+१
कृष्णा वडापाव- सारंग, सहकारनगर
यांचा वडापाव आता अजिबात चांगला राहिला नाही :-(
Relax - सारंग, सहकारनगर ची coffee अप्रतिम!
जयश्री गार्डन, टिळक रोड ची पावभाजी उत्तम.
अच्छा इकडं कुठलंही ठिकाण चालेल का? त्या धाग्यावर बृहन्मुंबै पर्यंतच मर्यादित होतं!
बरं मग आपली फेव्हरीट्स
१. मालवण मेढ्यातल्या साळगांवकरांच्या जय गणेश मंदिराच्या मागल्या बाजूस जय गणेश खानावळ आहे. तिथे साबुदाण्याची खिचडी उत्तम मिळते. अशीच उत्तम साबुदाण्याची खिचडी आणखी एका ठिकाणी खायला मिळाली होती ती गणपतीपुळ्याला देवळाबाहेर असणार्या बारक्या दुकानांतून.
२. पालीला पार्किंग जवळ वैद्यांची खानावळ आहे. तिथे सर्व प्रकारची न्याहारी उत्तम मिळते.
३. पोलादपूरला एसटी स्टॅण्डसमोर 'भगवती' खानावळ आहे. उत्तम जेवण!
४. त्याच खानावळीच्या समोरच्या बाजूला, महाबळेश्वर फाटा सोडून थोडं पुढे गेल्यावर डाव्याबाजूला लाईनीत दुकानं आहेत. त्या रांगेत एक म्हातारी आजीबाई चहाचा स्टॉल लावत असे! अमृतच ते!
५. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठल्याही बाजारातल्या कुठल्याही हाटेलात जाऊन चहा नि 'बाम' खा! जब्बरदस्त नाश्ता! एकेक बाम चहात बुडवून टपाटप खायला मजा येते!
६. बाकी एलपी/नाविक/विनोदा/कर्केराज/दहिसर चेकनाक्यावरचा कुठलाही अशा एखाद्या बार मध्ये जाऊन पेयपान झाल्यावर एक दालखिचडी मागवा! काम फिट्ट! असली अप्रतिम चव असते.. अहाहा!
७. रात्री १२ ते ४ वगैरे सायकली घेऊन फिरणार्या कॉफीवाल्यांकडे इडली चटणी मिळते! क्लासिक!!
मैद्यापासून (कन्फर्म करून सांगतो) बनवतात. गोडसर असतात. बारीक बारीक तळलेले गोळे, मूगाच्या भजीसारखे. गरम गरम खायला मजा येते! मध्ये फोडायचा चहात बुडवायचा नि गट्ट! पंधरावीस तर सहज!
मालवण मेढ्यातल्या साळगांवकरांच्या जय गणेश मंदिराच्या मागल्या बाजूस जय गणेश खानावळ आहे. तिथे साबुदाण्याची खिचडी उत्तम मिळते. अशीच उत्तम साबुदाण्याची खिचडी आणखी एका ठिकाणी खायला मिळाली होती ती गणपतीपुळ्याला देवळाबाहेर असणार्या बारक्या दुकानांतून. >>>
एक नंबर रे मेव्या !!
बहुतेक यादी आलेलीच आहे .
१ ) पुणे- औरंगाबाद प्रवासादरम्यान बस ' वडाळा-नाका' येथे जर थांबली तर प्लेटमधुन ओसंडुन जाणारी गरमागरम ' भजी ' खा . ऑस्सम !!(पुण्यात आजकाल मोजुन सहा भजी असतात.)
२) पुण्यातल्या कुठल्याही इराण्याच्या हॉटेलात शिरा. कोबी आणि वाटाणे असलेला कुरकूरीत 'पेपर समोसा ' मागवा . सोबतीला मिळालेच तर केच-अप, वर बोनस म्हणुन इराणि स्टाइलचा दुध मलाइ चहा.
