्याची संभावना नवरा बग अशी करतो. भाड्याने घेतलेल्या घराचं छप्पर खाली आहे, मला ते घर कोझी वाटतं, नवरा त्याचीच तक्रार करतो.
टॉयलेट सीट वरच ठेवली तर काय फरक पडतो? आपण खाली करून ठेवलेली तो उचलतो हे काय कमी आहे?
क्रमांक दहाची सवय, आईच अन्नपूर्णा आहे, यावर मी एकच उत्तर दिलं होतं, "तुझ्या घरी तर तुझी आईच अन्नपूर्णा आहे, माझे आई आणि बाबासुद्धा उत्तम स्वयंपाकी होते. पण म्हणून तुला आणि मला त्याचा काय फायदा!" असं (बाणेदार) उत्तर मी दिलं होतं. किंवा "मग आईलाच सांग ना बनवायला, मी पण खाते!" किंवा "तू शिक ना मग आईकडून!" अशी उत्तरंही चालू शकतील.
एकूण काय लॅटरल थिंकींग करा आणि स्वतःच्या आणि नवर्याच्याही डोक्याला त्रास देऊ नका.
नवर्याची सगळ्यात वाईट सवय कोणती तर वापरलेले कपडे धुवायला टाकायचे नाहीत, वर "माझे कपडेच संपले धुतलेले" अशी तक्रार करायची. एक-दोनदा मी मुद्दामच वापरलेल्या कपाटात पसरलेल्या कपड्यांकडे दुर्लक्ष केलं, पुन्हा तक्रार आली नाही.
बाकी इतर बाबतीत माझा नवरा एकदम गुणाचा आहे, त्याच्याच माझ्याबद्दल काही तक्रारी असतील!!
<<<त्याच्याच माझ्याबद्दल काही
In reply to बग्ज आणि फीचर्समधे फारसा फरक नसतो by ३_१४ विक्षिप्त अदिती
त्याच्याच माझ्याबद्दल काही तक्रारी असतील!!
फक्त त्याच्याच? ;)
बाकीचे मला रोजच्या रोज, बनवून
In reply to <<<त्याच्याच माझ्याबद्दल काही by शिल्पा ब
बाकीचे मला रोजच्या रोज, बनवून खायला घालत नाहीत, तेव्हा बाकीच्यांच्या तक्रारी कुठे सारायच्या हे मला माहित आहे. ;-)
पण तुम्ही केलेले खायची
In reply to बाकीचे मला रोजच्या रोज, बनवून by ३_१४ विक्षिप्त अदिती
पण तुम्ही केलेले 'खाद्यपदार्थ' (?) खायची दुर्दैवी आणि भयंकर वेळ आलेल्याबद्दल थोडीतरी सहानुभुती असावी (बाई)माणसाकडे!!
बाकीच्यांच्या तक्रारी कुठे सारायच्या हे मला माहित आहे
In reply to बाकीचे मला रोजच्या रोज, बनवून by ३_१४ विक्षिप्त अदिती
:-O
(बाकीचे मला रोजच्या रोज, बनवून खायला घालत नाहीत, तेव्हा बाकीच्यांच्या तक्रारी कुठे सारायच्या हे मला माहित आहे. )
बिच्चारा :(
>>>>>एकदा कान्दे आणायला
>>>>>एकदा कान्दे आणायला पाठ्विले असता मोठा कुकर घेउन आला
सही
माझे बाबा दर रविवारी महाग आणि खराब भाज्या आण्तात
तर आई म्हणते की , सगळे भाजीवाले तुमची वाटच बघत असतील.
त्यावर बाबा दरवेळेस म्हणत्तात जाउ दे ही शेवट ची वेळ ह्या वेळेस अॅड्जस्ट कर.
>>>>>एकदा कान्दे आणायला
>>>>>एकदा कान्दे आणायला पाठ्विले असता मोठा कुकर घेउन आला
सही
माझे बाबा दर रविवारी महाग आणि खराब भाज्या आण्तात
तर आई म्हणते की , सगळे भाजीवाले तुमची वाटच बघत असतील.
त्यावर बाबा दरवेळेस म्हणत्तात जाउ दे ही शेवट ची वेळ ह्या वेळेस अॅड्जस्ट कर.
अजुन एक सवय.. बाकिचे नवरे
अजुन एक सवय..
बाकिचे नवरे नेहमी बायकोला फोन करताना मी पहाते खास करुन जेवलिस का वैगरेसाठी तर हमखास. आम्च ध्यान चुकुनही फोन करत नाही, केलाच तर समजाव कि ह्याच माझ्याकडे काहितरी काम आहे किवा ह्याने १००% घोळ घातलाय व तो मला आता सोडवायचाय.
किवा बायको कुठे एकटिच गेली असेल तर पोहोचली कि नाही ह्या काळजिने सुढ्हा नवरे फोन करुन विचरतात्...मी ह्याला म्हणाले कि तुला काहि काळजिच वाटत नाही तर वर हा म्हणाला कि मला १००% खात्री आहे तु जाशिल तिकडे निट जाशिलच.. घ्या आता :|
१००% खात्री आहे तु जाशिल तिकडे निट जाशिलच..
In reply to अजुन एक सवय.. बाकिचे नवरे by पर्नल नेने मराठे
नव-याला खात्री आहे ही गोष्ट वाईट आहे????????
नव-याला खात्री असली तरी त्याने फोन करायला पाहीजे कारण बायकोला "त्यामुळे" बरे वाटते. म्हणजे...
च्यायला "त्या" ध्याग्यावर लिहायला एक कारण मिळाले.
;)
धन्यु.
माझे बाबा पन असेच एक प्रश्न
माझे बाबा पन असेच एक प्रश्न १० वेळा विचर्नार ,तुझि मुल तुझा लाडामुळ बीघडलित हे तर नेहमिच वाक्य!
आइ म्हनते ते बिघ्डु पर्यन्त तुम्हि हिमालयावर गेले होते का? रोजचिच गम्मत!
हे सगळे मुलामुलींना आपोआपच
In reply to माझे बाबा पन असेच एक प्रश्न by पियुशा
हे सगळे मुलामुलींना आपोआपच ट्रेनिंग होत असते!
अरेरे... शुचितै... तुमच्या
अरेरे... शुचितै... तुमच्या आणि माझ्या नवर् याच्या दु:खाची कल्पना आली मला.... अरे संदीप, कसा रे सहन करतोस.. खरा सहनशील बाबा तू! :(
मुद्दा क्रमांक चार वर युद्ध चित्रपटांऐवजी कौटुंबिक मेलो मेलो मेलोड्रामा चित्रपट आणि मुद्दा क्रमांक नऊ वर खेळा ऐवजी पुस्तक... एवढाच काय तो फरक! अर्थात मेल च्या जागी फिमेल वाचावे हे सांगणे न लगे :)