Skip to main content

एक नवा घोर

लेखक सन्जोप राव यांनी मंगळवार, 14/12/2010 05:50 या दिवशी प्रकाशित केले.
पार्श्वभूमी - हातकणंगले तालुक्यातल्या मौजे रांजणवाडी बुद्रुक मध्ये घडलेली ही सत्य घटना आहे. म्हणजे घटनाच आहे, पण सत्य आहे. किंवा सत्यच आहे, पण घटना आहे. ______ काही दिवसांपूर्वी रांजणवाडी बुद्रुकमध्ये ग्रामसभा होती. या सभेमध्ये सकाळच्या पारी गावाबाहेर 'बसायला' जाणार्‍या ग्रामस्थांना आणि त्यांच्या मुलांना सरपंचानी आमंत्रित केले होते. हेतू हा होता की सरकारच्या नव्या नियमांची या लोकांना माहिती द्यावी आणि लोकांना घरोघरी बांधकामासाठी प्रोत्साहित करावे. पण झाले भलतेच. या सरपंचांनी सुरुवातीलाच भलताच सूर लावला. त्यांनी भाषणात सांगितले की - आपल्या गावात सकाळीसकाळी बाहेर बसायला जाणार्‍या लोकांचा पाठलाग करुन त्यांना (मुद्देमालासकट? रंगेहाथ?) अटक करण्याचा ग्रामपंचायतीचा इरादा आहे. त्यामुळे गावकर्‍यांनी सावध राहावे. पाठलाग करण्याचा कामावर नेमण्यात आलेल्या भरारी पथकात चपळ आणि वेगवान लोकांचा भरणा आहे. एकतर 'त्या' अवस्थेत पलायन करणे हे गुन्हेगारांना फारच गैरसोयीचे होईल आणि दुसरे म्हणजे अटक झालेल्या आरोपींना त्यांची वैयक्तिक स्वच्छता पूर्ण झाल्यानंतर कडक शासन करण्यात येईल. सरपंचांनी सदर भाषणात 'बूच' किंवा या अर्थाचे काही इतर ग्राम्य शब्द वापरले. तेंव्हा ग्रामस्थांनी काळजी घ्यावी आणि आपापल्या आवारांत सरकारी अनुदानाने काही विशिष्ट कार्यपूर्तीसाठीची आवश्यक अशी बांधकामे करुन घ्यावीत. यावर ग्रामस्थांना हसावे की रडावे तेच समजेना. हे सरपंच घाबरवत आहेत की प्रोत्साहन देत आहेत तेच कळत नव्हते. मौजे रांजणवाडी बुद्रुकमध्ये खाजगी बांधकाम अतोनात महाग आहे. पब्लिकसाठी म्हणून केलेल्या सुविधांमध्ये काही वेगळ्याच समस्या आहेत. प्रायव्हेट सुविधांमध्ये ह्या समस्या नाहीतच याची शाश्वती नाही. काळजीने मौजे रांजणवाडी बुद्रुकच्या ग्रामस्थांना खूप घोर लागला आहे. या जागतिक समस्येवर मंथन होऊन त्यातून उत्तररुपी नवनीत हाती लागावे, म्हणून हा लेखनप्रपंच.

वाचने 9420
प्रतिक्रिया 45

प्रतिक्रिया

हा धागा विडंबन नसून अश्लाघ्य साहित्याचा विकृत प्रकार आहे. तरी मी संपादकांना विनंती करतो की हा धागा त्वरित संपादित करण्यात यावा.

In reply to by गुंडोपंत

ते होणार असेल तर ते होईलच. आपण मॉरल पुलिसिंग केले नाही तरी चालेल. आणि वकीली चालत नसेल तर दुसरा धंदा शोधा. असे अशील बळकावण्याचा प्रयत्न नको.

आवरा!!! हसून हसून मरायची वेळ आली आहे. :-D भरारी पथक काय ...... त्या अवस्थेत पळणारी लोकं काय ..... सॉलीड!!!!!!

In reply to by शुचि

ह्याला म्हणतात खिलाडू वृत्ती!! ये गुंडोपंत को गुस्सा क्यू आता है?

जीएंच्या कथांमधली माणसं, राक्षस, दीपस्तंभ, झालंच तर कस्तुरीमृग हे घटक स्वतंत्र अस्तित्व घेऊन नव्हे तर रूपक म्हणून येतात. त्यामुळे अभिधेपासून फारकत घेऊन व्यंजनेचाच आधार घ्यावा लागतो. रावांचं हे लिखाणदेखील मला तसंच रूपकांनी परिप्लृत वाटलं. मला सापडलेल्या सामंतर्यात आश्चर्यकारकरीत्या सरपंच हे सरपंचच राहातात. मात्र मौजे रांजणवाडी बुद्रुक हे मिसळपाव.कॉम असावे की काय असा संशय घ्यायला जागा राहाते. मग ग्रामपंचायत, विधी, गावकरी वगैरे सर्व गोष्टींचा - अगदी बुचांपर्यंत - मेळ लागतो. आता मंथन होऊन काय लोणी हातात येतं ते पाहायचं.

