Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by शुचि on Fri, 12/24/2010 - 21:19
वा रे वा आम्हा बायकांच्याच त्रासदायक सवयी नसतात काही. नवर्‍याच्या देखील काही सवयी त्रासदायक असतात. त्यापैकी टॉप १० (मुख्य १०). (१) टूथपेस्ट मधूनच दाबून ठेवणे. ज्यायोगे पुनर्वापरास ती निरुपयोगी होऊन बसते. (२) टॉयलेट सीट वरचे वरच ठेवणे. या भयंकर अ‍ॅनॉयींग सवयीबद्दल जितकं बोलाल तितकं कमीच आहे. पण आवरतं घेते. :P (३) घुमेपणा - अभिव्यक्तीची किमान गरज असणे. (४) ऊठ्सूठ युद्ध चित्रपट पाहणे आणि घरातल्यांचे डोके त्यातील कर्णकर्कश्श आवाजाने उठविणे. (५) "मेल बाँडींग" या गोंडस नावाखाली देवाला सोडलेल्या वळूगत उनाडगिरी करणे. (६) मॉलमध्ये पाय टाकल्याच्या ५ मिनीटाच्या आत हवी असलेली वस्तू घेऊन बाहेर पडणे आणि एवढा तीर मारून काय करणे तर घरी येऊन ढाराढूर झोपणे. (७) एखादा सामान्य पदार्थ बकवास बनवून, दुप्पट सांडलवण करून, आरडाओरड करून घर डोक्यावर घेऊन, शेवटी बायकोकरता तिप्पट काम वाढवून ठेवणे. (८) रस्ता चुकल्यास पृथ्वी प्रदक्षिणा घालून पेट्रोल वाया घालविणे पण पत्ता न विचारणे. (९) क्रिकेट्/फूट्बॉल आदिची मॅच असल्यास जगबुडी का होइना पण आंघोळ/दाढी वगैरे न करता टी व्ही ला चिकटून बसणे आणि फर्मान (ऑर्डरी) सोडणे. (१०) आपल्या आईच्या हातचं खाणं साक्षात अन्नपूर्णा आली तरी बनवू शकणार नाही असा अंधविश्वास बाळगणे. या यादीमध्ये सर्व सदस्यांनी आपल्या परीने भर घालावी ही विनंती.
  • Log in or register to post comments
  • 16556 views

प्रतिक्रिया

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sat, 12/25/2010 - 08:31

In reply to १.स्वतःचे सॉक्स धुण्यासाठी by प्राजु

Permalink

लै भारी.

:)
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Sat, 12/25/2010 - 07:30

Permalink

छ्या. पुरुषांमध्ये इतके

छ्या. पुरुषांमध्ये इतके दुर्गुण असूनही लेख आणि प्रतिसाद धरून इतके कमी आणि इतके फुटकळ दुर्गुण मांडले गेलेले पाहून निराशा झाली.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Sat, 12/25/2010 - 07:43

In reply to छ्या. पुरुषांमध्ये इतके by नगरीनिरंजन

Permalink

आपले ते फुटकळ.. आणि

आपले ते फुटकळ.. आणि दुसर्‍याचे ते... ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sat, 12/25/2010 - 07:42

Permalink

मस्त

:) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Sat, 12/25/2010 - 11:03

Permalink

प्रॅक्टिकली करेक्ट

टॉयलेट सीट वरचे वरच ठेवणे. या भयंकर अ‍ॅनॉयींग सवयीबद्दल जितकं बोलाल तितकं कमीच आहे. पण आवरतं घेते. सीट वर ठेवली की खालील फायदे होतात. सीटच्या खाली काही घाण लागली असेल तर ती दिसते व साफ करता येते. पुरुषांनी लघवीसाठी टॉयलेट वापरली तर सीटवर थेंब पडून ती खराब व दुसर्‍याला वापरण्यायोग्य रहाणार नाही. मला वाटतं की पूर्वी ट्रेनमधल्या कमोडवर 'जंटलमेन विल लिफ्ट द सीट आफ्टर युज' असे लिहिलेले असायचे. बाकी संवयी मात्र एकदम पटल्या.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Sat, 12/25/2010 - 11:09