३) औरंगाबाद ला मुस्लीम लग्नविधीत नान-कंदुरी मटण ,इतर पंगतीतले वांग्या-बटाट्याचे 'शाक' म्हणजे झकास असते. ( एकताय ना बिरुटे काका ,कोणाला पाकृ येत असेल तर द्या राव ,) औ.बाद मध्ये अजुन कुठे मिळते ही चौकशी ही आहे
४ ) रमजानच्या सिझनात , पुण्यातल्या मोमेनपुराला एक बाजार लागतो . तिथे मिळणारा ' मटण दालचा ", म्हणजे कल्लाच असतो .
५) वाडिया कॉलेजचा चौकात, अण्णाच्या टपरीत, गेल्या बारा-तेरा वर्षांपासुन चव न बदलेलेल्या, काहीही खा, भजी-ईडली-वडापाव-मिसळ-पॅटीस ..एक नंबर लागतात..पण त्याचे काही विषेश नाही. सर्वात चवदार असतो ते " दाल वडा ".
यादी बरीच मोठी आहे ..आलोच थोड्या वेळात !
अशीच उत्तम साबुदाण्याची खिचडी आणखी एका ठिकाणी खायला मिळाली होती ती गणपतीपुळ्याला देवळाबाहेर असणार्या बारक्या दुकानांतून.
+१००००
तिथली साचिखि तर अफलातून मस्त्..आणि त्या बारक्या दुकान कम टपरी हाटेलांत इतर जिन्नसही उत्कृष्ट मिळतात. मला वाटते देवळातून बाहेर पडल्यावर प्रदक्षिणामार्गाच्या दिशेकडे जाताना लायनीतले एकदम पहिलेच दुकान ब्येष्ट आहे.
तिथले नुसते फरसाणही किलोभर तरी विकत घेऊन यावे, घरीही मिसळीला अप्रतिम चव येते.
आमच्या औरंगाबादमध्ये:
१. उत्तम, गुलमंडी इथे मिळणार्या ईमरती (चक्कर येईल एवढ्या गोड असतात), मिरची भजे इ.इ.इ.
२. मथुरावासी, गोमटेश मार्केट इथे मिळणारे कांदा/लसुणरहित देसी घी सहित पदार्थ - भल्ला, चाट, गाजराचा हलवा इ.इ.इ.
३. शहराबाहेर - हिरण्य रिसॉर्ट , दौलताबाद घाट, मोमबत्ता तलावाखाली - हुरडा, वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, मांडे, पुरणाच्या पोळ्या
आणि रात्री बाराच्या नंतर
तारा पान सेंटर, उस्मानपुरा
३. शहराबाहेर - हिरण्य रिसॉर्ट , दौलताबाद घाट, मोमबत्ता तलावाखाली - हुरडा, वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, मांडे, पुरणाच्या पोळ्या
दोनच दिवसापुर्वी लाभ घेतला आहे. निवांत आनी छान व्हेज रिसॉर्ट आहे. येथे पाच टेंटही आहेत रहाण्यासाठी. १८०० रुपये प्रतिदिन.
'वैशालीच्या' एसपीडीपीची चव एवढ्यात बदलली आहे असे कोणाला वाटते आहे काय?
अतोनात पब्लिक असतं तिथे.......चव कशी राखणार?
पण अगदी नविनच हा पदार्थ वैशालीत सुरु झाल्यावर खुपच चवदार असायचा.
नुसत्या नोंदी करण्यापेक्षा शक्य झाले तर पदार्थांचे वर्णन करा. वाचणार्यांची लाळ टपकली पाहिजे आणि जीवाचा चडफडाट झाला पाहिजे (ह. घ्या.)