In reply to by राजेश घासकडवी

डोस्क्यात काय घुसल असल तर शप्पथ ! इथे पोर झुकझुक गाडी खेळू र्‍हायले आनी तुमि इमान काय उडवताय. तुम्च इमान डॉस्क्यावरुन गेल.

In reply to by राजेश घासकडवी

मला वाटतं की रांजणवाडीचे सरपंच ज्या भाषेत बोलत आहेत ते भाषण गावातल्या टग्यांनी लिहून दिलेले असावे असे वाटले.

In reply to by राजेश घासकडवी

घासकडबी काकांचे बरोबर आहे. अभिदा आणि व्यंज्यने बरोबर उपमा आणि उत्प्रेक्ष्येचा अविश्कार हा लेखकाचा हातखंडा आहे लेखणीला कंड सुटलेला असताना प्रतिभेने बंड केल्यानन्तरचे लेखन हा वाचकाना प्रचम्ड दंड आहे असे काही काही वेळा वाटते मागल्या लौकीकाला जागून लेखनात आपोआपच कीक येईल असे लेखकाला वाटत असावे अशी शंका येवून वाचक मूक होतो. काही वेळा लेखनात दीप असला तरी बातमी चीप होती. असल्या लिखाणात वाचकाला काही गम्य असेल असा लेखकाचा रम्य समज असू शकेल पण अशा लिखाणाने वाचकाचा भ्रम निरास होतो आणि लेखकाने मांडलेली शब्दांची आरास ही शब्दांची अशी नुसतीच रास आहे हे कळून नवे काही वाचायला मिळेल ही आस विरून मानसीक त्रास होतो. काहितरी चांगले वाचायला मिळेल या आभासापोटी वाचणारांची मात्र नुसतीच गळफास होते.

वा! सरपंच भलतेच तडफदार दिसत आहेत. गावातील समस्येचे अगदी योग्य आकलन झालेले दिसत आहे. फक्त भरारी पथकातील सदस्यांनी विशिष्ट कार्यपूर्तीसाठीची आवश्यक अशी बांधकामे करुन घेतली होती की नाही आणि करुन घेतली असल्यास त्यांचा यथायोग्य उपयोग ते करत होते की नाही की पाठलाग करुन ग्रामस्थांवर दंड कारवाई झाल्यावर भरारी पथकातील सदस्यच त्या मोकळ्या जागेचा सदुपयोग करत होते हे कळाले नाही.

मध्यंतरी एका गावात भरारी पथक स्थापन करुन सकाळी क्रियामग्न व्यक्ती उघड्यावर आढळल्यास त्यांना गांधीगिरी पद्धतीने पथकातल्या सर्वांनी गाठून पकडून गुलाब फूल द्यायचे (लाज वाटावी आणि सर्वांमधे पसरावेही याकरिता) असे ठरून कारवाई सुरु झाली. एक मध्यमवयीन गृहस्थ (जे स्वतःच या "हागणदारी मुक्त गाव "प्रोजेक्टचे एक मेन मेंबर होते) त्यांनाच भल्या पहाटे कार्यमग्न अवस्थेत या पथकाने "स्पॉट" केले आणि फूल देण्याच्या क्रियेसाठी त्यांच्या मागे लागले असता लाजेस्तव हे गृहस्थ जिवाच्या आकांताने पळू लागले. त्यांना हार्ट ट्रबल होता. हार्टात कळ येऊन त्यांचे ताबडतोब प्राणोत्क्रमण झाले. ही बाजारगप नाही. सत्य घटना आहे. पेप्रात वाचली असेल कोणीतरी..

आपल्या देशाची लोकसंख्येचा विचार करता सर्वांचाच मुद्देमाल हस्तगत करुन त्याचा योग्य विनिमय केला तर आपल्या शेती मालाचे उत्पादन वाढुन राष्ट्रीय संपत्तीत भर पडेल. पंढरपुरच्या वारकर्‍यांची वाटेत एकाने आपल्या वावरात सोय करुन दिली होती त्यामुळे त्याच्या वावरातील शेतीमालाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे तो आता वारकर्‍यांना आग्रहाचे निमंत्रण देतो. ही माहिती आम्हाला वारकर्‍यांच्या वैद्यकीय पथकात काम करणार्‍या एका हितचिंतकाने दिली असल्याने विश्वासार्ह आहे. रांजणवाडी बु|| मधील ग्रामस्थांनी यापासून बोध घ्यावा.

In reply to by नरेशकुमार

वीज टेलीफोन यासारख्या अत्यावश्यक सेवा पुरवणार्‍या कंपन्यांनी बिले भरण्याचे सर्व प्रकारचे मार्ग व सुविधा या गरजेनुसार पुरवल्यामुळे त्यांच्या थकबाकीत लक्षणीय घट झाली व तिजोरीत वाढ झाली. बिले पटकन भरल्यास सूट देखील पुरवली जाते. म्हणजे पुर्वी दंड करुन जो महसुल वाढत नव्हता तो सूट देउनही वाढू लागला. ठिकाणे शोधत बसण्या पेक्षा बसल्या जागी सोय केली पाहिजे तरच महसुल वाढेल. लोकांनी क्रयशक्ती वाढवली पाहिजे. पायाभुत सुविधा असल्या शिवाय राष्ट्राची प्रगती होत नाही. आजच्या पायाभुत सुविधेवरील खर्च हे उद्याचे उत्पन्न असते.