Permalink

मिपामुळे लग्नानंतर नवरा

मिपामुळे लग्नानंतर नवरा बायकोंना एकमेकांचे काय काय रमणीय अनुभव येतात हे वाचायला मिळत आहे ;)
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Sat, 12/25/2010 - 11:48

In reply to मिपामुळे लग्नानंतर नवरा by परिकथेतील राजकुमार

Permalink

पार्सिंग

यावर पंगांच्या 'पार्सिंगचा घोळ' अशा प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments

Submitted by पर्नल नेने मराठे on Sat, 12/25/2010 - 11:44

Permalink

*खंडीभर पाहुण्यांना बोलावुन

*खंडीभर पाहुण्यांना बोलावुन ठेवणे व पाहुणे आले असता ३-३दा चहा कॉफी करायला भाग पाडणे. *हल्ली देवाला हात जोडायला विसरतोस असे म्हणताच ' मनात देव आहे' अश्या फुकाच्या बंडला मारुन आपल्या अचरट वागण्याचे समर्थन करणे वर मी अथर्वशिर्‍श्य मनात म्हणतो असे खोटेच सान्गणे. *स्व्तच्या आइला व बहिणींना गुपचुप बाहेरुन फोन करणे व त्यान्चाच खुशाली विचारण्यासाठी फोन आला होता असे उगाचच सांगणे. *४ चॉघात वाइट्ट्ट इन्ग्लिश बोलुन लाज आणणे. * बाथरुमचा लाईट ऑफ करायला विसरणे.
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Sat, 12/25/2010 - 11:57

In reply to *खंडीभर पाहुण्यांना बोलावुन by पर्नल नेने मराठे

Permalink

भले शाब्बास!!

तुमच्या ह्यांची जरा गळाभेट घ्यायचीय हो!!! कुठे भेटतील? * बाथरुमचा लाईट ऑफ करायला विसरणे. हे तर काहीच नाही! आमचा एक मित्र तर असा लाईट विसरुन आला आणि बायकोने लक्षात आणून दिल्यावर, "तू सुद्धा जाउन ये बरं! बराच वेळ झाला, गेली नाहीस!!" असं आमच्या पुढ्यातच तिला सांगून मोकळा झाला!!!!:) नंतर जो काय हलकल्लोळ झालाय म्हणता!!!
  • Log in or register to post comments

Submitted by पर्नल नेने मराठे on Sat, 12/25/2010 - 12:13

In reply to भले शाब्बास!! by पिवळा डांबिस

Permalink

ह्म्म अजुन राहिलेच

ह्म्म अजुन राहिलेच कि, *बिस्किटचे पुडेच्या पुडे एका दमात संपवुन कोणाला देण्यास ड्बा उघडल्यास पंचाइत करुन ठेवणे, रॅपर्स तशिच रिकामी आत ठेवणे. * मनात येइल तसे वागणे... एकदा कान्दे आणायला पाठ्विले असता मोठा कुकर घेउन आला, एकदा उगाचच जाउन आयफोन, म्युसिक सिस्तिम घेउन आला. २घानी जाउन आणणे हा प्रकारच नाही. रोमॅन्तिक नाही म्हणजे किति नाही ते पहा.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Sat, 12/25/2010 - 13:18

In reply to ह्म्म अजुन राहिलेच by पर्नल नेने मराठे

Permalink

एकदा कान्दे आणायला पाठ्विले

एकदा कान्दे आणायला पाठ्विले असता मोठा कुकर घेउन आला
मग अजुन किती वर्षे कच्चे अन्न खायचे त्यांनी ?
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Sat, 12/25/2010 - 23:10