अहमदनगरमध्ये पूर्वी खूप वडापाव होते. आता संख्या कमी झाली आहे. तरी दोन वडापाव अजून प्रसिद्धी टिकवून आहेत. सगळ्यात भारी म्हणजे एकमुखी दत्ताच्या देवळाबाहेरचा वडापाव. संध्याकाळी आठनंतर गेलात तर फक्त भजी खावी लागतात. एक वडापाव खाऊन भागत नाही. किमान तीन वडापाव हाणल्याशिवाय जीभ आणि पोट गप्प बसत नाही. दुसरा वडापाव म्हणजे 'बेक्कार वडापाव'. याच्या नावावर जाऊ नका. आपण एखाद्या गोष्टीला 'भयानक सुंदर' म्हणतो तसेच नगरकर याला 'बेक्कार' म्हणतात. वड्यासोबत कापलेला कांदा आणि गोडसर चटणी मिळते. तेवढाच हुळहुळत्या जिभेला दिलासा. घासगल्लीच्या कोपर्यावर पण एक गाडी आहे, पण तिथला वडापाव 'बरा' कॅटॅगरीतला आहे.
पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे द्या ( प्रत्येकी ४ मार्कांचा प्रश्न)
१) तवा सुरमई डिशची वैशिष्ट्ये सांगा.
२) मुर्ग मसल्लम डिशचे वर्णन करा.
३) 'बाम' म्हणजे काय?
सुरमई डिश : (पुना गेट , निगडी) -
मी २००४-७ मध्ये निगडी ला कॉलेज ला होतो, तेंव्हा ३ ही वर्ष मी प्रत्येक पार्टी याच हॉटेलात केली होती , अआणि स्टारटर सेम - तवा सुरमई .. ( नंतर नंतर .. २ -२ प्लेट घेवुन हेच जेवण असायचे आणि नंतर फ्रूट पंच)
तवा सुरमई - या हॉटेल मध्ये मस्त ३० सेंमी (अंदाजे, त्या ही पेक्षा मोठी असते, म्हणजे मोठ्या ताटात सरळ मावेल अशी) अशी लांब सुरमई मसाल्यामध्ये आणि तव्यावर केलेली मिळते. (अशी बनवतात माहित नाहि)
त्यात भरलेला मसाला खुप अप्रतिम आहे. तो कोकण्/मंग्लोरीअन या स्टाईल मध्ये बनवलेला असतो .
४ माणसे एक सुरमयी आरामात स्टारटर म्हणुन फस्त करु शकतात.
आम्ही चौघेजण अस्लो की २ मागावयचो आणि मग फक्त भात खाल्ला की जेवण समाप्त होत असे ..
(बाकी मला व्यवस्तीत वर्णन नाही करता आले , पण आपले म्हणने ऐकुन लिहिले आहे. कोणॅए येथे खाल्ली असेन सुरमई तर सांगा ना जरा व्यवस्थीत राव)
तसेच
फ्रुट पंच
हे देखिल येथील वेगळे आणि मस्त आहे, अजुन असे जाड भरीव थर मी कुठल्याच हॉटेलातील फ्रुट पंच मधेय बघितले नाहियेत.
खरं तर तो माणिक चौक नाही. पण तिथुन दोन मिनिटांवर.
सोपानरावचा वडा म्हणुन पुर्वी (सुमारे १०-१२ वर्षांपुर्वी) अप्रतिम वडा मिळत असे. नंतर वरीजनल सोपानराव बदलला, वडा छोटाही झाला आणि पुर्वी इतका झकास उरला नाही. (माझं मत)
ह्या सोपानरावाबद्दल बर्याच दंतकथा होत्या. एक नेहमीची म्हणजे तो रोज एव्हढे वडे बनवतो की उकडलेले बटाटे तो एका मोठ्ठ्या टबात घालुन पायाने रगडतो वगैरे.
त्याच्या वड्याची चव इतकी भारी असते कारण बटट्यांमध्ये त्याचा घाम (वगैरे वगैरे) मिसळलेले असते.
सगळ्यात हैट्ट म्हणजे, इन्कम टॅक्स वाल्यांनी त्याच्यावर रेड टाकली. त्याच्या गाडीच्या आसपास लोकांनी टाकलेले कागद मोजुन त्यांनी ह्याचे उत्पन्न ठरवले.
वरीजनल सोपानराव नंतर, गंज बाजारात महाराज म्हणुन एक वडेवाल्याचं दुकान होतं, त्याचे वडेही छान असत.