In reply to by टारझन

खर तर आधुनिक विनोबांचा अवतार ही चळवळ वेगानी वाढवेल. उगीच नाही सोनखताला महत्व दिले आपल्या पुर्वजानी.

In reply to by स्पा

"गुदान " म्हणजे त्याना "गुदान गरम "असे म्हणायचे असेल .. होय ना टारझन भाउ??? टीप : ("गुदान" हा शब्द सलग आहे. मधेच एकही रिकामी जागा नाही याची सर्वानी नोन्द घ्यावी.)

In reply to by टारझन

मागे आम्ही उत्तराखंडला पर्यटनाला गेलो त्यावेळी तिथे सुलभ दानगृहाची सोय होती. तेथील व्यवस्थापकाने सांगितले की बहुसंख्य पर्यटक आदान प्रदान करायला इच्छुक असतात. त्याने असेही सांगितले की इतके दिवस आमच्या सरकराच्या ही गोष्ट लक्षातच आली नव्हती. लोक तिथे स्वखुषीने दानही करतात व वर सेवा मुल्यही देतात. यामुळे तेथील पर्यटक दात्यांची संख्या अक्षरशः तिप्पट चौपट झाली होती. दानपेटी विदेशी पद्धतीची सुबक व स्वच्छ असेल तर विदेशी पर्यटक सेवामुल्यही जास्त देतात.

In reply to by अवलिया

गु णवत्तेत फरक नसतो. पण दानपेटिका ही आकर्षक व स्वच्छ व विदेशी पद्धतीची असेल तर मिळणारे सेवा मुल्य हा जास्त मिळते हा अनुभव त्यानी सांगितला.

In reply to by प्रकाश घाटपांडे

माझ्या माहितीनुसार कोणत्याप्रकारचा कच्चा माल ( मराठीत रॉ मट्रेल) वापरला आहे त्यावर गु णवत्ता ठरत असावी. जाणकारांनी प्रकाश टाकावा ; ) -

In reply to by टारझन

सहमत. त्याचप्रमाणे सदर कच्चा माल प्रक्रिया करतांना वापरलेले इतर अनुषंगिक द्रव्य आणि त्यानंतर एकजीव होण्यासाठी केलेल्या शरिरबाह्य आणि अंतर्गत हालचाली यांचा सुद्धा कसा प्रभाव पडतो यावर सुद्धा जाणकारांनी प्रकाश टाकावा.

In reply to by अवलिया

सर्वांगिण परिस्थितीचा विचार करता , दात्याच्या आरोग्य परिस्थितीचा सुद्धा फरक पडत असावा. कारण ह्यामुळे कधी सढळ हाताने(इच्छा असो नसो) दान होत असावे तर कधी "जुदा होके भी .. तु मुझ मे कही बाकी है .. " किंवा तत्सम राग आळवुन दानकार्य होत असावे. जाणकार न सांगता प्रकाश टाकतीलंच !

In reply to by टारझन

कधी संचित माल फार नसतो पण दातृत्वाची उबळ येते तर कधी माल भरलेला असतो पण दातॄत्वाची उबळच येत नाही. ही प्रेरणा आतुन यावी लागते

In reply to by प्रकाश घाटपांडे

दानाविषयी दोन गोष्टी महत्वाच्या: एक. दान "सत्पात्री" पडावे. दोन. "या हाताचे त्या हाताला" कळू नये.. अतएव गुप्तदान असावे.

In reply to by टारझन

दानाचे प्रमाण आणि आस्तिक नास्तिक याचा काही परस्परसंबंध आपल्यातल्या प्रज्ञावान विचारवंताला दिसत आहे का? असल्यास कसा यावर प्रकाश टाकावा.

In reply to by अवलिया

प्रकाश यान्नि प्रकाष टाकुन टाकुन सगळे मिपा प्रकाशमय झालय. आनि आजपासुन सगळे सढळ हाताने दान करतिल याचि खात्रि वाटते.

In reply to by टारझन

पाच रुपयाचे नाणे व पाच रुपयाची नोट यात 'मुल्यात्मक' फरक नसला तरी वजनात व आकारात फरक असतो हे मान्य आहे. तसेच हजार रुपयांची नोट वा शंभराच्या दहा नोटा वा दहाच्या शंभर नोटा यात असणारा संख्येचा फरक असतो. ब्यांकेत म्हनुन तर डिनॉमिनेश लिवत्यात.

=)) =)) =)) =)) जबराट!! धागा आणि त्यावरील प्रतिसादही मस्त! धागा चोप्य पस्ते करुन संग्रही ठेवण्यात आला आहे! :)