In reply to एकदा कान्दे आणायला पाठ्विले by परिकथेतील राजकुमार

Permalink

>>>मग अजुन किती वर्षे कच्चे

>>>मग अजुन किती वर्षे कच्चे अन्न खायचे त्यांनी ? ठ्ठ्यॉ!!!!! एकदम पडलेच खाली.. =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by पर्नल नेने मराठे on Sun, 12/26/2010 - 13:21

In reply to एकदा कान्दे आणायला पाठ्विले by परिकथेतील राजकुमार

Permalink

अरे मोठा कुकर आणलान्....छोटा

अरे मोठा कुकर आणलान्....छोटा होताच माझ्याकडे..
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Sun, 12/26/2010 - 15:12

In reply to अरे मोठा कुकर आणलान्....छोटा by पर्नल नेने मराठे

Permalink

पण तु म्हणालिस की त्याची

पण तु म्हणालिस की त्याची शिट्टीच वाजत नाही म्हणुन ? :) - (शिट्टी वाजवणारा) कुकु
  • Log in or register to post comments

Submitted by Pain on Tue, 12/28/2010 - 07:04

In reply to एकदा कान्दे आणायला पाठ्विले by परिकथेतील राजकुमार

Permalink

भारी !

भारी !
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Sat, 12/25/2010 - 13:11

Permalink

एकदा कान्दे आणायला पाठ्विले

एकदा कान्दे आणायला पाठ्विले असता मोठा कुकर घेउन आला तुमची किती काळजी घेतात बघा ना. कांदे शिजायला वेळ लागेल म्हणून कुकरसारखी महत्वाची टिकाऊ वस्तु आणली त्याबद्दल ही बै धन्यवाद वगैरे काहीच देत नाही. शिवाय वर कांद्यासारखा क्षुल्लक पदार्थ आणला नाही म्हणुन दोषारोप आहेत्ते वेगळेच. २घानी जाउन आणणे हा प्रकारच नाही. रोमॅन्तिक नाही म्हणजे किति नाही ते पहा. २घानी जाऊन कान्दे आणणे यात कस्ला रोमॅन्तिक पणा? २घानी हनीमून ला जाणे यात रोमॅन्तिकपणा म्हणाल तर ते लॉजिकली बरोबर आहे. अवांतरः बघा बघा....आता कसे आता कसे..... या बायका ना इथून तिथून सारख्याच. सगळ्या मेल्या एकजात सारख्या टीप : होय मी "बायका" हा शब्द महिलाना सिंगलाआउट करण्यासाठीच वापरला आहे
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Sat, 12/25/2010 - 13:14

In reply to एकदा कान्दे आणायला पाठ्विले by विजुभाऊ

Permalink

२घानी हनीमून ला जाणे यात

२घानी हनीमून ला जाणे यात रोमॅन्तिकपणा म्हणाल तर ते लॉजिकली बरोबर आहे. हल्ली कार्यबाहुल्य* आणि करीयर यामुळे एकेकटेच हनीमुनला जाऊन येण्याची फॅशन आहे. *ह्याचा आणि बाहुल्यांनी होऊ शकणारे कार्य याचा काही संबंध नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by लतिका धुमाळे on Sat, 12/25/2010 - 14:28

Permalink

१ घर म्हणजे होस्टेल वाटणे. २

१ घर म्हणजे होस्टेल वाटणे. २ स्वतःच्याच घरात परक्या सारखे (stranger) वावरणे. लतिका धुमाळे
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Sun, 12/26/2010 - 07:57

In reply to १ घर म्हणजे होस्टेल वाटणे. २ by लतिका धुमाळे

Permalink

हा वर्मावर घाला आहे .(हेच

हा वर्मावर घाला आहे .(हेच शब्द /हेच वाक्य ) घायाळ मुक्काम पोस्ट जर्मनी
  • Log in or register to post comments

Submitted by जाई अस्सल कोल्हापुरी on Sat, 12/25/2010 - 14:53

Permalink

अजुन एक अजुन एक....