पुण्यात डहाणुकर कॉलनीत, अन्नपुर्णा म्हणुन वडे मिळत असत( अजुन सुरु आहे की माहित नाही) संध्याकाळी गरम गरम खायला गेलात तर ४-५ असे फस्त कराल इतके भारी असतात. असो.
बाकी सर्वात बेस्ट लागायचा तो, सहा महिन्यांनंतर मद्रासहुन परत येताना पहाटे पहाटे सोलापुरात खाल्लेला वडा. एकदा चेन्नईलाही (सावकार पेठेत) वडा-पाव मिळाला होता . असो.
'भयानक सुंदर'
खरय. चितळे रोड जेथे संपतो आनी नालेगाव चालु होते तेथे त्या चौकात हा वडापाव मिळायचा. साधारण १९८९-९० ला हा सुरु झाला. त्यावेळेस मी नालेगावातच रहायचो. तिथे होतो तोपर्यंत आमची संध्याकाळ बेक्कारकडेच जायची.
हे नाव ईतके फेमस होते की लोक दोन वडापाव द्या ऐवजी दोन बेक्कार द्या असेच म्हणायचे.
एकमुखी दत्ताच्या देवळाबाहेरचा वडापाव.
सोपानचा वडा हा आमच्या (म्हणजे सासूसासर्यांच्या) जावयांचा लाडका आहे म्हणे.
नुकत्याच झालेल्या भेटीत त्यांनी त्यांच्या कॉलेजच्या मित्रांबरोबर पैज लावून वडे खाल्ले.
बर्याच वर्षांपूर्वी मी जावयांच्या आईवडीलांना 'त्यात काय एवढे?' असे म्हटल्याबरोबर लगेच जाऊन त्यांनी सोपानचे वडे आणले होते. एक खाऊन माझे समाधान झाले. नंतर चमचाभर साखर खावी लागली.;)
नगरला अप्पूहत्तीचा चौक आहे तिथे मिळणारी कचोरी भेळ (अंबिकाची) मला फार आवडते.
नगरला अप्पूहत्तीचा चौक आहे तिथे मिळणारी कचोरी भेळ (अंबिकाची) मला फार आवडते.
लाल टाकी एरिया जवळ मी रहायचो कॉलेजला असताना तेंव्हा नुकताच तो अप्पुहत्ती आनी लहानशी बाग झाली होती.
बाकी भेळ खाल्लीय तिथे पण अंबिकाची होती की नाही ते आठवत नाही.
बास की आता. किती आठवणी काढून जळवाल?
सोपानचा वडा, बॉम्बेवाल्याची बासुंदी, बन्सीमहाराजचे गुलाबजाम, रसनाची मिसळ, वर्धमानसमोरची रगडाकचोरी, सरदवाडीची कोरडी भेळ, नगरकॉलेजचा कढीवडा, महेंद्रचा पेढा, प्रभात बेकरीच्या पॅटीज, सिद्धीबागेतली सुधाकरची ओली भेळ, दुर्गासिंग आणि द्वारकासिंगची लस्सी वगैरे चवी आठवल्या की फार त्रास होतो जीवाला.
सोपानचा वडा, बॉम्बेवाल्याची बासुंदी, बन्सीमहाराजचे गुलाबजाम, रसनाची मिसळ, वर्धमानसमोरची रगडाकचोरी, सरदवाडीची कोरडी भेळ, नगरकॉलेजचा कढीवडा, महेंद्रचा पेढा, प्रभात बेकरीच्या पॅटीज, सिद्धीबागेतली सुधाकरची ओली भेळ, दुर्गासिंग आणि द्वारकासिंगची लस्सी वगैरे चवी आठवल्या की फार त्रास होतो जीवाला.
व्वा मस्त आठवणी. जवळपास सर्व पदार्थ खायचा योग आला आहे. नगरकॉलेजचा कढीवडा तर फारच मस्त. ग्राऊंडच्या कट्ट्यावर बसुन आजुबाजुची हिरवळ पहात हा कढीवडा खाण्याची लज्जत काही वेगळीच. मी ११-१२ वीला नगर कॉलेजलाच होतो , होस्टेलवर रहात असे.
