वा , फारच छान फोटो आहेत सर्व . थायलंड ट्रिप ची आठवण जागी झाली . (मी ८-९ वर्षापूर्वी थायलंड ला गेले होते. )
बँकॉक मधील वातारूण (Wat Arun) टेम्पल , नदीतले फ्लोटींग मार्केट , पॅलेस, डाऊनटाऊन, हत्ती आणि मगरींचा थरारक शो ..सगळच सही .
पुढचे भाग लवकर टाका. वाचायला उत्सुक.
ईश्वरी
सुंदर लेख ओंकार अन भरपुर सुरेख छायाचित्रांबद्दल धन्यवाद :)
>>अयुथया - अयुत्थ्या (अयोद्ध्या)
'ऍना अँड दी किंग ऑफ सयाम' या पुस्तकात अयोध्येचा असाच उल्लेख होता असे स्मरले.
फोटो छान आहेत. थायलंड बद्दल कुतूहल आहेच. अजून पुढे लवकर लिहा. एक प्रश्न नेहमी पडतो, थाय संस्कृति वर भारताचा एवढा प्रभाव आहे, पण आज तिथे भारता बद्दल किंवा भारतीय संस्कृतिबद्दल एकंदरीत काय मत आहे? ते भारताला कोणत्या नजरेने बघतात? तुम्हाला असे काही माहित असेल तर जरूर लिहा.
बिपिन.
थायलंडची सचित्र सफर घडवुन आणलीत. पुढील लेखाच्या व चित्रांच्या प्रतिक्षेत
हेच म्हण्तो आहे !
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
आपल्याकडे "अरुणोदय" असं म्हणतात, त्याचप्रमाणे हे अरुन सवास आहे काय? (माझी आपली शंका!)
बाकी लेख मात्र अतिशय उत्तम. छायाचित्रे तर अप्रतिम!
असेच लेख अजूनही लिहावेत. चालू दे!
थायलंडची प्रकाशचित्रे सुरेखच आहेत.
रामायणातील प्रसंग बहुधा कुंभकर्णाचा असावा का काय असे वाटून गेले.
हे शहर ख्मेर राजवटीत वसवले होते आणि ते आधी राजधानीचे शहर होते.
अयुथ्थ्याबद्दल हा उल्लेख कुठे सापडला? कारण अयुथ्थ्याचे राजे हिंदू/बौद्ध असले तरी ख्मेर नसावेत आणि अयुथ्थ्याचा उदय ख्मेर घराण्याच्या पडत्या काळात झाला, शहरही तेव्हाच वसवले असावे असे वाटते. अयुथ्थ्याच्या एका राजाने सुमारे १४व्या शतकात (चू. भू. दे. घे.) ख्मेर घराणे खिळखिळे झाल्यावर त्यावर स्वारी केली होती असे वाटते.
ख्मेर राजवटीत वसवल्याचा उल्लेख चुकला. ख्मेर राजवटीच्या अस्तकाळात वसवले गेले असे वाक्य असावयास हवे होते. ख्मेर शिल्पकलेच्या प्रभावाबद्दल लिहायचे होते. ते राहून गेले. संदर्भ - http://www.tourismthailand.org/destination-guide/phranakhonsiayutthaya-14-1-1.html
सर्वच छायाचित्रे आवडली आणि वर्णनावरून देश बघण्याची इच्छा झालेली आहे.
सोनेरी रंग थायलंडमध्ये कुठच्यातरी एका काळात प्रिय झालेला दिसतो आहे. दुसरीकडे अयुथ्थ्यास मात्र इमारतींची नैसर्गिक रंगसंगती दिसते आहे.
मस्त चित्रे.
ओंकारा,
सर्व फोटू व वर्णन क्लासच आहे!
मला जुन्या थाई लाकडी घराचा फोटू सर्वाधिक आवडला! :)
पुढच्या भागांत फ्लोटींग मार्केट आणि थाई खादाडीबद्दल लिहीन. तूर्तास इतकेच...
अरे वाट पाहतो आहे रे! तुझ्या हा लेख म्हणजे मेजवानीच आहे. आम्हाला घरबसल्या थायलंडची चित्रदर्शी सफर घडली. आता थाई खादाडीचं सचित्र वर्णन येऊ द्यात!
तात्या.
प्रतिक्रिया
सुंदर चित्रे..
वा , फारच छान
सुंदर
ओम्कार
सुंदर लेख
अप्रतिम लेख
वरील सर्वांशी सहमत
सहमत...
थायलंडची
+१
अरुन सवास!!
मस्तच
अतिशय
छान लेख आणि
प्रकाशचित्रे आवडली
एकसे एक
सुंदर प्रकाशचित्रे, परंतु
चूक
धन्यवाद
छान
सुवर्णभूमी
क्लास!
व्वा!