....सतत घुमेपणा.... ....बोल ना काहीतरी ...असं म्हटलं की.....झालं कि आता अमुक वर्षं ...सारखं काय बोलायचं..... हे सुनवायचं आणि हापिसातल्या पोरी सोर्री... पोरं टारं ...याच्याशी गुलुगुलु गप्पा...... ......
  • Log in or register to post comments

Submitted by योगप्रभू on Sat, 12/25/2010 - 18:56

Permalink

वाचा सुंदर विनोद..

एक नवरा मानसोपचारतज्ज्ञाकडे गेला. डॉक्टरांनी विचारले, 'हं! काय त्रास आहे तुम्हाला?' नवरा म्हणाला, ' मला काही त्रास नाही, पण माझ्या बायकोला बहुधा वेड लागायला सुरवात झालीय. तिच्या घाणेरड्या सवयींमुळे माझे डोके फिरायची वेळ आलीय.' त्यावर विचारात पडून डॉक्टर म्हणाले, 'अस्सं. बरं पण तिच्या नक्की कोणत्या सवयी तुम्हाला त्रासदायक वाटतात?' त्यावर नवरोबा म्हणाले, ' आता कालचेच उदाहरण घ्या. मी नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे सिंकमध्ये शू करायला गेलो, तर तिथे दोन दिवसांची खरकटी भांडी तशीच पडून आहेत. सिंक स्वच्छ नको का ठेवायला तिने? मला नाही खपत ही अस्वच्छता.'
  • Log in or register to post comments

Submitted by पर्नल नेने मराठे on Sat, 12/25/2010 - 18:58

Permalink

सिन्कमधे शु :ओ मी तर नव्राचा

सिन्कमधे शु :ओ मी तर नव्राचा खुन्च करेन
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Sat, 12/25/2010 - 20:20

Permalink

छे! तीनवेळा प्रतिसाद टंकून मी

छे! तीनवेळा प्रतिसाद टंकून मी काढून टाकला. रागानं तणतण होते आहे त्यामुळे आता लिहिणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Sat, 12/25/2010 - 20:51

Permalink

अरे काय हे!! चुचे तुलासुद्धा

अरे काय हे!! चुचे तुलासुद्धा स्वताच्या नवर्‍याला स्वताच्याच ताब्यात ठेवता येउ नये म्हणजे कमाल झाली आता.. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Sat, 12/25/2010 - 21:04

Permalink

एकदा कान्दे आणायला पाठ्विले

एकदा कान्दे आणायला पाठ्विले असता मोठा कुकर घेउन आला माझ्या मामेबहिणीचा नवरा कढीपत्ता भरपूर आणायला सांगितला असता तमालपत्राचे दोन मोठे पुडे घेऊन आला होता. त्याच्यामते कोणतीतरी पानं असण्याशी मतलब! माझ्या बाबांनी नवीन प्रकारची भाजी करताना त्यावर तवंग आला नाही म्हणून कच्च्या तेलात लाल फूडकलर घालून भाजीवर पसरवला होता. माझ्या नवर्‍याला एकदा मिक्सरमधून टोमॅटो काढून भाजीत घाल म्हटले तर पुन्हा पुन्हा कुठे, कुठे विचारत होता. मग मी त्याला रागानं सांगितले कि टाक ट्रॅशमध्ये तर त्याने खरच टाकला आणि म्हणाला कि अश्या क्लियर इंस्ट्रक्शन्स देत जा म्हणजे समजतं.
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Sat, 12/25/2010 - 22:00