रात्री बॉम्बेवाल्यासमोर काही दुधाच्या गाड्या लागत. मोठ्मोठ्या कढया भरुन दुध तापवतात. बरोबर मलाई बर्फीही छान मिळते तिथे.
रात्री बॉम्बेवाल्यासमोर काही दुधाच्या गाड्या लागत. मोठ्मोठ्या कढया भरुन दुध तापवतात. बरोबर मलाई बर्फीही छान मिळते तिथे.
हो. आणि खास नगरी स्टाईलचा फालुदासुद्धा. घट्ट दुधात शेवया, सब्जा बी, भरपूर सुकामेवा आणि कधी कधी आईस्क्रीमचा छोटा गोळा टाकलेला हा फालुदा मला लहानपणी फार आवडायचा.
माझे लहानपन नगर ला गेले, प्रेमदान चौ़का जवळ (झोपडी कँटिन च्या पुढे) रहायचो ८५ ते ९० पर्यंत त्या वेळी आम्हि रोयल कुल्फि खायचो १ रु. मिळायचि तेव्हा मस्त पिस्ता कुल्फि होति...आता मिळ्ते का?
माझे लहानपन नगर ला गेले, प्रेमदान चौ़का जवळ (झोपडी कँटिन च्या पुढे) रहायचो ८५ ते ९० पर्यंत त्या वेळी आम्हि रोयल कुल्फि खायचो १ रु. मिळायचि तेव्हा मस्त पिस्ता कुल्फि होति...आता मिळ्ते का?
मीही त्या कुल्फीचा आनि स्नॅक्सचा लाभ घेतलेला आहे. ८८-८९-९० ला मी प्रेमदान्च्या समोर तोरणा कँटीनला नेहमी बसायचो माझ्या बीएचएमएस च्या मित्रांबरोबर. आता मीळते का ते माहीत नाही.
एकदा पाइप लाइन रोड ,च्या चोकात येउन पाहा ईथ्लि चव घेउन पहा ,पानिपुरि,मिसल ,पाव्भाजि,पुलाव्,चाएनिज,
सेर्व झक्कास ,कचि दाबेलि, आनि वडा क्या बात वडा, क्या बात , क्या बात !
वर्धमानच्या दुकानासमोर अजून पाणीपुरी, रगडा, कचोरी चांगली मिळते.
मथुरा होटेल शिवाय कुठलीच पाणीपुरी आवडतं नाही.
रच्यकाने
परवा वडगाव शेरी ला ब्रम्हा गार्डन जवळ पहिल्यांदा ७ वेगवेगळ्या चवीची पाणीपुरी खाल्ली , व्यवसायातील कल्पकता आवडली.
द्येवा,
चहाबद्दल लिहिताना फुगेवाडी नाक्यापासचा 'अशोक' विसरलात का? :)
अर्धा अर्धातास तिथं चहा पित बसणारं पब्लिक अजुनही आहे. कित्येक ओळखी तर 'अशोक'ला चहाच्या टेबलावर नेहमी पाहून पाहोन झाल्या आहेत इतकं फेमस है ते. :)
शनिवारपेठेत 'रामदास'ची मिसळपण भारी (होती.)
चाकण (की त्याच्या थोडं पुढे गेल्यावर) समाधान म्हणून एक हाटिल आहे. तिथलं मटण...अग्ग्ग्ग्ग्गं! नादच करायचा नाही!
डेक्कनला सोहममध्ये भरल्या वांग्याची भाजी, वांग्याचं भरीतही छान मिळतं आणि सोलकढीदेखील. तिथं गेल्यावर (तिथंच काय, कुठेही गेल्यावर) मी निम्मं जेवण तर सोलकढीवर संपवतो. :) (अधिक माहितीसाठी भेटा अथवा लिहा- मिपा सदस्य : मनिष. ;) )
औंधच्या ब्रेमेन चौकातून खडकीकडे जायला उजवीकडे वळलं, की स्पायसर कॉलेजच्या आधी एक कळकट खानावळ दिसते. 'महाराष्ट्र हॉटेल' म्हणून. तिथे खिमा आणि पाव खाऊन पहावा. :) येक लंबर!
