एक नवा घोर
पार्श्वभूमी - हातकणंगले तालुक्यातल्या मौजे रांजणवाडी बुद्रुक मध्ये घडलेली ही सत्य घटना आहे. म्हणजे घटनाच आहे, पण सत्य आहे. किंवा सत्यच आहे, पण घटना आहे.
______
काही दिवसांपूर्वी रांजणवाडी बुद्रुकमध्ये ग्रामसभा होती. या सभेमध्ये सकाळच्या पारी गावाबाहेर 'बसायला' जाणार्या ग्रामस्थांना आणि त्यांच्या मुलांना सरपंचानी आमंत्रित केले होते. हेतू हा होता की सरकारच्या नव्या नियमांची या लोकांना माहिती द्यावी आणि लोकांना घरोघरी बांधकामासाठी प्रोत्साहित करावे.
पण झाले भलतेच. या सरपंचांनी सुरुवातीलाच भलताच सूर लावला. त्यांनी भाषणात सांगितले की - आपल्या गावात सकाळीसकाळी बाहेर बसायला जाणार्या लोकांचा पाठलाग करुन त्यांना (मुद्देमालासकट? रंगेहाथ?) अटक करण्याचा ग्रामपंचायतीचा इरादा आहे. त्यामुळे गावकर्यांनी सावध राहावे. पाठलाग करण्याचा कामावर नेमण्यात आलेल्या भरारी पथकात चपळ आणि वेगवान लोकांचा भरणा आहे. एकतर 'त्या' अवस्थेत पलायन करणे हे गुन्हेगारांना फारच गैरसोयीचे होईल आणि दुसरे म्हणजे अटक झालेल्या आरोपींना त्यांची वैयक्तिक स्वच्छता पूर्ण झाल्यानंतर कडक शासन करण्यात येईल. सरपंचांनी सदर भाषणात 'बूच' किंवा या अर्थाचे काही इतर ग्राम्य शब्द वापरले. तेंव्हा ग्रामस्थांनी काळजी घ्यावी आणि आपापल्या आवारांत सरकारी अनुदानाने काही विशिष्ट कार्यपूर्तीसाठीची आवश्यक अशी बांधकामे करुन घ्यावीत.
यावर ग्रामस्थांना हसावे की रडावे तेच समजेना. हे सरपंच घाबरवत आहेत की प्रोत्साहन देत आहेत तेच कळत नव्हते.
मौजे रांजणवाडी बुद्रुकमध्ये खाजगी बांधकाम अतोनात महाग आहे. पब्लिकसाठी म्हणून केलेल्या सुविधांमध्ये काही वेगळ्याच समस्या आहेत. प्रायव्हेट सुविधांमध्ये ह्या समस्या नाहीतच याची शाश्वती नाही.
काळजीने मौजे रांजणवाडी बुद्रुकच्या ग्रामस्थांना खूप घोर लागला आहे. या जागतिक समस्येवर मंथन होऊन त्यातून उत्तररुपी नवनीत हाती लागावे, म्हणून हा लेखनप्रपंच.
प्रतिक्रिया
हा धागा काढावा
अल मखदूम, मखदूम!
हाहाहाहाहा..माईंड मॅप
खलास!!!!
हे घ्या..
रूपकात्मक लिखाण
डोस्क्यात काय घुसल असल तर
प्रकाटाआ
मस्त प्रतिसाद
थोडा फरक
घासकडबी काकांचे बरोबर
मेलो...
वा! सरपंच भलतेच तडफदार
बुच मारुन काय उप्योग होणार नाही.
बकवास विडंबन
लिहिण्याचे श्रम वाया जाणार
+१
मध्यंतरी एका गावात भरारी पथक
मुद्देमाल
आमि मुद्देमाला सकट राष्ट्रीय
सोयीचे
पकाकाकांशी सहमत आहे. दोन
होय
कहर आहे हा..............
श्रेष्ठ दान .. गुदान "
गुदान नाही
gudang मधील "g"(शेवटचा) साइले॑ट ..
आदान प्रदान
=)) =)) =)) =)) सर्व
विदेशी आणी स्वदेशी दानाच्या
नाही
माझ्या माहितीनुसार
सहमत. त्याचप्रमाणे सदर कच्चा
सर्वांगिण परिस्थितीचा विचार
टारझनभाऊ.. काय हे? हसून
"जुदा होके भी .. तु मुझ मे कही बाकी है .. "
मान्य
हे दान..
सहमत आहे, पात्र स्वच्छ नसेल
बाजारात बाह्यप्रेरक उपलब्ध
चला ... ऑफिसातुन निघायची वेळ
दानाचे प्रमाण आणि आस्तिक
प्रकाश यान्नि प्रकाष टाकुन
पाच रुपयाचे नाणे व पाच
=)) =)) =)) =)) जबराट!! धागा