Permalink

माझ्याबरोबर खरेदीला यायला

माझ्याबरोबर खरेदीला यायला नवर्याला फार्फारच त्रास होतो...झालं का ? झालं का? सुरु होतं... आता समजा आपला नंबर आला अन त्या बाईने स्कॅन्निंग सुरु केले अन तेवढ्यात आपल्याला अजून काहीतरी घ्यायचे आठवले तर मी तिला बिनदिक्कत थोडं थांबायला सांगून पटकन ती वस्तू घेऊन येते...खासकरून ग्रोसरीच्या दुकानात...मग याची लगेच कटकट सुरु...त्या बाईला काही त्रास नसतो पण याचीच तडतड... कपडे घ्यायचे तर दिवस दिवस पुरत नाहीत कारण खूप प्रकार, रंग, fashion , matching कानातले वगैरे घ्यावे लागते याला आम्ही तरी काय करणार? बरं गबाळं राहिलेलं चालत नाही...म्हणजे आधी नाही आवडायचं आणि आता आम्हाला नाही पटत , नाईलाज आहे...
  • Log in or register to post comments

Submitted by बबलु on Sun, 12/26/2010 - 03:38

In reply to माझ्याबरोबर खरेदीला यायला by शिल्पा ब

Permalink

हा हा !!! शिल्पाबै... प्रिंट

हा हा !!! शिल्पाबै... प्रिंट काढू का या प्रतिसादाची ?? :) :)
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Sun, 12/26/2010 - 07:15

In reply to हा हा !!! शिल्पाबै... प्रिंट by बबलु

Permalink

हॅ हॅ हॅ...खरं तेच लिहिलंय

हॅ हॅ हॅ...खरं तेच लिहिलंय हो... :)
  • Log in or register to post comments

Submitted by योगेश सुदाम शिन्दे on Sat, 12/25/2010 - 22:25

Permalink

छान

सुन्दर लेख उत्तम सवयि आहेत
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Sat, 12/25/2010 - 22:44

Permalink

बग्ज आणि फीचर्समधे फारसा फरक नसतो

बग्ज आणि फीचर्समधे फारसा फरक नसतो असं आमचं दोघांचं मत आहे. पण प्रॉब्लेम असा होतोय की मला जे फीचर वाटतं त्याची संभावना नवरा बग अशी करतो. भाड्याने घेतलेल्या घराचं छप्पर खाली आहे, मला ते घर कोझी वाटतं, नवरा त्याचीच तक्रार करतो. टॉयलेट सीट वरच ठेवली तर काय फरक पडतो? आपण खाली करून ठेवलेली तो उचलतो हे काय कमी आहे? क्रमांक दहाची सवय, आईच अन्नपूर्णा आहे, यावर मी एकच उत्तर दिलं होतं, "तुझ्या घरी तर तुझी आईच अन्नपूर्णा आहे, माझे आई आणि बाबासुद्धा उत्तम स्वयंपाकी होते. पण म्हणून तुला आणि मला त्याचा काय फायदा!" असं (बाणेदार) उत्तर मी दिलं होतं. किंवा "मग आईलाच सांग ना बनवायला, मी पण खाते!" किंवा "तू शिक ना मग आईकडून!" अशी उत्तरंही चालू शकतील. एकूण काय लॅटरल थिंकींग करा आणि स्वतःच्या आणि नवर्‍याच्याही डोक्याला त्रास देऊ नका. नवर्‍याची सगळ्यात वाईट सवय कोणती तर वापरलेले कपडे धुवायला टाकायचे नाहीत, वर "माझे कपडेच संपले धुतलेले" अशी तक्रार करायची. एक-दोनदा मी मुद्दामच वापरलेल्या कपाटात पसरलेल्या कपड्यांकडे दुर्लक्ष केलं, पुन्हा तक्रार आली नाही. बाकी इतर बाबतीत माझा नवरा एकदम गुणाचा आहे, त्याच्याच माझ्याबद्दल काही तक्रारी असतील!!
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Sun, 12/26/2010 - 07:12

In reply to बग्ज आणि फीचर्समधे फारसा फरक नसतो by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

<<<त्याच्याच माझ्याबद्दल काही

<<<त्याच्याच माझ्याबद्दल काही तक्रारी असतील!! फक्त त्याच्याच? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Sun, 12/26/2010 - 07:14