डेक्कनला जिमखाना ग्राऊंडपाशी चितळेंच्या कोपर्यावर साबुदाणा खिचडी एकदम ब्येष्टेष्ट मिळते राव.
आणखी काही आठवतील तशी सांगेनच.
मी निम्मं जेवण तर सोलकढीवर संपवतो.
हावरटच दिसताय.
मग जा नाशिकला महामार्ग बसस्टँडजवळ साहेबा मधे. सोलकढी तर अप्रतिमच. व्हेज नॉनव्हेज , भाकरी , मिरचीचा ठेचा, कांदा ,चटणी सगळंच मस्त.
>> मग जा नाशिकला महामार्ग बसस्टँडजवळ साहेबा मधे. सोलकढी तर अप्रतिमच. व्हेज नॉनव्हेज , भाकरी , मिरचीचा ठेचा, कांदा ,चटणी सगळंच मस्त.
आयशप्पत काय आठवण काढली राव! लै लै लै खास! आणि सायबा मध्ये तितर फ्राय मस्त मिळतो म्हणे! ही ऐकीव आणि देखीव माहिती! :D
>>>> शनिवारपेठेत 'रामदास'ची मिसळपण भारी (होती.)
+ १
तिथेच श्री ची मिसळ पण चान्गली आहे.
आणि चहा शनिवारपेठेत 'रामदास' च्या जवळच अम्रुततुल्य चहा मिळ्तो .
१ नम्बर आहे.
मी शनिवारी न रविवारी फक्त तिथेच चहा पिते
प्रतिक्रिया
कृष्णा वडापाव- सारंग,
हो आहे अजुन चालु ..
पूर्वी चांगला होता
सहकार नगर ला माझी रुम होती ३
+१ कृष्णा वडापाव- सारंग,
+१ सहमत चव पहिल्यासारखी
मिसळ
अच्छा इकडं कुठलंही ठिकाण
मस्त .. गणप्ती पुळ्याला जाणार
मैद्यापासून (कन्फर्म करून
सिंधुदुर्ग ला अजुन गेलो
खादाडी !!
अशीच उत्तम साबुदाण्याची खिचडी
औरंगाबादमध्ये:
ओहोहोहो....
हिरण्य रिसॉर्ट
आत्ता नक्की आठवत नाही पण
पैठण गेटजवळ बरेच गाडे असतात,
आत्ता नक्की आठवत नाही पण
एस्.पी.डि.पी मल्टीस्पाईस,
'वैशालीच्या' एसपीडीपीची चव
चव बदलली आहेच. पण
शक्य झाले तर पदार्थांचे वर्णन करा...
सुरमई डिश : (पुना गेट ,
अहमदनगर मध्ये बहुतेक तो "
माणिक चौक
खरं तर तो माणिक चौक नाही. पण
'बेक्कार वडापाव'
एकमुखी दत्ताच्या देवळाबाहेरचा
अप्पूहत्तीचा चौक
अप्पू चौकात भेळेपेक्षा पाणीपुरी चांगली मिळाली...
बास की आता. किती आठवणी काढून
सोपानचा वडा, बॉम्बेवाल्याची
रात्री बॉम्बेवाल्यासमोर काही
माझे लहानपन नगर ला गेले,
रॉयल कुल्फी आणि फेमस व्हेज
जोशी 'ले'
एकदा पाइप लाइन रोड ,च्या
बास की आता. किती आठवणी काढून
मथुरा
द्येवा, चहाबद्दल लिहिताना
धमालराव
>> मग जा नाशिकला महामार्ग
तर हो!
मी तर
>>>> शनिवारपेठेत 'रामदास'ची
आणि चहा शनिवारपेठेत 'रामदास'
हो तोच कयम गर्दी असते तिथे
वडापाव?
हो खाल्लाय छान असतो पण