पोटपुजेची ठिकाणे
रोमनाचा धागा बघितला .. आणि वाटले ज्याला जिथले पदार्थ आवडतात तो येथे त्या ठिकाणाची माहिती लिहिन ..
त्यामुळे केंव्हाही कोठे ही महाराष्ट्रभर फिरलो तरी कळेल की कोठे काय छान मिळते.
परवाच एका च्या सांगण्यावरुन .. शिंदेवाडिच्या पुढे कैलास मध्ये रात्री जेवन केले पिठल भाकरी थाली अआणि इतर महाराष्ट्रियन पदार्थ .. जबराट आहे एकदम सगळे ..
असो ... खालील माहितीचा बाकीच्यांना उपोयोग होयील असे वाटते.
-------------------------------------
मिसळ :
१. सिन्नर ची मिसळ ही अतिशय उत्कृष्ठ आहे असे मला वाटते.. नंतर नाशिकची ..
२. कोल्हापुरची मिसळ खुप प्रसिद्ध आहे , पण मी कोल्हापुरमध्ये मेन ठिकाणी खाल्ली नसेन म्हणुन येव्हडी आवडली नाही, शिवाय त्याबरोबर ब्रेड होते म्हणुन मज्जा आली नाही. (कोल्हापुरला २ दाच गेलो आहे फक्त म्हणुन माहीती नाही काही)
३. पिंपरी-वाघिरे ( पिंपरी-चिंचवड, निअर पिंपळे सौदागर, पुणे) - जनता मिसळ हाउस मध्ये खुप भारी मिसळ मिळते .. दर विकएंड ला जातो मी घरी गेल्यावर.. मसाला ते कोल्हापुर मधुन मागवतात आणि फरसान घरीच बनवतात म्हणुन तर खुप जबरी लागते ...
जवळच तेथे निसर्ग म्हणुन हॉटेल आहे तेथे ही छान मिळते मिसळ.
बाकी अजुनहि खुप भारी ठिकाणे असतीलच ...
वडापाव :
१. कृष्णा वडापाव- सारंग, सहकारनगर - मला येथील वडापाव खुप आवडतो.
तळजाईला जाताना हमखास येथे वडापाव खातोच .. खुप मोठी रांग असते येथे.;
२. अहमदनगर : येथील एका चौकातील वडापाव खुप फेमस आहे, पण नेमके नाव विसर्लो त्याचे .. नगरकरांनी सांगावे .. खुप पुर्वी गेलो होतो म्हणुन आठवत नाहिये .
३. कुंजविहार, ठाणे पश्चिम.
पिठल भाकरी /शेव भाजी
१. सोहम , डेक्कन जिमखाना, पुणे
२. कैलास , निअर शिंदेवाडी आणि निअर खेड शिवापुर, मुंबई-बँगलोर हायवे.
चहा :
१. टिळकरोड, पुणे येथील कुठल्याही अमृततुल्य मध्ये , खास करुन टिळक येथे आणि शक्तीस्पोर्ट समोर ( बहुतेक नाव : आंबाई आहे.. देवीचे नाव आहे हे नक्की पण)
२. त्रिवेणी : जंगली महाराज रोड.
३. भवानी : गजानन महाराज मठा शेजारी.. पर्वती पायथ्याकडुन मठाकडे येताना. (क्रिमरोल पण खुप छान आहे इथला).
४. माऊली : पिंपरी-वाघिरे ( पिंपरी-चिंचवड, निअर पिंपळे सौदागर, पुणे)
तवा सुरमई:
१. पुना गेट , निगडी. NH4 पुणे -मुंबई हायवे.
( नक्की खा, मी कायम खातो .. खुप वेगळी अआणि मस्त आहे. मुंबईत ही नाही मिळाळी अशी अजुन.
चिकन/चिकन थाली
१. हॉटेल सिंधुदुर्ग, निअर शिवसेना भवन, दादर , मुंबई.
२. गोमंतक , दादर , मुंबई.
३. गोविंद गार्डन, पिंपळे सौदागर, पुणे. (मुर्ग मसल्लम)
- बाकी आठवेन तसे देइन .. आपण ही आपल्या जवळील माहिती द्यावी
(नोट : असो आपली माहिती देत रहा अशी विनंती .. आणि आम्हीच दिलेले भारी आणि तुम्ही दिलेले टुकार असे म्हणुन भांडन करु नये ही सुचना )
वर्गीकरण
प्रतिक्रिया
कृष्णा वडापाव- सारंग,
हो आहे अजुन चालु ..
पूर्वी चांगला होता
सहकार नगर ला माझी रुम होती ३
+१ कृष्णा वडापाव- सारंग,
+१ सहमत चव पहिल्यासारखी
मिसळ
अच्छा इकडं कुठलंही ठिकाण
मस्त .. गणप्ती पुळ्याला जाणार
मैद्यापासून (कन्फर्म करून
सिंधुदुर्ग ला अजुन गेलो
खादाडी !!
अशीच उत्तम साबुदाण्याची खिचडी
औरंगाबादमध्ये:
ओहोहोहो....
हिरण्य रिसॉर्ट
आत्ता नक्की आठवत नाही पण
पैठण गेटजवळ बरेच गाडे असतात,
आत्ता नक्की आठवत नाही पण
एस्.पी.डि.पी मल्टीस्पाईस,
'वैशालीच्या' एसपीडीपीची चव
चव बदलली आहेच. पण
शक्य झाले तर पदार्थांचे वर्णन करा...
सुरमई डिश : (पुना गेट ,
अहमदनगर मध्ये बहुतेक तो "
माणिक चौक
खरं तर तो माणिक चौक नाही. पण
'बेक्कार वडापाव'
एकमुखी दत्ताच्या देवळाबाहेरचा
अप्पूहत्तीचा चौक
अप्पू चौकात भेळेपेक्षा पाणीपुरी चांगली मिळाली...
बास की आता. किती आठवणी काढून
सोपानचा वडा, बॉम्बेवाल्याची
रात्री बॉम्बेवाल्यासमोर काही
माझे लहानपन नगर ला गेले,
रॉयल कुल्फी आणि फेमस व्हेज
जोशी 'ले'
एकदा पाइप लाइन रोड ,च्या
बास की आता. किती आठवणी काढून
मथुरा
द्येवा, चहाबद्दल लिहिताना
धमालराव
>> मग जा नाशिकला महामार्ग
तर हो!
मी तर
>>>> शनिवारपेठेत 'रामदास'ची
आणि चहा शनिवारपेठेत 'रामदास'
हो तोच कयम गर्दी असते तिथे
वडापाव?
हो खाल्लाय छान असतो पण