In reply to <<<त्याच्याच माझ्याबद्दल काही by शिल्पा ब

Permalink

बाकीचे मला रोजच्या रोज, बनवून

बाकीचे मला रोजच्या रोज, बनवून खायला घालत नाहीत, तेव्हा बाकीच्यांच्या तक्रारी कुठे सारायच्या हे मला माहित आहे. ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Sun, 12/26/2010 - 07:34

In reply to बाकीचे मला रोजच्या रोज, बनवून by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

पण तुम्ही केलेले खायची

पण तुम्ही केलेले 'खाद्यपदार्थ' (?) खायची दुर्दैवी आणि भयंकर वेळ आलेल्याबद्दल थोडीतरी सहानुभुती असावी (बाई)माणसाकडे!!
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Sun, 12/26/2010 - 07:59

In reply to बाकीचे मला रोजच्या रोज, बनवून by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

बाकीच्यांच्या तक्रारी कुठे सारायच्या हे मला माहित आहे

:-O (बाकीचे मला रोजच्या रोज, बनवून खायला घालत नाहीत, तेव्हा बाकीच्यांच्या तक्रारी कुठे सारायच्या हे मला माहित आहे. ) बिच्चारा :(
  • Log in or register to post comments

Submitted by मुलूखावेगळी on Sun, 12/26/2010 - 00:03

Permalink

>>>>>एकदा कान्दे आणायला

>>>>>एकदा कान्दे आणायला पाठ्विले असता मोठा कुकर घेउन आला सही माझे बाबा दर रविवारी महाग आणि खराब भाज्या आण्तात तर आई म्हणते की , सगळे भाजीवाले तुमची वाटच बघत असतील. त्यावर बाबा दरवेळेस म्हणत्तात जाउ दे ही शेवट ची वेळ ह्या वेळेस अ‍ॅड्जस्ट कर.
  • Log in or register to post comments

Submitted by मुलूखावेगळी on Sun, 12/26/2010 - 00:03

Permalink

>>>>>एकदा कान्दे आणायला

>>>>>एकदा कान्दे आणायला पाठ्विले असता मोठा कुकर घेउन आला सही माझे बाबा दर रविवारी महाग आणि खराब भाज्या आण्तात तर आई म्हणते की , सगळे भाजीवाले तुमची वाटच बघत असतील. त्यावर बाबा दरवेळेस म्हणत्तात जाउ दे ही शेवट ची वेळ ह्या वेळेस अ‍ॅड्जस्ट कर.
  • Log in or register to post comments

Submitted by पर्नल नेने मराठे on Sun, 12/26/2010 - 13:28

Permalink

अजुन एक सवय.. बाकिचे नवरे

अजुन एक सवय.. बाकिचे नवरे नेहमी बायकोला फोन करताना मी पहाते खास करुन जेवलिस का वैगरेसाठी तर हमखास. आम्च ध्यान चुकुनही फोन करत नाही, केलाच तर समजाव कि ह्याच माझ्याकडे काहितरी काम आहे किवा ह्याने १००% घोळ घातलाय व तो मला आता सोडवायचाय. किवा बायको कुठे एकटिच गेली असेल तर पोहोचली कि नाही ह्या काळजिने सुढ्हा नवरे फोन करुन विचरतात्...मी ह्याला म्हणाले कि तुला काहि काळजिच वाटत नाही तर वर हा म्हणाला कि मला १००% खात्री आहे तु जाशिल तिकडे निट जाशिलच.. घ्या आता :|
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Sun, 12/26/2010 - 14:15

In reply to अजुन एक सवय.. बाकिचे नवरे by पर्नल नेने मराठे

Permalink

१००% खात्री आहे तु जाशिल तिकडे निट जाशिलच..

नव-याला खात्री आहे ही गोष्ट वाईट आहे???????? नव-याला खात्री असली तरी त्याने फोन करायला पाहीजे कारण बायकोला "त्यामुळे" बरे वाटते. म्हणजे... च्यायला "त्या" ध्याग्यावर लिहायला एक कारण मिळाले. ;) धन्यु.
  • Log in or register to post comments

Submitted by पियुशा on Sun, 12/26/2010 - 14:58

Permalink

माझे बाबा पन असेच एक प्रश्न

माझे बाबा पन असेच एक प्रश्न १० वेळा विचर्नार ,तुझि मुल तुझा लाडामुळ बीघडलित हे तर नेहमिच वाक्य! आइ म्हनते ते बिघ्डु पर्यन्त तुम्हि हिमालयावर गेले होते का? रोजचिच गम्मत!
  • Log in or register to post comments

Submitted by अरुण मनोहर on Sun, 12/26/2010 - 15:38

In reply to माझे बाबा पन असेच एक प्रश्न by पियुशा

Permalink

हे सगळे मुलामुलींना आपोआपच

हे सगळे मुलामुलींना आपोआपच ट्रेनिंग होत असते!
  • Log in or register to post comments

Submitted by स्मृती on Sun, 12/26/2010 - 21:54

Permalink

अरेरे... शुचितै... तुमच्या

अरेरे... शुचितै... तुमच्या आणि माझ्या नवर् याच्या दु:खाची कल्पना आली मला.... अरे संदीप, कसा रे सहन करतोस.. खरा सहनशील बाबा तू! :( मुद्दा क्रमांक चार वर युद्ध चित्रपटांऐवजी कौटुंबिक मेलो मेलो मेलोड्रामा चित्रपट आणि मुद्दा क्रमांक नऊ वर खेळा ऐवजी पुस्तक... एवढाच काय तो फरक! अर्थात मेल च्या जागी फिमेल वाचावे हे सांगणे न लगे :)
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Sun, 12/26/2010 - 23:14

Permalink

>>आपल्या आईच्या हातचं खाणं

>>आपल्या आईच्या हातचं खाणं साक्षात अन्नपूर्णा आली तरी बनवू शकणार नाही असा अंधविश्वास बाळगणे. आता असते एखाद्याची आई सुगरण, सुनेने हे मान्य करण्याचा मनाचा मोठेपणा दाखवला तर काय बिघडलं !! :D
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Mon, 12/27/2010 - 01:59

In reply to >>आपल्या आईच्या हातचं खाणं by सूड

Permalink

तु म्हणतोस तो मुद्दा मान्य.

आता असते एखाद्याची आई सुगरण, सुनेने हे मान्य करण्याचा मनाचा मोठेपणा दाखवला तर काय बिघडलं !! परन्तु हे positively त्या पात्रतेपर्यन्त पोहोचलेले उदाहरण आहे. तीने मान्य केल आणि तीने करून दाखवले. नव्हे ती गेले (२६ पैकी) २३-२४ वर्षे करून दाखवत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by ramjya on Sun, 12/26/2010 - 23:29

Permalink

बिचारे नवरे

एक गाणे ऐकले होते रेडिओ वर " जब से हुई हे शादी,आसु बहा रहा हु, आफत गले पडी है,उस्को निभा रहा हु" हौस्टेल लाईफ बरी आहे...महिनाभर रूम झाड्लेली नसणे, आन्घोळील सुट्टी,वास मारणारे मोजे....लग्नानन्तर खरी गम्मत असेल्....तरी मिपाकारा कडुन बरीच माहिती मिळत आहे...धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश१११ on गुरुवार, 02/03/2011 - 19:11

Permalink

शुची - काय देऊ प्रतिक्रिया.

शुची - काय देऊ प्रतिक्रिया. मनापासून लिहिले. आवडले असे कसे म्हणू ..? सरळ बाण मारलात. आता खरेच स्वताचे परीक्षण करण्याची वेळ आली आहे . मी पण घरी मला हवे तसे काम करतो .माझ्या पद्धतीने. चूक आहे कबूल पण काम करीत नाही असे होत नाही . बायकाच नवरोबाला लाडावून ठेवतात मग उलटे टांगता. आहेतना अशा बायका ..? असो छान लिहिलेत. खूप शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com